सप्रेम नमस्कार.
या
आठवडयात जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, लातूरचे पांडुरंग पोळ, हिंगोलीचे
तुकाराम कासार साहेब यांना वार्तांकनाकामी केंद्रीय महिला व बालकल्याण
मंत्रालयाच्या कामात भेटलो. या शिवाय मुळचे मराठी आणि हिमाचल कॅडरचे मंडी जिल्हयाचे
तरूण जिल्हाधिकारी संदीप कदम आणि सर्वोत्कृष्ठ जिल्हाधिकारी म्हणून पंतप्रधानांच्या
हस्ते पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित मूळचे सोलपूरचे हरियाणा कॅडरचे चंदिगडचे जिल्हाधिकारी
अजित जोशी यांची भेट झाली. अजित जोशी साहेबांशी मी दिल्लीत आल्यापासून ओळखतो
त्यांच्या कामाची झलक प्रत्यक्ष हरियाणात जाऊन बघितली. अजित जोशींच्या कार्यावर अल्प
प्रकाश टाकणारी ही मुलाखात महान्यूज या राज्य शासनाच्या वेब पोर्टलवर प्रकाशित
झाली आहे. तीच मुलाखात खास आपल्यासाठी.
भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठी तारा : अजित जोशी
मंगळवार, २६ एप्रिल, २०१६
|
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी ‘जनधन योजनेच्या’ प्रभावी अंमलबजावणीसाठी यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा बहुमान प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांना प्रदान करण्यात आला.
अजित बाळासाहेब जोशी हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील रातंजनचे रहिवाशी. श्री.जोशी, हे २००३ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीचे अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात अव्वल तर देशात २९ वा क्रमांक मिळवणारे व हरियाणा कॅडरमध्ये काम करणाऱ्या श्री.जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे. महाराष्ट्राबाहेर काम करून त्यांनी महाराष्ट्राची अमीट छाप सोडली आहे. ‘पंतप्रधान पुरस्कार’ मिळाल्याने त्यांची कारकीर्द उजळून निघाली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याविषयी माहिती देणारी ही नेट भेट......
प्रश्न : चंदीगडमधे ‘जनधन’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल आपला
हा सन्मान झाला, त्याविषयी थोडक्यात सांगा?
उत्तर : पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील गोर गरीब जनतेचेही बँक खाते असावे या
उद्देशाने ‘जनधन’ योजना सुरु झाली. चंदीगडमधे या योजनेअंतर्गत १ लाख ९६ हजार बँक खाते
उघडण्याचे उद्दिष्ट आम्हाला देण्यात आले होते. आम्ही दिलेल्या मुदतीच्या आत जनधन
योजनेअंतर्गत २ लाख २० हजार बँक खाते उघडून नियत उद्दिष्टांपेक्षा उत्तम काम करून
दाखवले. गरीबांकडे असलेला पैसा नेमका कुठे आहे ते कळत नसे, पण
‘जनधन’ योजनेच्या माध्यमातून गोरगरीब
जनतेचे बँक खाते उघडून त्यांचा पैसा मुख्य प्रवाहात आला. या योजनेअंतर्गत विक्रमी
बँक खाते उघडून ६० कोटी रूपये बँक खात्यामधे जमा केले. स्थलांतरीत लोकांचे,
आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांची बँकखाते उघडून त्यांना विमा
सुरक्षा कवच प्रदान केले. गरजू व गोरगरीब जनतेला या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा
झाला.
प्रश्न : ‘पंतप्रधान
पुरस्कार’ पटकाविणे हे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचे
स्वप्न असते, स्वप्नवत असणाऱ्या या पुरस्कारासाठीची निवड
प्रक्रिया खडतर असते, त्याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : केंद्र शासनाच्या ‘जनधन’, ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’, ‘स्वच्छ विद्यालय’ आणि ‘मृदा परीक्षण पत्र (सॉईल हेल्थ कार्ड) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील जिल्ह्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी पूर्वोत्तर व पर्वतीय राज्यांतील १४१ जिल्ह्यांचा गट, केंद्रशासित प्रदेशातील २३ जिल्हे याव्यतिरीक्त देशातील ५१३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला. या सर्व जिल्ह्यांमधून पहिल्या टप्प्यात ७४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या ७४ जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण व बीएसएनएल फोन कॉलच्या माध्यमातून ७ लाख ६२ हजार लोकांकडून मत मागविण्यात आले, या आधारावर ७४ पैकी ३८ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या ३८ जिल्ह्यांमधे केंद्रातून २ अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले, त्यातील २४ जिल्ह्यांची या पथकाने निवड केली. अंतिम फेरीत केंद्रसरकारचे कॅबिनेट सचिव बी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीत ज्यात बाहेरील तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता त्यांनी अंतिम १० जिल्ह्यांची निवड केली. अशा प्रकारे सर्व चाचण्यांमधे जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उत्तम ठरलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत चंदीगडची निवड झाली.

प्रश्न : सुरुवातीला हरियाणामधे काम करताना काही अडचणी आल्यात का, त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : माझी
पहिली पोस्टींग पानिपत जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून झाली. या जिल्ह्याचा
तसा महाराष्ट्राशी थेट संबंध सांगता येतो. दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी मराठे उत्तरेत
आले होते. इथेच पानिपतची तिसरी लढाई झाली व त्यात मराठ्यांचा पराभव झाला होता.
महाराष्ट्राशी नाड असणाऱ्या जिल्ह्यात मला काम करायची संधी मिळाली. कामाचा पहिलाच
दिवस. एक वृद्ध व्यक्ती माझ्या कॅबीन मधे आली आणि खड्या बोलीत बोलू लागली. मला न
कळाल्याने मी स्वीय सहायकाला विचारले की, ही व्यक्ती नेमकं काय म्हणत आहे. मी त्यांचं काम केलं. मात्र, जाताना ती व्यक्ती म्हणाली, ‘सरकार भी कैसी अजब है,
हमारी भाषा जिन्हे समजती नही ऐसे लोगो को काम में लगाती है’.
पुढे काही दिवासांनी माझी बढती झाली तर त्याच गावातील लोकांनी माझी
घोड्यावरून मिरवणूक काढली. या प्रसंगापासून ते आजपर्यंत मला कोणतीही अडचण आली
नाही. हरियाणातले लोक रांगडे आणि परखड आहेत.
प्रश्न : आपण पानिपत या युद्धभूमीच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला, तिथे पानिपत महोत्सव सुरु केला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..
प्रश्न : आपण पानिपत या युद्धभूमीच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला, तिथे पानिपत महोत्सव सुरु केला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..
उत्तर : पानिपतला
पोस्टींग झाल्यावर मी पानिपतच्या युद्धभूमीला भेट दिली. या भूमीची दूरावस्था झाली
होती. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त राखण्यासाठी ज्या युद्धभूमीवर निकराचे प्रयत्न
करून प्राणपणाला लावून लढा दिला त्या भूमीचा जिर्णोद्धार करण्यासाठी मी पुढाकार
घेतला, आणि तिथे स्मारक उभारले. या युद्धभूमीला सिमेंटचे
कुंपन बांधून घेतले, सुशोभीकरण करून घेतले. २००६ पासून येथे
दरवर्षी ‘पानिपत महोत्सवाचे’ आयोजन
केले जाते. यास स्थानिकांचा व महाराष्ट्रातील मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रश्न : बिहारमधील एक गाव दत्तक घेऊन आपण महाराष्ट्राच्या दातृत्च
वृत्तीचे दर्शन घडविल्याचे आम्ही ऐकले आहे,
त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : मराठी
मातीतच दातृत्वाचे संस्कार आहेत आणि त्यामुळेच मराठी माणूस जगाच्या कोणत्याही
कानाकोपऱ्यात असला तरी आपली छाप सोडू शकतो हा माझा विश्वास आहे. वर्ष २००८ मधे बिहारमधे
कोसी नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणात हानी झाली. गावे वाहून गेली होती. तेव्हा मी
सोनिपत जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. मी बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील मुसेहारी या
अती मागास गावाला भेट दिली. हे गाव कोसी नदीच्या पुरामुळे पूर्णपणे वाहून गेले
होते. आम्ही हे गाव दत्तक घेतले. या गावाला नव्याने उभे करण्यासाठी सोनिपतच्या
जनतेला मी आवाहन केले. दुपारचे जेवण करू नका आणि तो पैसा आम्हाला द्या. लोकांनी
हाकेला प्रतिसाद दिला. बघता बघता आबाल वृद्धांनी आमच्याकडे १ कोटी ४३ लाख रूपये
जमा केले. या निधीतून आम्ही मुसेहारीत २२३ घरे उभारली. २२,००० चौरस मिटरचे रस्ते बांधले, ५०
हापशा उभारल्या, प्रसाधन गृह बांधले, समाज
मंदीर बांधले. त्यातूनही आमच्याकडे २० लाखांची रक्कम उरली. ती आम्ही पंतप्रधान
सहायता निधीत दिली. एखाद्या राज्यातील जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या राज्यातील एखादे
गाव दत्तक घेऊन ते विकसित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग होता. या गावाचे
लोकार्पण हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या हस्ते
बिहारमध्ये झाले होते. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही या
उपक्रमासाठी मला जाहीर शाबासकी दिली होती.
प्रश्न : भिंडावास पक्षी अभयारण्याच्या पुनरोद्धारासाठी आपण पुढाकार
घेतला, देशातील महत्वाचे
पक्षी अभयारण्य म्हणून या अभयारण्याकडे पाहिले जाते. त्याबद्दल जाणून घ्यायला
आवडेल
उत्तर : झझ्झर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळताना माझ्या कार्यक्षेत्रात असणारे भिंडावास पक्षी अभियारण्य दुर्लक्षित होते. त्यासाठी मी परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा केली. पुढे हेच भिंडावास झझ्झर जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेले पक्षी अभयारण्य म्हणून नावारूपास आले. परिसरातील ७ ते ८ गावातील गावकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन या अभयारण्यासाठी दिली त्यातून ११०० एकर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभे राहिले आहे. हिवाळ्यात या अभयारण्यात जवळपास अडीचशे प्रजातींचे दीड लाखांहून अधिक पक्षी येतात. विशेषत: ५० प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचाही यात समावेश असतो. भिंडवास पक्षी अभयारण्य व येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जास्तीत-जास्त पक्षीनिरीक्षक व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘बर्डस् ऑफ भिंडावास’ पुस्तक आणि ई-बुक, वेबसाईट व मोबाईल ॲप्लीकेशन तयार केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे गेल्यावर्षी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.

झज्जर, या
देशातील सर्वाधिक वीटभट्ट्या असलेल्या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी
म्हणून कार्यरत असताना श्री.जोशी यांनी वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या स्थलांतरीत
मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या भट्टाशाळेचे तर दस्तरखुद्द दिवगंत माजी
राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होते. स्थलांतरीत मजुरांची
समस्या असलेल्या काही आफ्रिकन देशांमध्येही भट्टा शाळेची संकल्पना एक मॉडेल म्हणून
राबविण्यात आली होती. मतदार याद्यांमधील घोळ मिटविण्यासाठी अजित जोशी यांनी पुढे
आणलेली बायोमेट्रिक प्रणाली (कॉमन इलेक्ट्रोल रोल) संकल्पना चांगलीच वाखाणली गेली.
श्री.जोशी यांना अजूनही कल्पक आणि नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा व
धडाडी आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कार घेऊन हरियाणा या आपल्या कर्मभूमीत कल्पक व
दर्जेदार काम करणारे चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी हे खऱ्या अर्थाने भारतीय प्रशासकीय
सेवेतील अनमोल मराठी तारा ठरले आहेत. श्री.जोशी यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र
परिचय केंद्र, नवी दिल्ली.

No comments:
Post a Comment