Monday, September 20, 2021

कोरोना विरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर

विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड१९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे. कोविड१९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका वठवत असून त्यांना आधार देत आले आहेत. राज्याने आरोग्य यंत्रणा बळकट करून हा लढा अधिक भक्कम केला परिणामी रुग्ण संख्येत घट झाली व रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. लसीकरणातही राज्याने देशात आघाडी घेतली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून कोरानाची संभाव्य तिसरी लाट परतवून लावण्याची तयारी केली आहे. राज्याने कोविड१९ च्या व्यवस्थापनासाठी केलेल्या यशस्वी कार्यवाहीवर प्रकाश टाकणारा हा लेख. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा राज्याच्या हातात योग्यती साधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती. मात्र, सव्वावर्षांत बऱ्याच साधनसामग्रीची उपलब्धता करण्यात आली. कोविड केअर सेंटर्स ,बेड्स,आयसीयू सुविधा,व्हेंटिलेटर्स,औषधी,मास्क,ऑक्सिजन उपकरणे अशा अनेक बाबी राज्याने उभारल्या. या सुविधा वाढविताना टाळेबंदीसह काही निर्बंधही लावले, याचाच सुपरिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात आलेल्या कोरानाच्या दुसऱ्या लाटेने आव्हान वाढवले. विशेषत: ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड झाली. मात्र, राज्याने तातडीने ‘मिशन ऑक्सिजन’ सुरु करून दररोज १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीसह ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष ठेवले. लसीकरणामध्ये महाराष्ट्राने दोन्ही डोस देण्यात देशात पहिले तर एकूण डोस देण्यात दुसरे स्थान मिळवून ६ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात यावर्षी कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला दिवसाकाठी ६० हजार रुग्ण संख्या झाली. याचा सामना करण्याकरिता उपचाराच्या सुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता,संसंर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले परिणामी जून महिन्यापासून राज्यातील कोरानाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत घट होवू लागली व आज हा आकडा ३ ते ४ हजारांच्या घरात आला आहे. राज्य शासनाने पहिली लाट थोपवताना उभारलेल्या सुविधांच्या जोडीला यावेळी उपचाराच्या नव्याने सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राज्यात उपलब्ध सुविधांवर एक नजर राज्यात ६०९ चाचणी प्रयोग शाळा आणि ५ हजारांहून अधिक कोविड केअर सेंटर्स आहेत. आजपर्यंत कोराना उपचाराच्या ६ हजार ९५९ सुविधा असून यात ४ लाख ९७ हजार ९७ आयसोलेशन खाटांचा (आयसीयू खाटा वगळून) समावेश आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ऑक्सिजन खाटा आहेत. राज्यात ३६ हजार ७०२ आसीयू खाटा असून १४ हजार २४५ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णांसाठी ३ लाख ५१ हजार ३३० खाटा उपलब्ध आहेत. कोविड संशयित रुग्णांसाठी १ लाख २७ हजार ७२१ आयसोलेशन खाटा, १५ लाख ८६ हजार ९६ पीपीई कीट आणि २६ लाख १८ हजार ८६० एन९५ मास्क उपलब्ध आहेत. मिशन ऑक्सिजनची घौडदौड कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात येत आहे. दररोज १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून ही क्षमता ३ हजार मेट्रीक टन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यक ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसवण्यात येत आहे. जून अखेर पर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लान्ट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती झाली. राज्यातील साखर कारखाने, पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी पाहता राज्याने अन्य राज्यांमधून ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन घेतला. आर्थिक पाठबळ कोरोना संसर्गाच्या संकटांचा निकराने सामना करण्याकरिता राज्यशासनाने आर्थिक पाठबळ दिले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३ हजार ३०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. राज्यातील ३५० आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रत्येक १ कोटी प्रमाणे ३५० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत . तुलनेने ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. लसीकरणात अव्वल राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त लसीनुसार राज्यात दररोज सुमारे ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४ टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला आतापर्यंत लस मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविड कृतीदलाची स्थापना ; ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात कोराना संसंर्गाची लाट आली तसे या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब‍ कल्याण मंत्री राजेश टापे यांच्यासह संबंधित विभागांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली. कोरोना संसर्गाची लाट थोपवून धरण्यासाठी व परतवून लावण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या राज्य कोविड कृतीदलाची स्थापना करण्यात आली. या कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींचा यात समावेश आहे. कोरानाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचे कृती दल तयार केले असून या १४ सदस्यीय कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु आहेत. मुख्यमंत्री महोदय कायम या कृतीदलांच्या संपर्कात असून त्यांनी या कृतीदलांच्यावतीने वेळोवेळी आयोजित परिषदांमध्ये सहभाग घेवून मार्गदर्शन केले आहे. संभाव्य तिस-या लाटेची तयारी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने नुकतेच ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संसर्गाविरूध्दच्या युध्दात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी आदी कोरोना योद्धे हे शस्त्र असल्याचे सांगितले. राज्यातील रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री,औषध उपलब्धतेबाबतही लक्ष देण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले. राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेसह सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांची पालकत्वाची भूमिका राज्यात सुरु झालेल्या कोरोना संसर्गापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत व त्यांना धीर देत आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोनाकाळात वेळोवेळी जनतेशी संवाद साधला. राज्यातील वृत्त वाहिन्यांद्वारेही घराघरात पोहचलेल्या या संवादातून त्यांनी राज्यशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रसंगी राज्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी दै‍नंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह नियम पाळण्याविषयीही ते मार्गदर्शन करीत आहेत. जनतेसोबतच्या संवादातच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ या महत्वाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी हे दोन उपक्रम सुरु केले. कोरोनास्थितीत डळमळीत झालेली स्थिती सावरून राज्याला पुन्हा उभेकरण्यासाठी त्यांनी याच मंचावून ‘मिशन बिगिन अगेन’ आणि ‘ब्रेक दि चेन’ या कार्यक्रमांची घोषणा केली. ‘ब्रेक दि चेन’ निर्बंधकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. राज्यात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी सुरु आहे. इतिहासकाळापासून विविध संकटांवर समर्थपणे मात करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या थोर पंरपरेला साजेशे कार्य करत राज्यशासन कोरोना संसर्गाचा नेटाने मुकाबला करत या संकटावर मात करण्याच्या दिशेने समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात मोठया प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या सुविधा व गतीमान पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक अन्य महत्चाच्या उपाययोजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र हे संभाव्य तिसऱ्या लाटेलाही परतवून लावण्यासाठी सज्ज होत आहे. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic 00000 रितेश मोतीरामजी भुयार, उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Wednesday, July 28, 2021

जगाच्या पाठीवर मराठी माणसांची चमकदार कामगिरी- खासदार संजय राऊत

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/sthairya-epaper-sthairya/jagachya+pathivar+marathi+manasanchi+chamakadar+kamagiri+khasadar+sanjay+raut-newsid-n272631724
https://mahasamvad.in/?p=36978 नवी दिल्ली, १९ : प्रतिभा व प्रतिमेच्या जोरावर जगात मराठी माणसाने व्यापार-उद्योगात नाव कमाविले आहे. तसेच, काही देशांमध्ये राजकारणातही उत्तम कामगिरी केली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज व्यक्त केले. “जगाच्या पाठीवरील मराठी” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प गुंफताना श्री. राऊत बोलत होते. महाराष्ट्र व मराठीचा जागतिक राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्द कौशल्यास जागतिक इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाने जागतिक स्तरावर अन्यायाविरोधात आवाज उठवत समर्थपणे भूमिका मांडल्या आहेत. जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणाऱ्या मराठी माणसाने आज जगात सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले असून व्यापार, उद्योग आणि राजकारणातही त्यांनी प्रवेश केला आहे,ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे श्री. राऊत म्हणाले. कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर आज जगभरात मराठी माणसांचा वावर आहे. स्पर्धेत पूरेपूर उतरून मराठी माणसाने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे ,उत्तुंग झेप घेतली आहे व आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अमेरीकेपासून,इस्त्रायल,आयर्लंड,जपान,मॉरीशस,अफगाणीस्तान आदी देशांमध्ये मराठी माणसांनी कर्तबगारी दाखविल्याचे आश्वासक चित्र आहे. आयर्लंडचे पंतप्रधानपद भूषविणारे लिओ वराडकर हे कोकणातील मालवणचे आहेत. त्यांच्या रूपाने मराठी माणसाने एका देशाच्या प्रमुखपदाचे सर्वोच्च स्थान मिळवीले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या असेंब्लीमध्ये श्री. ठाणेदार हे मराठी गृहस्थ मोठया मतांनी निवडून आले आहेत, अनेक वर्ष तेथील राजकारणात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लडमधील राजकारणात मराठी माणूस आहे. मॉरीशस मधील राजकारणात, संसदेत व मंत्रिमंडळात मराठी माणस आहेत. जगाच्यापाठीवरील या मराठी माणसांकडे आपण मोठया अपेक्षेने पाहिले पाहिजे असे श्री राऊत म्हणाले. मराठी माणूस हे कलाप्रेमी आहेत. परदेशातही मराठी नाटक, चित्रपट, संगीत मैफिली आदींच्या आयोजनांतून त्यांनी मराठीची जोपसना केली आहे. बृह्नमहाराष्ट्र मंडळ, मराठी परिषदा आदींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची जोपासना केली आहे.मॉरीशस आणि अमेरिकेत मराठी मंडळांच्यावतीने गणेशोत्सव साजरे होतात. शिकागो, न्युयॉर्क आणि कॅनडामध्ये भरणारे बृह्ममहाराष्ट्र परिषदांचे अधिवेशन यावरही श्री. राऊत यांनी प्रकाश टाकला. इस्त्रायलमध्ये ‘मायबोली’ हे मराठी नियकालीक चालवले जाते,त्यास मोठा मराठी वाचक लाभला आहे. तेथे मराठी कार्यक्रम, उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात. मराठी भाषेचे उत्सव साजरे होतात.माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कुसुमाग्रजांच्या उपस्थितीत इस्त्रायलमध्ये जागतिक मराठी परिषदेचे पहिले संमेलन भरविण्यात आले होते. जगभरातील मराठी माणसांनी व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी माणसांनी जागतिकस्तरावर सक्षमपणे भूमिका मांडल्या भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत लंडन हे मराठी माणसाचे लक्ष्य होते. लोकमान्य टिळक हे लंडनला जावून आपली बाजू मांडून आले होते. राघोबादादांना पेशवाईचे वस्त्र मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी आपला वकील लंडनला संपर्कासाठी पाठविला होता. ब्रिटीशांनी अन्यायपणे साताऱ्याची गादी खालसा केल्याच्या विरोधात छत्रपती प्रतापसिंह राजे यांचे वकील रंगो बापुजी हे लंडनला संपर्कासाठी गेले होते. त्यावेळी रंगो बापुंनी लंडनच्या हैलपार्कमध्ये ‘राजा मेला, तरी न्याय मेला नाही’ अशी गर्जना करून वैचारीक लढा दिला. डॉ. एम. के. पारधी हे मराठी गृहस्थ 1910 मध्ये लंडन येथे स्थायीक झाले. साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी 1932 च्या सुमारास गोलमेज परिषदेत गर्जना केली होती. स्वातंत्र्याच्या क्रांतिची ठिणगी देशात टाकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याची सुरुवात लंडनपासून केली, येथील वास्तव्यात त्यांनी मराठी क्रांतिकारकांना एकत्र करण्याचे काम केले, असे श्री राऊत म्हणाले. परदेशात नोकरदारीत अग्रणी असलेल्या मराठी माणसांनी आता प्रशासनातही आपला दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. जगात मराठीची अस्मिता जपावी व प्रशासनात सहभागी होऊन मराठी माणसांनी संकटसमयी महाराष्ट्राला सहकार्य करावे तसेच राज्याच्या विकासात योगदान दयावे, अशी अपेक्षाही श्री राऊत यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा: http://twitter.com/micnewdelhi ००००० रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.114/दिनांक 19.04.2021

Friday, July 9, 2021

सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर

सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर. वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त,श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक,संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. २० एप्रिल १८९६ रोजी ठाणे जिल्हयातील केळवे येथे जन्म. प्राथमिक शिक्षण केळवे येथे तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी घेतली वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू विष्णुबुवा जोग यांच्या संपर्कात आले आणि त्यांना हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लागली. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. पदवी मिळविली पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक,मुंबईतील रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले. १९२१ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली. १९४७ मध्ये त्यांनी ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. १९५१ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदे’चे अध्यक्षपद भूषविले. अध्यापन करीत असतांनाही त्यांनी ‘पंढरीची वारी’ कधीच चुकविली नाही.वारीच्या माध्यमातून त्यांनी वारकऱ्यांचे प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. १९५३ मध्ये त्यांनी नेवासे येथील ‘ज्ञानेश्वर मंदिरा’चा जीर्णोद्धार केला. पिंपळनेर येथील ‘संत निळोबाराय मंदिर’, पुण्यातील ‘निवडुंग्या विठोबा मंदिर’ आदी मंदिरांचाही जीर्णोद्धार केला. १९५६ महाराष्ट्र शासनाने सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वरी ग्रंथाची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी एक समिती नेमली होती. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरी च्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संशोधित आवृत्तीला त्यांची १५० पानांची प्रस्तावना असून ‘सोनोपंतांची ज्ञानेश्वरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना सन्मार्ग दाखविला. ‘ज्ञानेश्वरी’, ‘नामदेव गाथा’, ‘भावार्थ रामायण’ इत्यादी संत-साहित्य त्यांनी संशोधित केले. ‘ज्ञानदेव आणि प्लेटो’, ‘ईश्वरवाद’, ‘अध्यात्मवादाची मूलतत्त्वे’, अभंग-संकीर्तनभाग-१,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले. श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य जोग महाराजांनी भूषविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोनोपंत दांडेकर यांनी बराच काळ सांभाळली होती .

व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर. श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार . ६ जुलै १९२७ रोजी सांगली जिल्हयातील माडगूळ येथे त्यांचा जन्म झाला . माडगूळकर यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसले तरी त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला . आरंभीच्या काळात पत्रकारिता केल्यानंतर १९५० च्या सुमारास ते मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. १९४९ मध्ये ‘माणदेशी माणसं’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिध्द झाला . ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हस्ताचा पाऊस’, ‘सीताराम एकनाथ’, ‘काळी आई’, ‘जांभळाचे दिवस’ आदी त्यांचे ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द आहेत त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत . ‘बनगरवाडी’, ‘वावटळ’, ‘पुढचं पाऊल’, ‘कोवळे दिवस’, ‘करूणाष्टक’ आणि ‘सत्तांतर’ या त्यांच्या ग्रामीण कादंबऱ्याही उल्लेखनीय ठरल्या ‘करूणाष्टक’, ‘वावटळ’ आणि ‘कोवळे दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्रपर कादंबऱ्या प्रसिध्द आहेत. ‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ आदी त्यांनी लिहिलेली उल्लेखनीय नाटके होत. ‘सांगत्ये ऐका’, ‘पुढचं पाऊल’, ‘वंशाचा दिवा’, ‘जशास तसे’, ‘रंगपंचमी’ आदी मराठी चित्रपटांच्या कथा व पटकथा त्यांनी लिहिल्या ‘बिनबियांचे झाड’ आणि ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ ही त्यांनी लिहीलेली लोकनाटयेही गाजली. ‘चित्रे आणि चरित्रे’ ,‘नागझिरा’, ‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’, ‘पांढऱ्यावर काळे’, ‘रानमेवा’ ही त्यांची ललित गद्य पर पुस्तके प्रसिध्द आहेत १९५५ ते १९८५ अशा दीर्घ कालावधिसाठी त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली. चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती होती ,त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिध्द आहेत. ‘गावाकडील गोष्टी’, ‘काळी आई’ या कथासंग्रहास, ‘बनगरवाडी’ या कादंबरीस आणि ‘सती’ ही नाट्यकृती आदींना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले . ‘सत्तांतर’ या त्यांच्या कादंबरीस १९८३ मध्ये साहित्य आकदमी पुरस्कार प्राप्त झाला . १९८३ मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले .

गुरुदेव रानडे

रामचंद्र दत्तात्रेय रानडे तथा गुरुदेव रानडे . आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ . ३ जुलै १८८६ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित विषय घेऊन बी.ए. आणि तत्वज्ञान विषय घेऊन एम.ए. ची पदवी संपादन केली. १९१३ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली . ‘ॲकॅडमी ऑफ फिलॉसॉफी ॲड रिलिजन’ ही संस्था स्थापन करून त्यांनी भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहास खंडांची योजना आखली . १९२८ ते १९४३ दरम्यान ते अलाहबाद विद्यापिठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते . ‘इव्हलूशन ऑफ ओल थॉट’ या त्यांच्या लेखावरून त्यांच्या तत्वज्ञान विषयक विचारांचा झालेला विकास लक्षात येताे . मराठी ,हिंदी व कन्नड संतवाड्:मयातील साक्षात्कारवादाचे सर्वेक्षण करून त्यांनी एक नवीन तत्वज्ञान मांडले . गुरुदेव रानडे यांचे बहुतांश लेखन इंग्रजीत असून ते मराठीत अनुवादितही झाले आहे . ‘अ कन्स्ट्रक्टिव्‍ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘मिस्टिसिझम इन महाराष्ट्र’,‘पाथ वे टू गॉड इन मराठी लिटरेचर’ आदी इंग्रजी ग्रंथ त्यांने लिहीले आहेत. ‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतरचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’, ‘रामदासवचनामृत’ आदी त्यांची मराठी ग्रंथ रचना आहे.

गणपतराव बोडस

गणपतराव बोडस . मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट . २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे त्यांचा जन्म झाला. पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले, शाळेत शिकत असतापासूनच ते हौशी नाटयमंडळातून अभिनय करू लागले. १८९५ मध्ये त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्त्रीभूमिका वठविल्या त्यानंतर ‘सौभद्र’ नाटकात कृष्ण, ‘शारदा’ नाटकात कांचनभट, ‘मूकनायक’ मध्ये विक्रांत व ‘मानापमान’ मध्ये लक्ष्मीधर अशा महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. १९९३ मध्ये ‘किर्लोस्कर मंडळी’ सोडून बालगंधर्व आणि गोविंद टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली. ‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकर, ‘मृच्छकटिक’ नाटकातील शकार, ‘विद्याहरण’ नाटकातील शिष्यवर या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. १९३० नंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले यानंतर त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या पण येथे त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. १९४० मध्ये नाशिक येथे भरलेल्या ३१व्या नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. त्यांनी १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. १९५६ मध्ये त्यांना नाटयक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आल. गणपतराव बोडसांनी ४० वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाटयसृष्टीतील अनेक बहुमान मिळविले . ‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरि९ १९४० मध्ये प्रकाशित झाले .

हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते. १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयातील गहुली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेडयांमध्ये झाले तर विठोली आणि अमरावती येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून बीएची पदवी व नंतर एलएलबी पदवी मिळविली. विद्यार्थी दशेत त्यांच्यावर ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘डेल कार्नेगी’ यांच्या विचारांचा प्रभाव पडला. कायद्याची पदवी घेवून पुसद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली . १९४३ -४७ कालावधित त्यांची पुसद कृषिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याशिवाय हरिजन वसतीगृह आणि राष्ट्रीय वसतीगृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले . १९५१-५२ मध्ये त्यांची मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली . १९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसद नगरप‍ालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले . १९५२ ते १९५६ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले . १९५७ राज्य पुनर्रचनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले . १९६० मध्ये वसंतराव नाईक हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री झाले . १९६३ मध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी या पदावर तब्बल १२ वर्षे काम केले . त्यांनी कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्राला धान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य केले . गोरगरिबांच्या व गरजुंच्या हाताला काम देणारी ‘रोजगार हमी योजना’ वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरु झाली. त्यांच्या काळात या योजनेतून असंख्य विहिरी , तलाव खोदले गेले. महाराष्ट्राला त्यांनी दुग्ध उत्पादनात अग्रेसर केले. शिक्षण आणि शेती विषयात विशेष लक्ष घालून त्यांनी महाराष्ट्रात मोठया सुधारणा घडवून आणल्या . ‘पाझर तलाव’ आणि ‘वसंत बंधाऱ्या’चे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. शेती,महसूल, राज्यभाषा, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण-दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी त्यांनी कठोर प्ररिश्रम केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिन महाराष्ट्रशासनाच्यावतीने ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो .

Wednesday, March 31, 2021

शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्राची भक्कम वाटचाल डॉ. विजय चोरमारे

नवी दिल्ली, दि. १९ : शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या कार्यावर व विचारांवर महाराष्ट्र उभा आहे व पुढच्या काळातही आपल्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमारे यांनी आज महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घटनाच्या व्याख्यानात केले. महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिव, फुले, शाहु,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो तेव्हा या चार महापुरुषांच्या कार्यातून मुल्यमापन करावे लागेल. शिवाजी हे जगाच्या पाठीवर पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते. अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटण हा आदर्श राज्याचा समाजाचा पहिला निकश आणि शिवाजी महाराजांनी आल्याला शिकवण देतात. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या वैचारिक पायातून आजचा महाराष्ट्र राजकीय व सामाजिकदृष्टया उभा आहे. शिवाजींनी राज्य कस कराव याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात आपल्या चालीरिती कशा असायल्या हव्या, जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण फुलेंनी दिली. राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे ही शिकवणूक शाहुंनी दिली. आंबेडकरांनी शिवाजी फुले शाहु यांनी कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी आंबेडकरांनी राज्यघटनेत आणल्या. ज्या आधुनिक काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. वैचारिक कार्यावर उभ आहे पुढच्या काळातही आपल्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल. महाराष्ट्र हा आधार भारताचा सेनापती बापट यांनी देशपातळीवर महाराष्ट्राच स्थान अधोरेखित करताना म्हटले आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ! महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरावीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा ! या ओळी भारताच्या जडणघडनीतील महाराष्ट्राच योगदान अधोरेखित करतात. छत्रपती शाहु महाराजांनी संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. प्रस्तापितांचा विरोध स्विकारून हे धोरण धैर्याने राबविले. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारले. १९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेला जगता यावे म्हणून महाराष्ट्राने रोजगार हमी योजना राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक. त्याआधी १८९६- ९७ नंतरच्या काळात कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी ही योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावाने राबविली जाते. ही महाराष्ट्राची देणगी आहे. देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय व अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. पुढे देश पातळीवर ३३ टक्के आरक्षण दिले. देशात पुढे ५० टक्के आरक्षणाच्या मागणीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला समाजकारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्या कल्पनेतील चित्र. त्यापूर्वीचे भाषण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आराखडा पुढे ठेवून त्याची उकल केली नाही तर हा आंधळा प्रवास ठरेल. मात्र आम्हाला डोळस प्रवास करायचा आहे व ध्येय ठरवून निश्चित गतीने हा प्रवास करायचा आहे. आज आमच्या समोरील प्रश्न राजकीय सामाजिक आर्थिक . आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना . यशवंतरावांनी राज्यातील सहकाराला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले. सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतरावांन भाषणात म्हटले होते विचारवंतांनी महाराष्ट्राच वर्णन भंगलेल मन अस केल होत. वस्तूनिष्ट पायावर समाजकारण राजकाारण कराणर भंगलेले मन आम्हाला सांधायचे आहे. जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट केले पाहिजे असा विचार मांडले होते . गेल्या ६० वर्षांत त्यातून काय साध्य केल तर निराशा समोर येते. राजकारणाच्या पातळीवर जातीयता सौम्य होण्या ऐवजी तिष्ण होत आहे. जातीयवादी विचारापासून दूर जाण्याचा विचार सोयीनुसार पाळतो. महा राष्ट्राच्या समाजसुधाराच्या चळवळीचे दाखले दिले जातात. सामाजिक सुधारकांची मोठी परंपरा येथे निर्माण झाली यास जातीय राजकारण शोभा देत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचा उल्लेख करावा लागेल वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आंबेडकर फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात चळवळ उभी केली ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत उपेक्षित समाजाला आत्मभान दिले. यशवंतराव, वसंतदादा पाटील, बाळासाहेब, पाटील ह ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण या सूत्रावर राजकारणाची मांडणी केली म्हणजे राजकारणाला समाजकारणाची जोड दिली. कार्यकर्त्यााचया . अलीकडच्या राजकारणात हे सूत्र दिसत नाही . राजकारणाने समाजकारणापासून फारकत घेतल्याचे दिसते. समाजकारणाने सांस्कृतिककरणापासून फारकत घेतली आहे. सांस्कृतिक जोड असल्या शिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक चांगल्यारितेने चालेत तर सांस्कृतिक बाबा आढवांनी सुरु केलेली एकगाव एक पानवठा चळवळ समृध्द सामाजिक चळवळ, दाभोळकरांची अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ जादुटोना विरोधी विधेयक. कर्नाटकाने एक विधेयक मंजूर केल. सामाजिक पातळीवरी चळवळ देशाला मार्गदर्शक. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे पंजावबराव देशमुख आदींनी शिक्षणाची गंगा तळागाळात पोचवली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ कारण शिक्षण. वसंतदादा पाटील यांच्या काळात शिक्षणाचे धोरण १९८३ नंतर चार दशकानंतर बघतो. डी वाय पाटील, आदींनी दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था. काळाच्या पातळीवर योग्य. शिक्षण क्षेत्रातील पुढारलेले राज्य. खाजगीकरणच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थाचे महाराष्ट्रात मोठे योगदान. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वाची सी डी देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील स्त्रियांचे लढे प्र कल्प ग्रस्त विस्तापितांसाठीचे मेधा पाटकर यांचे आंदोलन देशपातळीवर कार्य. आदिवासींच्या कल्याणासाठी भागात नंदूरबार येथे प्रतिभा शिंदेचे आंदोलन. विदर्भात पारामिता गोस्वामी काम . यशवंतरावांपासून गडकरींपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अशा अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे. सामाजिक क्षेत्रात बाबा आमटे नानाजी देशमुख यांच काम दिसत. अन्ना हजारे यांनी उभे केलेले आंदोलन मोठे होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बघता काँग्रेस केंद्रीत राजकारण, शेतकरी कामगार पक्षाच राजकारण, जनता पक्ष, शिवसेना, भाजप, महानिर्माण सेना रिपब्लीकन राजकारणाच्या स्थित्यंतरात . नोंद करावी अशी बाब डावे व समाजवादी यांचा झालेला –हास चिंतेची बाब आहे. काळाची पावले ओळखू शकले नाहीत राजकारण समाजकारणाचा दिर्घ पट महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi 000000 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४९/दिनांक १९.०३.२०२१

परिचय केंद्राची ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प

नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत. महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे. दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi 000000 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१

Monday, March 15, 2021

वासुदेव विष्णु मिराशी

वासुदेव विष्णु मिराशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक १३ मार्च १८९३ ला रत्नागिरी जिल्हयातील कुवळे येथे जन्म कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व राजाराम महाविद्याल आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी, याच काळात त्यांनी ‘अद्वैतब्रह्यसिद्धि’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले नागपूर येथील मॉरिस कॉलेज व अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज मध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी ‘कालिदास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. ‘सातवाहन’, ‘वाकाटक’, ‘कलचुरी-चेदी’, ‘शिलाहार’ इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ , ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ , ‘कलचुरी नृपति आणि त्यांचा काल’ , ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून ‘कालिदास’, ‘मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक’ आणि ‘भवभूति’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले. भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यां अध्यक्षपद भूषविले सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्‌. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल केली. मिराशी यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तर सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे. त्यांच्या निवडक ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून– विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत. मिराशी यांचे जवळपास ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले १९७५ मध्ये साहित्य अकादमीने प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला १९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा नागरी सन्मान देवून गौरविले

अभिनेते शाहू मोडक

अभिनेते शाहू मोडक मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व २५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म ‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. ‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती. शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या . त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या. माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.

अभिनेते शाहू मोडक

अभिनेते शाहू मोडक मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व २५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म ‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. ‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती. शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या . त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या. माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.

Saturday, March 13, 2021

नवे ते स्वीकारून जुन्याचे जतन केल्याने भाषेचे सौष्ठव टिकेल – ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना अभिवादन

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

साडेतीन वर्षाच्या चिमुकलीने घेतला ‘कुसुमाग्रज काव्यवाचन’ उपक्रमात सहभाग

कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र ‘हीरक’ महोत्सव : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्रधानमंत्री बॅनरच्या उपविजेत्याचा मान

महाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

प्रधानमंत्र्यांनी बालकांशी साधला संवाद

व्हॅलेंटाईन विशेष २०२१

१७ व्या लोकसभा निवडणुका एक स्वर्णीम आठवण

दिल्लीतील वास्तव्यात विशेषत: शासकीय नौकरीत वेगवेगळया आघाडयांवर लढावं लागतं याचाच एक स्वर्णीम अनुभव. वर्ष २०१९ मध्ये १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला व या निवडणुका देशभर सुरक्षीत तसेच व्यवस्थीतरित्या पार पाडण्याची भूमिका असलेल्या भारत निवडणूक आयोगाने ऑब्सजर्व्हससाठी आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्याचा हा अनुभव आहे. भारत निवडणूक आयोग देशातील आएएस, आयपीएस, आयआरएस आदी अधिका-यांना वेगवेगळया राज्यांत ऑब्सजर्व्हर म्हणून नेमते. निवडणूक काळात नियत नियमानुसार पैसा व्यय व्हावा, सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी यासह नेमूण दिलेल्या अन्य बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अधिका-यांची नेमणूक करण्यात येते. त्याच राज्यात नेमणूक असलेला अधिकारी त्याच राज्यात ऑब्जर्व्हर नसावा हा दंडक पाळला जातो. या ऑब्जर्व्हस्‍ साठी भारत निवडणूक आयोगाने विज्ञानभवनात दोन टप्प्यात ब्रिफींग मिटींग आयोजित केली होती एक १४ मार्च २०१९ ला तर दुसरी २६ मार्च २०१९ ला. निवडणूक आयोग या आयोजनात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयाची मदतही या घेत असते. त्यानुसार महाराष्ट्र सदन या राज्य शासनाच्या दिल्लीतील महाराष्ट्राच्या दुतावासाकडे ब्रिफींग मिटींग काळात हेल्पडेस्क लावण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र सदनाकडून माझ्या नावावर शिक्कामोर्तब होवून कार्यालय प्रमुखाला याबाबतीत अवगत करून माझी विशेष सेवा घेण्यात आली. असे काम करतो हेल्पडेक्स महाराष्ट्र सदनाचा एक कर्मचारी एक वेळा श्री.जगदीश उपाध्याय तर दुस-यावेळी श्री. राजेश हरणे हे माझ्या दिमतीला होते. महाराष्ट्रात ज्या ऑव्जर्व्हरची नेमणूक केली आहे ते अधिकारी आमच्या हेल्प डेक्सवर येत असत. मग संबंधित लोकसभा मतदार संघ कुठे आहे?, त्याच्या आजुबाजुला कोणते एअरपोर्ट आहे?, आम्हाला घ्यायला गाडी येणार का?, तो भाग कसा आहे?, तेथे पर्यटन स्थळ कोणती आहेत?, खानपान कस आहे? असे आपआपल्या प्रकृतीनुसार सर्व प्रश्न विचारण्यात येत असत. हेल्पडेक्सवरील माझे सहकारी हे मुळात उत्तराखंड व दिल्लीत जन्मलेले असल्याने त्यांचा महाराष्ट्राशी व तेथील भौगोलिक राजकीय परिस्थितीचा तसा फारसा अभ्यास नसल्याने या अधिका-यांना माहिती देवून त्यांचे समाधान करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. आणि ही आगळीवेगळी जबाबदारी सांभाळताना मला खूप मजाही आली व एक सुंदर अनुभवही मिळत होता. आमच्या डेक्सवर आलेल्या अधिका-यांना आम्ही महाराष्ट्राचा नकाशा , जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी , पोलीस अधिक्षक कार्यालय आदींचे संपर्क क्रमांक असणारी माहिती पुस्तिका देत असू. या निमित्ताने देशातील आयएएस आयआरएस आएफएस आदी अधिका-यांचा हा मेळाच जवळून बघता आला. या अधिका-यांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर, आकस, मोठेपणाचा तोरा आदी गुण अवगूण म्हणा हवे तर जवळून बघता आले. आणि हेल्प डेक्सहून वेळ मिळाला तसा या ब्रिफींग मिटींगमध्ये होत असलेल्या मार्गदर्शन सत्राचाही आस्वाद घेता आला. एकंदरीतच हा एक आगळा वेगळा अनुभव समृध्द करणारा ठरला. 0000

Wednesday, March 10, 2021

महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर

महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्याला जन्म मुंबई येथे उच्च शिक्षण. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा उत्तीर्ण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक, साधना साप्ताहिकात सहसंपादक ,आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून नियुक्ती काही काळ ‘प्रोड्यूसर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली. मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली . मुंबई विद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती . ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘जिप्सी’, ‘छोरी ‘ ,‘उत्सव’ , ‘विदूषक’ व ‘सलाम’ आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद ‘मीरा’ ह्या नावाने प्रसिद्ध इंग्रजीतील लिम्‌रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही लिहिल्या आहेत. ‘भोलानाथ’ आणि ‘बबलगम’ हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह. ‘जिप्सी’, ‘छोरी’ व ‘भोलानाथ’ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके. पाडगावकरांनी लिहिलेले काव्यात्म ललित निबंध ‘निंबोणीच्या झाडामागे’ नावाने प्रसिद्ध अनेक अमेरिकन साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत जे. कृष्णमूर्तींच्या काही भाषणांचा त्यांनी अनुवाद केला . ‘बोरकरांची कविता’ , ‘युगात्मा’ , ‘महात्मा गांधीवरील ललित लेखनाचा संग्रह’, ‘संहिता’ , ‘विंदा करंदीकर ह्यांची निवडक कविता’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले त्यांच्या ‘शर्मिष्ठा’ या नाट्यकाव्यात प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार दिसतो उपहास व उपरोधाचे चित्र असलेला ‘सलाम’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे पाडगांवकर यांच्या साहित्यिक योगदानासाठी २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान २०१३ मध्ये केंद्र शासनाने ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला

वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज

वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार २७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे येथे जन्म नाशिक येथे त्यांचे शिक्षण झाले. १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते त्यांनी पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’ , ‘हिमरेषा’ व ‘वादळवेल’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण ठरले ‘दुसरा पेशवा’ , ‘कौंतेय’ , ‘आमचं नाव बाबुराव’ , ‘ययाति आणि देवयानी’ , ‘वीज म्हणाली धरतीला’ , ‘नटसम्राट’ आदी त्यांची स्वतंत्र नाटक प्रसिध्द आहेत ‘दूरचे दिवे’ , ‘वैजयंती’ , ‘राजमुकुट’ , ‘ऑथेल्लो’ व ‘ बेकेट’ ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके होत ‘वैष्णव’ , ‘जान्हवी’ व ‘कल्पनेच्या तीरावर’ आदी त्यांच्या प्रसिध्द कादंब-या होत ‘फुलवाली’ , ‘सतारीचे बोल आणि इतर कथा’ , ‘काही वृद्ध काही तरुण’ , ‘प्रेम आणि मांजर’ व ‘निवडक बारा कथा’ आदी त्यांच्या कथासंग्रह प्रसिध्द आहेत कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर , ‘समिधा’ हा मुक्तकाव्य संग्रह, ‘आहे आणि नाही’ हा लघुनिबंध संग्रह तसेच काही ‘बालकथा’ व ‘बालगीते’ यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले भारतीय साहित्यातील योगदानासाठी १९८७ मध्ये त्यांना मानाच्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वि.वा.शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातील योगदानासाठी २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर ‍ि९ मार्च १८९९ ला सातारा जिल्हयातील चाफळ येथे त्यांचा जन्म १९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली कवी यशवंत हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक कवींपैकी एक महत्वाचे कवी म्हणून प्रसिध्द. १९२० ते ३० या दशकात रविकिरण मंडळाने कविता महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवल्या १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ‘आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत त्यांनी आईची थोरवी वर्णिली आहे. ‘यशोधन’ हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कविता संग्रह होय ‘यशवंती’, ‘भावमंथन’, ‘बंदिशाळा’, ‘जयमंगला’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह ‘जयमंगला’, ‘काव्यकिरीट', ‘बंदीशाळा' आदी खंडकाव्य त्यांनी ‍ लिहिली ‘काव्यकिरीट’ या खंड काव्यात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. या काव्याने प्रभावीत होत १९४० मध्ये बडोद्याच्या महाराजांनी कवी यशवंत यांना ‘राजकवी’चा बहुमान दिला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले पानशेत धरण फुटल्याच्या दुर्घटनेवर त्यांनी ‘मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य लिहिले ‘मित्रप्रेम रहस्य’, ‘वीणा झंकार’, ‘कातिणीचे घर’ ही त्यांची पुस्तके गाजली ‘मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह कवी यशवंत यांनी लिहिलेली 'घायाळ' ही कादंबरी लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर होय त्यांनी १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले १९६९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

गणपतराव जोशी

गणपतराव जोशी मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी जिल्हयातील राजापूर येथे जन्म १८८१ मध्ये त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना केली,ही मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था ठरली अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते गणपतराव जोशी यांनी शेक्सपिअर यांच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका वठवून लोकप्रियता मिळविली . झुंझारराव (ऑथेल्लो), चंद्रसेन (हॅम्‍लेट), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्यकडून मिळाले होते ‘राणा भीमदेव’ नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व ‘तुकाराम’ व ‘रामदास’ नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्‌भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. ‘झोपी गेलेला जागा झाला’ (दातेकृत) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती

Tuesday, March 9, 2021

पद्मश्री रणजित देसाई

पद्मश्री रणजित देसाई उत्कृष्ट कादंबरीकार,कथालेखक आणि नाटककार ८ एप्रिल १९२८ रोजी जन्म. कोल्हापुर जिल्हयातील कोवाड हे त्यांचे मूळ गाव माध्यमिक शाळेत असतांनाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली कोल्हापूरच्या महाद्वार मधून त्यांचे लेखन प्रसिध्द होत असे त्यांच्या ‘भैरव’ कथेला कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथा लेखनाला सुरुवात झाली ‘रूपमहाल’, ‘कणव’ , ‘जाणे’ , ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’ इत्यादी त्यांचे कथा संग्रह प्रकाशित झाले ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा एक प्रकारे चित्रकथाच होत्या, इतकी त्यांची जीवंत मांडणी होती सुरुवातीला त्यांनी ‘बारी’ ,‘माझ गांव’ या कांदब-या लिहिल्या १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ या ऐतिहासिक कादंबरीने लोकप्रियतेचे शिखर गाठले १९६४ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीही अतिशय लोकप्रिय झाली कर्णाच्या जीवनारील ‘राधेय’ तसेच ‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिंड’, ‘राजा रवी वर्मा’ या त्यांच्या कादंब-याही खूप गाजल्या त्यांनी लिहिलेल्या ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’, ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली ‘नागिन’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘सवाल माझा ऐका’ आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या १९७३ मध्ये ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला

Wednesday, February 17, 2021

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

नवी दिल्ली, दि. 22 : महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. https://mahasamvad.in/?p=30219