शासकीय
नोकरीतील एक वर्ष
: ‘एक सिंहावलोकन’
(माझ्या लॅपटॉपवर काही शब्द उमटत नसल्याने या
पोस्टमधे व्याकरणीक चुका झाल्याचे आपणास जाणवेल त्यासाठी क्षमस्व, पण कधी-मधी वेळ
मिळताच त्या चुका दुरुस्त करेल.)
आज दिनांक 27
फेब्रुवारी 2014 ला आम्ही कार्यालयाच्यावतीने ‘मराठी भाषा
गौरव दिन’ साजरा केला. राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. रात्री मस्त पु.लं. चे नाटक ‘अंतु
बर्वा’ अण ‘नारायण’ बघीतले. उद्या
सकाळीच ऑफीस असल्यानं झोपण्याकडे मोर्चा वळवला. आज झोप येईना. वीजांचा कळकळाट
होतोय, पाऊस सुध्दा सुरु झालाय अण झोपायचा प्रयत्न करतोय. पण, कसली मेली झोप यायच
नाव नाही. मग मला आठवल मी माझ्या ब्लॉगवर लिहीलेली पहिली पोस्ट(‘माझ्या
आठवणीतील पाऊस’) सुध्दा अशाच 2009 च्या एका मध्यरात्री दिल्लीत
कोसळलेल्या पावसाच्या वातावरणात लिहीली होती. आज नेमकं तसच वातावरण आहे पण, वर्ष 2014
अण दिल्लीत पत्रकारिता व नोकरी करण्यासाठी सुरु झालेल्या तत्कालीन प्रवासाला आता
योग्य वळण लागलय. या शहरात 5 वर्ष पत्रकारितेच्या विविध प्रांतात मुक्त संचार
केल्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत माझ्या आवडत्या व्यवसायात स्थीर झालो. मी
शासकीय नोकरीत येवून 18 फेब्रुवारी 2014 रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झाल. तेव्हा या
कालावधीचे सींहावलोकन हा विषय निवडलाय मी. Sorry , बर का ! थोड अपडेट करतो तुम्हाला. घडयाळीत रात्रीचे 1
वाजले आहेत. आता पावासाचा अण वारयाचाही जोर वाढलाय, वीजांचा कळकळाट अण गारपीटही
होत आहे भोवताली.
या एक वर्षात यापूर्वी सरकारवर सतत ओरखडे
ओढणारा मी, सरकारी पध्दतीची बातमी लिहायला शीकलो. बातमी लिहीताना बातमीतील अचूक
आकडेवारी, वक्त्यांचे कोट असणे गरजेचे असते. बातमी उशीरा गेली तरी चालेल पण, ती
अचूक असावी कारण आपण देत असलेली माहिती ही शासनाचा भरवशाचा स्त्रोत म्हणून ओळखली
जाते याच महत्व प्रकर्षाने पटल. बातमी संदर्भात या एक वर्षाच्या काळात घडलेल्या 2
चुका अण त्यासाठी झालेली शीक्षा हे आधी प्रांजळपणे कबुल करतो. पण त्यात पूर्णपणे
मी दोषी नसल्याच वास्तवही कथन करतो. उत्तराखंडमध्ये 2013 च्या जून महिन्यात आलेली
नैसर्गीक आपत्ती अण आमच्या कार्यालयाने यावेळी उत्तराखंडतून परतलेल्या अण
महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही जाण्यासाठी आतुर असणारया भावीकांसाठी दिल्लीत सुरु
केलेल्या मदत समन्वय कक्षातील कामाचा वेगळा अनुभव. त्यातही प्रसारमाध्यमांना अचूक
माहिती पुरवणे अण मदत समन्वय कक्षाच्या कार्याच्या प्रसिध्दीची धुरा सांभाळण्याचा
अनुभव वेगळाच. तसेच, आमच्या कार्यालयातर्फे महाराष्ट्राच्या पश्चीम महाराष्ट्र,
विदर्भ, कोकण, खांदेश, मराठवाडा या भागातील पत्रकारांसाठी आयोजित दिल्ली अभ्यास
दौरयात समन्वयक अण प्रसीध्दीची धुरा सांभाळण्याचा अनुभव उल्लेखनीय ठरला. हित
शत्रुंच्याही नव्याने ओळख्या झाल्या. पण, या नोकरीमुळे स्वत:च वेगळ स्थान निर्माण
केल्याचा क्षण व त्यामुळे जन्मदात्या आई –वडिलांच्या चेहरयावर झळकत असलेल्या आंनदातून
डोळे सूखावून जातात. (घडयाळीत
मध्यरात्रीचे अडिच वाजलेत. पाऊस पूर्णपणे थांबलाय. अण जोराची झोप येतीय मला.
उर्वरीत भाग पूर्ण करेल वेळ मिळताच)
शासकीय
नोकरीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ पत्रकार अण कथाकार अशोक थोरात यांना 19
फेब्रुवारी 2013 ला मराठीतील साहितयिक योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळणार
होता. लगेच त्यांना गाठल अण मुलाखत केली, नी झाली सुरुवात नोकरी नी कामाला.
दिल्लीतच पत्रकारिता केली असल्यानं पत्रकारांच मन, त्यांचे बलस्थान, त्यांच्या
अडचणी-मागण्या अण पत्रकारितेचा ground चा असलेला अभ्यास अण
ज्या कार्यालयात नोकरी करतोय तेथील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी अण वातावरणाशी familiar
असल्यान सुरुवात जोरात झाली. पण, माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेल्या फळामुळे पत्रकारितेतील
काही हीत शत्रूंच्या अण संपर्कातील सभ्यतेचा मुखवटा घालून मीरवणारया हीत
शत्रूंचाही जवळून परिचय झाला. त्याचा एक किस्सा मुददाम सांगतो. माझं selection
ही
व्हायच होतं तेव्हा, एकाने मी दिल्लीत येईल अण त्याच महत्व कमी होईल या विचाराने
घाबरून मला सल्ला दिला ‘तू कामासाठी मुंबईच कार्यक्षेत्र माग, त्याचा
तूला फायदा होईल’ त्यावर संबंधीताला मी उत्तर दिल, ‘ अजून
selection प्रक्रीयेतील टप्पे बाकी आहेत. मी लेखी परिक्षाच उत्तीर्ण झालोय. बघू
पुढच पुढे, अण राहिला प्रश्न कुठे काम करायचा?
तर मी कुठेही काम करू शकतो तेवढा आत्मविश्वास आहे मला’. मग काय सर्व हीत शत्रूंचे चेहरे समोर येत गेले पण त्याचा अंदाज घेत
त्यास कस सामोर जायच याची रणनिती करण्याच कसब हळू हळू शिकतोय त्यात मनस्वी अण हीत चिंतकांची खूप मदत
होतीये.
उपलब्धी
:
1)
आई वडिलांच्या चेहर्यावर आनंद. दिर्घ
काळाच्या मेहनतीला आलेल फळ.
2)
महाराष्ट्र सदनात स्थापीत उत्तराखंड मदत
समन्वय कक्षात 24x7 काम करण्याच्या अनुभवातून सरकारी नोकरीत मी
माझ्या आवडीच्या क्षेत्रात रमून समाजाची उत्तम सेवा करू शकता हा विश्वास आला.
कार्यालयातील अधिकारी-कर्मचारयांचा मेहनतीचा अण कौशल्याचा जवळून परिचय झाला.
3)
दिल्ली अभ्यास दौरयासाठी महाराष्ट्राच्या
वेगवेगळया भागातून येणार्या पत्रकारांकडून तेथील सामाजिक, राजकिय, आर्थीक व
संस्कृतीक स्थीती त्यांच्य नजरेतून समजता
आली. त्यांच्याशी मैत्री झाली अण नवा जनसंपर्क वाढला. दौरयाचा समन्वयक अण
प्रसिध्दीची जबाबदारी मीळाल्याने स्वत:ला सीध्द करण्याची संधी मिळाली.
4)
फण-फणत्या तापात अण विपरीत वातावरणात
स्वत: फिल्ड वर जावून दिवसाला 3-3 बातम्या करण्याचा अनुभव स्वत:तील मेहनतीचा
टेम्पो कायम असल्याचा आत्मविश्वास दूनावून गेला.
5)
कार्यालयातर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन,
आभार प्रदर्शन या व्यतिरीक्त गावाकडे गेल्यावर विविध शाळा, महाविद्यालये, धार्मिक
आयोजन,सामाजिक संस्थांमध्ये भाषण, डॉक्युमेंटरी, व्याख्यानाच्या माध्यमातून
नोकरीतील 1 वर्षाच्या काळात आत्मविश्वासाने केलेल काम.
