Wednesday, March 31, 2021
शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्राची भक्कम वाटचाल डॉ. विजय चोरमारे
नवी दिल्ली, दि. १९ : शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या कार्यावर व विचारांवर महाराष्ट्र उभा आहे व पुढच्या काळातही आपल्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमारे यांनी आज महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घटनाच्या व्याख्यानात केले.
महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिव, फुले, शाहु,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो तेव्हा या चार महापुरुषांच्या कार्यातून मुल्यमापन करावे लागेल. शिवाजी हे जगाच्या पाठीवर पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते. अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटण हा आदर्श राज्याचा समाजाचा पहिला निकश आणि शिवाजी महाराजांनी आल्याला शिकवण देतात. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या वैचारिक पायातून आजचा महाराष्ट्र राजकीय व सामाजिकदृष्टया उभा आहे. शिवाजींनी राज्य कस कराव याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात आपल्या चालीरिती कशा असायल्या हव्या, जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण फुलेंनी दिली.
राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे ही शिकवणूक शाहुंनी दिली. आंबेडकरांनी शिवाजी फुले शाहु यांनी कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी आंबेडकरांनी राज्यघटनेत आणल्या. ज्या आधुनिक काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. वैचारिक कार्यावर उभ आहे पुढच्या काळातही आपल्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल.
महाराष्ट्र हा आधार भारताचा
सेनापती बापट यांनी देशपातळीवर महाराष्ट्राच स्थान अधोरेखित करताना म्हटले आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले !
महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले,
खरावीर वैरी पराधिनतेचा,
महाराष्ट्र आधार हा भारताचा ! या ओळी भारताच्या जडणघडनीतील महाराष्ट्राच योगदान अधोरेखित करतात.
छत्रपती शाहु महाराजांनी संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. प्रस्तापितांचा विरोध स्विकारून हे धोरण धैर्याने राबविले. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारले.
१९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेला जगता यावे म्हणून महाराष्ट्राने रोजगार हमी योजना राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक. त्याआधी १८९६- ९७ नंतरच्या काळात कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी ही योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावाने राबविली जाते. ही महाराष्ट्राची देणगी आहे.
देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय व अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. पुढे देश पातळीवर ३३ टक्के आरक्षण दिले. देशात पुढे ५० टक्के आरक्षणाच्या मागणीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली.
ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला
समाजकारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्या कल्पनेतील चित्र. त्यापूर्वीचे भाषण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आराखडा पुढे ठेवून त्याची उकल केली नाही तर हा आंधळा प्रवास ठरेल. मात्र आम्हाला डोळस प्रवास करायचा आहे व ध्येय ठरवून निश्चित गतीने हा प्रवास करायचा आहे. आज आमच्या समोरील प्रश्न राजकीय सामाजिक आर्थिक .
आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना . यशवंतरावांनी राज्यातील सहकाराला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले.
सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतरावांन भाषणात म्हटले होते विचारवंतांनी महाराष्ट्राच वर्णन भंगलेल मन अस केल होत. वस्तूनिष्ट पायावर समाजकारण राजकाारण कराणर
भंगलेले मन आम्हाला सांधायचे आहे. जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट केले पाहिजे असा विचार मांडले होते . गेल्या ६० वर्षांत त्यातून काय साध्य केल तर निराशा समोर येते. राजकारणाच्या पातळीवर जातीयता सौम्य होण्या ऐवजी तिष्ण होत आहे. जातीयवादी विचारापासून दूर जाण्याचा विचार सोयीनुसार पाळतो.
महा राष्ट्राच्या समाजसुधाराच्या चळवळीचे दाखले दिले जातात. सामाजिक सुधारकांची मोठी परंपरा येथे निर्माण झाली यास जातीय राजकारण शोभा देत नाही.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचा उल्लेख करावा लागेल वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आंबेडकर फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात चळवळ उभी केली ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत उपेक्षित समाजाला आत्मभान दिले.
यशवंतराव, वसंतदादा पाटील, बाळासाहेब, पाटील ह ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण या सूत्रावर राजकारणाची मांडणी केली म्हणजे राजकारणाला समाजकारणाची जोड दिली. कार्यकर्त्यााचया . अलीकडच्या राजकारणात हे सूत्र दिसत नाही . राजकारणाने समाजकारणापासून फारकत घेतल्याचे दिसते.
समाजकारणाने सांस्कृतिककरणापासून फारकत घेतली आहे. सांस्कृतिक जोड असल्या शिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक चांगल्यारितेने चालेत तर सांस्कृतिक बाबा आढवांनी सुरु केलेली एकगाव एक पानवठा चळवळ समृध्द सामाजिक चळवळ, दाभोळकरांची अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ जादुटोना विरोधी विधेयक. कर्नाटकाने एक विधेयक मंजूर केल.
सामाजिक पातळीवरी चळवळ देशाला मार्गदर्शक. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे पंजावबराव देशमुख आदींनी शिक्षणाची गंगा तळागाळात पोचवली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ कारण शिक्षण. वसंतदादा पाटील यांच्या काळात शिक्षणाचे धोरण १९८३ नंतर चार दशकानंतर बघतो. डी वाय पाटील, आदींनी दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था. काळाच्या पातळीवर योग्य. शिक्षण क्षेत्रातील पुढारलेले राज्य. खाजगीकरणच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थाचे महाराष्ट्रात मोठे योगदान.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वाची सी डी देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील स्त्रियांचे लढे प्र कल्प ग्रस्त विस्तापितांसाठीचे मेधा पाटकर यांचे आंदोलन देशपातळीवर कार्य. आदिवासींच्या कल्याणासाठी भागात नंदूरबार येथे प्रतिभा शिंदेचे आंदोलन. विदर्भात पारामिता गोस्वामी काम .
यशवंतरावांपासून गडकरींपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अशा अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे.
सामाजिक क्षेत्रात बाबा आमटे नानाजी देशमुख यांच काम दिसत. अन्ना हजारे यांनी उभे केलेले आंदोलन मोठे होते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बघता काँग्रेस केंद्रीत राजकारण, शेतकरी कामगार पक्षाच राजकारण, जनता पक्ष, शिवसेना, भाजप, महानिर्माण सेना रिपब्लीकन राजकारणाच्या स्थित्यंतरात . नोंद करावी अशी बाब डावे व समाजवादी यांचा झालेला –हास चिंतेची बाब आहे.
काळाची पावले ओळखू शकले नाहीत राजकारण समाजकारणाचा दिर्घ पट
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४९/दिनांक १९.०३.२०२१
परिचय केंद्राची ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प
नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी
डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे.
दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार
शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१
Monday, March 15, 2021
वासुदेव विष्णु मिराशी
वासुदेव विष्णु मिराशी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक
१३ मार्च १८९३ ला रत्नागिरी जिल्हयातील कुवळे येथे जन्म
कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व राजाराम महाविद्याल आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात शिक्षण
मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी, याच काळात त्यांनी ‘अद्वैतब्रह्यसिद्धि’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले
नागपूर येथील मॉरिस कॉलेज व अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज मध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली
एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी ‘कालिदास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले.
‘सातवाहन’, ‘वाकाटक’, ‘कलचुरी-चेदी’, ‘शिलाहार’ इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले
कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ , ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ , ‘कलचुरी नृपति आणि त्यांचा काल’ , ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले
संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून ‘कालिदास’, ‘मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक’ आणि ‘भवभूति’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली
पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत.
१९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले.
भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यां अध्यक्षपद भूषविले
सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल
केली.
मिराशी यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तर सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे.
त्यांच्या निवडक ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून– विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.
मिराशी यांचे जवळपास ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले
१९७५ मध्ये साहित्य अकादमीने प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला
१९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा नागरी सन्मान देवून गौरविले
अभिनेते शाहू मोडक
अभिनेते शाहू मोडक
मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व
२५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म
‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला.
‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात.
शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या .
त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.
‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या.
माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.
अभिनेते शाहू मोडक
अभिनेते शाहू मोडक
मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व
२५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म
‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला.
‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात.
शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या .
त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.
‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या.
माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.
Saturday, March 13, 2021
१७ व्या लोकसभा निवडणुका एक स्वर्णीम आठवण
दिल्लीतील वास्तव्यात विशेषत: शासकीय नौकरीत वेगवेगळया आघाडयांवर लढावं लागतं याचाच एक स्वर्णीम अनुभव. वर्ष २०१९ मध्ये १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला व या निवडणुका देशभर सुरक्षीत तसेच व्यवस्थीतरित्या पार पाडण्याची भूमिका असलेल्या भारत निवडणूक आयोगाने ऑब्सजर्व्हससाठी आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्याचा हा अनुभव आहे.
भारत निवडणूक आयोग देशातील आएएस, आयपीएस, आयआरएस आदी अधिका-यांना वेगवेगळया राज्यांत ऑब्सजर्व्हर म्हणून नेमते. निवडणूक काळात नियत नियमानुसार पैसा व्यय व्हावा, सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी यासह नेमूण दिलेल्या अन्य बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अधिका-यांची नेमणूक करण्यात येते. त्याच राज्यात नेमणूक असलेला अधिकारी त्याच राज्यात ऑब्जर्व्हर नसावा हा दंडक पाळला जातो. या ऑब्जर्व्हस् साठी भारत निवडणूक आयोगाने विज्ञानभवनात दोन टप्प्यात ब्रिफींग मिटींग आयोजित केली होती एक १४ मार्च २०१९ ला तर दुसरी २६ मार्च २०१९ ला.
निवडणूक आयोग या आयोजनात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयाची मदतही या घेत असते. त्यानुसार महाराष्ट्र सदन या राज्य शासनाच्या दिल्लीतील महाराष्ट्राच्या दुतावासाकडे ब्रिफींग मिटींग काळात हेल्पडेस्क लावण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र सदनाकडून माझ्या नावावर शिक्कामोर्तब होवून कार्यालय प्रमुखाला याबाबतीत अवगत करून माझी विशेष सेवा घेण्यात आली.
असे काम करतो हेल्पडेक्स
महाराष्ट्र सदनाचा एक कर्मचारी एक वेळा श्री.जगदीश उपाध्याय तर दुस-यावेळी श्री. राजेश हरणे हे माझ्या दिमतीला होते. महाराष्ट्रात ज्या ऑव्जर्व्हरची नेमणूक केली आहे ते अधिकारी आमच्या हेल्प डेक्सवर येत असत. मग संबंधित लोकसभा मतदार संघ कुठे आहे?, त्याच्या आजुबाजुला कोणते एअरपोर्ट आहे?, आम्हाला घ्यायला गाडी येणार का?, तो भाग कसा आहे?, तेथे पर्यटन स्थळ कोणती आहेत?, खानपान कस आहे? असे आपआपल्या प्रकृतीनुसार सर्व प्रश्न विचारण्यात येत असत. हेल्पडेक्सवरील माझे सहकारी हे मुळात उत्तराखंड व दिल्लीत जन्मलेले असल्याने त्यांचा महाराष्ट्राशी व तेथील भौगोलिक राजकीय परिस्थितीचा तसा फारसा अभ्यास नसल्याने या अधिका-यांना माहिती देवून त्यांचे समाधान करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. आणि ही आगळीवेगळी जबाबदारी सांभाळताना मला खूप मजाही आली व एक सुंदर अनुभवही मिळत होता. आमच्या डेक्सवर आलेल्या अधिका-यांना आम्ही महाराष्ट्राचा नकाशा , जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी , पोलीस अधिक्षक कार्यालय आदींचे संपर्क क्रमांक असणारी माहिती पुस्तिका देत असू.
या निमित्ताने देशातील आयएएस आयआरएस आएफएस आदी अधिका-यांचा हा मेळाच जवळून बघता आला. या अधिका-यांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर, आकस, मोठेपणाचा तोरा आदी गुण अवगूण म्हणा हवे तर जवळून बघता आले. आणि हेल्प डेक्सहून वेळ मिळाला तसा या ब्रिफींग मिटींगमध्ये होत असलेल्या मार्गदर्शन सत्राचाही आस्वाद घेता आला. एकंदरीतच हा एक आगळा वेगळा अनुभव समृध्द करणारा ठरला.
0000
Wednesday, March 10, 2021
महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर
महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर
१० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्याला जन्म
मुंबई येथे उच्च शिक्षण. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा उत्तीर्ण
मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक, साधना साप्ताहिकात सहसंपादक ,आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून नियुक्ती काही काळ ‘प्रोड्यूसर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली .
मुंबई विद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती .
‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह.
‘जिप्सी’, ‘छोरी ‘ ,‘उत्सव’ , ‘विदूषक’ व ‘सलाम’ आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द
मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद ‘मीरा’ ह्या नावाने प्रसिद्ध
इंग्रजीतील लिम्रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही लिहिल्या आहेत.
‘भोलानाथ’ आणि ‘बबलगम’ हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह.
‘जिप्सी’, ‘छोरी’ व ‘भोलानाथ’ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके.
पाडगावकरांनी लिहिलेले काव्यात्म ललित निबंध ‘निंबोणीच्या झाडामागे’ नावाने प्रसिद्ध
अनेक अमेरिकन साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत
जे. कृष्णमूर्तींच्या काही भाषणांचा त्यांनी अनुवाद केला .
‘बोरकरांची कविता’ , ‘युगात्मा’ , ‘महात्मा गांधीवरील ललित लेखनाचा संग्रह’, ‘संहिता’ , ‘विंदा करंदीकर ह्यांची निवडक कविता’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले
त्यांच्या ‘शर्मिष्ठा’ या नाट्यकाव्यात प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार दिसतो
उपहास व उपरोधाचे चित्र असलेला ‘सलाम’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे
पाडगांवकर यांच्या साहित्यिक योगदानासाठी २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान
२०१३ मध्ये केंद्र शासनाने ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला
वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार
२७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे येथे जन्म
नाशिक येथे त्यांचे शिक्षण झाले. १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते
त्यांनी पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता
‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’ , ‘हिमरेषा’ व ‘वादळवेल’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह
‘विशाखा’ हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण ठरले
‘दुसरा पेशवा’ , ‘कौंतेय’ , ‘आमचं नाव बाबुराव’ , ‘ययाति आणि देवयानी’ , ‘वीज म्हणाली धरतीला’ , ‘नटसम्राट’ आदी त्यांची स्वतंत्र नाटक प्रसिध्द आहेत
‘दूरचे दिवे’ , ‘वैजयंती’ , ‘राजमुकुट’ , ‘ऑथेल्लो’ व ‘ बेकेट’ ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके होत
‘वैष्णव’ , ‘जान्हवी’ व ‘कल्पनेच्या तीरावर’ आदी त्यांच्या प्रसिध्द कादंब-या होत
‘फुलवाली’ , ‘सतारीचे बोल आणि इतर कथा’ , ‘काही वृद्ध काही तरुण’ , ‘प्रेम आणि मांजर’ व ‘निवडक बारा कथा’ आदी त्यांच्या कथासंग्रह प्रसिध्द आहेत
कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर , ‘समिधा’ हा मुक्तकाव्य संग्रह, ‘आहे आणि नाही’ हा लघुनिबंध संग्रह तसेच काही ‘बालकथा’ व ‘बालगीते’ यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो
१९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले
भारतीय साहित्यातील योगदानासाठी १९८७ मध्ये त्यांना मानाच्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
वि.वा.शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातील योगदानासाठी २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो
पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर
पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर
ि९ मार्च १८९९ ला सातारा जिल्हयातील चाफळ येथे त्यांचा जन्म
१९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली
कवी यशवंत हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक कवींपैकी एक महत्वाचे कवी म्हणून प्रसिध्द. १९२० ते ३० या दशकात रविकिरण मंडळाने कविता महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवल्या
१९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ‘आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत त्यांनी आईची थोरवी वर्णिली आहे.
‘यशोधन’ हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कविता संग्रह होय
‘यशवंती’, ‘भावमंथन’, ‘बंदिशाळा’, ‘जयमंगला’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह
‘जयमंगला’, ‘काव्यकिरीट', ‘बंदीशाळा' आदी खंडकाव्य त्यांनी लिहिली
‘काव्यकिरीट’ या खंड काव्यात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. या काव्याने प्रभावीत होत १९४० मध्ये बडोद्याच्या महाराजांनी कवी यशवंत यांना ‘राजकवी’चा बहुमान दिला
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले
शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले
पानशेत धरण फुटल्याच्या दुर्घटनेवर त्यांनी ‘मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य लिहिले
‘मित्रप्रेम रहस्य’, ‘वीणा झंकार’, ‘कातिणीचे घर’ ही त्यांची पुस्तके गाजली
‘मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह
कवी यशवंत यांनी लिहिलेली 'घायाळ' ही कादंबरी लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर होय
त्यांनी १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले
१९६९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
गणपतराव जोशी
गणपतराव जोशी
मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट
१५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी जिल्हयातील राजापूर येथे जन्म
१८८१ मध्ये त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना केली,ही मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था ठरली
अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते
गणपतराव जोशी यांनी शेक्सपिअर यांच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका वठवून लोकप्रियता मिळविली . झुंझारराव (ऑथेल्लो), चंद्रसेन (हॅम्लेट), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या.
शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्यकडून मिळाले होते
‘राणा भीमदेव’ नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व ‘तुकाराम’ व ‘रामदास’ नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत.
‘झोपी गेलेला जागा झाला’ (दातेकृत) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती
Tuesday, March 9, 2021
पद्मश्री रणजित देसाई
पद्मश्री रणजित देसाई
उत्कृष्ट कादंबरीकार,कथालेखक आणि नाटककार
८ एप्रिल १९२८ रोजी जन्म. कोल्हापुर जिल्हयातील कोवाड हे त्यांचे मूळ गाव
माध्यमिक शाळेत असतांनाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली
कोल्हापूरच्या महाद्वार मधून त्यांचे लेखन प्रसिध्द होत असे
त्यांच्या ‘भैरव’ कथेला कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथा लेखनाला सुरुवात झाली
‘रूपमहाल’, ‘कणव’ , ‘जाणे’ , ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’ इत्यादी त्यांचे कथा संग्रह प्रकाशित झाले
ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा एक प्रकारे चित्रकथाच होत्या, इतकी त्यांची जीवंत मांडणी होती
सुरुवातीला त्यांनी ‘बारी’ ,‘माझ गांव’ या कांदब-या लिहिल्या
१९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ या ऐतिहासिक कादंबरीने लोकप्रियतेचे शिखर गाठले
१९६४ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीही अतिशय लोकप्रिय झाली
कर्णाच्या जीवनारील ‘राधेय’ तसेच ‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिंड’, ‘राजा रवी वर्मा’ या त्यांच्या कादंब-याही खूप गाजल्या
त्यांनी लिहिलेल्या ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’, ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली
‘नागिन’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘सवाल माझा ऐका’ आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या
१९७३ मध्ये ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला
Subscribe to:
Posts (Atom)



