-माझ्या नजरेतून सुक्ष्म निरीक्षण
‘आम्हाला
आमच्या क्रिकेट मंडळाकडून आर्थिक मदत मिळाली नाही, आम्हाला कपडयांपासून समस्या
होती, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकही नवीनच अशा सर्व विपरीत परिस्थितीत, विडींज संघाच्या १५ मोह-यांनी स्वत:हून आपापल्या भूमिका
वठवत संघासाठी केलेली उत्तमोत्मक कामगिरी याचा परिपाक म्हणूनच आम्ही सलग दुस-यांदा
टी-२० विश्व चषकावर नाव कोरू शकलो.’ हे वक्तव्य आहे वेस्टंडिज संघाचा कर्नधार डॅरेन सॅमीच. ज्यात लपल त्यांच्या विश्वविजेतपदाच गमक. विडींज युवा, पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी २०१६ चा
टी२० विश्व चषक जिंकून इतिहास घडवला.
एकेकाळी क्रिकेटच्या जगतात
आपल्या गोलंदाजीने विरोधकांना धसका भरण्यास लावणा-या आणि काही वर्षांपासून क्रिकेट
विश्वात बहुदा मागच्या पायदानावर फेकल्या गेलेल्या वेस्टंडीस क्रिकेट संघांनी २०१६
मधे टी २० क्रिकेटप्रक्रारात विश्वकपवर आपले नाव कोरून जगज्जेता असल्याचे दाखवून
दिले. बांग्लादेशात पारपडलेल्या १९
वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला नमवणारा यंग वेस्टंडीसच
संघ, बलाढय ऑस्ट्रेलिया संघाला नमविणारा महिला विंडींज संघ आणि इडनगार्डनवर अंतिम
सामन्यात ६ चेंडूत १९ धावांची गरज असताना लागोपाठ ४ षटकार लगावत इंग्लड विरूध्द विजय
मिळवून देणारा कार्लोस ब्रेथवेट या सर्व स्वर्णीम क्षणांचा आठव करून विंडीज जनता
स्वत:ला भाग्यवान समजत असेल. पुरुषांच्या
विडींज संघाने सलग दुस-यांदा टी २० चा बादशहा असल्याचे सिध्द केले तर महिला व युवा
संघाने प्रथमच आपल्या देशाला विश्व विजेतेपदावर विराजमान केले.
झटपट क्रिकेटचा थरार म्हणजे टी
२० क्रिकेट प्रकार. जगभरात या
क्रिकेटप्रकाराला मोठया प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. उत्तम रणनिती, त्याची चोख अंमलबजावणी, सांघिक भावनेतून जिददीने व लढवय्येपणाने
दमदार प्रदर्शन करणारा संघच येथे बाजीमारून नेतो. २०१६ च्या टी २० विश्व चषकावर नाव कोरणारा वेस्टइंडिजचा युवा, महिला
व पुरूष संघांनी या क्रिकेट
प्रकाराचे आम्ही अनभिक्षीक्त राजे असल्याचेच
जगाला दाखवून दिले. प्रतीकूल परिस्थितीलाही
सामोरे जाऊन खिलाडीवृत्तीचे दर्शन घडविणा-या विडींज संघाला मानाचा मुजरा.

No comments:
Post a Comment