पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७ वा
वाढदिवस. या देशाचा सामान्य नागरीक म्हणून माझ्या नजरेतून त्यांच्या
व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडायचा मोह आवरला नाही म्हणून हा लेख प्रपंच. मी,
व्यक्तीपूजक नाही आणि कोणत्या राजकीय पक्षाचा फॉलोअरही नाही हे मी आधिच स्पष्ट
करतो.
मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचा
मला भावलेला पैलू म्हणजे त्यांचे अमोघ वक्तृत्च. बहुतेक नेते मंडळी ही त्यांच्या
वक्तृत्चामुळे ओळखले जातात. मोदी ही त्याला अपवाद नाहीत उलट ते एक सरस वक्ते आहेत
असच म्हणाव लागेल. पंतप्रधान होण्या आधी मी त्यांचे एकही भाषण ऐकले नाही ही
विशेषत्वाने नमूद करतो. मात्र, विविध कार्यक्रमांमध्ये(ज्यातील काही कार्यक्रमांचे मी स्वत: कव्हरेज केले.),
परदेश दौ-यांमधे आणि ‘मन की बात’ या
रेडीओ कार्यक्रमातील त्यांच्या भाषण शैलीचा मी बारकाईने अभ्यास केला. मनाला
भिडणारे शब्द, शब्द फेक, उच्चारणातील चढ-उतार आणि उत्तम हाव भाव हे त्यांच्या वक्तृत्वातील
ठळक वैशिष्टे. प्रत्येक भाषणात
नावीन्यपूर्ण संकल्पना असतात त्यांच्या. २०१४ च्या निवडणूक प्रचारातील भाषणांमध्ये
दिवसाला ४ प्रचार सभा असतील तर तेथील त्यांचा पेहराव आणि भाषणातील मुद्दे एकदम
वेगळे मात्र स्थानिक प्रश्नांची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक प्रश्नांना साद घालणारे
वक्तव्य ते आपल्या शैलीने लिलया पेरतात हा माझा अनुभव. सरकारी कार्यक्रम वा
योजनांच्या उदघाटन प्रसंगीचं भाषण त्याहून वेगळ त्यात आव्हान करणारे वक्तव्य मनाला
भीडतात. सामन्य जनतेला संबोधून करण्यात येणार
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र दिनाचं भाषण हे राजकीय सामाजिक आणि आर्थिक अशा
विविध छटा असणारं. आता हे भाषण मोदी साहेब स्वत: तर तयार करीत नसतील अर्थात
त्यांच्याकडे वेळ नसतो.मात्र, भाषणाचे मुद्दे मिळाल्या नंतर ते फुलवण्याच त्यांच
कौशल्य भारी आहे.
संसद भवनातील ग्रंथालयात ज्ञानपीठ
पुरस्कार वितरण कार्यक्रमातील भाषण, १५ ऑगस्ट २०१५ रोजीचे लाल किल्यावरील भाषण, ‘सेतू भारतम’ या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या
योजनेच्या शुभारंभातील भाषण,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी
कार्यक्रमातील त्यांचे भाषण आणि २८ जानेवारी २०१६ रोजी एनसीसी कॅडेट्सला ‘पंतप्रधान बॅनर’ वितरण कार्यक्रमातील भाषणाचे
वार्तांकण करण्याची मला संधी मिळाली हे इथे आवर्जून नमूद करतो. या कार्यक्रमाच्या
निमित्ताने मला पंतप्रधानांना काही अंतराहून बघण्याची संधी मिळाली. यात बहूतेक
वेळा माझी पत्नीही सोबत होती त्यामुळे तिलाही मोंदीच दर्शन घडल.
पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या वहील्या
गणतंत्र दिनी २६ जानेवारी २०१५ रोजी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे
प्रमुख पाहुणे असताना मोदींना सर्व नियम व सुरक्षा बाजुला ठेवून वर हात करून
उपस्थितांना केलेले अभिवादन म्हणजे आम्ही दोघांनी त्यांना १० ते १५ फुट अंतराहून
बघण्याचा सुखद प्रसंग. त्यानंतर ऑफीसचा कॅमेरामन नसल्यानं स्वत: कॅमेरा चालवत
महाराष्ट्र सदनात आयोजित मुख्यमंत्री परिषदेच्या समारोपाचे वक्ते म्हणून संबोधीत
करण्याकरीता आलेले मोदी हे मला पुन्हा एकदा १० ते १५ फुटांहून पाहण्याची मिळालेली
संधी.
आता
थोड कामाबद्दल . पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशात स्वच्छतेला प्राधान्य देत
सुरु केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’, पायाभूत
सुविधांनी सज्ज अशा शहरांची संकल्पना असलेले ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प, आर्थिक सुधारणांच्या
दिशेने पाऊल टाकत सुरु झालेली ‘पंतप्रधान जनधन योजना’, मुलींचा घटत जाणारा जन्मदर
रोखण्यासाठी सुरु झालेली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’, बेरोजगरांना काम आणि उद्योगांना
कुशल कामगार देणारी ‘स्कील इंडिया’ ही
योजना, कृषी क्षेत्रात मोलाची ठरणारी ‘पंतप्रधान पिक विमा योजना’ अशा महत्वाच्या योजना
वैशिष्ट पूर्ण म्हणता येईल त्याच्या प्रत्यक्ष व चोख अंमलबजावणीमुळे मोठा देशात
मोठा व सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होईल हे निश्चित.
काही दुर्देवी घटनाही घडल्या. मुस्लीम व दलीत बांधवांवर
झालेले अत्याचार, महिलांवर झालेले अत्याचारही आपल्याला दृष्टी आड करून चालत नाहीत.
जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादयांच्या कारावयांमुळे गालबोट
लागले.उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्र
सरकारकडून झालेला प्रयत्न आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लगावलेली चपराक सुध्दा चर्चेचा विषय
झाला.
याच काळात शिक्षक दिनी पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद, भारतीय
अंतराळ संशोधन संस्थेत स्वत: उपस्थित राहून संशोधकांना दिलेले प्रोत्साहन, रीओ
ऑल्म्पिक मधे भाग घेण्यासाठी जाणा-या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छा
आदी बाबी उल्लेखनीय वाटल्या.
योजना आयोगाचे नाव बदलून निती आयोग
करणे, कृषी मंत्रालयाला जोडून शेतकरी कल्याण नामकरण करणे या बाबींचा विचारही
महत्वाचा ठरतो. मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला थेट
जनतेशी संवाद करण्याची त्यांची शैलीही उत्तम ठरते. विविध राज्यांतील प्रलंबित
प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून
त्या-त्या राज्यांच्या मुख्य सचिवांशी दर महिन्याला घेत असलेली बैठक याचाही उल्लेख महत्वाचा ठरेल.
विदेश नितीचा विचार करता सकारात्मक बाबी
दिसून येतात. ज्या अमेरीकेने मोदींना व्हिजा नाकारला होता त्याच अमेरीकेच्या
राष्ट्राध्यक्षांशी त्यांचे जुडलेले टयुनींग संपूर्ण जगाने पाहीले त्यामुळे आशिया
खंडात भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. अमेरीकेने भारताला संयुक्त राष्ट्र
संघात स्थायी सदस्यत्वासाठी जाहीर केलेला पाठींबा आणि अमेरीकी संसदे संबोधित
करण्यासाठी मोदींना देण्यात आलेले निमंत्रण हे जागतिक राजकारणात महत्वाचे ठरते.
जपान, चिन, अमेरिका, इंग्लड सासख्या बलाढय देशांसह आखाती देशांसोबतची मैत्री जागतिक राजकारणात महत्वाची ठरते. परदेश दौ-यात
भारतीयांना संबोधन म्हणजे कुटनितीक दृष्टया महत्वाचे ठरले. प्रत्येक देशांशी
भारताचे व्यापारीक व नैसर्गीक संबंध सुधारण्याच्या दिशेने ते महत्वाचे पाऊले
ठरतात. पंतप्रधानपदाची शपथ घेतानाच सार्क देशाच्या प्रमुखांना मोदींनी निमंत्रित
करून नवा पायंडा पाडला हे ही इथे उल्लेखनीय.
दर वाढदिवासाला आपल्या आईचे आशिर्वाद
घेण्यासाठी जाणारे मोदी आणि पक्ष व देशा
प्रती त्यांची असलेली श्रध्दा एका सच्या
मानसाची ओळख करून देते.
