Tuesday, September 29, 2020
Friends Corner गप्पा With ज्योत्सना
Monday, September 21, 2020
Tuesday, September 15, 2020
Friends Corner गप्पा With सारिका
https://youtu.be/FYK9tt890yg
सर्व
मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार,
‘वाळवंटातील फुलं’ या आपल्या वाट्सअप समुहाच्या Friends Corner या उपक्रमाची दुसरी SpecialGuest सारिका मोहोड-काळबांडे ला काल 13 सप्टेंबर 2020 ला आपण भेटलो.
. सारिका, बॉर्न अँड बॉटअप नागपूर सारख्या मोठया शहारात झाली. त्यामुळे विहिगावला आल्यावर तिचं वागणं-बोलणं व सर्वांमध्ये मिसळनं इथल्या मुला-मुलींना एकदम इम्प्रेस करायचं. बोल्ड वागणारी सारिका जेवढी फटकळ तेवढीच ती मनाने मृदू व सालस. बारावी नंतर इतर मुलींप्रमाणे तिलाही खूप शिकायचं होतं पण, तिच्या वाटयाला अल्प कॉलेजजीवन आलं. परिस्थितीने तिला स्वप्नांच्या दुनियेत रमन्याआधीच प्रपंचाकडे वळवलं . मुलीने सुखाने संसार थाटावा व त्यात रमावं ही आई-वडिलांची इच्छा असते त्याला सारिकाचे आई वडीलही अपवाद नव्हते.सर्वांनी सारिकासाठी वर निवडला सर्वांना आवडलेही यजमान. मात्र, हिला काहीकेल्या आपल्या जीवनपटाचा हिरो आवडेना. आता, ती दोन गुणी लेकारांची आई आहे. साहिल नुकताच कॉलेजला गेला तर मुलगी भूमी ही 10वी कडे वाटचाल करित आहे, आता तिला जीवनपटाचा हिरोचं बॉलीवडुच्या शहंशाहप्रमाणे वाटू लागला आहे.
आपल्या उपक्रमाच्या पहिल्या सेगमेंटमध्ये यजमानांशी अरेंजमॅरेजपध्दतीने जुळलेल्या रेमीगाठीबाबत मजेशीर किस्से सांगतांनाच संसारपटाच्या सुरुवातीच्या काळात घरातील ज्येष्ठ सदस्याच्या अंगावर चुकून पडलेली भाजी व त्यातून उडालेली धांदल हा किस्सा ऐकून हशा पिकला. आवडी- निवडी जाणून घेताना रिताने आम्हाला सांगितलेली तुझी झोपेची आवड आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या आवडीपायी तू या चित्रपटाचे केलेले 100 वेळा पारायण आमच्या भूवया उंचावून गेले. फोटोसोबत संवाद साधतांना तुझा हिरोईन स्वरूपातील फोटो आविष्कार व त्याची जन्म कहाणी ऐकून मजा आली. तुला पंख दिले तर सर्व मित्रांना भेटून येण्याची व त्यातही स्वित्झर्लंडमध्ये पहिली भेट अमोल ठाकरेची घेण्याची तुझी कल्पकताही आम्हाला भावली.
प्रिय सारिका, काका (तुझे वडील) अत्यवस्थ असल्याने त्यांच्या तब्येतीची ममताकडून जातीने झालेली विचारपूस मैत्रिचा अर्थ अधोरेखित करून गेली. आज तुझ्याकडे आयत्यावेळी पाहुने आले त्यात तू ठरल्या नियोजनात व्यत्यय नको म्हणून मैत्रिसाठी वेळ काढलास आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यासाठी आमच्या सर्वांकडून तुझे आभार,अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
(रितेश मोतीरामजी भुयार)
***
Thursday, September 3, 2020
Performing KIRTAN after 10 Years -Part 1
महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान
➡️ राजधानीतून...
महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान; राज्याला एकूण १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
'Friends Corner' chat with Amol Thakrey
सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम
नमस्कार,
‘वाळवंटातील
फुलं’ या आपल्या वाट्सअप समुहाच्या Friends Corner या पहिल्या-वहिल्या उपक्रमाचा पहिला Special Guest अमोल
ठाकरे ला काल ३० ऑगस्ट २०२० ला आपण भेटलो.
आपल्या
उपक्रमाच्या वेगवेगळया सेगमेंटमध्ये गप्पांतून तुझं आणि वहिनीसाहेब अदिती यांच्या
जुळून आलेल्या प्रेमगाठी ते संसाराचा डोलारा सांभाळताना वाटेला आलेले सुखद क्षण व
काही गमती जमतींचा उलगडाही झाला. परदेशात भारतीय, महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या रितीभाती जपतानाचे व स्वित्ज्ञर्लंडमध्ये
यासाठी कार्यरत महाराष्ट्रीय, केरळी आदी मंडळ त्यांची
कार्यपध्दती तसेच परदेशातील वर्ककल्चर व जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोण आदी
बाबींविषयीही जाणून घेता आले. छायाचित्रांसोबत तू खूप छान
संवाद साधला व आम्हालाही या छायाचित्रांमुळे तुझ्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडले.
कार्यालयीन काम आणि कुटुंब
सांभाळून तू जपलेल्या आवडी त्यात सालसाच्या रूपाने टाकलेली भरही प्रशंसनीय. पंख दिल्यास सध्या आजारपणातून जात असलेल्या आई जवळ जाण्याची व्यक्त
केलेली ईच्छा भावूक होती. झटपट संवादात आयुष्यात काय राहील व
काय करावस वाटत यावर प्रकाश टाकतच विहीगाव व महात्मा फुले शाळेविषयी व्यक्त
केलेल्या प्रेमळ भावना असा सर्व तब्बल पावने तीन तासांचा (२.४५ मिनीटे) संवाद आम्हा सहभागी सर्वांसाठी खूप काही
देवून गेला, त्यातील खुपच निवडक बाबी इथे नमूद करण्याचा
प्रयत्न केला.
प्रिय अमोल कामाच्या व्यस्ततेतून मैत्रिसाठी
वेळ काढलास आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यासाठी आमच्या सर्वांकडून तुझे
आभार,अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
(रितेश मोतीरामजी भुयार)
*****








