शिलाँग येथे आयआयएममधे व्याख्यान देताना डॉ.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच दिनांक २७ जुलै २०१५
रोजी रात्री ९ वाजता त्यांचे निधन झाले. बातमी वा-यासारखी पसरली आणि देश-विदेशातून
त्यांच्या जाण्याबददल हळ-हळ व्यक्त करण्यात येऊ लागली. डॉ.कलाम यांचं निधन हे मी
ख-या अर्थानं कर्मयोग्याच निधन मानतो. वैज्ञानिकदृष्टीकोणाच्या प्रचार-प्रसाराचा
वसा घेतलेल्या डॉ. कलामांनी शेवटच्या श्वासापर्यंत ध्यास सोडला नव्हता. म्हणूनच ते
भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाचे खरे हकदार ठरतात. ऐरवी व्यक्तीचं निधन हे
अपघात, आजार यामुळे झाल्याचे आपण बघतो मात्र देशसेवा करता -करता मृत्यू येणारे डॉ.
कलामांसारखे विरळा व्यक्तीमत्वच यास पूर्णपणे अपवाद ठरतात.
तामिळनाडूतील रामेश्वरममधील नावाडयाच्या कुटुंबात
जन्माला आलेले अब्दुल पाकीर जेमनुब्दीन कलाम यांचा भारतीय शस्त्रसज्जतेतील अतुलनीय
योगदानामुळे मिसाईल मॅन ते भारताचे राष्ट्रपतीपद भूषविण्यापर्यंतचा प्रवास थक्क
करणारा आणि प्रेरणादायी असा आहे. Defense Research & Development Organization (DRDO) चे संचालकपद
भूषवून त्यांनी विविध अग्नीबानांची निर्मिती करण्यात दिलेले योगदान आणि पोखरणच्या
अनुचाचणीत दिलेले योगदान अतुलनीय होते. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना
प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी लिलया पेललेली जबाबदारी उल्लेखनीय ठरते.
कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना केवळ प्रामाणिक देशसेवक या ओळखीमुळे
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने २००२ साली त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषीत
केले. डॉ. कलामांच्या कर्तव्यनीष्ठमुळे आणि त्यांच्या प्रखर देशसेवेच्यावृत्तीमुळे
विरोधीपक्षांनीही त्यांना या पदावर विराजमान होण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही.
डॉ. कलाम राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारण्याच्या
काही दिवसांपूर्वीची हा किस्सा. डॉ. कलामांना एका महाविद्यालयात व्याख्यानासाठी
आमंत्रित करण्यात आले होते. मुळात राष्ट्रपतीपदासाठीची सर्व सुरक्षा
त्यावेळेसपासूनच कलामांना मिळाली होती. पण त्यांनी तो तामझाम न स्वीकारता
साधेपणानेच या कार्यक्रमास उपस्थिती लावली. याच कार्यक्रमात एकदम वीज पुरवठा खंडीत
झाला. अशात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमधे जाऊन संबोधन केले. या प्रसंगातून
त्यांना विद्यार्थ्यांबददल असलेली तळमळ आपल्याला दिसून येते. एकदा व्यापीठावर पाच
खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या पैकी मधली एक खुर्ची उंच होती. हे डॉ. कलामांच्या
लक्षात येताच त्यांनी मधली खुर्ची काढून टाकण्यास सांगून इतर खुर्च्यांप्रमाणेच
मधली खुर्ची लावण्यास सांगितली. माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी
सांगितलेला किस्सा. डॉ. कलामांना आपल्या पदाचा कधीच अभिमान नव्हता त्यांची भूमिका
नेहमीच सहकार्याची असायची. प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर डॉ. कलामांनी
स्वत: श्रीमती पाटील यांना राष्ट्रपती भवनातील विविध दालन दाखविली आणि या पदावर
पहिल्या महिला होण्याबददल कौतूक केल. श्रीमती पाटील सांगतात की, राष्ट्रपती
भवनातून संसदेकडे डॉ. कलामांकडून राष्ट्रपतीपदाचे सूत्रे स्वीकारण्याकरिता दोघेही
एकाच गाडीतून जातअसताना कलामांनी श्रीमती पाटील यांच्याकडे बघून विचारले, ‘आपण अस्वस्थ
दिसताय काल झाल?’
त्यावर त्या म्हणाले मला हिरव्या पेनने लिहायची सवय आहे अन माझ्याकडे
हिरव्याशाहीचा पेनच नाही. हे ऐकूण कलामांनी लोकसभा सचिवालयातील अधिका-याला फोन
करून हिरवा पेन तयार ठेवण्यास सांगितले.
त्यांचा साधेपणा कमालीचा होता म्हणूनच त्यांना
जनतेचा राष्ट्रपती सुध्दा म्हणतात. त्यांनी राष्ट्रपतीपदाचा पगार कधीच घेतला नाही
तो त्यांनी एका संस्थेला दान केला. ते राष्ट्रपती भवनातून गेले तेव्हां
त्यांच्याकडे केवळ एक ब्रीबकेस होती. त्यांचं विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम होत. हेच
दिसून येते.

No comments:
Post a Comment