दिल्लीत पावसाचा जोर.. त्यात आज (दिनांक १३ ऑगस्ट २०१५)
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. पहाडगंज या मध्यवर्ती वस्तीत आधुनिक
तंत्रज्ञानाने सुसज्ज असा व्हॅल्यूएबल स्टुडियो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.
दीपक सावंत, खासदार
अरविंद सावंत आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य
अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन स्टुडिओत सकाळी ८ वाजता हजर. ही मंडळी
येथील व्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करीत होते आणि याचवेळी महाराष्ट्रातील मेळघाट
या दुर्गम व आदिवासी बहुल भागात सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक
पथक आणि मुंबईतील स्टुडिओत तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक हजर होते. या तीनही
स्टुडिओंचा परस्परांमधील समन्वय स्वत: मंत्रीमहोदय जातीने बघत होते. ठरल्या
वेळेप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डांचा ९.३० वाजता स्टुडिओत प्रवेश
झाला. ही सर्व लगभग होती महाराष्ट्र राज्याच्या ‘शिव आरोग्य सेवा’ या ‘टेली मेडिकल कॅम्प’ द्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याबाबतचे
सादरीकरण करण्याची.
राजधानीत पूर्वीच्या योजना आयोग आणि आता बदललेल्या निती आयोगाकडून
राज्याकरिता निधी मागण्यासाठीच्या सादरीकरणाचा मी साक्षीदार. पण, राज्याच्या आरोग्य सेवेतील प्रगतीबाबत स्वत: राज्याचे आरोग्य मंत्री
आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्य क्षेत्रातील प्रयोग केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना
सहभागी करून सादरीकरण करण्याचा हा दुर्मीळ पण राज्याच्यादृष्टीने तेवढाच महत्वाचा
प्रसंग. हे सादरीकरण केंद्रीय मंत्र्याना खूपच आवडले आणि त्यांनी ‘शिव आरोग्य सेवेचे’ तोंडभरून कौतुक केले.
सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्रासाठी ‘शिव आरोग्य सेवा’ ही योजना. आणि ‘टेली मेडिकल कॅम्प’द्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णावर कशा प्रकारे उपचार करता येतील याचे यशस्वी सादरीकरण. शिव आरोग्य सेवेच्या माध्यातून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे एक क्रांतिकारक पाऊल पुढे टाकले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘शिव आरोग्य सेवेअंतर्गत’ थेट प्रक्षेपणाद्वारे ‘टेली मेडिसीन’ सेवेचे सादरीकरण केले. यावेळी दिल्लीतील स्टुडिओत प्रत्यक्ष केंद्रीय
आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत तर
मुंबई येथील स्टुडीओत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.अवस्थी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निश सावंत, उरोतज्ज्ञ डॉ.ना.म.जोशी या तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू आणि सेमाडोह येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजाराने ग्रस्त रूग्ण व त्यावर उपचार करणारे
डॉक्टर्स यांचा सहभाग होता.
यावेळी झालेल्या सादरीकरणाप्रसंगी सर्वप्रथम सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात तनजीम शेख रशिद या ८ महिन्यांच्या बालकाची डॉक्टरांनी तपासणीकरून आजाराची पार्श्वभूमी व विविध चाचण्यांबाबत माहिती दिली. त्यानुसार रूग्णाचे वजन कमी असून कुपोषणाची लक्षणे दिसून आले तर बालकाच्या आईचे वजनही कमी असून तिलाही कुपोषण असल्याचे लक्षण दिसून आले. त्यादृष्टीने मुंबई स्टुडीओतील तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी बाळाला सकस पोषण आहार देण्याचा, स्तनपान व परंपरागत आहार देण्याचा सल्ला देत पुढील उपचारांबाबत निर्देश दिले. बाळाच्या आईलाही पोषण आहार देण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर सादरीकरणात वयोवृद्ध महिला मिथान भिसांडरे यांच्या डोळ्याच्या आजाराबाबत निदान व उपचारांबाबत चर्चा झाली. निदानासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे कागदपत्र यावेळी प्रत्यक्ष स्क्रीनवर दिसत होती त्याआधारे तज्ज्ञ डॉक्टर्स सल्ला व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करीत होते. श्री.कृष्णा या वयोवृद्ध रूग्णाबाबत चर्चा झाली. हृदयात सारखं दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. यावेळी सेमाडोह येथील डॉक्टरांना दिल्लीतील स्टुडिओत बसलेल्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि मुंबई स्टुडीयोतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे यांनी रूग्णाच्या छातीला टेथॅस्कोप लावण्यास सांगितला. यावेळी रूग्णाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकायला येत होते. यावरून तज्ज्ञ डॉक्टरांनी निर्देश दिले व रूग्णाच्या इसीजी चाचणीबाबत विचारणा करून तो दाखविण्यास सांगितले. हा रिपोर्ट बघून त्यांनी पुन्हा सेमाडोह येथील डॉक्टरांना रूग्णावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. अर्थात रुग्णाचा रक्तदाब, ईसीजी, सीटीस्कॅन रिपोर्ट, डोळ्याच्या इमेज पाहून त्याचे निदान कसे करता येऊ शकते हे प्रत्यक्षात मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून दिसत होते.

या सादरीकरणादरम्यान केंद्रीय
आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी डॉक्टर
व रूग्णांशी संवाद साधला. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण आणि
डॉक्टर्स तसेच मुंबई येथील स्टुडीओत बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुचे अभिनंदन
केले. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ‘शिव आरोग्य सेवा’ दुर्गम भागातील रूग्णांना संजीवनी ठरली असल्याची प्रशंसा श्री.नड्डा
यांनी यावेळी केली. देशातील ‘टेली मेडिसीन’ कार्यक्रमात ‘शिव आरोग्य सेवेचे’ मोलाचे आणि सरस योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या
कौतुकाच्या थापेने या योजनेला यशस्वी करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व
मंत्रीमहोदयांचा उत्साह वाढला आणि या योजनेच्या यशस्वीतेकडे जाण्याचा राजमार्ग
प्रशस्थ झाला अस म्हटल्यास वावग ठरणार नाही.
सादरीकरण्याच्यावेळी
राज्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशसकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व होते. सर्वश्री
खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अरविंद सावंत, कृपाल तुमाने आणि महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त
व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन यांची याप्रसंगी
उपस्थिती राज्याचा दिल्लीतील आवाज बुलंद करण्यासाठी पुढे आलेल्या नेतृत्वाचे चित्र
बघणे उर अभिमानाने भरून आणणारे होते.
रितेश
मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.

No comments:
Post a Comment