Thursday, January 12, 2023

नागपूरचा पक्षी ‘ओरियंट हनी बझर्ड’

भारतदेशाचा राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ तर महाराष्ट्राचा राज्य् पक्षी ‘हरियाल (हारोळी) याच ओळीत नागपूर शहराचा पक्षी ‘ओरियंट हनी बझर्ड’ हा होय. शहराच्या सिव्हील लाइन्स भागात जीपीओ चौकात Bird of Nagpur नावाने पक्षाची एक भली मोठी लोह प्रतिमा दिसली म्हणून या पक्षाची माहिती मिळवून येथे ही माहिती देण्याचा प्रयत्न. या पक्षाला क्रेस्टेड हनी बझर्ड नावानेही ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव पेरनीस प्टीलोऱ्हानक्स (Pernis ptilorhyncus) आहे. हा पक्षी ॲक्सीपीट्रीडाई (Accipitridae) कुटुंबातील एक शिकारी पक्षी असून या प्रजातीत पतंग, गरुड आणि हॅरियर सारख्या अन्य पक्षांचा समावेश होतो. या प्रजातीस ओरियंट हनी बझर्ड हे नामाभिदान प्राप्त झाले आहे. नावाव्यतीरिक्त ही प्रजाती ब्युटीओ बझर्ड प्रजातीच्या पक्षांशी संबंधीत नाही मात्र, वर्गीकरणानुसार पतंगांच्या जवळची प्रजाती आहे. या पक्षाची मान लांब तर त्याचं डोक लहान (कबुतराप्रमाणे) असतं तर त्याची शेपटी सपाट असते. या पक्षाचे डोके तेवढे आकर्षक व मजबुत नसते म्हणजेच मोठी शेपूट बारकंस डोक असा त्याचा आकार दिसतो. या पक्षाच्या शरीराचा वरचा भाग तपकिरी असतो तर उर्वरीत शरिराच्या खालचा भाग हा फिकट तपकिरी रंगाचा असतो. गळयाचा रंग गडद असतो. शरीराच्या रंगाच्या मदतीनेच या पक्षातील नर व मादा ओळखता येतो. नराचे डोके निळसर-तपकिरी तर मादीचे डोके तपकीरी रंगाचे असते. मादा ही नराच्या तुलनेत आकाराने थोडी मोठी आणि रंगाने गळद असते. नराची शेपटी काळी आणि त्यावर पांढरे पट्टे आढळतात. ०००

No comments:

Post a Comment