Friday, July 29, 2016

महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रगत वाटचाल




महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राजधानी दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राने राज्याच्या नावाला साजेशी कामगीरी केली आहे. राज्यशासनाच्या प्रसिध्दी व जनसंपर्काचे काम यशस्वीपणे सांभाळणा-या या कार्यालयाने बदलाची कास धरली. वायफाय सुविधा,अत्याधुनिक साधन सामुग्री आणि कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण निर्मिती यामुळे कार्यालय आएएसओ प्रमाणीत झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कार्यशाळांचे आयोजन करून कार्यालयाने महाराष्ट्राची प्रतिमा राज्याबाहेर निर्माण करण्यात यश मिळवीले असून देशातील विविध राज्यांच्या जनसंपर्क कार्यालयांना जोडण्यात पुढाकार घेतला.
राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे लाईव्ह वेब कास्टकरून कार्यालयाने नवा इतिहास घडवला. पंजाब मधील घुमान येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात पंजाबी भाषेत मेक इन महाराष्ट्र ही पुस्तिका प्रकाशन करून केलेली विशेष प्रसिध्दी म्हणजे कार्यालयाने केलेले सिमोलंघन ठरले.राज्य शासनाची उपलब्धी देश-विदेशातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लावण्यात आलेली प्रदर्शनी विशेष ठरली. सोशल मीडीया आणि एसएमएस सवेचा प्रभावी वापर करून राज्यशासनाच्या कामांची माहिती शेकडो पत्रकारांना देणा-या या कार्यालयाने महाराष्ट्र शासनाचा विश्वसनीय स्त्रोत म्हणून नाव लौकीक मिळवीले आहे. म्हणूनच राज्याचे मंत्री,लोकप्रतिनीधी, साहित्यिक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी,प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या महाविद्यालयांचे विद्यार्थी या कार्यालयाला सतत भेटी देतात.
माहिती व जनसंपर्क विभागाचे महत्वाचे कार्यालय म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राने पुढाकर घेत शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे सलग दोन वर्ष यशस्वी आयोजन केले. जनसंपर्कातील नवे प्रवाह, प्रतिमा निर्मिती, सामाजिक माध्यमांचा वापर, ब्रँडिंग आदी विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्याख्यात्यांनी या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. २०१५ मध्ये आयोजित या कार्यशाळेत आसाम, मणिपूर, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, केरळ, गोवा या राज्यांतील जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांसह महाराष्ट्रातील २० जिल्हा माहिती अधिका-यांनी सहभाग घेतला. २०१६ मध्ये आयोजित कार्यशाळेत माहिती व जनसंपर्क विभागातील १४ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील माहिती व जनसंपर्क विभागाच्या २३ अधिका-यांनी  सहभाग घेतला.         
लाईव्ह वेबकास्टच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे काम कार्यालयाने केले. राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेतील विविध महत्वाचे सत्र महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर वेबकास्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. महासंचालनालयाचे जे अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित राहू शकले नाहीत अशा अधिका-यांनी आप-आपल्या मोबाईलवर आणि कार्यालयांमधे मोठ-मोठया स्क्रिन लाऊन या उपक्रमाचा लाभ घेतला. विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला व उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  पत्रकार परिषदेचे लाईव्ह वेबकास्ट करून कार्यालयाने  महासंचालनालयाच्या कार्यालयांपुढे नवा पायंडा घालून दिला. या प्रक्षेपणाला सर्वचस्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
                 पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातआयोजित करण्यात आले. या संमेलनात कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्राची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्मिती करण्याच्या उद्देशाने मेक इन महाराष्ट्र ही पंजाबी भाषेतील पुस्तिका तयार करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन झाले, त्‍यांनी कार्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. साहित्य संमेलनास भेट देण्यास येणारे साहित्यप्रेमी, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह ही पुस्तिका पंजाबमध्ये लोकप्रिय ठरली. या शिवाय संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शन दालनात महाराष्ट्राची प्रगती दर्शविणारे पंजाबी भाषेतील विविध फलक कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आले होते. महाराष्ट्र आणि दिल्लीबाहेर देशाच्या उत्तरेकडील महत्वाच्या पंजाब राज्यात केलेली महाराष्ट्राची प्रतिमा निर्मिती म्हणजे या कार्यालयाने केलेले सिमोलंघनच ठरले.
             राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात येणारा अंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा म्हणजे देश- विदेशातील ग्राहक व जनता यांचा संगम. पंधरा दिवस चालणा-या या मेळाव्यात सहभागी होणा-या जनतेसमोर महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या उपलब्धींची माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यालयाने प्रदर्शनीचे आयोजन केले. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महाराष्ट्र दालनास भेट देणारे देश -विदेशातील व्यापारी, गुंतवणुकदार, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती प्रभावीपणे पोहचविण्यात आली. दिल्ली हाट येथे राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, हस्तकला व लघु उद्योगाचे दर्शन घडविणा-या महाजत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात कार्यालयाच्यावतीने राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले. जवळपास दोन आठवडे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून महाजत्रेस भेट देणारे देश-विदेशातील पर्यटक, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली.
            राजधानी दिल्लीतील शासकीय व खासगी प्रसार माध्यमांच्या कामाचे स्वरुप तसेच संसदीय कार्यप्रणली आदींची माहिती पत्रकारांना व्हावी, या उद्देशाने या कार्यालयाने महाराष्ट्राच्या विविध विभागांतील पत्रकारांसाठी  दिल्ली पत्रकार दौ-याचे आयोजन केले. या उपक्रमाअंतर्गत कोकण व नाशिक विभाग, अमरावती व नागपूर विभाग, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पत्रकार दौ-यांचे आयोजन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. या कालावधीत ब्युरो ऑफ पार्लामेंटरी स्टडीज एण्ड  ट्रेनिंगच्या सत्रांचे आयोजन , लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, साहित्य अकादमी, राष्ट्रीय माध्यम केंद्र आदी कार्यालयांच्या भेटींचे आयोजन करण्यात आले. तसेच, केंद्रीय मंत्री आणि प्रसार माध्यम, राजकीय,आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांशी या दौ-यात सहभागी पत्रकारांच्या वार्तालापाचे आयोजनही करण्यात आले. याशिवाय दिल्ली स्थित मराठी व गैर मराठी पत्रकारांसाठी कार्यालयाच्यावतीने पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयात घुमान येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनासाठी  पत्रकार दौ-याचे आयोजन करण्यात आले.
कार्यालयाने एसएमएस सेवा सुरू केली. MPCELL आणि MICDEL नावानी ही सेवा प्रसिध्द असून अल्पावधीत ही सेवा लोकप्रिय झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून दिल्लीत झालेल्या महाराष्ट्रासंबंधित महत्वाच्या निर्णयाची माहिती महाराष्ट्रातील ५ हजारांहून अधिक पत्रकारांना, दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांना दिली जाते. तसेच, मंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेच्या आयोजनाबाबतची माहितीही देण्यात येते. महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील मराठी मंडळांच्या सदस्यांनाही या एसएमएस सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अपडेट देण्यात येतात.
बातमी हे या कार्यालयाचे महत्वाचे अंग आहे. दिल्ली  शासकीय भेटीवर असणारे मुख्यमंत्री , इतर मंत्री त्यांच्या बैठकी, महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव, केंद्र शासनाकडून महाराष्ट्रासाठी झालेले महत्वाचे निर्णय आदी महत्वाच्या घटनांचे वार्तांकन करून ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यालयाच्यावतीने अव्याहतपणे सुरु आहे. समाज माध्यमांचा (सोशल मीडिया)वाढता प्रभाव लक्षात घेता कार्यालयाने या नव माध्यमांची कास धरत शासनाच्या प्रसिध्दीकामी या माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयाचे अधिकृत  ट्विटर हँडल, फेसबुक अकांऊट आणि पेजेस, ब्लॉग, गुगल प्लस आणि युटयूब अकाऊंट  असून या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 MAHA INFO CENTRE नावाने कार्यालयाचे ट्विटर हँडल असून आतापर्यंत ७८० ट्वीट करण्यात आले. कार्यालयाच्या ट्वीटरचे एकूण २ हजार ४८२ फॉलोअर्स आहेत. Mic New Delhi नावाचे कार्यालयाचे फेसबुक अकाऊंट आहे याचे एकूण ९५४ फ्रेंडस आहेत. याव्यतिरीक्त Maharashtra Information Centre PR Activity आणि MIC MEDIA GROUP नावाने कार्यालयाचे स्वतंत्र पेजेस आहेत. http://micnewsdelhi.blogspot.in/ नावाने कार्यालयाचा ब्लॉग असून यावर १८७ पोस्ट प्रकाशीत करण्यात आल्या. MIC New Delhi या नावाने कार्यालयाचे Google+ अकाऊंट आहे. MIC New Delhi नावाने कार्यालयाचे युटयुब अकाऊंट असून आतापर्यंत १२ व्हीडीओ अपलोड करण्यात आले असून त्यास ६५० लोंकानी भेट दिली आहे.MIC
            विविध आयोजनातही कार्यालयाचा पुढाकार आहे. दरवर्षी ६ जानेवारी ला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. पत्रकारीतेतील नामवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शन यावेळी आयोजित करण्यात येते. राज्यातील प्रसार माध्यमांसाठी कार्य करणा-या दिल्लीतील प्रतिनिधींसह दिल्लीत कार्यरत गैर मराठी भाषीक पत्रकारही या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित असतात. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जंयती निमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मराठी भाषेसाठी योगदान देणा-या नामवंताचे मार्गदर्शन आणि मराठीसाठी झटणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येतो. ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कालावधित मराठी पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, विविध चर्चासत्रे, व्याख्याने, काव्य रजनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या काळात करण्यात येते. दिवाळी अंक प्रदर्शनाची मोठी परंपरा या कार्यालयाला असून दरवर्षी दिवाळी अंक प्रदर्शनी भरवण्यात येते. या प्रदर्शनीस वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.  
                 राजधानी दिल्लीत राज्याचे पहिले संपर्क कार्यालय म्हणून डौलाने उभे असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे महत्व अबाधित असून या कार्यालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
                                                  00000



No comments:

Post a Comment