Wednesday, October 21, 2015

Cashless Country



एक नवीन विषय मांडतो इथे
Cashless
देश (जिथे सर्व आर्थिक व्यवहार पैश्यांशिवाय नुसत्या कार्ड्स द्वारे होतात जसे क्रेडिट, डेबिट कार्ड आणि मोबाईल बैंकिंग)
तुम्हाला माहीत आहे का !,  जगातील Cashless देश कोणता ?
स्वीडन हा जगातला पहिल्या क्रमांकाचा Cashless देश आहे. इथे 97%लोक कार्ड व मोबाईल बैंकिंग द्वारे आर्थिक व्यवहार करतात. 
*
बेल्जियम हा 2 -या क्रमांकावर 
*
फ़्रांस 3 -या
*
कॅनडा 4 थ्या तर इंग्लंड 5 व्या क्रमांकावर आहे.
आता जरा भारतावर एक नजर टाकू !. भारतात अजूनही 86 % आर्थिक व्यवहार हे पैस्यांद्वारे वा चलनाद्वारे होतात.
               आता पाहू या Cashless होण्याचे फायदे.

1)
पैसे छपाईच्या प्रिंटिंग चा मोठा खर्च वाचतो.
2)
बँक लुटीच्या घटनांना आळा बसतो.
3)
काळया पैशाला आळा बसतो.
4)
सुरक्षित आर्थिक देवान-घेवाणीचे वातावर निर्माण होते पर्यायाने देशातील जनता आर्थिक व्यवहारांच्याबाबतील Tension Free राहते.
सद्य: परिस्थिती बघता आपल्या देशात हे वातावरण निर्माण व्हायला कित्येक वर्ष लागतील. यातून आपण अजून जगाच्या किती मागे आहोत हे लक्षात येईल.
आपल्या देशात किती लोकांचे Bank Account आहेत, इथून सुरुवात आहे. 
राजकारण बाजुला ठेवलं तरी आपणास 'जनधन' योजनेचं महत्व पटाव, ज्याद्वारे देशात जास्तीत-जास्त लोकांचे Bank Account उघडण्याचा स्तुत्य विचार मुळाशी आहे.
   भारत देश cashless होण्यासाठी आपली Communication System अधिक बळकट व्हावी लागेल ज्याद्वारे Hacking आणि Information decoding च्या प्रकारांना आळा बसेल.
*
मजेशीर गोष्ट तर पुढे आहे.
भारतात मॉलमधे अजूनही केवळ 10% व्यवहार डेबिट व क्रेडिट कार्ड ने होतो . याही पुढे असं की Online Purchasing करतांना भारतातील लोक  'Cash on Delivery' हा पर्याय निवडतात, गंमत तर पुढे आहे ! क्रेडिट,डेबिट कार्ड, मोबाईल बैंकिंग,माँल आणि Online Purchasing हे शब्द आपल्या किती देशबांधवांना माहीत आहे!. ( उपहासाने नव्हे चिंतेने म्हणावेसे वाटते)
आता मूळ मुद्दा, "आपल्याला ही स्थिती बदलविण्यासाठी काय योगदान देता येईल" प्रत्येकाने आपला वाटा उचलावा ही भावना आपल्यात जागावी याच अपेक्षेसह।
                   शुभ रात्री.
                         

Thursday, October 15, 2015

माझ्या नजरेतून लाल किल्ला








चला माझ दिल्ली पुराण सुरु करतो।
मी दिल्लीतील प्रमुख ऐतिहासीक वास्तुबद्दल तुम्हाला माझ्या नजरेतून समजावून सांगणार आहे. दील्लीत मी ज्या पहिल्या ऐतिहासीक वास्तुला भेट दिली ती 'लाल किल्ला'. 
शहराच्या मध्यवस्तीत चादंनी चौक भागात ही वास्तू आहे जिला, UNESCO ने जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत स्थान दिल आहे. दिल्लीतील 3 वास्तुंना हा बहुमान लाभला आहे त्याबद्द्ल मी नंतर सांगेनच.
लालकिल्याहून 15 August या स्वातंत्रदिनी पंतप्रधानाने देशाला उद्देशुन संबोधन करण्याची प्रथा पंडित नेहरुं पासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत चालत आलेली आहे.
एक लाल किल्ला आग्रा येथे ही आहे जो, मोगल बादशहा शहाजहाँच्या वडीलाने अर्थात जहाँगीराने बांधला होता( ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले होते.) शहाजहाँ बादशहाने आपली राजधानी आग्राहून दिल्लीला आणली आणि इथे सन 1637 मधे लाल किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. त्या अगोदर 1631 ला 'ताजमहल' बांधण्यास सुरुवात झाली होती. शहाजहाँ नेच दिल्लीतील लाल किल्या समोरील ऐतिहासीक जामा मस्जिद(भारतातील सर्वात मोठी मस्जिद) बांधली जिचे निर्माण कार्य 1646 ला सुरु झाले.
शहाजहाँ हा शुरवीर तसेच कलेचा भोक्ता आणि कलेची कदरकरणारा मुस्लिम शासक होता. वयाच्या 16 व्या वर्षीच शहाँजहाँ ने लाल किल्ला(आग्रा) येथे किल्याच्या आत स्वतः काही वास्तू तयार केल्या होत्या. तेंव्हाच जहाँगिराने आपल्या मुलातील कलाकार ओळखला व त्यास प्रोत्साहन दिले म्हणूनच आज (वर उल्लेख केलेल्या वास्तू)जागतिक दर्जाच्या वारसा वास्तू ठरल्या आहेत(जामा मस्जिद सोडून). 
शहाजहाँ ने सैन्य बळावर राज्य विस्तार तर केलाच पण भारताला या ऐतिहासीक वास्तुंची अनोखी भेट दिली. 
           लाल किल्ला(दिल्ली)
* किल्ला जवळपास 3 ते 4 एकरात पसरला आहे .
* धौलपुरी लाल दगडांनी याचं बांधकाम करण्यात आलं आहे जे अजूनही ताज तवान दिसतं.
* किल्यात प्रवेश करताच चौक लागतो (जिथून प्रधानमंत्री लाल किल्याच्या कमानीवर भाषण देण्यास चढ़तात तो भाग.).
* पुढे मीना बाजार आहे. त्याकालात राण्यांसह किल्यातील अन्य महिला वर्गासाठी काही वस्तू खरेदी करण्याची व्यवस्था होती.
*किल्यातील पहीला दरवाजा. दरवाज्याच्या वर जीना आहे त्यात एक संग्रहालय तयार करण्यात आल असून युध्दात वापरण्यात येणा-या शस्त्रांचं प्रदर्शन इथे बघायला मिळते.
* याच दरवाज्यापासून डाव्या हातावर दीड कि.मी. अंतरावर इंग्रजांच्याकाळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पकड़ण्यात आलेल्या देश भक्तांना बंदी बनवण्यात येत असे त्या बरॅक आहेत(हे बहुतेक पर्यटकांना माहीत नाही - पण मी बघितलय). 
* किल्यात 'दिवाने आम' आणि 'दिवाने ख़ास' असे दोन वेगवेगळे सभामंडप आहेत. 'दिवाने आम' आर्थात जिथे राजा हा सामान्य जनतेच्या समस्या ऐकत असे, तर 'दिवाने ख़ास' म्हणजे जिथे राजा विशिष्ट लोकांशी बैठक करत असे.
* किल्यात नमाज पढ़ण्यासाठी शहाजहाँ ने मस्जिदही उभारली आहे जी ' मोती मस्जिद' म्हणून प्रसिद्ध आहे. 
* लाल किल्याच्या मागील बाजूस 'राज घाट', 'शक्ति स्थल'आदी स्मारक आणि त्या पलिकडे यमुना नदी आहे.
ईति वृतांत ( लाल किल्ला -माझ्या नजरेतून)
           रितेश मोतीरामजी भुयार, 
                  नवी दिल्ली

Tuesday, September 29, 2015

महाराष्ट्राची पताका उंचाविणारे अजित जोशी



महाराष्ट्र ही नररत्नांची खान आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातातील महाराष्ट्राच्या नररत्नांनी भारतदेशासाठी दिलेल्या योगदानाची दीर्घ परंपरा आहे. वर्तमानकाळातही ही परंपरा सुरु असल्याची प्रचिती मूळचे सोलापूरचे आणि सध्या हरियाणातील जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तक, ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन प्रकाशनाच्या वेळी आली. 

विशेष म्हणजे हे प्रकाशनही दिल्लीत मराठी मोहर उमटविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर तसेच हरियाणाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्या उपस्थितीत झाले. 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ च्या परिक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन हरियाणा केडरसाठी अजित जोशी यांची निवड झाली. त्यांची पहिली पोस्टींग पानीपत या महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध असणाऱ्या जिल्ह्यात झाली. वर्ष २००६ मधे झझ्झर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी झझ्झर पासून २० किलोमिटर अंतरावरील भिंडवास पक्षी अभियारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढाकार घेऊन या अभयारण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन परिषदांचे आयोजन केले. त्याचवेळी देश-विदेशातील पक्षीनिरीक्षकांचे लक्ष या पक्षी अभयारण्याकडे वेधल्या गेले. त्यानंतर पुन्हा सोनीपत, पानीपत आणि सध्या जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशी त्यांची पोस्टींग झाली. पण, भिंडवास पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी त्यांचा ध्यास कायम होता. यातूनच जन्माला आली भिंडवास मधील पक्ष्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची. यात महाराष्ट्रातील पुण्याच्या इला फाउंडेशनची त्यांना मोलाची मदत लाभली. बर्डस ऑफ भिंडास या पुस्तकाचे सहलेखकही महाराष्ट्राचे अर्थात सतीश पांडे, निरंजन संत आणि प्रमोद देशपांडे. आपल्या प्रशासकीय जबाबदारीचे यशस्वी वहन करत त्यांनी पुस्तकासोबतच आधुनिक माध्यमाची जोड देत ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले. 

‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तकातून भिंडवास हे झझ्झर जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेले पक्षी अभयारण्य असल्याचे सांगितले आहे. परिसरातील ७ ते ८ गावातील गावकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन या अभयारण्यासाठी दिली त्यातून ११०० एकर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभे राहिले आहे. हिवाळ्यात या अभयारण्यात जवळपास अडीचशे प्रजातींचे दीड लाखाहून अधिक पक्षी येतात. विशेषत: ५० प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचाही यात समावेश असतो. भिंडवास पक्षी अभयारण्य व येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जास्तीत-जास्त पक्षीनिरीक्षक व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठीच पुस्तक तयार करण्यात आले आहे. 

पानिपतला पहिली पोस्टींग झाल्यानंतर काही आठवड्यातच सोनिपत जिल्ह्यातील गुहाना येथे हत्याकांड झाले. त्यावेळी अजित जोशी यांनी पुढाकार घेऊन स्थिती आटोक्यात आणली आणि तेव्हाच हरियाणा प्रशासनाला गुणी महाराष्ट्रीय अधिकारी भेटल्याची वर्दी मिळाली. गुहाना हत्याकांडाने निर्माण झालेला तनाव सैल करण्याच्या त्यांच्या योगदानाबाबत तत्कालीन दलीत प्रश्नांबाबतच्या संसदीय समितीचे अध्यक्ष रा.सू. गवई यांनी श्री.जोशी यांचे कौतुक केले. वीट भट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुला-मुलींसाठी त्यांनी सुरु केलेल्या भटटा शाळांच्या उपक्रमाची नोंद तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी घेत श्री. जोशी यांचे कौतुक केले. बिहारमधे २०१० साली कोशी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या मुसेहारी गावाला दत्तक घेण्याचा निर्णय श्री. जोशींनी घेतला. हरियाणाच्या जनतेने श्री. जोशींच्या हाकेला प्रतिसाद देत मदतीचा ओघ मुसेहारीच्या दिशेने वळवला आणि बघता-बघता मराठी अधिकाऱ्याने हरियाणाच्या जनतेच्या मदतीने बिहारमधे गाव वसविल्याची महान कामगिरी घडली व बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांनी श्री.जोशीसह तमाम महाराष्ट्र वासियांच्या दातृत्वाचे कौतुक केले. आपल्या कामाने महाराष्ट्राच्या नररत्नांची यशस्वी परंपरा जपणाऱ्या व मराठी पताका फडकवत ठेवणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याचे राष्ट्रीय स्तरावर होत असलेले कौतुक महाराष्ट्राचेही कौतुकच ठरले आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Saturday, September 19, 2015

दिल्ली स्थित गणेशोत्सव



दिल्ली स्थित गणेशोत्सव

गणेश चतुर्थी महाराष्ट्र का एक प्रमुख त्यहार है. यह त्यहार गणेशोत्सव के नाम से भी जाना जाता है. महाराष्ट्र राज्य में बडी़ धूमधाम से मनाया जाने वाला यह त्यौहार महाराष्ट्र के बाहर कर्नाटक, तमिलनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली इत्यादि राज्यों में भी हर्षोल्लास से मनाया जाता है. छत्रपती शिवाजी महाराज के काल से धार्मिक उत्साह से यह त्यौहार मनाया जाता है. अंग्रेजों के बेंडियों में बुरी तरह फंसे देशवासियों को इकठठा कर उनमें देशप्रेम का अलक जगाने, प्रबोधन करने के माध्यम से इस त्यौहार को सामाजिक एकता का प्रतिक बनाने का श्रेय महान देशभक्त लोकमान्य बाल गंगाधर तिलक को जाता है. तिलक ने महाराष्ट्र में गणेशोत्सव को सार्वजनिक तौर पर मनाने की शुरुआत की.  इस त्यौहार को राष्ट्रीय त्यौहार बनाने का श्रेय भी तिलक को ही जाता है. आज इस त्यौहार की लोकप्रियता चरमोत्कर्ष पर पहुंच गई है. इस में राजधानी दिल्ली भी पीछे नहीं है. यहां स्थित विविध महाराष्ट्र मंडल तथा अन्य दिल्लीवासी इस त्यौहार को बड़े ही धूमधाम और हर्षोल्लास से मनाते है. आइये डालते है दिल्ली में मनाये जाने वाले गणेशोत्सव पर एक नजर .
       
दिल्ली में सार्वजनिक गणेशोत्सव मनाने की परंपरा लगभग ७५ से ८० वर्षों से चली आ रही है. पुरानी दिल्ली से शुरु हुई यह परंपरा पूरी दिल्ली तथा इसके परिसर में बसे गुडगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद तक पहुंच गई है. पुरानी दिल्ली के स्नेह संवर्धक समाज मंडल की ओर से दिल्ली में सर्वप्रथम गणेशोत्सव मनाने की शुरुआत हुई. आज नई दिल्लीस्थित सार्वजनिक उत्सव समिती, पीतमपुरा, सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र सदन, गणेश सेवा मंडल, लक्ष्मी नगर, दत्त विनयाक मंदिर तथा महाराष्ट्र मित्र मंडल जनक पुरी, महाराष्ट्र मंडल-विठ्ठल मंदिर, आर.के.पुरम, मराठी मित्र मंडल अलकनंदा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडल पहाड़गंज, महाराष्ट्र मंडल- गीता मंदिर-फरीदाबाद, गणराज महाराष्ट्र मित्र मंडल- ग्रेटर नोएडा, महाराष्ट्रीयन समाज समिती-नोएडा इत्यादि राष्ट्रीय राजधानि क्षेत्र (एन.सी.आर) के शहरों में स्थित गणेश मंडल में गणेशोत्सव को श्रध्दापूर्वक मनाया जाता है. दस दिनों तक चलने वाले इस गणेशोत्सव में रोजाना गणपती की आरती तथा गायन, नृत्य, नाटक इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन होता है, जिस में सभी धर्मों के लोग सम्मिलित होकर इस त्यौहार का आनंद लेते है.
दिल्लीवासी गणेश भक्तोंको गणेशोत्सव में लगनेवाली गणेशजी की मूर्ति उपलब्ध कराने का कार्य दिल्ली के कनॉट प्लेस में बाबा खड़क सिंह मार्ग पर स्थित महाराष्ट्र लघु औद्योगिक विकास महानिगम द्वारा संचालित मर्‍हाटी महाराष्ट्र एम्पोरियम विगत ४४ वर्षों से कर रहा है. इस वर्ष भी महाराष्ट्र एम्पोरियम में गणेशमूर्ति का विक्री प्रदर्शन लगा था. तथा  यहां बड़ी संख्या में आये गणेशभक्तों में पूरे हर्षोल्लास के साथ अपने लाडले गणेशजी की प्रतिमा खरीदने व वस्त्र अलंकार और पूजा सामग्री इत्यादि खरीदने की होड़ लगी हुई है. ज्यादातर गणेश भक्त गणेशजी की मूर्ती खरीदने का ऑर्डर गणेशमूर्ति स्थापना के दो – तिन महीने पहले ही देना शुरु कर देते है. 
सुंदर और मनमोहक गणेश मूर्तियों के विक्री प्रदर्शन हेतू विगत २३ वर्षों से महाराष्ट्र के थाने जिले के गणेश शिल्प कला केंद्र के मालिक मंदार शिंदे ने इस प्रदर्शन के बारे में जानकारी देते हुए बताया कि इस वर्ष २ इंच से लेकर ६ फीट की ऊंचाई वाली गणपति की मूर्ती प्रदर्शन में लगाई गई थी. प्रदर्शन में रखी गई इन मूर्तियों की कींमत ३5० रुपये से लेकर ३० हजार रुपये तक रखी थी. इस वर्ष लगभग १,००० मूर्तियां प्रदर्शन में विक्री के लिए रखी थी. जिसमे से ६० फिसदी मूर्तियां मिट्टी की तथा ४० फीसदी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) की बनी थी. जयपूर, लखनऊ, पानीपत, सोनीपत इत्यादि शहरों से गणेश भक्त मूर्ती खरीदने के लिए यहा आते हैं. भारत के सभी धर्म, पंथ, समुदाय एंवम् भाषिक प्रदेशों के लोग मूर्ती खरीदने में रुची रखते है. भारत के विभिन्न प्रांतो के साथ ही अन्य देशोंमे मूर्तीयाँ भेजी जाती है. कई विदेशी भी एम्पोरियम में  आकर गणेशजी और उत्सव के बारे में जानकारी लेते है.
दिल्लीस्थित महाराष्ट्रीयन लोगों के साथही अन्य धर्मों के लोग भी आज गणेशोत्सव बड़े ही जोश और उत्साह से मनाते हैं. तथा महाराष्ट्र मंडलों में मनाये जाने वाले विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों में सहभाग लेते हैं. गणेशोत्सव के माध्यम से एक सांस्कृतिक व सामाजिक एकता का संदेश मिलता है.
दिल्ली तथा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) में रहने वाले मराठी लोंग गणेशोत्सव मनाते है. प्रमुख रुप से निवासी आयुक्त कार्यालय जो कि दिल्ली के कोपरनिक्स मार्ग पर स्थित है ओर महाराष्ट्र सदन के नाम से परिचित है, यहां विगत २३ वर्षों से सार्वजनिक गणेशोत्सव समिती की और से गणेशोत्सव मनाया जाता है. इस मंडल की ओर से विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है.  
महाराष्ट्र सदन में दस दिन तक चलने वाले उत्सव में भारत के पूर्व राष्ट्रपति डॉ. शंकर दयाल शर्मा, प्रतिभा देवीसिंग पाटील, भूतपूर्व उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी के साथही विविध केंद्रिय मंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, राज्यपाल, व मंत्रिमंडल के मंत्री, विधायक तथा सांसद गणेशोत्सव में सम्मिलित हुए है.
गणेश चतुर्थी के दिन ढोल नगाड़े, ताशे, लेझिम व अन्य गाजे-बाजें के साथ गणेशजी की स्थापना की जाती है. दस दिन तक हर्षोल्लास के वातावरण में चलनेवाले इस गणेशोत्सव का समापन समारोह अनंत चतुरदशी को होता है. दिल्ली के विविध मराठी मंडल यहा के चांदणीचौकस्थित टाऊन हॉल के पास एकत्रित होते है. महाराष्ट्र के लोकनृत्य, झांज पथक,ढोल नगाड़े, ताशे, लेझिम व अन्य गाजे-बाजों के साथ बडी संख्या में गणेशभक्त, इस आशा के साथ की गणेशजी अगले बरस जल्दी आएंगे, अपने प्यारे भगवान को दु:खी मनसे यमुना नदी में विसर्जन कर विदाई देते है.
                      .......*……..

Monday, August 24, 2015

अग्नीपंख निखळले ........


शिलाँग येथे आयआयएममधे व्याख्यान देताना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच दिनांक २७ जुलै २०१५ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे निधन झाले. बातमी वा-यासारखी पसरली आणि देश-विदेशातून त्यांच्या जाण्याबददल हळ-हळ व्यक्त करण्यात येऊ लागली. डॉ.कलाम यांचं निधन हे मी ख-या अर्थानं कर्मयोग्याच निधन मानतो. वैज्ञानिकदृष्टीकोणाच्या प्रचार-प्रसाराचा वसा घेतलेल्या डॉ. कलामांनी शेवटच्या श्वासापर्यंत ध्यास सोडला नव्हता. म्हणूनच ते भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाचे खरे हकदार ठरतात. ऐरवी व्यक्तीचं निधन हे अपघात, आजार यामुळे झाल्याचे आपण बघतो मात्र देशसेवा करता -करता मृत्यू येणारे डॉ. कलामांसारखे विरळा व्यक्तीमत्वच यास पूर्णपणे अपवाद ठरतात.
तामिळनाडूतील रामेश्वरममधील नावाडयाच्या कुटुंबात जन्माला आलेले अब्दुल पाकीर जेमनुब्दीन कलाम यांचा भारतीय शस्त्रसज्जतेतील अतुलनीय योगदानामुळे मिसाईल मॅन ते भारताचे राष्ट्रपतीपद भूषविण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी असा आहे. Defense Research & Development Organization   (DRDO) चे संचालकपद भूषवून त्यांनी विविध अग्नीबानांची निर्मिती करण्यात दिलेले योगदान आणि पोखरणच्या अनुचाचणीत दिलेले योगदान अतुलनीय होते. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी लिलया पेललेली जबाबदारी उल्लेखनीय ठरते. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना केवळ प्रामाणिक देशसेवक या ओळखीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने २००२ साली त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषीत केले. डॉ. कलामांच्या कर्तव्यनीष्ठमुळे आणि त्यांच्या प्रखर देशसेवेच्यावृत्तीमुळे विरोधीपक्षांनीही त्यांना या पदावर विराजमान होण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही.   
डॉ. कलाम राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारण्याच्या काही दिवसांपूर्वीची हा किस्सा. डॉ. कलामांना एका महाविद्यालयात व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मुळात राष्ट्रपतीपदासाठीची सर्व सुरक्षा त्यावेळेसपासूनच कलामांना मिळाली होती. पण त्यांनी तो तामझाम न स्वीकारता साधेपणानेच या कार्यक्रमास उपस्थिती लावली. याच कार्यक्रमात एकदम वीज पुरवठा खंडीत झाला. अशात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमधे जाऊन संबोधन केले. या प्रसंगातून त्यांना विद्यार्थ्यांबददल असलेली तळमळ आपल्याला दिसून येते. एकदा व्यापीठावर पाच खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या पैकी मधली एक खुर्ची उंच होती. हे डॉ. कलामांच्या लक्षात येताच त्यांनी मधली खुर्ची काढून टाकण्यास सांगून इतर खुर्च्यांप्रमाणेच मधली खुर्ची लावण्यास सांगितली. माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी सांगितलेला किस्सा. डॉ. कलामांना आपल्या पदाचा कधीच अभिमान नव्हता त्यांची भूमिका नेहमीच सहकार्याची असायची. प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर डॉ. कलामांनी स्वत: श्रीमती पाटील यांना राष्ट्रपती भवनातील विविध दालन दाखविली आणि या पदावर पहिल्या महिला होण्याबददल कौतूक केल. श्रीमती पाटील सांगतात की, राष्ट्रपती भवनातून संसदेकडे डॉ. कलामांकडून राष्ट्रपतीपदाचे सूत्रे स्वीकारण्याकरिता दोघेही एकाच गाडीतून जातअसताना कलामांनी श्रीमती पाटील यांच्याकडे बघून विचारले, ‘आपण अस्वस्थ दिसताय काल झाल?’ त्यावर त्या म्हणाले मला हिरव्या पेनने लिहायची सवय आहे अन माझ्याकडे हिरव्याशाहीचा पेनच नाही. हे ऐकूण कलामांनी लोकसभा सचिवालयातील अधिका-याला फोन करून हिरवा पेन तयार ठेवण्यास सांगितले.  
त्यांचा साधेपणा कमालीचा होता म्हणूनच त्यांना जनतेचा राष्ट्रपती सुध्दा म्हणतात. त्यांनी राष्ट्रपतीपदाचा पगार कधीच घेतला नाही तो त्यांनी एका संस्थेला दान केला. ते राष्ट्रपती भवनातून गेले तेव्हां त्यांच्याकडे केवळ एक ब्रीबकेस होती. त्यांचं विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम होत. हेच दिसून येते.       

भूसंपादन कायद्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निती आयोगास सूचना

     
निती (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) आयोगाच्या संचालन परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन कायद्याबाबत केलेल्या महत्वपूर्ण सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात झालेल्या कौशल्य विकास कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही राजधानी दिल्लीत महत्वाची ठरली.
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी निती आयोगाच्या संचालन परिषदेची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत उपस्थित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. राज्यांच्या विकासाची गती वाढविण्यासाठी भूसंपादन कायद्यांतर्गत सरंक्षण आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांना सामाजिक परिणाम निर्धारण व संमती नियमातून वगळण्याची आणि विकास प्रकल्प सुरु न झाल्यास संपादित करण्यात आलेली जमीन पाच वर्षांनतंर परत करण्याच्या नियमात दुरुस्ती करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत केली.  
2013 सालचा भूसंपादन कायदा राज्यांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यातील तरतुदींनुसार राज्यातील विविध प्रकल्पांना सामाजिक परिणाम निर्धारण नियम लागू करण्यात आला.ज्यामुळे राज्यांतील अनेक प्रकल्पपूर्ण होण्यास विलंब लागत आहे. तर दुसरीकडे या कायद्यांतर्गत महामार्ग, कोळसा खाण आदी प्रकल्पांसह 105 केंद्रीय प्रकल्पांना सामाजिक परिणाम निर्धारण व संमती नियमातून वगळण्यात आले होते हे ही त्यांनी यावेळी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्रात 18 टक्के जमीन सिचंनाखाली आहे. शेतीच्या विकासासाठी भूसंपादनाची आवश्यकता आहे. याबाबी लक्षातघेता केंद्र शासनाने सामाजिक परिणाम निर्धारणात योग्य ते बदल केल्यास भूसंपादन प्रक्रिया अधिक सुलभ होऊन राज्यांच्या विकास प्रकल्पांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.या बैठकीत श्री. फडणवीस यांनी  2015 सालचा सुधारित भूसंपादन अध्यादेश राज्यांना अधिक अधिकार प्रदान करणारा असल्याचे सांगितले. तथापि, विकास प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेली जमीन ही संबंधित प्रकल्प सुरु न झाल्यास पाच वर्षांच्या कालावधीनंतर परत करण्याचा नियम या अध्यादेशात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विकास प्रकल्पाचा कालावधी वेग-वेगळा असू शकतो त्यामुळे जमीन परत करण्याचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक असावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. 
      कौशल्य विकास कार्यक्रमाच्या शुभारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
        जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरूवात केली. येणार्‍या काळात जागतिक पातळीवर आवश्यक असणा-या मनुष्यबळाचा विचारकरता भारताने कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जगाला लागणारे आवश्यक मनुष्यबळ पुढील काळात भारत पुरवील असा आत्मविश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी कौशल्य विकासाच्या बोधचिन्हाचे तसेच कौशल्य विकास प्रारुपाचे प्रकाशन करण्यात आले. कौशल्य कार्डाचे (Skill Card) वितरणही यावेळी करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, वित्तमंत्री अरुण जेटली, कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, उर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. 
              ऊकाई धरणातून राज्याला पाणी मिळावे
गुजरातमधील नदी जोड प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विशेष समितीच्या बैठकीत जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी गुजरातेतील  ऊकाई धरणातून 16.5 टीएमसी पाणी राज्यातील खान्देशमधील उर्ध्व तापी खो-यास देण्याची  मागणी केली. 
        या बैठकीत राज्यातील नार-पार-तापीवैनगंगा-गोसीखुर्ददमण-गंगा-पिजांळ प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. नार-पार-तापी या प्रकल्पातंर्गत राज्याला मिळणाऱ्‍या पाण्याविषयी श्री.शिवतारे म्हणालेया प्रकल्पातून राज्याला एकूण 28.5 टीएमसी पाणी मिळणार आहे. यापैकी 16.5 टीएमसी पाणी समुद्रात जाईल ते पाणी गुजरातला मिळावेअशी मागणी गुजरात राज्याने केली आहे. गुजरात राज्याने केलेल्या मागणीच्या बदल्यात महाराष्ट्राला गुजरातमधील ऊकाई धरणातून 16.5 टीएमसी पाणी मिळावेही मागणी राज्य शासनाच्यावतीने करण्यात आली. 
          तेलंगंणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गोदावरी खो-याअंतर्गत येणा-या प्राणहिता सिंचन प्रकल्पाची उंची 152 मीटर असल्याने राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 22 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 अशी एकूण 30 गावे बुडणार आहेत. हा धोका टाळण्याकरिता प्राणहिता सिंचन प्रकल्पाची उंची 148 मीटर असावीअशी मागणी होती. या मागणीवर तेलगंणा सरकारकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली.
                    
    दमण-गंगा-पिजांळ या नदी जोड प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झालेला आहे. या प्रकल्पामध्ये राज्य शासनाच्यावतीने काही महत्त्वपूर्ण बदल सुचविण्यात आले आहेत. या नदी जोड प्रकल्पातून मुंबई शहराचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सुमारे 21 टीएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून या प्रकल्पातून उपलब्ध होणा-या उर्वरित पाण्याचा उपसा करून हे गोदावरी खोऱ्‍यात वळविण्यात यावे तसेच या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करावा अशी मागणी श्री. शिवतारे यांनी केली.
                                
                                                         *****

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणार्‍या आणि आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ३४ किलो मीटर लांबीच्या 'मुंबई सागरी मार्ग प्रकल्पाला'  केंद्र सरकारकडून मिळालेली मंजुरी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात 90 मीटर व वडाळा परिसरात 225 मीटर उंचीच्या इमारतींना भारतीय विमान प्राधिकरणाने परवानगी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी. मुख्यमंत्र्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमंत्रण दिलेले निमंत्रण. आणि  राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय एक कंपनी स्थापन करणार असल्याची रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी केलेली घोषणा महाराष्ट्राच्या दृष्टीने राजधानी दिल्लीत घडलेल्या महत्वाच्या घडामोडी.
    
      पर्यावरण व वने मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मुंबई सागरी मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत अंतिम अध्यादेश काढण्यात येणार आहे. बैठकीनंतर पर्यावरण मंत्रालयाकडून मिळालेल्या मंजुरीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून होते. सागरीमार्गामुळे या वाहतुकीचा ताण कमी होईल. पर्यावरणाचे संतुलन राखत या प्रकल्पांतर्गत मुंबईत ९१ हेक्टर जागेवर हरित क्षेत्न तयार करण्यात येणार आहे. समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाहीत, याची दक्षता राज्य सरकार घेणार आहे. या रस्त्यांमुळे पर्यावरणची हानी होणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल तसेच यामार्गावर इमारत बांधकामांना परवानगी न देण्याबाबतची काळजी ही राज्य शासन घेईल. केवळ वाहतूकीचा ताण कमी करणे आणि हरित क्षेत्र तयार करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग करू असे मुख्यमंत्री म्हणाले. सुमारे ३४ किलोमीटरच्या किनारपट्टीला लागून असलेल्या या रस्त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडेल. खार ते वर्सोव्यापर्यंत हा रस्ता भुयारी असेल.

              पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकर
देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन लवकरच मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यानंतर काही सूचना आल्यात तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण आणि प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल असेही जावडेकर म्हणाले.  
                        सागरी मार्गाबाबत महत्वाचे

  • सागरी मार्गाचे अंतर ३४ किलो मिटर
  • नरिमन पाँइट ते कांदिवली भागातून जाणार सागरी मार्ग
  • हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित.
  • येत्या पाच ते सहा वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्धारीत
  • या प्रकल्पाद्वारे ९१ हेक्टर हरित क्षेत्र निर्मितीस वाव
  • गर्दीच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्याकरिता सागरी मार्गात २ ठिकाणी आंतरसुमुद्री बोगदा तयार करण्यात येतील
  • या प्रकल्पातंर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार
  • पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार 


बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात  90 मीटर उंचीच्या इमारतींना  परवानगीची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात 90 मीटर व वडाळा परिसरात  225  मीटर उंचीच्या इमारतींना भारतीय विमान प्राधिकरणाने परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री अशोक गजपती राजू यांच्याकडे केली.
      नागरी विमान वाहतूक मंत्रालयात श्री. राजू यांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींच्या उंची संदर्भात व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस उर्जा मंत्री पियुष गोयल व  वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
      मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भारतीय विमान प्राधिकरणाकडे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींची उंची वाढविण्यासंदर्भात या पूर्वीच विनंती केली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात 90 मीटर तर वडाळा परिसरात 225 मीटर अशी इमारतींची उंची असावी अशी विनंती प्राधिकरणा मार्फत करण्यात आली आहे, त्याचबरोबर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जी-ब्लॉक मधील इमारतींची उंची एकसमान 90 मीटर असावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. भारतीय विमान प्राधिकरणाने बांद्रा-कुर्ला परिसरात  51.75  ते  61.45 मीटर व वडाळा परिसरात  136.15  ते 154.41  मीटर उंचीच्या इमारती असाव्यात असे सूचित केले आहे. या परिसरातील इमारतींच्या उंची संदर्भात केलेल्या या सूचनेमुळे चटई क्षेत्राचा पूर्ण वापर करता येऊ शकत नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, सांताक्रुझ विमानतळाच्या धावपट्टी पासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसर यामध्ये खूप अंतर आहे. राज्य शासनाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या परिसरात  90 मीटर उंचीच्या इमारतीची आवश्यकता आहे. वडाळा परिसरात भारतीय विमान प्राधिकरणाने  139  मीटर उंची पर्यंतच्या इमारती असाव्यात असे सूचित केले आहे. वडाळा परिसरात 225 मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यात कोणतीही अडचण नाही असे कॅपीटल एअरस्पेस ग्रुप या अमेरिकास्थित कंपनीने अभ्यासांती राज्य शासनास कळविले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या सूचनांचा अभ्यास करू – अशोक गजपती राजू

नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री अशोक गजपती राजू यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स व वडाळा परिसरातील इमारतींच्या उंचीच्या प्रश्नां संदर्भात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे बैठकीत स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत केंद्र शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासनही श्री. राजू यांनी या बैठकीत दिले.
राज्य शासन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाच्या उभारणी बाबत कटीबद्ध आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा आढावा वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती या उपक्रमातंर्गत घेतला जातो. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारा निधी व नियम यांची देखरेख सिडकोच्या माध्यमातून राज्य शासन करीत आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सेवा कर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आदींबाबत सुट द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. नवी मुंबई विमानतळ उभारणीची प्रक्रीया लवकरच पूर्ण करण्यात येईल व यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनास मंजुरीसाठी सादर केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दिल्ली मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली मेट्रो रेल महामंडळाच्या (डीएमआरसी) मेट्रो भवन या मुख्यालयात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगु सिंह आणि व्यवसाय विकास विभागाचे संचालक एस.डी.शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली मेट्रोच्या परिचलनाबाबतव  प्रगतीविषयी इंतभूत माहिती जाणून घेतली. देशांतर्गत आणि देशाबाहेरही दिल्ली मेट्रो आपला  मोठया प्रमाणात कार्यविस्तार करत असल्याचे यावेळी मेट्रोच्या अधिका-यांनी सांगितले. दिल्ली शहरात मेट्रोने दररोज 25 लाख नागरिक प्रवास करतात.
विविध टप्प्यात 200 किमी लांबीचे जाळे मेट्रोने तयार केले आहे. प्रवास सुखकर आणि गतीमान करणा-या मेट्रोमुळे आपण प्रभावीत झालो आहे. दिल्ली मेट्रोप्रमाणे मुंबईतही मेट्रोचे जाळे कसे उभारता येईल याबद्दल विचार करावा लागेल, असे सांगून मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबईमध्ये मेट्रोचे जलद जाळे उभारण्याच्या दृष्टीने दिल्ली मेट्रोला मोठा वाव आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी रस्त्यांबरोबरच रेल्वे व्यवस्था सक्षम करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. नागपूर व पुणे शहरातील मेट्रो रेल्वे हा त्याचाच एक भाग आहे. मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच त्यांचा दैनंदिन प्रवास आरामदायक आणि परवडणारा होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिल्ली मेट्रोचे पथक मुंबई मेट्रोची पाहणी करण्यासाठी मुंबईला भेट देणार आहे.

                              
            महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याकरिता कंपनी
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि  रेल्वे मंत्रालय एक कंपनी स्थापन करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी  दिली.
महाराष्ट्रात गडचिरोली सारख्या दुर्गम व नक्षल प्रभावीत भागात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य सरकार उत्सूक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपल्याशी चर्चा केली असल्याचे नमूद करून, प्रभु यांनी राज्यातील रेल्वे प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरविणे, रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात केंद्र व राज्याचा वाटा ठरविणे, राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयात उत्तम समन्वय साधणे आदी बाबी कंपनी स्थापण करण्यात आल्याने सुकर होतील असल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थ संकल्पात जाहीर करण्यात आलेले तसेच राज्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यासही मदत होणार आहे. सद्या देशातील अन्य राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने अशा कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत.
राज्याच्या दृष्टीने मुंबई उपनगरी रेल्वेची स्थिती सुधारणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल या उन्नत प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत भौतिकी अभ्यासागट लवकरच पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील निवडक रेल्वे स्थानकांचा  सार्वजनिक –खासगी सहभागातून (पीपीपी)  विकास करण्याचे प्रस्तावित असून याअंतर्गत पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पावसाळयात कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरु  असून कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि सिग्नलची कामे पूर्ण करण्यात येतील. कोकण रेल्वेअंतर्गत येणा-या तराळ ते चिपळून, कोल्हापूर ते वैभववाडी हे रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात येतील. कोकण रेल्वेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी जीवन विमा कंपनी(एलआयसी) आणि आयएफएल या कंपन्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे प्रभु म्हणाले.                       

        पंतप्रधानांच्या हस्ते तीन महत्वांकांक्षी नागरी योजनांचा शुभारंभ
               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नागरी विकास, गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते स्‍मार्ट सिटी’, अटल शहरी पुनरनिर्माण व परिवर्तन’ (अमृत) आणिसर्वांसाठी घरे’(हाऊसिंग फॉर ऑल) या नागरी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी विकास, गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन मंत्री एम. व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंचावर उपस्थित होते.
            राज्याच्यावतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण राज्यमंत्री रणजीत पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, नागरी विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यावेळी उपस्थित होते.

                            मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिले
                नाशिक-त्र्यंबकेश्चर सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमंत्रण

               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.यावेळी पंतप्रधानांना सिंहस्थ मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले. विकासात आघाडीवर असणा-या नाशिक शहरात हा सिंहस्थ कुंभ मेळा होत असून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पात समावेश होण्याची क्षमता या शहरात आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. पंतप्रधानाच्या उपस्थितीने नाशिक सिंहस्थालाही एक वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे निमंत्रणात म्हटले आहे.           

 मुख्यमंत्री फडणवीस यांची फ्रान्सच्या राजदूतांनी घेतली भेट
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फ्रान्सचे राजदूत श्री. फ्रान्कॉईस रिचिअर यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेतली. यावेळी फ्रान्सचे आर्थिक व्यवहार मंत्री काऊन्सीलर श्री. जी. रेने कोगार्ड आणि फ्रेंच एजंसी फॉर डेव्हलपमेंटच्या उपसंचालक श्रीमती कॅमेले सेवेरॅक उपस्थित होत्या. राज्यातील स्मार्ट सिटीप्रकल्पाला सहकार्य देण्याकरिता फ्रान्सने पुढाकार घेत राज्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.