Thursday, July 23, 2020

माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची मुलाखत



(माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त लोकराज्य विशेषांकासाठी  मुलाखत घेण्याचा व ती शब्दबध करण्याचा योग आला. लोकराज्य अंक जुलै २०२०)  





जुलै महिन्याचा लोकराज्य विशेषांक प्रकाशित
'जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेषांक' वाचण्यासाठी क्लिक करा:
https://mahasamvad.in/?p=17886



घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल




(स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरांचा समावेश असल्याचा एक निकाल आला आहे काल कृपया याबाबत सविस्तर लेख दयावा असा आमचे सहकारी व लोकराज्य मासिकाचे उपसंपादक राजाराम देवकर यांचा एक संदेश मिळाला मग काय याविषयाचा माग घेतला आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या काही ट्विट वरून चक्क बातमी तयार झाली व तो लेखही लोकराज्यच्या जून २०२० अंकामध्ये प्रकाशित झाला )



वृत्त विशेष 63                                                                                 दिनांक 20 मे 2020 




          घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
                   राज्यातील ७६ शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील १४१ शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकटया महाराष्ट्रातील ७६ शहरांचा यात समावेश आहेनवी मुंबई महानगरपालिकेला पंचारांकित तर ३४ शहरांना तीन आणि ४१ शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मुलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो केंद्रीय नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष २०१९-२० साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहारांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील ४ हजार ३७२ शहरांपैकी १४३५ शहरांनी आवेदन पाठविली होती यापैकी डिजीटल एमआयएस चाचणीत ६९८ शहर बाद ठरलीउर्वरीत ७३७ शहरांमध्ये नागरीकांचे मत व मंत्रालयाच्या अधिका-यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण २० मानकांआधारे चाचणी करून अंतिम १४१ शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७६ शहरांनी बाजी मारली आहेदेशातील ६ शहरांना पंचारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील ६५ शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ३४ शहरांचा यात समावेश आहेदेशभरातील ७० शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील  ४१ शहरांचा यात समावेश आहे.
स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील  महानगरपालिका ,नगर पालिका खालील प्रमाणे.
पंचारांकित मानांकन
   नवी मुंबई महानगर पालिका
तीन तारांकित मानांकन
अंबरनाथ,भिवंडी निजामपूरब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलजइंदापूर,जळगावजालनाजेजुरीजुन्नरकागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि  विटा
एक तारांकित मानांकन
अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई,  जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूरकुरुंदवड, महाड,  मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे,  उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.
    राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले  वर्चस्व निर्माण केले आहे.   
स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणा-या एकूण गुणांपैकी २५ टक्के म्हणजे ६००० पैकी १५०० गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्व असून यात महाराष्ट्राची सरसी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.63 /दि.20.05.2020











                                                                      





भेळीने दिली यशाची किल्ली; रघुने घडवली यशाची दिल्ली


(स्पुट  आणि सहज लेखन मला आवडत. आदल्या दिवशी आमच्या कार्यालयाचे लेखापाल श्री. रघुनाथ सोनवणे यांचा फोन आला म्हटले,परवा माझा वाढदिवस माझ्या गावाकडच्या लोकांना माझा दिल्लीचा प्रवास कळावा अशी इच्छा आहे आपण लेखनी चालवा . मग या स्पुटाचा जन्म झाला.)





म्हणाल तर एक कागदाचा तुकडा पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जाते याचं जीवंत उदाहरण म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे. आठवडी बाजारात भेळ खाताना हाती आलेली वृत्तपत्रातील जाहिरात बघून दिल्ली पादाक्रांत करणारा रघु  आज स्वमेहनतीने व अपार कष्टाने देशाच्या राजधानीत राज्य शासनाच्या माहिती विभागात लेखापाल आहे.

             घरची परिस्थिती बेताचीच, दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत कमी पगारावर नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला व त्याने भेळ घेतली .पण त्याला काय माहीत होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल. म्हणजे ते घडले असे की ,  वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु खूश झाला 'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात आपले स्थान निश्चित केले व हाच  शासकीय नोकरीतील त्याचा प्रवेश ठरला.

            तसे दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत नाही.त्याला कारणे ही बरीच आहेत ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल-चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची सुत्रच या शहरातून हलतात म्हटल्याने या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून , वरिष्ठ लिपिक व आता थेट याच कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत असा लेखापाल म्हणून रघु जबाबदारी सांभाळत आहे.

 आपल्या कामा व्यतिरीक्त ज्या जनसंपर्क विभागात तो कामाला आहे त्यातील प्रभावी जनसंपर्काचे गुण त्याने आत्मसात केले आहे . म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.
भेळीच्या कागदातही भविष्याची वाट शेधून रघुने आज रघुनाथ सोनवणे साहेब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. हा प्रसंग सांगताना आजही रघु गहिवरतो सांगतो की, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्यातून मिळालेल्या संधीचे सोने करता आले तर या जगात अशक्य ते काहीच नाही.
माय भूमिपासून कोसोदूर असले तरी आजही अकोलेकरांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेलेल्या अकोलेकरावर ते खूप प्रेम करतात आस्थेवाईकपणे चौकशी करतात व त्यांना मोलाचे सहकार्य करतात.
 भेळीच्या वृत्तपत्र रद्दीने आज महाराष्ट्र परिचय केंद्रात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रघु सोनवणे स्वतःला धन्य समजतात.
                              000000
शब्दांकन  :  रितेश मो . भुयार, नवी दिल्ली.






Friday, November 29, 2019

प्रासंगीक : मातृभाषेतून शिक्षण देताना येणा-या अडचणी




 जन्मानंतर बाळाचा पहिला संपर्क मातेशी येतो आणि माता ज्या भाषेत मुलासोबत संवाद साधते त्याच भाषेचे संस्कार घेत तो मोठा होतो व तिच आपली मातृभाषा ठरते. म्हणून पंजाब मध्ये राहणा-या व्यक्तींची भाषा पंजाबी ठरते, गुजरातमध्ये राहणा-या व्यक्तींची गुजराती तर महाराष्ट्रातील जनतेची मराठी ही मातृभाषा ठरते. जगाच्यापाठीवर सर्वच ठिकाणी हे तत्व लागू पडते. म्हणूनच मातृभाषेतून घेतलेल शिक्षणही  उत्तम मानल जाते किंवा जी भाषा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात येते त्याच भाषेतून आपण शिक्षण दिल तर ते विद्यार्थी लवकर ग्रहण करतात. पर्यायाने मातृभाषेतून शिक्षण हे प्रभावी ठरते. मात्र, भारतासारख्या खंडप्राय देशात डोंगर -द-यात राहणा-या जमातीतील मुलांची स्थानिक भाषेतून जडणघडण होते त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देताना भाषिक अडचण मोठया प्रमाणात जाणवते.

स्थानिक भाषेतील जडण घडणीमुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेताना येणारी अडचण समजून घेण्याकरिता माझे स्वत:चे निरीक्षण व अनुभव येथे मांडणे संयुक्तीक समजतो. आपल्या राज्याची मराठी ही मातृभाषा म्हणून अभ्याससाहित्य हे प्रमाण मराठी भाषेत तयार होते मात्र, सामाजिक परिवेशातील वैविद्यामुळे स्थानिक भाषेसोबत जुडवून घेताना उच्चारण व शब्दबोध या अडचणी प्रकर्शाने जाणवतात. उदा. विदर्भातील विद्यार्थ्यांची जडण-घडण होताना या भागातील उच्चार हे प्रमाण मराठी बोलणा-या पुणे किंवा मुंबईतील विद्यार्थी किंवा शिक्षकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे एकाच राज्यात राहून विदर्भातील विद्यार्थी किंवा शिक्षक पुणे,मुंबई व राज्याच्या अन्य भागात गेल्यास त्यास भाषेची अडचण निर्माण होते तशी ती पुणे,मुंबई येथील विद्यार्थी किंवा शिक्षक विदर्भात आल्यानंतर होते.

भाषा ही त्यात्या परिसराच्या भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक घटकांचेही प्रतिनिधीत्व करीत असते त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण देताना ही अडचणही प्रकर्शाने जाणवते. अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील तालुक्यांच्या ठिकाणच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थीनी आदिवासी जमातीची आहेत. या मुलांची जडणघडण आदिवासी भाषेतून झाली असल्याने त्यांना मराठीतून शिक्षण घेताना अनंत अडचणी येतात. मी, मुलत: आकलणाची अडचण अधोरेखीत करतो. मुख्य प्रवाहातील समाजाशी कमीत कमी संपर्क असणा-या आदिवासी जमातीतील मुलांचा मराठी भाषेशी संबंधच येत नाही.  शाळेत  शिक्षकांनी  शिकवलेला मराठी  शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकलेला असतो त्यामुळे त्यांना आकलण होत नाही. आकलण न झाल्याने विद्यार्थ्यांच्या लेखनीतूनही ते उतरत नाही  परिणामी वेगाने पुढे जाण्याच्या शिक्षणाच्या शर्यतीत ही मुल कोसो दूर राहतात.

आदिवासी मुलांची जडणघडण ही त्यांच्या कोरकु वा अन्य स्थानिय भाषेत होत असल्याने मराठी या राज्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेताना महत्वाची अडचण जाणवून येते.

            महाराष्ट्रात अन्य राज्यातून येणा-या प्रशासकीय अधिका-यांना (जिल्हाधिकारी) यांना जसे स्थानिक भाषा शिकावी लागते त्यामुळे ते स्थानिक लोकांचे प्रश्न अधिक चांगल्यारितीने समजू शकतात व स्थानिक जनतेलाही आपल्या मातृभाषेतून अधिकारी संवाद साधतो याचे समाधान लाभते. तसेच, सामाजिक वैविद्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेताना स्थानिक भाषेतील विद्यार्थ्यांची जडण-घडण हीच मोठी अडचण असते.   
                                                                *****   
रितेश मोतीरामजी भुयार,
 नवी दिल्ली.


औचित्य शतकपुर्तीचे : दिल्लीतील मराठीजणांची आधारवड ‘बृह्नमहाराष्ट्र भवन’



        कंफर्टझोन  सोडून  जेव्हां आपण स्वत:ला सिध्द करण्यासाठी बाहेर पडतो आणि तिथे आपल्याला आपलेपणाचा आधार मिळतो तोच आधार मला दिल्लीत बृह्नमहाराष्ट्र भवनाने दिला. महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाने नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेत ‘बृह्नमहाराष्ट्र  भवन’ ही देखनी वास्तू उभारली आहे. महाराष्ट्रातील कित्येकांसाठी देशाच्या राजधानी दिल्लीत अगदी अल्पदरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देणा-या बृह्नमहाराष्ट्र भवनात व्यवस्थापक म्हणून दिलेली सेवा आणि या दरम्यान मला लाभलेलं सर्वांच सहकार्य आणि प्रेम यामुळे मी समृध्द झाले आणि ही वास्तू तर जणू माझी हक्काची आधारवडच झाली.

 यजमानांच्या सरकारी नोकरीमुळे  लग्न होऊन थेट माझा संसारच देशाच्या राजधानी दिल्लीत  थाटला. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लीकेशन विषयाची पदव्युत्तर असलेली मी लग्नाआधी जॉब करायचे. मात्र, दिल्लीत पाय ठेवताच येथील लोक, वातावरण आणि कार्यसंस्कृती अशा सर्व गोष्टी समजल्यानंतरच मला पुन्हा लग्नानंतर जॉबची दुसरी इनिंग सुरु करायची होती . एव्हाना, करोलबागेत बँकींगचे क्लासेस लावून  बँकींगच्या परीक्षा देण्याच्या निमित्ताने दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा (एनसीआर) ब-यापैकी अभ्यास झाला होता. म्हणूनच बँकींगच्या परीक्षेची तयारी आणि आता सोबतीला जॉब कराव अस मनोमन वाटू लागलं. त्यात  आम्ही ज्या पहाडगंज भागात राहत असू तिथेच ही बृह्नमहाराष्ट्र भवनाची  भव्य इमारत  बघीतली होती. यातच इथे व्यवस्थापक पदाची जागा रिक्त असल्याचे मला यजमानांकडून कळाले. आम्हा उभयतांतील चर्चे अंती येथे जॉब करण्याचा निर्णय झाला. संस्थेच्या पदाधिका-यांसोबत बोलन झाल व रितसर मुलाखतीचे सोपस्कार करून मी भवनात जॉब करायला लागली. हीच माझी या वास्तूतील आणि एका अर्थाने  महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाच्या भल्या मोठया कुटुंबातील एन्ट्री.

  महाराष्ट्र  भवनात  निवासास येणारा महाराष्ट्रातील  प्रत्येक व्यक्ती (स्त्री-पुरुष) हा आमचा क्लायंट. भवनाच्या पहिल्या माळयावरच अगदी दर्शनीभागात स्वागतकक्षातच माझी डयुटी असल्याने येणा-या प्रत्येक क्लायंटसोबतच अदबीने बोलने आवश्यक माहितीची नोंद करून त्यांची  रूम व डॉर्मेट्रीमध्ये व्यवस्था करणे  आणि अनुषांगीक कामे असायची. तसेच, टॅली ही माझी जमेची बाजु बघून व्यवस्थापनाने मला लेखा विभागाचीही काही जबाबदारी दिली होती ती ही मी चोखपणे पार पाडली. व्यवस्थापन आणि येथील कर्मचारी वर्ग अगदी आस्थेने विचारपूस करतो त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात येथील जॉब सुरु होता. यासोबतच व्यवस्थापनाच्या बैठका आणि स्नेहसंवर्धक समाजाच्या कार्यक्रमांची सतत रेलचेल ही भवनात असायची. त्यामुळे  या भल्यामोठया परिवारातील सदस्यांचाही माझा परिचय झाला. दिल्ली सारख्या शहरात राहून या सर्वांनी मराठी भाषा, संस्कृती किती उत्तमरित्या जपली व त्याचा वारसा ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला देत असल्याचे पाहून उर अभिमाने भरून येतो.

  भवनातील गणपती उत्सव, दासनवमी, कोजागीरी, भोंडल्यांचा कार्यक्रम असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील ज्यांची सारखी रेलचेल असते. माझ्या सारख्या दिल्लीत नवख्या मराठी स्त्रीला आपले सण, उत्सव साजरे करण्यासाठी भवनाने जणू मला मोठे व्यासपीठच उपलब्ध करून दिले होते. भवनाच्या शेजारीच असलेल्या नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाच्या प्रेक्षागृहात व प्रांगणातही विविध कार्यक्रमांचे नियमीत आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांनाही  कित्येकदा सहकुटुंब आम्ही उपस्थित असतो. एका अर्थाने राजधानी दिल्लीत आम्हाला  व आमच्या मुलांना मराठी  सांस्कृतीसोबत जोडून ठेवण्याचं महनमंगल कार्य महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाने केल आहे. या संस्थेने गेल्या शंभर वर्षांच्या काळात माझ्या सारख्या कित्येकांना मराठीबाण्याची व प्रेमाची शिकवण दिल्लीत दिली याचा मला सार्थ अभिमान आहे. स्नेह संवर्धक समाजाच्या महाराष्ट्र भवनाने आधारवडरूपी दिलेल प्रेम मी सदैव माझ्या आयुष्यात कायम जपेन आणि या संस्थेप्रती कृतज्ञभाव ठेवेन. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.

 सोनाली रितेश भुयार,
टागौरगार्डन, नवी दिल्ली.


Saturday, October 5, 2019

सेवानिवृत्ती दिन की स्मरणीय यादें


(संपादन एवं रचना : रितेश मोतीरामजी भुयार

इन्सान का  जीवन मानों दिवार पर लगी ‘घडी’ की तरह है, जो हमें संदेश देती ‘जीवन चलने का नाम चलते रहो सुबहो शाम…..’ लेकीन, इस सतत चलने वाले जिंदगी में ऐसा मौका आता है जहां एक दिन रुकना पडता है. वैसा ही  रुकने का दिन सरकारी नोकरी में भी आता है. ढाई दशक के निरंतर सरकारी सेवा के बाद मेरे जीवन में भी  सेवानिवृत्ती का दिन आ ही गया. जीस कार्यालय में मेरा रोजाना आना जाना लगा रहता अब वह रूक ने वाला था. मानों सरकारी नोकरी का पूर्ण विराम लगने वाला ओर सेवानिवृत्ती  वाली जींदगी जिने के लिए अल्प विराम ही कह लिजीए एक तरह से. पर में खुशनसीब हु जिसके सेवानिवृत्ती का दिन स्मरणीम बन गया.    

            महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क विभाग का दिल्लीस्थित ‘महाराष्ट्र सूचना केंद्र’ जो विगत २७ सालों से मेरे रोजी रोटी का जरिया था आज इसी कार्यालय  से बिदाई अर्थात सरकारी नोकरी से सेवानिवृत्त होने का दिन. कार्यालय के लायब्ररी में ३१ अगस्त २०१९ को आयोजित समारोह में मेरे सेवानिवृत्त साथी तथा सेवा में कार्यरत सभी अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहे. कुछ सेवानिवृत्त कर्मचारी निजी कारनों से उपस्थित नही हो सके लेकिन , उन्होंने मुझे अपने शुभकामना संदेश भेजे . यह तो मानों मेरी यादों की गठरी है जो मै इस कार्यालय से बांध कर अपने घर ले जा रहा था.
इस  भावविभोर मौके पर सभी ने अपने खट्टे मिठे अनुभवों के आधार पर मेरे बारे में अपने विचार रखे. मेरे कुछ साथी भावूक हो गये और अपने आंसुओं को रोख नही पाए. मेरे सेवानिवृत्त होने का दुख उनकी आखों और चहरे से झलक रहा था. उस समय कार्यक्रम का वातवरण गमगीन हो गया था. यह सभ देखकर मेरी आँखों से आंसु झलक रहे थें. लेकिन कार्यालय प्रमुख के साथ मुख्य अतिथीके भाती सभ के बिच बैठा में इस वक्त खुद को भावूक होने से संभाल रहा था.
कार्यालय के उपसंपादक  श्री रितेश जी को तहे दिल से धन्यवाद करता हू.  श्री रितेश भुयार जी ने कार्यक्रम में चार चांद लगा दिए. हमेशा ही कार्यालय के कार्यक्रम का निवेदन करने की जिम्मेदारी संभालते हुए उन्होंने आज के इस कार्यक्रम की भी कमान संभाली थी. मेरे परिवार के लोगों की उपस्थिती देखते हुए उन्होंने इस  कार्यक्रम  की पुरी कारवाई हिंदी भाषा में की. उन्होंने  अपने अनुभव के आधार पर मेरें व्यक्तीत्व के विभिन्न्‍ा पैलुओं के बारे में उपस्थित सभी को अवगत कराया. उस को सुन कर कुछ अधिकारी -कर्मचारी तो हैरान हो गये यहां तक की कार्यालय प्रमुख उपनिदेशक श्री दयानंद कांबले जी ने अपने वक्तव्य में कहा की, ‘ मैं, हैरान हु की मुझे रामदास जी के व्यक्तीत्व के बारे में आजतक कुछ पता नही चला. ओर यह  सब कुछ उनके सेवानिवृत्ती के दिन पता चला’.
            श्री. कांबले जी ने जो बाते व अनुभव सभ के सामने  रखे इसके लिए मै   उनकी भावनाओं  का  विनम्रता  से  स्वीकार करता हॅूं और उन्हे हृदय से धन्यवाद देता हॅूं.
            हमारे एक साथी श्री नैनसिंह तो शेरो शायरी के माहिर है. रामलिला में उन्होंने निभाए कई किरदारों के कारन उनके शब्दों में अलग ही मिठास है. उन्होंने अपने शब्दों को एक लडी में पिरोकर शायरी के अंदाज में मेरे व्यक्तीत्व को सभी के सामने रखा. मनोरंजक बातों के साथ ही उन्होंने मेरे संगिनी के अकाली निधन के संदर्भ में की शायरी वातावरण को भावूक कर गयी और आज के इस अवसर पर  मुझे मेरे  प्रिय पत्नी  की कमी  का अहसास दिला गयी. इस कार्यालय में जो भी कर्मचारी सेवानिवृत्त हुए उनकी  पत्नी  इस  मौके पर उनके साथ उपस्थित रही लेकीन, मैने इस बारे में खुद को दुखी  महसुस किया.
             कुछ साथीओंने मेरे काम की तारिफ की, हमारे लेखा विभाग के कर्मचारीने ‘मेरे अनुषाशीत एवं गुणवत्तापूर्ण काम करने का बखान किया’. तो लघुलेखक ने  ‘काम के प्रती मेरी निष्ठा  पर प्रकाश  डालडते हुए कहा,  दुसरा कर्मचारी उनके जगह पर आने से पहले वह अपना कार्यलय के स्वागत कक्ष का आसन नही छोडते थे तथा कार्यालय में आनेवाले विभीन्न क्षेत्र के आगंतुको का प्यार से स्वागत करते और उन्हों आवश्यक जानकारी मुहय्या करते थे’. कार्यालय के अन्य साथियों के प्रती  नम्र व्यवहार तथा सदैव हसमुख व सभी को मदद करने का स्वभाव यह बाते भी कहीओने इस अवसर पर रखी , जो मुझे गदगद कर गयी. मैंने अपनी नोकरी के प्रती निष्ठा से किया काम ओर  साथही में पारिवारीक जिम्मेदारी का किया वहन इन बातों पर प्रकाश डाला गया.
            परिवार के सदस्यों की ओर से मेरी बेटी ने इस कार्यक्रम में अपने विचार रखे. मेरे सहित उपस्थित सभी की नजर ओर कान उसकी बातों पर टिके रहे. उसके एक एक शब्द से  मेरे प्रति प्यार झलक रहा था.  मुझे नाज है अपने बेटीपर जिस ने इस कार्यक्रम में अपने विचार रखते हुए ‘पापा कों बेस्ट पापा ऑफ द वर्ल्ड’ के खिताब से नवाजा. तब मुझे अपनेद्वारा बेटी को दिए अच्छे संस्कारों का अहसास हुआं ओर एक जिम्मेदार बाप होने के कर्तव्य में मै सफल  हुआ यह अनुभूती भी मैने इस कार्यक्रम में लि.
            महाराष्ट्र शासन के सूचना एवं जनसंपर्क विभाग के कुछ कार्यालय के अधिकारीयों ने मुझे सोशल मिडीयापर  शुभकामनाए दी उन सभी शुभचिंतकों का मै  हृदय से  धन्यवाद करता हॅुं. और  आशा करता हॅुं की  नोकरी के माध्यम से आप सभी से जुडा यह स्नेह ऐसेही बना रहेगा.
            सेवानिवृत्ती के दिन का अनुभव बयां करते समय मैने ‘घडी’ का उदाहरण दिया था. वैसे ही,  ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम ओ  फिर नही आते’  इस वास्तव को भी मै नही भुलना चाहता हू. बिते २७ साल कि नोकरी में मैने जो अच्छी बाते सिखीं ज्ञान प्राप्त किया उसका समाज ओर परिवार के लिए उचित तरह से उपयोग करूगा ओर इस देश का सच्चा नागरीक होने का दायीत्व निभाने का मै पुरा प्रयास करूंगा यह प्रण मै इस अवसर पर लेता हू. ओर मेरे सेवानिवृत्ती  का यह  स्मरणीय दिन हमेशा के लिए अपने शब्दों से ही सही अपनी गठरी में संजो के रखता हूं.  
आपका
रामदास भारती,
संवानिवृत्त कर्मचारी ,महाराष्ट्र सूचना केंद्र नई दिल्ली.
०००००

            

Monday, September 9, 2019

ये दिल्ली है, मेरी जान!



    (22 जुलै 2019 रोजी मला दिल्लीत येऊन 11 वर्ष पूर्ण झालीत या पार्श्वभूमीवर हा लेखन प्रपंच)

दिल्ली, देशाची राजधानी. मोगल, इंग्रज आदी सत्तांनी भारत देशावर राज्य करताना याच शहराला राजधानी म्हणून पसंती दिली. आज स्वतंत्र भारतातही राजधानी म्हणून या शहराचं महात्म्य कायम आहे. देशाचे राजशकट चालविणा-या या शहरात विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व आहे तसे ते महाराष्ट्राचेही आहे. या शहारात माझ्या वास्तव्याला 22 जुलै 2019 रोजी तब्बल अकरा वर्ष पूर्ण झाली 
  करीअरसाठी या शहरात आलो त्यात यशही संपादन केलं, खूप शिकायला मिळालं शिकतही आहे. या शहरातील माझ्या वास्तव्यात महाराष्ट्र व मराठीच्या वैविध्यपूर्ण  व सकारात्मक खूणा दिसून आल्या, त्याचा घेतलेला हा धांदोळा.

दिल्लीत मराठी माणसांना भाडयाने घर घेण्यास अजिबात अडचण जात नाही हे माझं निरीक्षण प्रथमत: नोंदवतो. महाराष्ट्राचं  देशातील महत्वाच स्थान आणि मराठी संस्कृतिच्या पुण्याईवर लगेच दिल्लीकर भाडेकरून म्हणून तुम्हाला स्विकारण्याचं शुभकार्य पार पाडतात. केंद्र सरकारमधील मराठी मंत्री आणि त्यांनी सिध्द केलेले कर्तृत्व, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मान मिळविणा-या महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील, भाजपाचे पहिले मराठी अध्यक्ष ठरलेले केंद्रातील विद्यमान मंत्री नितीन गडकरी यांच्या रूपाने मराठी माणसांचे सर्वोच्च नेतृत्व दिसून माझ्या दिल्लीतील वास्तव्यात दिसून आले. तर केंद्रात मंत्रीपद भूषवित असतानाच अचानक काळाने घाला घातल्याने दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे या लोकनेत्यांना दिल्लीकर मराठी जणांनी साश्रू नयनांनी निरोप दिल्याचा दु:खद अनुभवही पाठीशी आहे .

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा एल्गार आणि देश व जगात गेलेला त्यांचा डंका व दिल्लीत  झालेला राजकीय सारीपाटावरील बदल आणि  त्यामुळे राज्याचा सामाजिक ठसा  राजधानीत उमटल्याचा अनुभव संस्मरणीय ठरला. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून गौरव असणा-या राष्ट्रीय नाटय विद्यालय (एनएसडी), ललित कला अकादमी, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे प्रमुख म्हणून मराठी माणसांची मोहरही कौतुकास्पद आहे. दिल्लीची भिती मनातून निघाल्याने स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मोठया प्रमाणात मराठी तरूण या शहरात येताहेत आणि यश मिळवित आहेत. मराठी तरूणांनी स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक केंद्रही उभारल्याचे सकारात्मक चित्र आहे. दिल्लीत मराठी प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत मराठीचा टक्का विशेषत: यात तरूणांचा वाढता सहभाग ही कौतुकास्पद बाब आहे. 





दीड कोटी लोकसंख्येच्या दिल्ली व राजधानी क्षेत्रामध्ये ५ लाख मराठी लोक वास्तव्य करतात. मराठी जणांना जोडून ठेवणारी येथील ३९ मंडळ व त्यांच्याद्वारे साजरा होणारा गणपती उत्सव. येथील दोन मराठी शाळा, विविध क्षेत्रातील महिलांच्या पुढाकाराने जोमाने कार्यरत मंडळ, दिल्लीकर मराठी माणसांचे हक्काचे प्रतिपंढरपूर म्हणून येथील आर.के.पूरम भागात स्थित विठ्ठल मंदिर, दिल्लीतील प्रमुख रस्ते, रेल्वेस्थानक व स्टेडीय यांना देण्यात आलेली मराठी मान्यवरांचे नावे ही ख-या अर्थाने मराठी म्हणून दिल्लीत मानाने शीर उंचावणारे प्रेरणास्थळेच ठरली आहेत. ल्युटियन दिल्लीतील ऐतिहासिक इंडिया गेट शेजारी कस्तुरबा गांधी मार्गावर डौलाने उभे असलेले महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्र शासनाचे मिनीदुतावास म्हणजे महाराष्ट्राची शान असलेली दिल्लीतील भव्य मराठी वास्तू ,जी दिल्लीतील अन्य कोणत्याही राज्याच्या वास्तूपेक्षा कलात्मकता, क्षेत्रफळ व उंचीच्याबाबतीत सरस आहे. दैनिक लोकसत्ता नंतर आता दैनिक लोकमत दिल्लीतून प्रकाशित होत आहे व महाराष्ट्रातील व दिल्लीतील माहितीचा पिटाराच दैनिक लोकमतच्या माध्यमातून दिल्लीकर मराठी बांधवांसाठी खुला झाला आहे.

मी, दिल्लीत 22 जुलै 2008 रोजी प्रवेश केला तेव्हा काँग्रेसप्रणीत राष्ट्रीय पुरोगामी लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार केंद्रात सत्तेवर होते, दिल्लीतही शिला दीक्षित या काँग्रेसच्याच मुख्यमंत्री होत्या. पुढे 2009 मध्ये 15 व्या लोकसभेसाठी निवडणुका होऊन जनतेने रालोआच्याच बाजुने कौल दिला. यावेळी केंद्रात सुशील कुमार शिंदे यांना ऊर्जा मंत्री व नंतर गृहमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याच काळात मुंबईच्या 26/11 च्या दहशतवादी हल्यातील आरोपी अजमल कसाबला फासी देण्याची कार्यवाही अतीशय गोपनीयपणे व कोणत्याही पध्दतीची हिंसक घटना न घडता पार पडली. विलासराव देशमुख या राजकाराणातील मातब्बर नेत्याने केंद्रसरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री पदाची धुरा सांभाळत दिल्लीत प्रवेश केला. पुढे याच सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द मोलाची राहीली. सर्वश्री  शरद पवार, प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक, स्व.गुरुदास कामत, माणिकराव गावीत, मिलींद देवरा, प्रतिक पाटील यांनी मंत्रीपदाची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.  

वर्ष 2009 मधे तत्कालीन प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दबदबा असणा-या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची धुरा विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांभाळली व दिल्लीत मराठी माणसाने नवीन इतिहास रचला. भाजपाचे पहिले मराठी अध्यक्ष तथा पक्षाच्या इतिहासात सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. तर, याच काळात 15 व्या लोकसभेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत भाजपाच्या लोकसभेतील उपनेते पदाची जबाबदारी सांभाळली. पहिल्या महिला राष्ट्रपती व मराठी कन्या प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012  या कालावधित देशाच्या प्रथम नागरीक अर्थात राष्ट्रपती पदाचा बहुमान समर्थपणे सांभाळला. महाराष्ट्रीय महिलांचे प्रतिनिधीत्वच त्यांच्या रूपाने दिल्लीत सर्वोच्चस्थानी विराजीत असल्याचा अनुभव स्वर्णीम ठरला. मात्र, 2012 ते 2014 या दोनच वर्षाच्या काळात दिल्लीने महाराष्ट्रातील दोन लोकनेत्यांचे अकाली निघून जाण्याचा कटू अनुभवही घेतला. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणून कार्यरत असतानाच मूत्रपिंडाच्या आजाराने विलासराव देशमुख यांचे  14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले. या दु:खातून दिल्लीकर मराठी सावरत नाही तोच 3 जून 2014 च्या पहाटे एका रस्ते अपघातात तत्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले. या दोनही दुर्देवी घटना येथील मराठी जणांना चटका लावून जाणा-या ठरल्या.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात मराठी मंत्र्यांचा मोठा बोलबाला आहे. सर्वात कार्यक्षम केंद्रीय मंत्री म्हणून भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी  दिल्लीत वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळेच मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना केंद्रात जलसंपदा मंत्रीपदाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता. याशिवाय, सर्वश्री केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, अनंत गिते, सुरेश प्रभू आणि सर्वश्री राज्यमंत्री  हंसराज अहिर, डॉ. सुभाष भामरे आणि रामदास आठवले केंद्रात व दिल्लीत मराठीची पताका डौलाने उंचावली आहे. आता मोदी सरकारच्या दुस-या कार्यकाळात नव्याने  केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद सांवत, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे या मंत्र्यांची वर्णी लागली असून राज्यातील सात मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात जोमाने कार्यरत आहेत. दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या आयोजनात या मंत्र्यांची उपस्थिती व सहभाग असतो. 





                                                                     मै अन्ना हॅूं
महाराष्ट्राला समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची  थोर परंपरा लाभली आहे व मला  त्याचा सार्थ अभिमान आहे. मात्र, वर्तमानकाळात महाराष्ट्रातील एका सामाजिक कार्यकर्त्याला देशव्यापी आंदोलन करावे लागेल व अख्खा देश त्यांच्या मागे उभा असेल असा विचार कधी केला नव्हता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे यांनी 2011 मध्ये पुकारलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि या आंदोलनाचे नायक म्हणून त्यांची किर्ती देश-विदेशात गेली. त्यावेळी मी एका वृत्तपत्रात व आकाशवाणी दिल्लीत कार्यरत होतो. त्यामुळे प्रसार माध्यमांनी अन्नांच्या आंदोलनाला दिलेली जागा व त्यांचे कौतुक म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्याच्या देशाच्या राजधानीतील तो प्रभाव अनुभवताना प्रचंड अभिमान वाटायचा. दिल्लीतील गल्ली बोळांमध्ये तिरंगी झेंडे आणि पांढरी टोपी व  त्यावर लिहीलेले ह्यमै अन्ना हॅूह्ण हे वाक्य ठळकपणे सर्वत्र दिसत होते. त्यावेळी बसेस, मेट्रो ने प्रवास करणा-या प्रवाशांपैकी जवळपास ८० टक्के लोकांच्या डोक्यावर ‘मै अन्ना हॅू’ हे वाक्य पाहून मराठी माणसाचा  प्रभाव आणि तो ही देशाच्या राजधानीत  अनुभवताना स्वाभीमान दुनावला. रिक्शा टॅक्सींवर अन्नांच्या समर्थनार्थ पोस्टर्स बघितले त्यावेळी ‘जंतर मंतर’  आणि ‘रामलिला मैदानावर’ अन्नांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध स्तरातील दिल्लीकर व देश विदेशातील समर्थक बघण्याचा अनुभव स्वर्णीम ठरला. अन्नांच्या आंदोलनामुळे तयार झालेल्या वातावरणामुळे पुढे  दिल्लीतील राजकीय सारीपाटीवर  झालेला ऐतिहासिक बदल संपूर्ण देश व जगाने बघितला. 

एक कटु अनुभवही येथे विषद केल्या वाचून राहवत नाही. महाराष्ट्रात अमराठींना मुंबई व महाराष्ट्रातून हाकलून लावायची भाषा होऊ लागली त्यासाठी निदर्शने ,प्रदर्शने आदी झाली. त्याचा परिणाम म्हणून दिल्लीतील महाराष्ट्र सदनासमोर निषेद करण्यासाठी मोठा जमान आला व त्यांनी दगडफेकही केली. याच काळात दिल्लीत या आंदोलनाचा जाहीर निषेद म्हणून जागो-जागी चर्चा होऊ लागली. प्रसार माध्यमातूनही तोच रोख होता. बस व मेट्रोत प्रवास करतानाही हा अनुभव येत असे. त्यामुळे आम्हा दोन मराठी व्यक्तींना आपलं मराठीपण झाकण्यासाठी हिंदीतून संवाद करावा लागत असे. दिल्लीतही त्यादृष्टीने आम्ही उपरेच. नोकरीसाठी या शहरात आलो. जात-पात, धर्म, प्रदेश विसरून भारतीय झालो पण महाराष्ट्रातील अमराठी विरोधी आंदोलनाने हे आंदोलन संकुचित असल्याचा  विचार आम्ही जगलो हे ही तेवढच खर.  





                         मानाच्या सांस्कृतिक संस्थांवर मराठीची पताका
दिल्ली स्थित देशातील नामवंत सांस्कृतिक संस्थाच्या अध्यक्षपदी मराठी माणसांचे नेतृत्व अभिमानास्पद आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत देशातील नाटय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था राष्ट्रीय नाटय्  विद्यालयाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी ज्येष्ठ कलावंत वामन केंद्रे यांच्या रूपाने प्रथमच मराठी माणसाने मोहर उमटवली. २०१३ पासून ते या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली व नाटय क्षेत्रातील दिर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी या संस्थेमध्ये नवनवीन उपक्रम राबविले.  सांस्कृतिक क्षेत्रातील आणखी दोन महत्वाच्या व मानाच्या संस्थावर मराठी मोहर उमटली आहे. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी जानेवारी २०१८ मध्ये  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय सांस्कृतिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांच्या नंतर डॉ. सहस्त्रबुध्दे हे या संस्थेचे अध्यक्षपद भुषविणारे तिसरे मराठी व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून परदेशातील ३७ केंद्रामध्ये मेळघाटातील आदिवासी महिलांद्वारे निर्मित पर्यावरण स्नेही राख्या पाठविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

जून २०१८ मध्ये भारतीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत कला क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ललीत कला अकादमीच्या अध्यक्षपदी  ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचरने यांची निवड झाली. या तिन्ही महत्वाच्या संस्थांवरील निवडीतून दिल्लीत सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी दबदबा बघायला मिळतो. 

                स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत येणा-या मराठी विद्यार्थ्यांच्या टक्यात वाढ
या शहरात २००८ मध्ये ज्या प्रमाणात मराठी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(युपीएससी) परिक्षांची तयारी करण्यासाठी येत असत ती संख्या आता झपाटयाने वाढली आहे. युपीएससीच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी वर्षाला या शहरात जवळपास १५ हजार मराठी विद्यार्थी येतात. दिल्लीत येऊन युपीएससीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविण्यातही महाराष्ट्राची सरसी आहे. या परिक्षेतील  उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा दबदबा मोडून काढत महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनी हे स्थान पटकाविले आहे. नागरी सेवेसह असीस्टंट कमांडट, वनसेवेत मोठया प्रमाणात मराठी विद्यार्थी यश मिळवित असल्याचे सकारात्मक चित्र आहे. दरवर्षी युपीएससीच्या निकालात उत्तीर्ण होणा-या  एकूण १२०० पैकी महाराष्ट्रातील १०० ते १२५ विद्यार्थ्यांचा समावेश असतो यातूनच चित्र अधिक स्पष्ट होते.

दिल्लीच्या करोलबाग, ओल्ड राजेंद्रनगर, डॉ. मुखर्जी नगर या भागात युपीएससी परिक्षेचे मार्गदर्शन केंद्र मोठया प्रमाणात असून याच भागात मराठी विद्यार्थींची रेलचेलही बघायला मिळते. अनुभवानुसार या भागात २००८ मध्ये एखाद दुसरा मराठी विद्यार्थी दिसायचा हे चित्र बदलून आता १०-१० ते २०-२० च्या समुहाने  मराठी विद्यार्थी या भागात बघायला मिळतात. येथील प्रसिध्द जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही युपीएससी परिक्षेचा अभ्यास करणारे मराठी विद्यार्थी मोठया प्रमाणात आढळतात.

कौतुकाचीबाब म्हणजे राजधानीत युपीएससी केंद्र सुरु करण्यातही मराठीजणांची आघाडी दिसून येते. डॉ. मुखर्जीनगर भागात संजीव कबीर या मराठी तरूणाने २००८ मध्ये ‘करीअर क्वेस्ट’ नावाने युपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोलापूरचे सुपूत्र व चंडीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांनी श्री.कबीर यांना मार्गदर्शन केंद्र उभारण्यास मदत केली आहे हे ही वैशिष्टयपूर्ण बाब नमूद करावी वाटते. करोलबाग परिसरात संजय राठोड या मराठी व्यक्ती ने ह्यव्हिजन इंडियाह्ण नावाने २००८ मध्ये युपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरु केले २०१० पासून सलग तीन वर्ष या केंद्राचे विद्यार्थी युपीएससीच्या परिक्षेत चांगल्या रँकने उत्तीर्ण झाले. काही कारणास्तव २०१७ मध्ये श्री. राठोड यांनी हे केंद्र बंद केले. याशिवाय ह्यचाणक्य मंडळह्ण आणि ह्यस्टडी सर्कलह्ण या महाराष्ट्रातील नामांकीत संस्थांनीही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उघडली मात्र येथील विद्यार्थ्यांच्या गरजा व या संस्थांचा मूळ पिंड तसेच  व्यवसाय व माकेर्टींगचे तंत्र आदीतील काही अडचणी या कारणास्तव या संस्थांना दिल्लीत पाय रोवता आले नाही. या पार्श्वभूमीवर ह्ययुनीक अकादमीह्णने मोठे धाडस दाखवून नुकतीच दिल्लीत शाखा उघडली आहे.

याशिवाय महाराष्ट्र शासनाच्यावतीने आणि दिल्ली स्थित विविध मंत्रालये व विभागांमध्ये कार्यरत मराठी अधिका-यांच्या षटकार गृप यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी  दिल्लीत  येणा-या विद्यार्थ्यांसाठी अभिमत मुलाखतीचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि षटकार गृप यांच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अभिमत मुलाखतीच्या माध्यमातून तयारी करून घेण्यात येते. महाराष्ट्र सदनात या अभिमत मुलाखती होतात व या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना युपीएससीच्या मुख्य मुलाखतीसाठी खूप चांगला फायदा होत असल्याचे चित्र आहे.  



दिल्लीतील मराठी प्रसार माध्यम प्रतिनिधींमध्ये तरूणांचा टक्का वधारला
केवळ गाव, तालुका, जिल्हा व प्रादेशिक पातळीवर कार्यरत मराठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आता राजधानी  दिल्लीसर केली आहे. गेल्या दहा वर्षात यात तरूणांचा सहभाग वाढल्याचे चित्र आहे. राजधानीत विविध राज्यांतील वृत्तपत्र व वृत्त  वाहिन्यांचे व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचे ब्युरो कार्यालये आहेत. यात महाराष्ट्रातील पत्रकारांची  वेगळी ओळख आहे. या पत्रकारांना विशेष मान आहे. मुळात मराठी तरूण दिल्लीत यायला कचरत असत त्यामुळे आतापर्यंत दिल्लीतील मराठी वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांमध्ये वरिष्ठांचा राबता असायचा. आता मात्र हे चित्र बदलले असून झी २४ तास, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी, नेटवर्क १८ लोकमत, ई टिव्ही इंडिया, लोकसभा  या वृत्त वाहिन्यांकरिता कार्यरत तरूण पत्रकार आहेत व त्यांनी राष्ट्रीय पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दैनिक लोकमत, पुढारी व सकाळ या वृत्तपत्रांमध्येही तरूण दमाचे मराठी पत्रकार कार्यरत असून त्यांनी ज्येष्ठांचा आदर्श पुढे नेत दिल्लीत मराठीची पताका डौलाने उंचविली आहे. सर्वश्री विजय नाईक, अनंत बागाईतकर, सुनील चावके, विकास झाडे, व्यंकटेश केसरी, श्रीराम जोशी, श्यामकांत जहागिरदार, राजीव शर्मा, अशोक वानखडे, विजय सातोकर, प्रमोद मुजुमदार, निवेदिता खांडेकर, अभिलाष खांडेकर, अजय बुवा हे ज्येष्ठ पत्रकार दिल्लीचे भूषण आहेत. 

लोकमत व लोकसत्ताचे वाचक दिल्लीकर
दीड दशकांपूर्वी दिल्लीतून दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनास सुरुवात झाली. मराठी जणांनी या वृत्तपत्रास डोक्यावर घेतले. आणि सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय मराठी दैनिक लोकमतने गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिण्यात दिल्ली आवृत्ती सुरु करून येथील मराठीजणांना मोठी भेट दिली. लोकमतच्या दिल्ली आवृत्तीतील पहिल्या तीन पानांवर प्रकाशित होणा-या दिल्लीतील महत्वाच्या बातम्या व अन्य पानांवरील महाराष्ट्रातील विविध विभागांतील बातम्या  दिल्लीकर वाचकांचे खास आकर्षण ठरत आहे. म्हणता म्हणता महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकांनी दिल्ली आवृत्ती सुरु करणे यातूनच दिल्लीतील मराठी वाचक व मराठी समाज यांना जोडून ठेवण्यासाठी माध्यमांचा पुढाकारही अधोरेखीत होतो.

                   दिल्लीत विविध रस्ते व स्मारकांना मराठी नेत्यांची नावे
देशाची राजधानी म्हणजे प्रत्येक राज्यांच्या  खूणा इथे सापडतात. त्या-त्या राज्यांतील थोर व्यक्तींच्या नावाचे रस्ते, स्टेडीयमला नावे आहेत. यात महाराष्ट्राची सरसी आहे. महात्माफुले मार्ग, पेशवा मार्ग, टिळक मार्ग, सावरकर मार्ग, श्रीमंत माधवराव शिंदे रोड, मधू लिमये मार्ग, राणी लक्ष्मीबाई मार्ग, डॉ. हेडगेवार मार्ग, राजमात विजयाराजे सिंधीया मार्ग, न्या. सुनंदा भंडारे मार्ग असे दिल्लीतील रस्त्यांना मराठी मान्यवरांची नावे आहेत.  शिवाजी ब्रिज रेल्वे स्थानक, तिलक ब्रिज रेल्वे अशा दोन रेल्वे स्थानकांना मराठी नेत्यांची नावे आहेत तर मेट्रो स्टेशनलाही शिवाजी स्टेडीयम मेट्रो स्टेशन, सुनंदा देशमुख मेट्रो स्टेशन अशी नावे आहेत.

याशिवाय संसदेच्या आवारात महत्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या जवळील टिळकमार्गावरील  बाळगंगांधर टिळक यांचा पुतळा, के.कामराज मार्ग व राजाजी मार्गाच्या क्राँसींगवर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा, डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा सरोजनी मार्केट जवळील पुतळा, लोधी कॉलनी येथील वीर सावरकर पार्क येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, पहाडगंज भागातील डॉ. बाळकृष्ण मुंजे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच शिवाजी स्टेडीयम हे हॉकीचे स्टेडीयम तर खाशाबा जाधव कुस्तीचे स्टेडीयमही दिल्लीत आहे. गंमत म्हणजे नामवंत शिल्पकार राम सुतार यांनी दिल्लीतील बहुतांश भव्य पुतळे तयार केले आहेत. आजही ते मोठमोठ्या मान्यवरांच्या प्रतिमेला आकार देत आहेत. सुतार हे दिल्लीत महाराष्ट्राचा अभिमान आहे.

                                                                 मराठी व्यावसायिक
महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाले व  सर्वप्रथम इथे मराठी माणसाच्या बीव्हीजी या हाऊस किंपींग कंपनीने प्रवेश केला. या कंपनीचा प्रवास २०१३ ते  आॅगस्ट २०१८ असा दीर्घ चालला आणि आता सप्टेंबर २०१८ पासून सुमीत या मराठी माणसाच्याच हाऊसकिपींग कपंनीने महाराष्ट्र सदनातील हे कंत्राट चालवायला घेतले आहे.  करोल बागेतील महाराष्ट्र ज्वेलर्स, पाटील ज्वेलर्स, हँडीक्राफ्ट, फुल व्यवसायिक काल निर्णय व गणेशमुर्ती विक्रेते स्पर्श एडव्हर्टायजींग ,आयएन मार्ग स्थित दिल्ली हाट येथील ह्यमराठी फुड स्टॉलह्ण जुने व नवीन महाराष्ट्र सदन येथील कँटीन आदी माध्यमातून मराठी व्यवसाय या ठिकाणी बघायला मिळते.

 महाराष्ट्र सदनाची भव्य वास्तू
ऐतिहासिक इंडिया गेट जवळील कस्तुरबा गांधी मार्गावर महाराष्ट्राची भव्य वास्तू ‘महाराष्ट्र सदन’  हे या शहरात येणा-या देश- विदेशातील जनतेचे खास आकर्षण आहे. एकूण ६.११ एकर परिसरात ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे.  ४ जून २०१३ मध्ये तत्कालीन  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या या भव्य वास्तूचे उदघाटन झाले. याठिकाणी एकूण १३८ कक्ष असून  मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांसाठी स्वतंत्र सुट आहेत. प्रेस सभागृह, व्हीडीओ कॉन्फरसींग हॉल आणि  भव्य प्रेक्षागृह येथे आहे. मोठया प्रमाणात दिल्लीकर मराठी मंडळी व स्थानिक दिल्लीकर परदेशी पाहुणे या वास्तूला अवश्य भेट देतात.

                                 दिल्लीतील  महाराष्ट्रीय संस्कृतीची जपणूक
राजधानी दिल्लीत विविध मराठी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या विभागांच्यावतीने राज्याची संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे सुरु आहे. पहाडगंज स्थित दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १९९२ पासून महाराष्ट्र राज्य नाटय स्पधेर्चे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संस्थेच्या आरामबाग येथील नूतन मराठी शाळेतील सभागृहात या नाटय स्पधेर्चे आयोजन करण्यात येते. मात्र, तीन वर्षांपासून हे आयोजन बंद आहे. बृहन्महाराष्ट्रातील विविध राज्यातील नाटय संस्था या स्पर्धेत सहभाग घेत. स्पर्धेत निवड झालेल्या पहिल्या तिन नाटकांना महाराष्ट्र राज्य नाट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था ही १९७२ पासून नाटय व सुगम संगीत स्पर्धा, अखिल भारतीय गद्य व संगीत नाटय स्पधेर्चे आयोजन करीत आहे. या संस्थेच्यावतीने नूतन मराठी शाळा चालविण्यात येते. ५ वी ते १२ वी पर्यंत या शाळेत शिक्षण दिले जाते या शाळेत मराठी विषय अनिवार्य आहे.
            महाराष्ट्र स्नेह-संवर्धक समाज संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव, दासनवमी, स्वातंत्र्यदिन कोजागिरी, संक्रांत आदी कार्यक्रम साजरे केले जातात. लोधी रोड स्थित वनिता समाजाच्या वतीने वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने समाजातील गरीब मुलांसाठी ज्युनीअर व सिनीअर किंडर शाळा चालविण्यात येते. करोलबाग येथील फैज रोड स्थित मराठा मित्र मंडळाच्यावतीने वर्ष भर विविध सण उत्सव साजरे करण्यात येतात. झंडेवालान भागात संस्थेच्या वतीने चौगुले पब्लिक स्कुल चालविण्यात येते. ही इंग्लीश मेडीयमची शाळा असून या शाळेत पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते इथे मराठी विषय अनिवार्य आहे. सार्वजनिक उत्सव समिती विविध दजेर्दार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. गणेशोत्सव काळात समितीच्या वतीने महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, यशवंतराव चव्हाण स्मृति सामारोह , कोजागिरी पोर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. याशिवाय करोलबाग स्थित राणी लक्ष्मी भगिनी समाज, जनकपुरी आणि लाजपतनगर स्थित महाराष्ट्र मित्र मंडळ, पुर्वांचल मित्र मंडळांच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेशोत्सव काळात दिल्ली  व परिसरात जवळपास 39 मराठी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
   
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीनेही मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे केले जाते. पत्रकार दिन, मराठी भाषा दिन, ग्रंथोत्सव, महाराष्ट्र दिनाचे आयोजन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात येते. महान व्यक्तींची जयंतीचे वर्षभर साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील विविध लेखक, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जनतेचा थेट संवाद घडवून आणण्यासाठी परिचय केंद्राच्यावतीने आयोन करण्यात येते. जनसंपर्क, वृत्त व माहिती असा मोठा डोलारा कार्यालयाच्यावतीने सांभाळला जातो. पुस्तकांचे नैमित्तिक प्रकाशन करण्यात येते, दर दोन वर्षांनी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारी ‘दिल्ली डायरी’ ही विविध माहितींनी परिपूर्ण पुस्तिका विशेष प्रसिध्द आहे. परिचय केंद्राचे सुसज्ज असे ग्रंथालय असून दिल्लीतील मराठी जन तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात.

        राजधानीत नव्या मराठी संस्था
‘दिल्ली मराठी प्रतिष्ठाण’ ही संस्था गेल्या तीन वर्षात नावारूपाला आली असून त्यांनी दर्जेदार मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठीजणांना एकासुत्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठाण या संस्थेमध्ये या शहरात कार्यरत जुण्याच मराठी संस्थाचे तरूण व विविध केंद्रीय मंत्रालयातील मराठी अधिकारी वर्ग यांचा समावेश आहे. या संस्थेने महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणारा व लोकप्रिय असलेला ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम थेट इंडिया गेट या ऐतिहासिक वास्तू समोर आयोजित करून तरूण दमाची संस्था म्हणून जोरदार सुरूवात केली. सलग दोन वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षीही संस्थेच्यावतीने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रसिध्द गायिका भगीणी बेला व सावनी शेंडे यांच्या सुरांची मोहिनी दिल्लीकर मराठी जाणांना मोहवून घेणार आहे. ऐतिहासिक लाल किल्ला येथे यावर्षी ह्यजाणता राजाह्ण या शिवाजी महाराजांवरील महानाटयाच्या हिंदी प्रयोगाचे सलग तीन दिवस सादरीकरण झाले.  

भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ आधिकारी तथा पराराष्ट्र विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने ‘पुढचे पाऊल’ ही दिल्ली स्थित मराठी प्रशासकीय अधिका-यांची नवी संस्था स्थापन करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यांच्या आयोजनासह स्पर्धापरिक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत  येणा-या मराठी तरूणांना मार्गदर्शन करणे व महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीत प्रशासकीय कामांमध्ये मदत करण्यासाठी या संस्थेच्या प्रत्येक अधिका-याने एक-एक खासदार विभागून घेतले आहेत. संस्थेने यावर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तीन दिवसांचा महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला, यात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले यात केंद्र व राज्य शासनातील मंत्री व अधिका-यांनी सहभाग घेतला. संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणा-या मराठी विदयार्थ्यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते कौतुक सोहळा व विशेष मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्यपुढचे पाऊलह्ण संस्थेच्या माध्यमातून दिल्ली स्थित विविध मंत्रालय व विभागांमध्ये कार्यरत जवळपास २५० मराठी अधिकारी जुळले आहेत. संस्थेच्या सदस्यांनी मराठी खासदारांकडेही मार्गदर्शक म्हणून कार्यास सुरुवात केली आहे.   

विविध राज्यांतील जनता दिल्लीमध्ये नौकरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने येतात. आणि बरेच लोक तर या शहरातच स्थायीक होतात. या शहरात वास्तव्यास स्थायी व अस्थायीपणे वास्तव्यास असणा-या मराठी जणांनी मात्र आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रगल्भ कार्य व लोकसंस्कृतीमुळे या राज्यांतील जनतेला दिल्लीने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे दिल्लीकर भाडयाने घर देण्यास महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या जनतेला प्राधान्य देतो. महाराष्ट्राचीहीच शान टिकवून ठेवण्याचे व हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम येथील मराठीजण करीत आहेत.

कृषी शास्त्रज्ञ!
दिल्लीत विविध क्षेत्रातील मराठी शास्त्रज्ञांची संख्या उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे दिल्लीतील कृषी शास्त्रज्ञांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. माजी कुलगुरु डॉ. चारुदत्त मायी, डॉ. गोविंद गुजर, डॉ. प्रताप देशमुख, डॉ. कोकाटे, डॉ. अनिल मोहरील आदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ इथलेच. कृषी संशोधन संस्थेत जवळपास ५० मराठी शास्त्रज्ञ आहेत. 

अटकेपार मराठीचे झेंडे लावणा-या महाराष्ट्रातील शूर सैन्यास दिल्लीच्या तख्तावर बसण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले नाही व पंतप्रधानपदाची माळही मराठी व्यक्तींच्या गळात पडली नाही ही खंत मात्र आहे. पण गेल्या अकरा वर्षात दिल्लीत मराठी जणांनी विविध क्षेत्रात रोवलेले झेंडे व त्यामुळे तयार झालेले एक सकारात्मक वातावरण  म्हणजे नव्या उजेर्ने  व जोमाने पुढे जाण्यास नक्कीच पुरक ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे.
-----  रितेश मोतीरामजी भुयार
-----------------------समाप्त----------------------------