Friday, July 9, 2021
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक.
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते.
१ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयातील गहुली येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेडयांमध्ये झाले तर विठोली आणि अमरावती येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून बीएची पदवी व नंतर एलएलबी पदवी मिळविली.
विद्यार्थी दशेत त्यांच्यावर ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘डेल कार्नेगी’ यांच्या विचारांचा प्रभाव पडला.
कायद्याची पदवी घेवून पुसद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली .
१९४३ -४७ कालावधित त्यांची पुसद कृषिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याशिवाय हरिजन वसतीगृह आणि राष्ट्रीय वसतीगृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले .
१९५१-५२ मध्ये त्यांची मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली .
१९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले .
१९५२ ते १९५६ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले .
१९५७ राज्य पुनर्रचनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले .
१९६० मध्ये वसंतराव नाईक हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री झाले .
१९६३ मध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी या पदावर तब्बल १२ वर्षे काम केले .
त्यांनी कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्राला धान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य केले .
गोरगरिबांच्या व गरजुंच्या हाताला काम देणारी ‘रोजगार हमी योजना’ वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरु झाली. त्यांच्या काळात या योजनेतून असंख्य विहिरी , तलाव खोदले गेले.
महाराष्ट्राला त्यांनी दुग्ध उत्पादनात अग्रेसर केले. शिक्षण आणि शेती विषयात विशेष लक्ष घालून त्यांनी महाराष्ट्रात मोठया सुधारणा घडवून आणल्या .
‘पाझर तलाव’ आणि ‘वसंत बंधाऱ्या’चे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. शेती,महसूल, राज्यभाषा, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण-दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी त्यांनी कठोर प्ररिश्रम केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिन महाराष्ट्रशासनाच्यावतीने ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment