Friday, July 9, 2021

गणपतराव बोडस

गणपतराव बोडस . मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट . २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे त्यांचा जन्म झाला. पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले, शाळेत शिकत असतापासूनच ते हौशी नाटयमंडळातून अभिनय करू लागले. १८९५ मध्ये त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्त्रीभूमिका वठविल्या त्यानंतर ‘सौभद्र’ नाटकात कृष्ण, ‘शारदा’ नाटकात कांचनभट, ‘मूकनायक’ मध्ये विक्रांत व ‘मानापमान’ मध्ये लक्ष्मीधर अशा महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. १९९३ मध्ये ‘किर्लोस्कर मंडळी’ सोडून बालगंधर्व आणि गोविंद टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली. ‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकर, ‘मृच्छकटिक’ नाटकातील शकार, ‘विद्याहरण’ नाटकातील शिष्यवर या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. १९३० नंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले यानंतर त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या पण येथे त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. १९४० मध्ये नाशिक येथे भरलेल्या ३१व्या नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. त्यांनी १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. १९५६ मध्ये त्यांना नाटयक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आल. गणपतराव बोडसांनी ४० वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाटयसृष्टीतील अनेक बहुमान मिळविले . ‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरि९ १९४० मध्ये प्रकाशित झाले .

No comments:

Post a Comment