Friday, July 9, 2021
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर.
वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त,श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक,संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक.
२० एप्रिल १८९६ रोजी ठाणे जिल्हयातील केळवे येथे जन्म.
प्राथमिक शिक्षण केळवे येथे तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी घेतली
वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू विष्णुबुवा जोग यांच्या संपर्कात आले आणि त्यांना हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लागली.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. पदवी मिळविली
पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक,मुंबईतील रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले.
१९२१ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली.
१९४७ मध्ये त्यांनी ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले.
१९५१ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदे’चे अध्यक्षपद भूषविले.
अध्यापन करीत असतांनाही त्यांनी ‘पंढरीची वारी’ कधीच चुकविली नाही.वारीच्या माध्यमातून त्यांनी वारकऱ्यांचे प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन केले.
१९५३ मध्ये त्यांनी नेवासे येथील ‘ज्ञानेश्वर मंदिरा’चा जीर्णोद्धार केला. पिंपळनेर येथील ‘संत निळोबाराय मंदिर’, पुण्यातील ‘निवडुंग्या विठोबा मंदिर’ आदी मंदिरांचाही जीर्णोद्धार केला.
१९५६ महाराष्ट्र शासनाने सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वरी ग्रंथाची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी एक समिती नेमली होती.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरी च्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संशोधित आवृत्तीला त्यांची १५० पानांची प्रस्तावना असून ‘सोनोपंतांची ज्ञानेश्वरी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना सन्मार्ग दाखविला.
‘ज्ञानेश्वरी’, ‘नामदेव गाथा’, ‘भावार्थ रामायण’ इत्यादी संत-साहित्य त्यांनी संशोधित केले.
‘ज्ञानदेव आणि प्लेटो’, ‘ईश्वरवाद’, ‘अध्यात्मवादाची मूलतत्त्वे’, अभंग-संकीर्तनभाग-१,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य जोग महाराजांनी भूषविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोनोपंत दांडेकर यांनी बराच काळ सांभाळली होती .
व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर.
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार .
६ जुलै १९२७ रोजी सांगली जिल्हयातील माडगूळ येथे त्यांचा जन्म झाला .
माडगूळकर यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसले तरी त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला .
आरंभीच्या काळात पत्रकारिता केल्यानंतर १९५० च्या सुमारास ते मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले.
१९४९ मध्ये ‘माणदेशी माणसं’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिध्द झाला .
‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हस्ताचा पाऊस’, ‘सीताराम एकनाथ’, ‘काळी आई’, ‘जांभळाचे दिवस’ आदी त्यांचे ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द आहेत
त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत .
‘बनगरवाडी’, ‘वावटळ’, ‘पुढचं पाऊल’, ‘कोवळे दिवस’, ‘करूणाष्टक’ आणि ‘सत्तांतर’ या त्यांच्या ग्रामीण कादंबऱ्याही उल्लेखनीय ठरल्या
‘करूणाष्टक’, ‘वावटळ’ आणि ‘कोवळे दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्रपर कादंबऱ्या प्रसिध्द आहेत.
‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ आदी त्यांनी लिहिलेली उल्लेखनीय नाटके होत.
‘सांगत्ये ऐका’, ‘पुढचं पाऊल’, ‘वंशाचा दिवा’, ‘जशास तसे’, ‘रंगपंचमी’ आदी मराठी चित्रपटांच्या कथा व पटकथा त्यांनी लिहिल्या
‘बिनबियांचे झाड’ आणि ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ ही त्यांनी लिहीलेली लोकनाटयेही गाजली.
‘चित्रे आणि चरित्रे’ ,‘नागझिरा’, ‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’, ‘पांढऱ्यावर काळे’, ‘रानमेवा’ ही त्यांची ललित गद्य पर पुस्तके प्रसिध्द आहेत
१९५५ ते १९८५ अशा दीर्घ कालावधिसाठी त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.
चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती होती ,त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिध्द आहेत.
‘गावाकडील गोष्टी’, ‘काळी आई’ या कथासंग्रहास, ‘बनगरवाडी’ या कादंबरीस आणि ‘सती’ ही नाट्यकृती आदींना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले .
‘सत्तांतर’ या त्यांच्या कादंबरीस १९८३ मध्ये साहित्य आकदमी पुरस्कार प्राप्त झाला .
१९८३ मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले .
गुरुदेव रानडे
रामचंद्र दत्तात्रेय रानडे तथा गुरुदेव रानडे .
आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ .
३ जुलै १८८६ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित विषय घेऊन बी.ए. आणि तत्वज्ञान विषय घेऊन एम.ए. ची पदवी संपादन केली.
१९१३ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली .
‘ॲकॅडमी ऑफ फिलॉसॉफी ॲड रिलिजन’ ही संस्था स्थापन करून त्यांनी भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहास खंडांची योजना आखली .
१९२८ ते १९४३ दरम्यान ते अलाहबाद विद्यापिठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते .
‘इव्हलूशन ऑफ ओल थॉट’ या त्यांच्या लेखावरून त्यांच्या तत्वज्ञान विषयक विचारांचा झालेला विकास लक्षात येताे .
मराठी ,हिंदी व कन्नड संतवाड्:मयातील साक्षात्कारवादाचे सर्वेक्षण करून त्यांनी एक नवीन तत्वज्ञान मांडले .
गुरुदेव रानडे यांचे बहुतांश लेखन इंग्रजीत असून ते मराठीत अनुवादितही झाले आहे .
‘अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘मिस्टिसिझम इन महाराष्ट्र’,‘पाथ वे टू गॉड इन मराठी लिटरेचर’ आदी इंग्रजी ग्रंथ त्यांने लिहीले आहेत.
‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतरचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’, ‘रामदासवचनामृत’ आदी त्यांची मराठी ग्रंथ रचना आहे.
गणपतराव बोडस
गणपतराव बोडस .
मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट .
२ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे त्यांचा जन्म झाला.
पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले, शाळेत शिकत असतापासूनच ते हौशी नाटयमंडळातून अभिनय करू लागले.
१८९५ मध्ये त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्त्रीभूमिका वठविल्या त्यानंतर ‘सौभद्र’ नाटकात कृष्ण, ‘शारदा’ नाटकात कांचनभट, ‘मूकनायक’ मध्ये विक्रांत व ‘मानापमान’ मध्ये लक्ष्मीधर अशा महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.
१९९३ मध्ये ‘किर्लोस्कर मंडळी’ सोडून बालगंधर्व आणि गोविंद टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकर, ‘मृच्छकटिक’ नाटकातील शकार, ‘विद्याहरण’ नाटकातील शिष्यवर या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या.
१९३० नंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले यानंतर त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या पण येथे त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
१९४० मध्ये नाशिक येथे भरलेल्या ३१व्या नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.
त्यांनी १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.
१९५६ मध्ये त्यांना नाटयक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आल.
गणपतराव बोडसांनी ४० वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाटयसृष्टीतील अनेक बहुमान मिळविले .
‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरि९ १९४० मध्ये प्रकाशित झाले .
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक.
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते.
१ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयातील गहुली येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेडयांमध्ये झाले तर विठोली आणि अमरावती येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून बीएची पदवी व नंतर एलएलबी पदवी मिळविली.
विद्यार्थी दशेत त्यांच्यावर ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘डेल कार्नेगी’ यांच्या विचारांचा प्रभाव पडला.
कायद्याची पदवी घेवून पुसद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली .
१९४३ -४७ कालावधित त्यांची पुसद कृषिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याशिवाय हरिजन वसतीगृह आणि राष्ट्रीय वसतीगृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले .
१९५१-५२ मध्ये त्यांची मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली .
१९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले .
१९५२ ते १९५६ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले .
१९५७ राज्य पुनर्रचनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले .
१९६० मध्ये वसंतराव नाईक हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री झाले .
१९६३ मध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी या पदावर तब्बल १२ वर्षे काम केले .
त्यांनी कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्राला धान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य केले .
गोरगरिबांच्या व गरजुंच्या हाताला काम देणारी ‘रोजगार हमी योजना’ वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरु झाली. त्यांच्या काळात या योजनेतून असंख्य विहिरी , तलाव खोदले गेले.
महाराष्ट्राला त्यांनी दुग्ध उत्पादनात अग्रेसर केले. शिक्षण आणि शेती विषयात विशेष लक्ष घालून त्यांनी महाराष्ट्रात मोठया सुधारणा घडवून आणल्या .
‘पाझर तलाव’ आणि ‘वसंत बंधाऱ्या’चे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. शेती,महसूल, राज्यभाषा, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण-दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी त्यांनी कठोर प्ररिश्रम केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिन महाराष्ट्रशासनाच्यावतीने ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो .
Wednesday, March 31, 2021
शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्राची भक्कम वाटचाल डॉ. विजय चोरमारे
नवी दिल्ली, दि. १९ : शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या कार्यावर व विचारांवर महाराष्ट्र उभा आहे व पुढच्या काळातही आपल्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमारे यांनी आज महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घटनाच्या व्याख्यानात केले.
महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिव, फुले, शाहु,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो तेव्हा या चार महापुरुषांच्या कार्यातून मुल्यमापन करावे लागेल. शिवाजी हे जगाच्या पाठीवर पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते. अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटण हा आदर्श राज्याचा समाजाचा पहिला निकश आणि शिवाजी महाराजांनी आल्याला शिकवण देतात. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या वैचारिक पायातून आजचा महाराष्ट्र राजकीय व सामाजिकदृष्टया उभा आहे. शिवाजींनी राज्य कस कराव याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात आपल्या चालीरिती कशा असायल्या हव्या, जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण फुलेंनी दिली.
राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे ही शिकवणूक शाहुंनी दिली. आंबेडकरांनी शिवाजी फुले शाहु यांनी कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी आंबेडकरांनी राज्यघटनेत आणल्या. ज्या आधुनिक काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. वैचारिक कार्यावर उभ आहे पुढच्या काळातही आपल्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल.
महाराष्ट्र हा आधार भारताचा
सेनापती बापट यांनी देशपातळीवर महाराष्ट्राच स्थान अधोरेखित करताना म्हटले आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले !
महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले,
खरावीर वैरी पराधिनतेचा,
महाराष्ट्र आधार हा भारताचा ! या ओळी भारताच्या जडणघडनीतील महाराष्ट्राच योगदान अधोरेखित करतात.
छत्रपती शाहु महाराजांनी संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. प्रस्तापितांचा विरोध स्विकारून हे धोरण धैर्याने राबविले. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारले.
१९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेला जगता यावे म्हणून महाराष्ट्राने रोजगार हमी योजना राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक. त्याआधी १८९६- ९७ नंतरच्या काळात कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी ही योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावाने राबविली जाते. ही महाराष्ट्राची देणगी आहे.
देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय व अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. पुढे देश पातळीवर ३३ टक्के आरक्षण दिले. देशात पुढे ५० टक्के आरक्षणाच्या मागणीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली.
ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला
समाजकारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्या कल्पनेतील चित्र. त्यापूर्वीचे भाषण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आराखडा पुढे ठेवून त्याची उकल केली नाही तर हा आंधळा प्रवास ठरेल. मात्र आम्हाला डोळस प्रवास करायचा आहे व ध्येय ठरवून निश्चित गतीने हा प्रवास करायचा आहे. आज आमच्या समोरील प्रश्न राजकीय सामाजिक आर्थिक .
आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना . यशवंतरावांनी राज्यातील सहकाराला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले.
सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतरावांन भाषणात म्हटले होते विचारवंतांनी महाराष्ट्राच वर्णन भंगलेल मन अस केल होत. वस्तूनिष्ट पायावर समाजकारण राजकाारण कराणर
भंगलेले मन आम्हाला सांधायचे आहे. जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट केले पाहिजे असा विचार मांडले होते . गेल्या ६० वर्षांत त्यातून काय साध्य केल तर निराशा समोर येते. राजकारणाच्या पातळीवर जातीयता सौम्य होण्या ऐवजी तिष्ण होत आहे. जातीयवादी विचारापासून दूर जाण्याचा विचार सोयीनुसार पाळतो.
महा राष्ट्राच्या समाजसुधाराच्या चळवळीचे दाखले दिले जातात. सामाजिक सुधारकांची मोठी परंपरा येथे निर्माण झाली यास जातीय राजकारण शोभा देत नाही.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचा उल्लेख करावा लागेल वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आंबेडकर फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात चळवळ उभी केली ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत उपेक्षित समाजाला आत्मभान दिले.
यशवंतराव, वसंतदादा पाटील, बाळासाहेब, पाटील ह ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण या सूत्रावर राजकारणाची मांडणी केली म्हणजे राजकारणाला समाजकारणाची जोड दिली. कार्यकर्त्यााचया . अलीकडच्या राजकारणात हे सूत्र दिसत नाही . राजकारणाने समाजकारणापासून फारकत घेतल्याचे दिसते.
समाजकारणाने सांस्कृतिककरणापासून फारकत घेतली आहे. सांस्कृतिक जोड असल्या शिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक चांगल्यारितेने चालेत तर सांस्कृतिक बाबा आढवांनी सुरु केलेली एकगाव एक पानवठा चळवळ समृध्द सामाजिक चळवळ, दाभोळकरांची अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ जादुटोना विरोधी विधेयक. कर्नाटकाने एक विधेयक मंजूर केल.
सामाजिक पातळीवरी चळवळ देशाला मार्गदर्शक. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे पंजावबराव देशमुख आदींनी शिक्षणाची गंगा तळागाळात पोचवली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ कारण शिक्षण. वसंतदादा पाटील यांच्या काळात शिक्षणाचे धोरण १९८३ नंतर चार दशकानंतर बघतो. डी वाय पाटील, आदींनी दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था. काळाच्या पातळीवर योग्य. शिक्षण क्षेत्रातील पुढारलेले राज्य. खाजगीकरणच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थाचे महाराष्ट्रात मोठे योगदान.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वाची सी डी देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील स्त्रियांचे लढे प्र कल्प ग्रस्त विस्तापितांसाठीचे मेधा पाटकर यांचे आंदोलन देशपातळीवर कार्य. आदिवासींच्या कल्याणासाठी भागात नंदूरबार येथे प्रतिभा शिंदेचे आंदोलन. विदर्भात पारामिता गोस्वामी काम .
यशवंतरावांपासून गडकरींपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अशा अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे.
सामाजिक क्षेत्रात बाबा आमटे नानाजी देशमुख यांच काम दिसत. अन्ना हजारे यांनी उभे केलेले आंदोलन मोठे होते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बघता काँग्रेस केंद्रीत राजकारण, शेतकरी कामगार पक्षाच राजकारण, जनता पक्ष, शिवसेना, भाजप, महानिर्माण सेना रिपब्लीकन राजकारणाच्या स्थित्यंतरात . नोंद करावी अशी बाब डावे व समाजवादी यांचा झालेला –हास चिंतेची बाब आहे.
काळाची पावले ओळखू शकले नाहीत राजकारण समाजकारणाचा दिर्घ पट
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४९/दिनांक १९.०३.२०२१
परिचय केंद्राची ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प
नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी
डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे.
दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार
शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१
Subscribe to:
Posts (Atom)

