Monday, August 24, 2020
Thursday, July 23, 2020
माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची मुलाखत
(माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची माजी
मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त लोकराज्य विशेषांकासाठी मुलाखत घेण्याचा व ती शब्दबध करण्याचा योग आला. लोकराज्य
अंक जुलै २०२०)
जुलै महिन्याचा लोकराज्य विशेषांक प्रकाशित
'जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेषांक' वाचण्यासाठी क्लिक करा:
https://mahasamvad.in/?p=17886
घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
(स्वच्छ भारत अभियानांतर्गत
घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरांचा समावेश असल्याचा एक निकाल आला
आहे काल कृपया याबाबत सविस्तर लेख दयावा असा आमचे सहकारी व लोकराज्य मासिकाचे उपसंपादक
राजाराम देवकर यांचा एक संदेश मिळाला मग काय याविषयाचा माग घेतला आणि केंद्रीय मंत्री
महोदयांच्या काही ट्विट वरून चक्क बातमी तयार झाली व तो लेखही लोकराज्यच्या जून २०२०
अंकामध्ये प्रकाशित झाला )
वृत्त विशेष 63 दिनांक 20 मे 2020
घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
राज्यातील ७६ शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान
नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील १४१ शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकटया महाराष्ट्रातील ७६ शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचारांकित तर ३४ शहरांना तीन आणि ४१ शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मुलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो . केंद्रीय नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष २०१९-२० साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहारांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील ४ हजार ३७२ शहरांपैकी १४३५ शहरांनी आवेदन पाठविली होती यापैकी डिजीटल एमआयएस चाचणीत ६९८ शहर बाद ठरली. उर्वरीत ७३७ शहरांमध्ये नागरीकांचे मत व मंत्रालयाच्या अधिका-यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण २० मानकांआधारे चाचणी करून अंतिम १४१ शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७६ शहरांनी बाजी मारली आहे. देशातील ६ शहरांना पंचारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील ६५ शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ३४ शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील ७० शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ४१ शहरांचा यात समावेश आहे.
स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील महानगरपालिका ,नगर पालिका खालील प्रमाणे.
पंचारांकित मानांकन
नवी मुंबई महानगर पालिका
तीन तारांकित मानांकन
अंबरनाथ,भिवंडी निजामपूर, ब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गडहिंगलज, इंदापूर,जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि विटा
एक तारांकित मानांकन
अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई, जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूर, कुरुंदवड, महाड, मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे, उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.
राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणा-या एकूण गुणांपैकी २५ टक्के म्हणजे ६००० पैकी १५०० गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्व असून यात महाराष्ट्राची सरसी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.63 /दि.20.05.2020
भेळीने दिली यशाची किल्ली; रघुने घडवली यशाची दिल्ली
(स्पुट आणि सहज लेखन मला आवडत. आदल्या दिवशी आमच्या कार्यालयाचे
लेखापाल श्री. रघुनाथ सोनवणे यांचा फोन आला म्हटले,परवा माझा वाढदिवस माझ्या गावाकडच्या
लोकांना माझा दिल्लीचा प्रवास कळावा अशी इच्छा आहे आपण लेखनी चालवा . मग या स्पुटाचा
जन्म झाला.)
म्हणाल तर एक कागदाचा तुकडा
पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जाते याचं जीवंत उदाहरण
म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे. आठवडी बाजारात भेळ खाताना हाती आलेली वृत्तपत्रातील
जाहिरात बघून दिल्ली पादाक्रांत करणारा रघु
आज स्वमेहनतीने व अपार कष्टाने देशाच्या राजधानीत राज्य शासनाच्या माहिती विभागात
लेखापाल आहे.
घरची परिस्थिती बेताचीच, दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या
अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत कमी पगारावर नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी
आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला व त्याने भेळ घेतली .पण त्याला काय
माहीत होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल. म्हणजे ते घडले असे
की , वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना
रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु
खूश झाला 'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक
टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात
आपले स्थान निश्चित केले व हाच शासकीय नोकरीतील
त्याचा प्रवेश ठरला.
तसे दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत
नाही.त्याला कारणे ही बरीच आहेत ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात
टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल-चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची
सुत्रच या शहरातून हलतात म्हटल्याने या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले
अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत
नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून , वरिष्ठ लिपिक व आता थेट याच
कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत असा लेखापाल म्हणून रघु जबाबदारी
सांभाळत आहे.
आपल्या
कामा व्यतिरीक्त ज्या जनसंपर्क विभागात तो कामाला आहे त्यातील प्रभावी जनसंपर्काचे
गुण त्याने आत्मसात केले आहे . म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त
रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.
भेळीच्या कागदातही भविष्याची
वाट शेधून रघुने आज रघुनाथ सोनवणे साहेब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. हा प्रसंग
सांगताना आजही रघु गहिवरतो सांगतो की, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्यातून
मिळालेल्या संधीचे सोने करता आले तर या जगात अशक्य ते काहीच नाही.
माय भूमिपासून कोसोदूर
असले तरी आजही अकोलेकरांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेलेल्या
अकोलेकरावर ते खूप प्रेम करतात आस्थेवाईकपणे चौकशी करतात व त्यांना मोलाचे सहकार्य
करतात.
भेळीच्या वृत्तपत्र रद्दीने आज महाराष्ट्र परिचय
केंद्रात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रघु सोनवणे स्वतःला धन्य समजतात.
000000
शब्दांकन : रितेश
मो . भुयार, नवी दिल्ली.
Friday, November 29, 2019
प्रासंगीक : मातृभाषेतून शिक्षण देताना येणा-या अडचणी
जन्मानंतर बाळाचा पहिला संपर्क
मातेशी येतो आणि माता ज्या भाषेत मुलासोबत संवाद साधते त्याच भाषेचे संस्कार घेत तो
मोठा होतो व तिच आपली मातृभाषा ठरते. म्हणून पंजाब मध्ये राहणा-या व्यक्तींची भाषा
पंजाबी ठरते, गुजरातमध्ये राहणा-या व्यक्तींची गुजराती तर महाराष्ट्रातील जनतेची मराठी
ही मातृभाषा ठरते. जगाच्यापाठीवर सर्वच ठिकाणी हे तत्व लागू पडते. म्हणूनच मातृभाषेतून
घेतलेल शिक्षणही उत्तम मानल जाते किंवा जी
भाषा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात येते त्याच भाषेतून आपण शिक्षण दिल तर ते विद्यार्थी
लवकर ग्रहण करतात. पर्यायाने मातृभाषेतून शिक्षण हे प्रभावी ठरते. मात्र, भारतासारख्या
खंडप्राय देशात डोंगर -द-यात राहणा-या जमातीतील मुलांची स्थानिक भाषेतून जडणघडण होते
त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देताना भाषिक अडचण मोठया प्रमाणात
जाणवते.
स्थानिक भाषेतील जडण घडणीमुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेताना
येणारी अडचण समजून घेण्याकरिता माझे स्वत:चे निरीक्षण व अनुभव येथे मांडणे संयुक्तीक
समजतो. आपल्या राज्याची मराठी ही मातृभाषा म्हणून अभ्याससाहित्य हे प्रमाण मराठी भाषेत
तयार होते मात्र, सामाजिक परिवेशातील वैविद्यामुळे स्थानिक भाषेसोबत जुडवून घेताना
उच्चारण व शब्दबोध या अडचणी प्रकर्शाने जाणवतात. उदा. विदर्भातील विद्यार्थ्यांची जडण-घडण
होताना या भागातील उच्चार हे प्रमाण मराठी बोलणा-या पुणे किंवा मुंबईतील विद्यार्थी
किंवा शिक्षकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे एकाच राज्यात राहून विदर्भातील विद्यार्थी
किंवा शिक्षक पुणे,मुंबई व राज्याच्या अन्य भागात गेल्यास त्यास भाषेची अडचण निर्माण
होते तशी ती पुणे,मुंबई येथील विद्यार्थी किंवा शिक्षक विदर्भात आल्यानंतर होते.
भाषा ही त्यात्या परिसराच्या भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक घटकांचेही
प्रतिनिधीत्व करीत असते त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण देताना ही अडचणही प्रकर्शाने जाणवते.
अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील तालुक्यांच्या ठिकाणच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी
बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थीनी आदिवासी जमातीची आहेत. या मुलांची जडणघडण आदिवासी
भाषेतून झाली असल्याने त्यांना मराठीतून शिक्षण घेताना अनंत अडचणी येतात. मी, मुलत:
आकलणाची अडचण अधोरेखीत करतो. मुख्य प्रवाहातील समाजाशी कमीत कमी संपर्क असणा-या आदिवासी
जमातीतील मुलांचा मराठी भाषेशी संबंधच येत नाही.
शाळेत शिक्षकांनी शिकवलेला मराठी शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकलेला असतो त्यामुळे
त्यांना आकलण होत नाही. आकलण न झाल्याने विद्यार्थ्यांच्या लेखनीतूनही ते उतरत नाही परिणामी वेगाने पुढे जाण्याच्या शिक्षणाच्या शर्यतीत
ही मुल कोसो दूर राहतात.
आदिवासी मुलांची जडणघडण ही त्यांच्या कोरकु वा अन्य स्थानिय भाषेत होत
असल्याने मराठी या राज्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेताना महत्वाची अडचण जाणवून येते.
महाराष्ट्रात अन्य राज्यातून येणा-या प्रशासकीय
अधिका-यांना (जिल्हाधिकारी) यांना जसे स्थानिक भाषा शिकावी लागते त्यामुळे ते स्थानिक
लोकांचे प्रश्न अधिक चांगल्यारितीने समजू शकतात व स्थानिक जनतेलाही आपल्या मातृभाषेतून
अधिकारी संवाद साधतो याचे समाधान लाभते. तसेच, सामाजिक वैविद्यामुळे मातृभाषेतून शिक्षण
घेताना स्थानिक भाषेतील विद्यार्थ्यांची जडण-घडण हीच मोठी अडचण असते.
*****
रितेश मोतीरामजी भुयार,
नवी दिल्ली.
औचित्य शतकपुर्तीचे : दिल्लीतील मराठीजणांची आधारवड ‘बृह्नमहाराष्ट्र भवन’
कंफर्टझोन सोडून जेव्हां
आपण स्वत:ला सिध्द करण्यासाठी बाहेर पडतो आणि तिथे आपल्याला आपलेपणाचा आधार मिळतो तोच
आधार मला दिल्लीत बृह्नमहाराष्ट्र भवनाने दिला. महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाने
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेत ‘बृह्नमहाराष्ट्र भवन’ ही देखनी वास्तू उभारली आहे. महाराष्ट्रातील
कित्येकांसाठी देशाच्या राजधानी दिल्लीत अगदी अल्पदरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध
करून देणा-या बृह्नमहाराष्ट्र भवनात व्यवस्थापक म्हणून दिलेली सेवा आणि या दरम्यान
मला लाभलेलं सर्वांच सहकार्य आणि प्रेम यामुळे मी समृध्द झाले आणि ही वास्तू तर जणू
माझी हक्काची आधारवडच झाली.
यजमानांच्या सरकारी नोकरीमुळे
लग्न होऊन थेट माझा संसारच देशाच्या राजधानी
दिल्लीत थाटला. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लीकेशन
विषयाची पदव्युत्तर असलेली मी लग्नाआधी जॉब करायचे. मात्र, दिल्लीत पाय ठेवताच येथील
लोक, वातावरण आणि कार्यसंस्कृती अशा सर्व गोष्टी समजल्यानंतरच मला पुन्हा लग्नानंतर
जॉबची दुसरी इनिंग सुरु करायची होती . एव्हाना, करोलबागेत बँकींगचे क्लासेस लावून बँकींगच्या परीक्षा देण्याच्या निमित्ताने दिल्ली
व राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा (एनसीआर) ब-यापैकी अभ्यास झाला होता. म्हणूनच बँकींगच्या
परीक्षेची तयारी आणि आता सोबतीला जॉब कराव अस मनोमन वाटू लागलं. त्यात आम्ही ज्या पहाडगंज भागात राहत असू तिथेच ही बृह्नमहाराष्ट्र
भवनाची भव्य इमारत बघीतली होती. यातच इथे व्यवस्थापक पदाची जागा रिक्त
असल्याचे मला यजमानांकडून कळाले. आम्हा उभयतांतील चर्चे अंती येथे जॉब करण्याचा निर्णय
झाला. संस्थेच्या पदाधिका-यांसोबत बोलन झाल व रितसर मुलाखतीचे सोपस्कार करून मी भवनात
जॉब करायला लागली. हीच माझी या वास्तूतील आणि एका अर्थाने महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाजाच्या भल्या मोठया
कुटुंबातील एन्ट्री.
महाराष्ट्र भवनात निवासास
येणारा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती (स्त्री-पुरुष)
हा आमचा क्लायंट. भवनाच्या पहिल्या माळयावरच अगदी दर्शनीभागात स्वागतकक्षातच माझी डयुटी
असल्याने येणा-या प्रत्येक क्लायंटसोबतच अदबीने बोलने आवश्यक माहितीची नोंद करून त्यांची रूम व डॉर्मेट्रीमध्ये व्यवस्था करणे आणि अनुषांगीक कामे असायची. तसेच, टॅली ही माझी
जमेची बाजु बघून व्यवस्थापनाने मला लेखा विभागाचीही काही जबाबदारी दिली होती ती ही
मी चोखपणे पार पाडली. व्यवस्थापन आणि येथील कर्मचारी वर्ग अगदी आस्थेने विचारपूस करतो
त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात येथील जॉब सुरु होता. यासोबतच व्यवस्थापनाच्या
बैठका आणि स्नेहसंवर्धक समाजाच्या कार्यक्रमांची सतत रेलचेल ही भवनात असायची. त्यामुळे या भल्यामोठया परिवारातील सदस्यांचाही माझा परिचय
झाला. दिल्ली सारख्या शहरात राहून या सर्वांनी मराठी भाषा, संस्कृती किती उत्तमरित्या
जपली व त्याचा वारसा ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला देत असल्याचे पाहून उर अभिमाने
भरून येतो.
भवनातील गणपती उत्सव, दासनवमी, कोजागीरी, भोंडल्यांचा
कार्यक्रम असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील ज्यांची सारखी रेलचेल असते. माझ्या सारख्या
दिल्लीत नवख्या मराठी स्त्रीला आपले सण, उत्सव साजरे करण्यासाठी भवनाने जणू मला मोठे
व्यासपीठच उपलब्ध करून दिले होते. भवनाच्या शेजारीच असलेल्या नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाच्या
प्रेक्षागृहात व प्रांगणातही विविध कार्यक्रमांचे नियमीत आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांनाही कित्येकदा सहकुटुंब आम्ही उपस्थित असतो. एका अर्थाने
राजधानी दिल्लीत आम्हाला व आमच्या मुलांना
मराठी सांस्कृतीसोबत जोडून ठेवण्याचं महनमंगल
कार्य महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाने केल आहे. या संस्थेने गेल्या शंभर वर्षांच्या
काळात माझ्या सारख्या कित्येकांना मराठीबाण्याची व प्रेमाची शिकवण दिल्लीत दिली याचा
मला सार्थ अभिमान आहे. स्नेह संवर्धक समाजाच्या महाराष्ट्र भवनाने आधारवडरूपी दिलेल
प्रेम मी सदैव माझ्या आयुष्यात कायम जपेन आणि या संस्थेप्रती कृतज्ञभाव ठेवेन. संस्थेच्या
पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
सोनाली रितेश भुयार,
टागौरगार्डन, नवी दिल्ली.
Saturday, October 5, 2019
सेवानिवृत्ती दिन की स्मरणीय यादें
(संपादन एवं रचना : रितेश मोतीरामजी भुयार)
इन्सान
का जीवन मानों दिवार पर लगी ‘घडी’ की तरह
है, जो हमें संदेश देती ‘जीवन चलने का नाम चलते रहो सुबहो शाम…..’ लेकीन, इस सतत
चलने वाले जिंदगी में ऐसा मौका आता है जहां एक दिन रुकना पडता है. वैसा ही रुकने का दिन सरकारी नोकरी में भी आता है. ढाई दशक
के निरंतर सरकारी सेवा के बाद मेरे जीवन में भी
सेवानिवृत्ती का दिन आ ही गया. जीस कार्यालय में मेरा रोजाना आना जाना लगा
रहता अब वह रूक ने वाला था. मानों सरकारी नोकरी का पूर्ण विराम लगने वाला ओर
सेवानिवृत्ती वाली जींदगी जिने के लिए अल्प
विराम ही कह लिजीए एक तरह से. पर में खुशनसीब हु जिसके सेवानिवृत्ती का दिन
स्मरणीम बन गया.
महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क
विभाग का दिल्लीस्थित ‘महाराष्ट्र सूचना केंद्र’ जो विगत २७ सालों से मेरे रोजी रोटी
का जरिया था आज इसी कार्यालय से बिदाई अर्थात
सरकारी नोकरी से सेवानिवृत्त होने का दिन. कार्यालय के लायब्ररी में ३१ अगस्त २०१९
को आयोजित समारोह में मेरे सेवानिवृत्त साथी तथा सेवा में कार्यरत सभी अधिकारी व कर्मचारी
उपस्थित रहे. कुछ सेवानिवृत्त कर्मचारी निजी कारनों से उपस्थित नही हो सके लेकिन ,
उन्होंने मुझे अपने शुभकामना संदेश भेजे . यह तो मानों मेरी यादों की गठरी है जो मै
इस कार्यालय से बांध कर अपने घर ले जा रहा था.
इस भावविभोर मौके पर सभी ने अपने
खट्टे मिठे अनुभवों के आधार पर मेरे बारे में अपने विचार रखे. मेरे कुछ साथी भावूक
हो गये और अपने आंसुओं को रोख नही पाए. मेरे सेवानिवृत्त होने का दुख उनकी आखों और
चहरे से झलक रहा था. उस समय कार्यक्रम का वातवरण गमगीन हो गया था. यह सभ देखकर मेरी
आँखों से आंसु झलक रहे थें. लेकिन कार्यालय प्रमुख के साथ मुख्य अतिथीके भाती सभ के
बिच बैठा में इस वक्त खुद को भावूक होने से संभाल रहा था.
कार्यालय के उपसंपादक श्री रितेश
जी को तहे दिल से धन्यवाद करता हू. श्री रितेश
भुयार जी ने कार्यक्रम में चार चांद लगा दिए. हमेशा ही कार्यालय के कार्यक्रम का निवेदन
करने की जिम्मेदारी संभालते हुए उन्होंने आज के इस कार्यक्रम की भी कमान संभाली थी.
मेरे परिवार के लोगों की उपस्थिती देखते हुए उन्होंने इस कार्यक्रम
की पुरी कारवाई हिंदी भाषा में की. उन्होंने अपने अनुभव के आधार पर मेरें व्यक्तीत्व के विभिन्न्ा
पैलुओं के बारे में उपस्थित सभी को अवगत कराया. उस को सुन कर कुछ अधिकारी -कर्मचारी
तो हैरान हो गये यहां तक की कार्यालय प्रमुख उपनिदेशक श्री दयानंद कांबले जी ने अपने
वक्तव्य में कहा की, ‘ मैं, हैरान हु की मुझे रामदास जी के व्यक्तीत्व के बारे में
आजतक कुछ पता नही चला. ओर यह सब कुछ उनके सेवानिवृत्ती
के दिन पता चला’.
श्री. कांबले जी ने जो बाते व अनुभव सभ
के सामने रखे इसके लिए मै उनकी भावनाओं
का विनम्रता से स्वीकार
करता हॅूं और उन्हे हृदय से धन्यवाद देता हॅूं.
हमारे एक साथी श्री नैनसिंह तो शेरो शायरी
के माहिर है. रामलिला में उन्होंने निभाए कई किरदारों के कारन उनके शब्दों में अलग
ही मिठास है. उन्होंने अपने शब्दों को एक लडी में पिरोकर शायरी के अंदाज में मेरे व्यक्तीत्व
को सभी के सामने रखा. मनोरंजक बातों के साथ ही उन्होंने मेरे संगिनी के अकाली निधन
के संदर्भ में की शायरी वातावरण को भावूक कर गयी और आज के इस अवसर पर मुझे मेरे प्रिय पत्नी की कमी का
अहसास दिला गयी. इस कार्यालय में जो भी कर्मचारी सेवानिवृत्त हुए उनकी पत्नी इस मौके पर उनके साथ उपस्थित रही लेकीन, मैने इस बारे
में खुद को दुखी महसुस किया.
कुछ साथीओंने मेरे काम की तारिफ की, हमारे लेखा विभाग
के कर्मचारीने ‘मेरे अनुषाशीत एवं गुणवत्तापूर्ण काम करने का बखान किया’. तो लघुलेखक
ने ‘काम के प्रती मेरी निष्ठा पर प्रकाश
डालडते हुए कहा, दुसरा कर्मचारी उनके
जगह पर आने से पहले वह अपना कार्यलय के स्वागत कक्ष का आसन नही छोडते थे तथा कार्यालय
में आनेवाले विभीन्न क्षेत्र के आगंतुको का प्यार से स्वागत करते और उन्हों आवश्यक
जानकारी मुहय्या करते थे’. कार्यालय के अन्य साथियों के प्रती नम्र व्यवहार तथा सदैव हसमुख व सभी को मदद करने
का स्वभाव यह बाते भी कहीओने इस अवसर पर रखी , जो मुझे गदगद कर गयी. मैंने अपनी नोकरी
के प्रती निष्ठा से किया काम ओर साथही में
पारिवारीक जिम्मेदारी का किया वहन इन बातों पर प्रकाश डाला गया.
परिवार के सदस्यों की ओर से मेरी बेटी
ने इस कार्यक्रम में अपने विचार रखे. मेरे सहित उपस्थित सभी की नजर ओर कान उसकी बातों
पर टिके रहे. उसके एक एक शब्द से मेरे प्रति
प्यार झलक रहा था. मुझे नाज है अपने बेटीपर
जिस ने इस कार्यक्रम में अपने विचार रखते हुए ‘पापा कों बेस्ट पापा ऑफ द वर्ल्ड’ के
खिताब से नवाजा. तब मुझे अपनेद्वारा बेटी को दिए अच्छे संस्कारों का अहसास हुआं ओर
एक जिम्मेदार बाप होने के कर्तव्य में मै सफल हुआ यह अनुभूती भी मैने इस कार्यक्रम में लि.
महाराष्ट्र शासन के सूचना एवं जनसंपर्क
विभाग के कुछ कार्यालय के अधिकारीयों ने मुझे सोशल मिडीयापर शुभकामनाए दी उन सभी शुभचिंतकों का मै हृदय से धन्यवाद करता हॅुं. और आशा करता हॅुं की नोकरी के माध्यम से आप सभी से जुडा यह स्नेह ऐसेही
बना रहेगा.
सेवानिवृत्ती के दिन का अनुभव बयां करते
समय मैने ‘घडी’ का उदाहरण दिया था. वैसे ही,
‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम ओ फिर नही आते’ इस वास्तव को भी मै नही भुलना चाहता हू. बिते २७
साल कि नोकरी में मैने जो अच्छी बाते सिखीं ज्ञान प्राप्त किया उसका समाज ओर परिवार
के लिए उचित तरह से उपयोग करूगा ओर इस देश का सच्चा नागरीक होने का दायीत्व निभाने
का मै पुरा प्रयास करूंगा यह प्रण मै इस अवसर पर लेता हू. ओर मेरे सेवानिवृत्ती का यह स्मरणीय
दिन हमेशा के लिए अपने शब्दों से ही सही अपनी गठरी में संजो के रखता हूं.
आपका
रामदास
भारती,
संवानिवृत्त
कर्मचारी ,महाराष्ट्र सूचना केंद्र नई दिल्ली.
०००००
Subscribe to:
Posts (Atom)








