जुना लेख (वर्ष अंदाजे २०१४-१५)
महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांमध्ये देशात अग्रगण्य
मान मिळवीत आहे. महाराष्ट्राबाहेर देशभरातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास असणारे
मराठी माणस राज्याचा हा मान सन्मानाने उंचवीत आहेत. महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र
अर्थात बृहन्महाराष्ट्र ही त्याची ओळख. नोकरी, व्यवसाय, उद्योग आदींसाठी देशातील
अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्रीयन जनता स्थायीक झाली. मराठी कला, संस्कृती
जपण्यासाठी त्यांनी त्या-त्या राज्यांमध्ये मराठी संस्था स्थापन केल्या. आपला
मराठी बाणा, मायबोली आणि सांस्कृतिक वारसा परप्रांतात टिकवून ठेवणा-या या
संस्थांनी महाराष्ट्रातून येणा-या जनतेसाठी राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली. बृहन्महाराष्ट्र
मंडळ ही देशभरांत कार्यरत सुमारे एकहजरांहून
अधिक बृहन्महाराष्ट्र संस्थांची शिखर संस्था. मराठी सण, उत्सव साजरे करत राज्याची
कला, संस्कृती व पंरपरा जपण्याचे व तिचा विस्तार करण्याचे महनीय काम या संस्थांनी समर्थपणे केले आहे. या संस्थाच्या
कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत
देण्यात आली आहे.
देशभरात जवळपास प्रत्येक राज्यांमध्येच
अशी मराठी मंडळ असून त्यांची वार्षीक अधिवेशनही होतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
हे या बृहन्महाराष्ट्र मंडळांचे पदसिध्द अध्यक्ष असतात त्यामुळे या अधिवेशनाला
बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितीती लावली आहे. महाराष्ट्रा
बाहेर अन्य राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलन, नाटय संमेलन यांच्यासह अन्य महत्वपूर्ण आयोजनातही या संस्थांचा मोलाचा
सहभाग असतो .
एक
नजर इतिहासावर
सतराव्या-अठराव्या शतकात मराठयांचे राज्य संपूर्ण भारत
भर परसले होते. श्री. शहाजी महाराजांनी दक्षिणेकडे चढाई केली आजचे म्हैसूर
त्यावेळी मराठयांनी जिंकले होते. त्यामुळे या संस्थानचे बरेच दिवाण मराठी भाषिक
होते. राघोबा दादांनी उत्तरेकडे अटकेपार मराठी सत्तेचा झेंडा रोवला तर नागपूरच्या
भोसल्यांनी बिहार, ओरिसा, बंगालकडे स्वा-या करून मराठी राज्याच्या कक्षा
रूंदावल्या. त्यामुळे ग्वाल्हेर, बडोदे, इंदूर, देवास, धार इ. त्यावेळच्या मराठी
राज्यांत मराठी माणसे मोठया प्रमाणावर स्थायिक झाले. पानीपतच्या दुस-या युध्दात मराठयांचा
झालेला निसटता पराभाव आणि दिल्लीवर तख्त राखन्याची हुकलेली संधी ही सर्वज्ञात आहे.
त्यावेळी महाराष्ट्रातून आलेले आणि
युध्दात वाचलेले मराठी सैन्यातील लोक याच भागात (हरियाणा)
स्थायिक
झाले. नंतरच्या शतकात ब्रिटीशांचे राज्य आले व उद्योग धंघ्यासाठी, नोकरी
निमित्ताने मराठी माणसे पर प्रांतात जाऊ लागली. बघता बघता त्यांच्या कित्येक पिढयांचा
जीवन काल तेथेच लोटला.
महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असणा-या या मराठी बांधवांनी संघटनेच्या
माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातून महाराष्ट्र समाज,
महाराष्ट्र मंडळ अशा संस्था स्थापन झाल्या. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला टिमरनी, झाशी, ग्वाल्हेर, उज्जैयिनी,पाटण, इंदूर,
बडौदे, अजमेर,रतलाम,सागर आदी ठिकाणी या संस्था स्थापन झाल्या होत्या. मराठी शाळा,
ग्रंथालये, व्यायामशाळा सुरु करून तसेच मंदिरांची स्थापना करून भजन, किर्तन आणि
प्रवचन यामाध्यमातून प्रबोधकार्य सुरु
झाले व राज्याबाहेर मराठी बाणा जपण्याचे
कार्य या संस्थानी जोमाने सुरु ठेवले. १९२६ पर्यंत बृहन्महाराष्ट्रात जवळपास ५०
संस्था सुरू झाल्या होत्या.
बृहन्महाराष्ट्र
मंडळाची स्थापना
कानपूर
येथे १९२५ मध्ये आयोजित काँग्रेस आणि हिंदुसभा यांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
तात्यासाहेब केळकर यांनी देशभरात कार्यरत
तत्कालीन बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना एकत्रित करून बृहन्महाराष्ट्र मंडळ ही मध्यवर्ती केंद्रीय संस्था स्थापन केली. राजधानी
दिल्ली मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे.
बृहन्महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन
बृहन्महाराष्ट्रात
कार्यरत या संस्थाच्या कामात सूत्रबध्दता आणण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने अधिवेश
भरविण्याचे ठरविले. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांच्या समान उद्देशाबाबत चर्चा घडवून
आणने, मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन व विस्तार करणे आदी उद्देशाने १९२६ मध्ये
झांशी(उत्तरप्रदेश)
येथे बृहन्महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन भरले. तात्यासाहेब करंदीकर त्या
अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथूनच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यास ख-या अर्थाने
सुरुवात झाली. तात्यासाहेब करंदीकर यांनी
१९२५ ते १९४५ या कालावधित मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. त्यानंतर १९४८ ते
१९६५ पर्यंत काकासाहेब गाडगीळ यांनी मंडळाला नेतृत्व दिले. यानंतर महाराष्ट्राचे
प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९८० पर्यंत मंडळाचे अध्यक्षपद भुषविले.
श्री. वसंत साठे यांनी १९८० ते १९९१ पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली.
मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात श्री. शरद पवार यांनी मंडळाच्या अध्यक्षपद
सांभाळले. १९९३ ते १९९६ या कालावधित श्री. वसंत साठे पुन्हा मंडळाचे अध्यक्ष झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राहतील असा मंडळाच्या घटनेत बदल करण्यात आला.
त्यानुसार श्री. मनोहर जोशी, श्री. विलासराव देशमुख,श्री. अशोकराव चव्हाण,
श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. विद्यमान मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत.
मंडळाची
आतापर्यंत ६५ हून अधिक
अखिल भारतीय स्वरूपाची अधिवेशने झाली आहेत. भारत देश पारतंत्र्यात असताना
देशप्रेम जागविण्याचे कामही या अधिवेशनांनी केले. १९४० मध्ये कराची येथे अधिवेशन
आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध शहरांमध्ये ही अधिवेशने आयोजित करण्यात
आली. महाराष्ट्रातील शहरांमध्येही अधिवेशन घेण्यात आली. थोर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ,समाजिक
कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी अधिवेशनाची
अध्यक्षता स्वीकारून मार्गदर्शन केले आहे.
प्रकाशने
विविध प्रकाशनांच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्रातील मराठी
बांधवांना जोडण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळाने केले. सुरुवातीच्या काळात ‘बृहन्महाराष्ट्र
मासिक’ या नावाने नियतकालिक प्रकाशीत
करण्यात येत असे. १९३५ पासून या नियतकालिकाचे नाव ‘महाराष्ट्र
विस्तार’ असे करण्यात आले. १९६७ मध्ये रतलाम (मध्यप्रदेश)येथे
आयोजित अधिवेशनात हे नाव बदलून ‘मायमराठी’
करण्यात
आले. इंदूर येथील बृहन्महाराष्ट्र संस्थांनी या नियतकालिकाची व्यवस्थापकीय
जबाबदारी स्वीकारली असून अश्विन खरे ये हा नियतकालीकाचे संपादक आहेत. बृहन्महाराष्ट्र
मंडळाच्यावतीने ‘बृहन्महाराष्ट्र संस्था परिचय सूची’ हे
महत्वाचे प्रकाशन करण्यात येते. यात देशभरातील मराठी संस्थांची माहिती देण्यात आली
असून आतापर्यंत या पुस्तिकेच्या ४ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. सूर्यकांत
कुळकर्णी यांनी पुस्तिका संपादित केल्या आहेत.
दिल्लीतील
महाराष्ट्र
राजधानी दिल्लीत विविध मराठी संस्था आणि महाराष्ट्र
शासनाच्या विभागांच्यावतीने राज्याची संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे सुरु आहे.
पहाडगंज
स्थित दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १९९२ पासून महाराष्ट्र
राज्य नाटय स्पर्धेचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
संस्थेच्या आरामबाग येथील नूतन मराठी शाळेतील सभागृहात या नाटय स्पर्धेचे आयोजन
करण्यात येते. बृहन्महाराष्ट्रातील विविध राज्यातील नाटय संस्था या स्पर्धेत सहभाग
घेतात. स्पर्धेत निवड झालेल्या पहिल्या तिन नाटकांना महाराष्ट्र राज्य नाट
स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था
ही १९७२ पासून नाटय व सुगम संगीत स्पर्धा, अखिल भारतीय गद्य व संगीत नाटय
स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या संस्थेच्यावतीने नूतन मराठी शाळा चालविण्यात येते. ५
वी ते १२ वी पर्यंत या शाळेत शिक्षण दिले जाते या शाळेत मराठी विषय अनिवार्य आहे.
महाराष्ट्र
स्नेह-संवर्धक समाज संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव, दासनवमी, स्वातंत्र्यदिन
कोजागिरी, संक्रांत आदी कार्यक्रम साजरे केले जातात. लोधी रोड स्थित वनिता
समाजाच्या वतीने वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने
समाजातील गरीब मुलांसाठी ज्युनीअर व सिनीअर किंडर शाळा चालविण्यात येते. करोलबाग
येथील फैज रोड स्थित मराठा मित्र मंडळाच्यावतीने वर्ष भर विविध सण उत्सव साजरे
करण्यात येतात. झंडेवालान भागात संस्थेच्या वतीने चौगुले पब्लिक स्कुल चालविण्यात
येते. ही इंग्लीश मेडीयमची शाळा असून या शाळेत पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले
जाते इथे मराठी विषय अनिवार्य आहे. सार्वजनिक उत्सव समिती विविध दर्जेदार
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. गणेशोत्सव काळात समितीच्या वतीने महाराष्ट्र
महोत्सव साजरा करण्यात येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, यशवंतराव चव्हाण स्मृति
सामारोह , कोजागिरी पोर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी
करण्यात येते. याशिवाय करोलबाग स्थित राणी लक्ष्मी भगिनी समाज, जनकपुरी आणि
लाजपतनगर स्थित महाराष्ट्र मित्र मंडळ, पुर्वांचल मित्र मंडळांच्या माध्यमातून
वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेशोत्सव काळात
दिल्ली व परिसरात जवळपास ३५ मराठी मंडळाच्या
माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या
कार्यालयाच्यावतीनेही मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे केले जाते. पत्रकार
दिन, मराठी भाषा दिन, ग्रंथोत्सव, महाराष्ट्र दिनाचे आयोजन परिचय केंद्राच्यावतीने
करण्यात येते. महान व्यक्तींची जयंतीचे वर्षभर साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील
विविध लेखक, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जनतेचा थेट संवाद
घडवून आणण्यासाठी परिचय केंद्राच्यावतीने आयोन करण्यात येते. जनसंपर्क, वृत्त व माहिती
असा मोठा डोलारा कार्यालयाच्यावतीने सांभाळला जातो. पुस्तकांचे नैमित्तिक प्रकाशन
करण्यात येते, दर दोन वर्षांनी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारी ‘दिल्ली डायरी’ ही विविध माहितींनी परिपूर्ण पुस्तिका विशेष प्रसिध्द
आहे. परिचय केंद्राचे सुसज्ज असे
ग्रंथालय असून दिल्लीतील मराठी जन तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे
विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात.
बृहन्महाराष्ट्रातील महात्वाच्या संस्थाचे पत्ते
|
बृहन्महाराष्ट्र
भवन, (दिल्ली
महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट) पहाडगंज पोलिस
स्टेशन जवळ, नवी दिल्ली- ११००५५. दूरघ्वनी
: ०११-२३६७९००८/२३६७०५२० |
वनिता
समाज, १३
इन्स्टिटयूशनल एरीया, लोदी रोड, साईबाबा मंदीर जवळ, नवी दिल्ली-११०००३. दूरध्वनी
: |
सार्वजनिक
उत्सव समिती, यु-१७,ग्रीन
पार्क एक्सटेंशन, नवी दिल्ली-११००१६ दूरध्वनी:
०११-२६१६७४०१, भ्रमणध्वनी ०९८९९८६२१११ |
महाराष्ट्र
परिचय केंद्र, ए-८,
स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडक सिंह मार्ग,नवी दिल्ली-११०००१. दूरध्वनी
: ०११-२३३६३७७३/ २३३६७८३० |
महाराष्ट्र
मित्र मंडळ, जनकपुरी, शिवनगर परिसर,सी-२बी, पॉकेट १२, जनकपुरी, नवी
दिल्ली-११००५८. ०११-६४६२२२८० |
|
(हरियाणा) महाराष्ट्र
मंडळ,गीता मंदीर, १०७७, सेक्टर-२९, फरीदाबाद-१२१००१ भ्रमणध्वनी
: ९९५८८७७६८८ |
(हिमाचल प्रदेश) महाराष्ट्र
मंडळ, ९१,
पंथाघाटी ‘देवांजली’ आयुर्वेदिक
डिसपेंसरी जवळ, कसम्पटी, शिमला-१७१००९. दूरध्वनी
: ०१७७-२६२०८०८ |
(पंजाब) महाराष्ट्र
मंडळ, प्लॉट नं.२४७ सेक्टर १९ डी, चंडीगढ-१६००११
|
(उत्तरप्रदेश) महाराष्ट्र
समाज ८४/१६६ कटरा मकबूलगंज, लखनऊ-२२६०१८. दूरध्वनी
-०५२२-६५३४९१९, भ्रमणध्वनी ०८००९०६७१७३ (व्यवस्थापक ,
सदानंद जोग) |
(उत्तरप्रदेश) काशी
महाराष्ट्र सेवा समिती, सी.के. २/४८, नीळकंठ स्मृति भवन, वाराणसी-२२१००१. भ्रमणध्वनी:
०९३३५६४१२६७(अध्यक्ष-माधव रटाटे) |
|
(उत्तर प्रदेश) टिळक
स्मारक भवन, ऑफ जी.टी.रोड, अलोपीबाग, अलाहबाद-२११००६. दूरध्वनी
: ०५३२-२६६७४११ |
(उत्तराखंड) महाराष्ट्र
समाज कल्याण समिती, मंगलायतन, ४४/३, कनाल रोड, जाखन , डेहरादून-२४८००९. भ्रमणध्वनी:
०९७५९३४८५६४ |
(मध्यप्रदेश) श्री.
समर्थ सेवा मंडळ, ‘नरहरी छाया’ एल.आय.जी.१७७
कोटरा, सुल्तानाबाद, भोपाळ-४६२००३. दूरध्वनी:०७५५-२७६२९५० |
(मध्यप्रदेश) गाडगीळ
वाडी, मेन हिंदी शाळे समोर, हाटकेश्वर वार्ड, खंडवा-४५०००१. दूरध्वनी:०७३३-२२४९१११ |
(मध्यप्रदेश) लोहामंडी
स्कूलच्या बाजूला, ३१, पंचशील नगर(स्नेहनगर), इंदौर-४५२००.
दूरघ्वनी:
०७३१-२४४६१३२ |
रितेश
मोतीरामजी भुयार
उपसंपादक,
महाराष्ट्र
परिचय केंद्र, नवी दिल्ली


No comments:
Post a Comment