भारताचे २६ वे सरन्यायाधिश
न्या. मु.अ.अहमदी यांचे २३ मार्च
२०२३ रोजी निधन झाले. आज (11 मे २०२३
रोजी) सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेत
सरन्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधिशांनी न्या.अहमदी यांच्या कतृत्वावर
प्रकाश टाकला. त्यातील मला भावलेले व आकलन झालेले
मुद्दे येथे रेखाटत आहे.
गुजरातच्या अहमदाबाद
शहरात दाऊदी बोहरा कुंटुबात अजिज मुस्सबर अहमदी यांचा जन्म झाला. वडीलही कायदेतज्ज्ञ
असल्याने घरातूनच त्यांना वारसा लाभला होता.
न्या. मोहम्मद हिदायतुल्ला (भारताचे
११वे सरन्यारयाधिश) यांच्या नंतर 1994
मध्ये ते भारताचे दुसरे मुस्लीम सरन्यायानिध झाले. सर्वोच्च न्यायालयात केसेस पेंडंसी
कमी करण्यासाठी आणि येथील कामकाजात संगणकाचा
पूरेपूर वापर करण्यासाठी त्यांची तीन वर्षांची प्रशासकीय कारकिर्द गाजली. भोपाळ गॅस
दुर्घनेतील त्यांच्या निकालासह, संजय दत्त यांच्या टाडा कायद्याअंतर्गत खटल्यातील जामीनासह
अडिच
हजारांवर निर्णय त्यांनी दिले.
सर्वोच्च न्यायालयातील
केस पेंडंसी कमी करण्यासाठी त्यांनी अवलंबलेली व यशस्वी करून दाखविलेल्या पद्धतीबाबत
मार्गदर्शन करण्याकरिता त्यांना इंग्लडच्या सर्वोच्च न्यायालयात पाचरण करण्यात आले
होते. हा भारतीय न्याय प्रणालीचा मोठा सन्मानच ठरला. सरन्यायाधिशपदाच्या कार्यकाळात
त्यांची प्रशासकीय कारकिर्द ही न्याय प्रणालीत संगणकाच्या प्रयोगाच्या आग्रहामुळे मैलाचा
दगळ ठरली. त्यांनी न्याय प्रणालीत संगणकाचा उपयोग केवळ ३ टक्केच होत असल्याचे दाखवून
दिले व संगणक वापराचा टक्का मोठया प्रमाणात वाढवला.
सरन्यायाधिशाव्यतिरीक्त
न्या.अहमदी यांचं व्यक्तीमत्व कुटुंबवत्सल होत. महत्वाचे निर्णय देवून आपल्या कार्याचा
ठसा उमटविणारे अहमदी यांना त्यांची पत्नी अमिना खूप प्रसंगात महत्वाचा सल्ला देत असे व मार्गदर्शन करीत असे त्यांच्या
चिरंजीवानेच अधोरेखित केले आहे. तर मुलीने सांगितले आहे की कामकाजाचा व्याप आटोपून
रात्री ९ वाजता अहमदी हे आम्हा मुलांसोबत टेनिस खेळत आणि आयुष्य व कायदा याचेचे विविध
बारकावे समजावून सांगत. व्यवसायाला सर्वोपरी माननारे अहमदी यांचे एकतत्व होते, वडिलांच्या
कार्यकाळात मुलाने सर्वोच्च न्यायालयात कार्यभार सांभाळू नये . याचा त्यांनी अंगिकार
केला व आपल्या मुलास त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च्ा न्यायालयात कार्यकरण्यास नाकारले.
राज्यघटना, कायदा यांचा
सखोल अभ्यास असणारे न्या. अहमदी यांनी आपल्या नि:पक्षपाती निर्णयाने भारतदेशाच्या न्याय प्रणालीत अभूतपूर्व
योगदान दिले आहे. न्या.अहमदी यांच्या कार्याला मानाचा मुजरा.
०००००

No comments:
Post a Comment