Friday, July 29, 2022
प्रसाद लेलो भैय्या
ऑफिसच्या जवळ रस्ता ओलांडून अगदी पोहचणारच होतो तर या रस्त्यावरच कानावर आवाज पडला ‘प्रसाद लेलो भैय्या’. रस्त्याच्याकडेला एक कार उभी होती आणि या कारमधील एक सद्गृहस्थ हातात छोटा वेलपॅक्ड पेपर डबा हातात घेवून रस्ताहून ये जा करणाऱ्या माणसांना प्रसादाचा हा डबा देत होते. तर या कारच्या पहिल्या सिटवर बसलेली महिला आपल्याकडे असलेल्या भल्यामोठया पृष्ठाच्या डब्यातून असे छोटे डबे काढून देत होती. म्हणता म्हणता कार शेजारी माणसांचे मोहोड निर्माण झाले व केवळ पाच मिनिटात प्रसाद वाटप संपले. हा सर्व प्रकार मी डोळयात टिपत होतो , म्हटल यावर काही लिहाव यासाठीच मोबाईल कॅमेरामध्ये फोटोही टिपत होतो. हे स्थळ सोडून ऑफिसकडे जाण्यासाठी थोडा पुढे आल्यावर या डब्यातून बुंदीचे लाडू खानारी मंडळी दिसली विषय इथेच संपला.
दिल्ली आणि प्रसाद लंगर आदिंचे समीकरण.
दिल्लीच्या विविध गुण वैशिष्टयांपैकी एक म्हणावा असा लंगर किंवा प्रसाद वाटपाचा उपक्रम. उदाहरणादाखल एखाद्या मार्केटमध्ये व्यापारी पैसे गोळा करून लंगर लावतात. आता लंगर म्हणजे काय? हा विषय विषद करतो. लंगर म्हणजे अन्नदान. लंगरचा मेन्यू जवळपास फिक्स असतो ‘आलू सब्जी ओर पुरी’ तसेच ‘सब्जी कचोडी’, शिरा आणि सोबतीला असे पॅकींगवाले लड्डूही. काही मंदिराच्या परिसरात पाण्याच्या बाटल्या वाटण्याचा लंगरही निदर्शनास येतो.
लंगर कोण लावतो व लंगर कोण खातो ?
देवाला नवस केलेले मंडळी ,देवाच्या नावाने दान करावे म्हणून पुढाकार घेणारी मंडळी आणि गोरगरिबांना दान करावे म्हणून काही मंडळी तर आपल्याकडून अनवधानाने झालेल्या पापाचे क्षालन होण्यासाठी असे लंगर लावतात. मात्र, ज्यांना गरज नाही अर्थात सुस्थितीतील मंडळीच या लंगरचा जास्त आस्वाद घेताना दिसतात. मुद्दा अजून स्पष्ट करतो, म्हणजे अशा अन्नदानाचा लाभ हा ज्यांना अन्न मिळत नाही,उपाशी आहेत अशा मंडळींना हा लाभ मिळावा मात्र, पोट भरलेली मंडळीच या लंगरचे लाभार्थी असल्याचे माझे निरिक्षण.
अजनात्यापणी झालेली चूक व तिच्या भिती पोटी पापक्षालन म्हणून, देवभोळेपणातून आणि दानाच्याभावनेतून हे लंगर किंवा प्रसाद वाटपाचे दिल्लीतील गल्लो गल्ली चालनारे कार्यक्रम या शहराच्या स्वभाव वैशिष्टयाचा अविभाज्य भाग म्हटले तरी वावगे होणार नाही.
००००
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment