Friday, July 29, 2022
‘जेव्हा पिलर पुजला जातो’
ऑफिस शेजारील पी.ब्लॉककडे जाणारा रस्ता ओलांडून ऑफिसला पोहचण्याच्या लगबगीत असतानाचं बघितलेलं चित्र काहीसं असं होत. एक गृहस्थ पी.ब्लॉकच्या अगदी टोकावरील भागात स्थित एसबीआय एटीएम समोरच्या पिलरला चहुबाजुंनी नमस्कार करीत होता. आश्चर्य वाटून माझे पाय तिथेच स्थिरावले. म्हटल आता पूर्ण चित्रपटच बघावा. या गृहस्थांनी नमस्कार आटोपल्यानंतर थेट हातात झाडू घेतला व त्या पिलर शेजारील छोटासा परिसर झाडूने स्वच्छ करण्यास सुरुवात केली. चित्रपट पूर्ण होण्याच्या आतच मला या चित्रपटाची सर्व स्टोरी क्लियर झाल्याने मी आता तिथून निघालो.
या घटनेनं माझं विचारचक्र सुरु झाल आणि WORK IS WORSHIP या इंग्रजी म्हणीवर येवून थबकल.पिलरला चहुबाजूनी नमस्कार करणारा हा गृहस्थ म्हणजे एक प्रामाणिक फेरीवाला जो त्याचं पिलरच्या शेजारी आपलं दुकान थाटतो व यातूनच त्याचा उदनिर्वाह व कुटुंबही चालत असेल कदाचित. म्हणूनच विना भाडेखर्चाच व निसर्गाने भरभरून कुलींग व नॉनकुलींगची व्यवस्थेसह एसीने परिपूर्ण अस हे दुकान ज्या पिलरच्या छायेत उभ आहे नव्हे तर तो पिलरच त्याच्या दुकानाची निशाणी आहे. अशा पिलरला त्या फेरिवाल्याने नतमस्तक होण म्हणजे कामाला सुरुवात करण्याआधी आपल्या श्रध्दास्थानाला नमन करणेच असल्याचा बोध मला विचारचक्राअंती झाला. ही घटना आश्चर्यकारकही होती .
००००००
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment