Friday, July 29, 2022
डेथ बॉडीची तिकीट कन्फर्म नाही
आपण रेल्वे किंवा विमानाने कुठे जात असू तेव्हा तिकीट कन्फर्म न होण्याचे अनुभव आपण स्वत: घेतलेले असतात व बरेचदा अन्य लोकांकडूनही ऐकले असतात. पण, याही पुढे जावून डेथ बॉडीचीही तिकीट कन्फर्म नसल्याची माहिती पहिल्यांदा मी ऐकली व चाटच पडलो की.
त्याच झाल असं की,
देशाच्या टोकावरील राज्यातील एका धार्मिक स्थळावर ढगफुटी झाली व त्यात महाराष्ट्रातील भावीक असण्याची शक्यता असल्याने याबाबत अपडेट माहिती व वृत्त देण्याचे आमच्या मुख्यालयाकडून सांगण्यात आले व तसा संदेश कार्यालयाकडून मला प्राप्त झाला. मग महाराष्ट्र सदनाकडे याची विचारणा केली असता तेथून माहिती आली हो या दुर्घटनेत मृत झाालेल्या महाराष्ट्राच्या एका भाविकाची डेथ बॉडी दिल्ली विमानतळावर आली आहे. प्रशासनाकडून प्राप्त सूचनेनुसार ही बॉडी महाराष्ट्रातील इच्छित स्थळी पाठविण्यात येईल त्यासाठी आम्ही एका प्रायव्हेट विमानाचं तिकीटही बुक केल आहे मात्र, डेथ बॉडीची तिकीट अजून पर्यंत कन्फ्रम नाही. ि
माहिती अशी
एखादी डेथबॉडी विमानाने न्यायची असेल तर विमानाद्वारे प्रवाशांचे सामान वाहून नेण्याच्या डिक्कीमधून ही डेथबॉडी वाहून नेली जाते. शवपेटीमध्ये ही व्यवस्थीत पॅक केली जाते व यासाठी तिकीट काढावी लागते. जी खूप जास्त असते. जसे दिल्लीहून पुणे येथे ही डेथबॉडी घेवून जाण्यासाठी ३० हजार रूपये खर्च आला.
०००००
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment