Tuesday, August 30, 2016

माणसान ‘चांगलं दिसाव की चांगल असावं’

 या ग्रुपमध्ये मध्यभागी चसमा परिधान केलेली मुलगी प्रतिभा सेठ

तब्बल १७ वर्ष जुनी आठवण. उन्हाळयात शाळेला सुटी लागल्यानंतर मे महिन्यात मी, संर्वांगीन विकास शिबीरात जायचो. तिथे मला शिकविणा-या शिक्षकांनी, प्रश्न विचारला होता. रितेश मला सांग, माणसाने चांगलं दिसावं की चांगलं असावं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी १ महिन्याचा कालावधी घेतला होता. दरम्यान, माझ्या निरीक्षणाच्या आधारावर मी या प्रश्नाच उत्तर दिल होत माणसाने चांगलं असावं’. या गोष्टीला तब्बल दीड तप(पंधरा वर्षांहून अधिक काळ) लोटून गेल आहे आणि आज परत त्या प्रश्नाचं ठोस उत्तर माझ्या जवळ आहे जे मी अनुभवातून सांगू शकतो की, माणासाने चांगलं असणंच श्रेष्ठ आहे.
मेट्रो रेल्वे स्थानकावर उभी असलेली सुंदर निटनेटकी मुलगी ही मांजाने कबुत्तराचा जीव जाणार हे पाहून विव्हळते व त्याला वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न करते. मराठीतील एफआयआर हिंदीत अनुवादीत करण्यासाठी आलेल्या गरीब इसमाचे काम विनामुल्य करून दिल्याबद्दल त्याने गहीवरून जाऊन उपकारादाखल माझे धरलेले पाय आणि काल चक्क आपल्या मित्र मैत्रिनींसमोर मला हस्तांदोलन करत एका सुंदर तरूणीने म्हटलेलं वाक्य, ‘आप बडे अच्छे हो. मला तब्बल दीड तपाने त्या प्रश्नाच उत्तर देऊन गेलं.
            १५ ऑगस्टचा दिवस. दिल्लीत या दिवशी पंतग उडवून आनंद व्यक्त करण्याची पध्दत आहे. मात्र, आता याला विभस्त रूप आलं आहे. घराच्या छतावर कर्णकर्षक आवाजात डिजे लाऊन बीअरच्या बाटल्या रिचवत पतंगबाजी करण्याचा नवीन ट्रेंड येथील तरूणाईत बघायला मिळतो. याच्या अगदी विपरीत चित्रही आहे , भाऊक आणि भूतदया माणणारी पिढीही इथे बघायला मिळते. एकमेकांच्या पतंगा कापन्यासाठी त-हे- त-हेचे मांजे वापरले जातात आणि यामुळे आकाशात उडणारे पक्षी मांजाने चखमी होतात कधी-कधी तर त्यांचा नाहक बळी जातो. आता अनुभव सांगतो. १५ ऑगस्ट रोजी माझी डयुटी असल्याने मी लगभगीत मेट्रोने जायला निघालो. मेट्रो स्टेशनवर एक सुंदर मुलगी माझ्या शेजारी उभी होती. आम्ही मेट्रोची वाट बघत होतो. एकदमच ही मुलगी मागे वळली आणि पाय-या उतरत असल्याचे बघून मी अवाक झालो नेमक काय झाल म्हणून मी कुतुहलाने बघायला गेलो तर, मांजात वाईट पध्दतीने टिनाच्या शेडला अडकलेल्या कबुत्तराला सोडविण्याचा प्रयत्न ती मुलगी करीत होती. मी तिथे गेलो आणि तिला म्हटल, मांजा ओढून कबुत्तराला सोडविण्यात त्याला इजा होईल तर मी मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला बोलवितो आणि त्याच्या मदतीने आपण कबुत्तराला वाचवू. तेवढयात तिथे आलेल्या ३५ शीतल्या तरूणाने आपला जीव धोक्यात घालवून त्या कबुत्तराला वाचविण्याचा प्रयत्न केला. बघता –बघता तिथून जाणा-या मेट्रो प्रवाशांची गर्दी जमली. कबुत्तराचा प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. मी तिथून निसटलो आणि मेट्रो कंट्रोल रूममधे जाऊन सुरक्षा रक्षकाला घेऊन आलो. तर काय कबुत्तराची सुटका झाली होती आणि गर्दी पांगली होती. हा अनुभव म्हणजे त्या मुलीचं चांगल असण अधोरेखित करून गेला. ती दिसायला सुंदर होतीच पण मनान आणखीही सुंदर होती  म्हणूनच मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी तीने पुढाकार घेतला आणि बघता बघता तिच्या कार्याला जनतेचाही पाठींबा मिळाला.
            अनुभव क्र. २. कामात असताना माझ्या कॅबीन मध्ये एक गृहस्थ अगदी साध्या वेशात पण चिंताग्रस्त चेहरा अशा अवस्थेत शिरले. आणि त्यांनी मला काही एफआयआरची कागद दाखवत विचारणा केली ,साहब इसका हिंदी में ट्रान्सलेशन करना है कितना खर्चा आएगा और क्या आप कर सकतो हो?. मी उत्तरलो हिंदी में काम है तो एक पेज का १५० रूपये(त्यांनी ६ पेज आणले होते). मग ते म्हणाले कुछ कम करों न साहब पैसे. मी म्हटल ८ साल से एकही रेट ले रहा हॅुं मै काम का. और मराठी से हिंदी , अंग्रेजी में ट्रान्सलेशन करके जरूरत मंदो को मदद करना ही हेतु है मेरा. यदी आपको कही और से कराना है तो मै आपको उनके भी मोबाईल नंबर देता हुं. हे ऐकूण त्यांनी निरागसपणे सांगित आपही करदो साहब मै किसे किसे और कहा कहा ढुंडता फिरू. आणि ते गृहस्थ निघून गेले. त्यांचा अगदी साधा मोबाईल ते माझ्या कॅबीन मधे विसरून गेले. मी तो मोबाईल सांभाळून ठेवला थोडया वेळाने ते मोबाईलच्या शोधात आले  सापडलेला मोबाई मी  त्यांना परत केला. दुस-या दिवशी ते ट्रांन्सलेशनच काम घ्यायला आले. पण मी बातमी कव्हरेज करण्यासाठी बाहेर गेलो होतो( राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान). त्यामुळे त्या गृहस्थांना २ तास ताटकळत बसाव लागल पण त्यांना त्याचा काहीही त्रागा झाला नाही नइफॅक्ट त्यांनी तो बोलवून दाखवलाही नाही. मग मी त्यांना हिंदी अनुवादीत पान प्रींट काढून दिली. त्यांनी ती बघीतली आणि खिशातील प्लॅस्टीकच्या पिशवीतून पिशवी करत एक एक शंभरची नोट ते काढत मोजून त्यांनी माझ्या हातात ९०० रूपये टेकवले. मी त्यांच्या निरागस व चिंताग्रस्त चेह-याकडे पाहत म्हटल, रहने दो अंकल मुझे पैसे नही चाहीए. इन पैसो को आप किसी अच्छे चिज के लिए इस्तेमाल करना. अस म्हणताच त्यांनी पैसे खिशात ठेवले आणि माझे पाय पकडले. मी  म्हटल ये क्या कर रहे हो आप. त्यावर ते म्हटले साहब बडी मेहरबानी हुई आपकी.  मुळात मी जेव्हा एफआयआर ट्रान्सलेशन करायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आल. की या गृहस्थाचे दोन मुल मुंबईत कामासाठी गेले. तिथे ट्रकवर क्लिनर म्हणून काम करून उत्तर प्रदेशातील आपल्या घरी ती दोघे पैसे पाठवत असत त्यावरच त्यांच घर चालत असे. या दोघा मुलांपैकी मोठया मुलाचा मध्यरात्री ट्रकच्या गॅलरीहून उतरताना पाय घरून पडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्या गृहस्थाला पुढील कारवाईसाठी विमा कंपनीत हा एफआयआर जमा करण्यासाठी हिंदीत अनुवादीत करून हवा होता. ही परिस्थिती एफआयआर करताना कळताच मला गहीवरून आल मग माणूसकीच्या नात जपतच मी त्या अनुवादाचे पैसे घेतले नाहीत. या अनुभवातून मलाच माझा अभिमान वाटला आण माझ्यातील चांगूल पण जिवंत ठेवण्याची उर्जा मिळाली.
            अनुभव क्र.३. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंडिया गेट समोरील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट २०१६ दरम्यान भारत पर्व नावाने महा प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारत देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि महान इतिहास दर्शविण्याचा तसेच विविध राज्यातील हस्तकला, खाद्य पदार्थ आणि त्या त्या राज्यांची उपलब्धीही दर्शविण्यात आली होती. महाराष्ट्राच्यावतीने या प्रदर्शनात ३ दालने उभारण्यात आली होती. आणि कार्यालयाने या कामाच्या प्रसिध्दीची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. दिनांक १६ ऑगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे महाराष्ट्र दालना गेलो तिथे भेट देणा-या लोकांना आपल्या दालना विषयी माहिती देत असतानाच मला दोन विदेशी मुल दिसले. अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स मी त्यांना या दालना विषयी आणि महाराष्ट्रा विषयी माहिती दिली त्यांची इन कॅमेरा मुलाखातही घेतली. यानंतर लगेचच आमच्या दालनात मुला मुलींचा घोळका शिरला. ही सर्व मुल मुली दिल्ली विद्यापीठाच्या  राज्यशास्त्र विभागात पदव्युत्तर  शिक्षण घेत असल्याचे कळले. मी त्या सर्वांना आमच्या डिजीटल दालनाची सैर घडवली त्यांना महाराष्ट्रा विषयी दालनात मांडण्यात आलेली माहिती दिली. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली ती त्यांना फारच आवडली. याचा कळस म्हणजे दिसायला सुरेख आणि हुशार असणारी,राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली प्रतिभा सेठ नावाची मुलगी या सर्व मुला मुलींच्या घोळक्यातून माझ्या समोर आली. आणि तीने चक्क सर्वांसमोर मला हस्तांदोलन केल आणि म्हणाली,‘सर आप बडे अच्छे हो. हे ऐकूण माझ्यासह माझ्या कार्यालयाचे आणि दालनात उपस्थित कर्मचारी यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, मला माझ्या कामाची पावती मिळाली. आपण चांगल आणि मनापासून काम केल की त्याची पावती आपल्याला नक्की मिळते. मग मला आठवल की याच खर गुपीत दडलय ते माणूस चांगला दिसण्या पेक्षा चांगला असण्यात दडलयं.
                              ००००००००००   

No comments:

Post a Comment