Wednesday, August 31, 2016

कल्पक व भावनाशिल चित्रकार श्री. चक्रधर हिवसे




              श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्तवेधक चित्रांनी उभी केली पंढरीची वारी
आलीया संसारा उठा वेग करा ! शरण जा उदारा पांडुरंगाया संतोक्तीनुसार सर्वांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा निर्देश केलेला आपणास जाणवतो. देश व राज्याच्या कानाकोप-यातून पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात भक्त सध्या मोठया प्रमाणात उपस्थित आहेत. आषाढीवारी निमित्त महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसूसले आहेत. हाच धागा धरुन मानवी मनाचा भाव आपल्या चित्रांमधून नेमकेपणाने मांडणारे प्रसिध्द चित्रकार चक्रधर हिवसे यांनी पांडुरंगाचे व त्याच्या लाडक्या भक्तांचे भाव आपल्या चित्रांतून नेमकेपणाने मांडले आहेत.
वारक-यांचा शूभ्र वेष परिधान केलेला, भाळी चंदनाचा टिळा, गळयात तूळशीची माळ आणि हाती चिपळया- विणा असणारा चित्रातील वारकरी आणि त्याच्या मागोमाग पताका, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जात नामजप करणा-या महिला वारक-यांचा जथ्था यासर्वांच्या मनोभावे भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना प्रेरणा देणारा चित्रातील पांडुरंग. अशी अप्रतिम कलाकृती श्री. हिवसे यांच्या चित्रातून कला रसीकांना भेटते.  
            श्री. हिवसे यांनी या चित्रांमधे केलेला रेषा, प्रकाश आणि रंगसंगतीचा अचूक व नेमका वापर यामुळे पंढरपूरच्या वारीचे चित्र ठळकपणे आपल्या डोळयांसमोर उभे राहते. एका चित्रात त्यांनी पांडुरंगाची भलीमोठी प्रतिमा उभारली असून त्यात पांडुरंगाच्या भावमुद्रेला नेमकेपणाने टिपताना मस्तकावरील मळवट, कानातील मत्स्य कुंडले, शिरावरील मुकुट बघून कस्तूरी मळवट श्रीमुख शोभले सूखाचे ओतले सकळहीअसे संतानी पांडुरंगाच्या रूपाचे केलेले वर्णन आपणास अनुभवास येते. 
पंढरिच्यावारीचा अनुभव करून देणारे  प्रसिध्द चित्रकार व 
माझे गुरु श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्रांना मानाचा मुजरा.


No comments:

Post a Comment