शाहरूख खान माझा आवडता नट. त्याच्या नैसर्गीक अभिनयाचा मी खूप चाहता आहे. त्याच्याशी अशी वादळी भेट होईल अस काही अपेक्षीत नव्हत. पण, ती भेट झाली. भेटीच वैशिष्टय अस की आमची ही भेट व वार्तालाप तमाम प्रेक्षकांनी बघीतला. आता तुमची फारशी उत्सूकता न तानता सांगतो, 14 ऑगस्ट2013 रोजी इंडिया टीव्हीच्या स्टुडिओमध्ये(या वृत्त वाहिनीचा आपकी अदालत हा प्रसिध्द कार्यक्रमही याच स्टुडिओत चित्रीत होतो) रात्री 3 ते 4 वाजे दरम्यान चित्रीत झालेला कार्यक्रम 'शाहरुख की आजादी एक्सप्रेस' आणि त्यात विविध राज्यांच्या चमुनी शाहरुखशी संवाद साधावयाचा होता. आणि महाराष्ट्राच्या 15 सदस्यीय चमुच नेतृत्व होत माझ्याकडे.
स्टुडिओत रात्री 9 वाजताच मराठमोळया वेशात दाखल झालेलो आम्ही आणि आमच्या सारखेच पंजाब, तामीळनाडू, केरळ आदी राज्यांच्या चमूचे सदस्य खूप वैतागलो होतो शाहरूखची वाट बघून. घडयाळीचे काटे फिरत होते 10 , 11, 12 तस-तसे सर्वांना पेंगायला येत होत. पण शाहरूखच्या दर्शणाची ओढ सर्वांनाच होती. आम्हाला 1 वाजता मुख्य स्टुडिओत सोडण्यात आल. तिथेही शाहरूखची वाट बघण्यात दीड तास गेला आण्िा रात्री 2.30 वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपर स्टार बादशा शाहरूख एकदाचा अवतरला. त्यात कार्यक्रम सुरु झाला आणि ज्या- त्या मुली शाहरुखला विनवनी करू लागल्या. शाहरूख I am your fan & I want to hug you, want to dance with you, कोणीतर शाहरूखला लूंगी परिधान केली तर कोणी डान्स शिकवला. आधीच वेळ एवढा झालेला. त्यात लोक असले प्रकार करताताहेत त्यामुळे आता इथे महाराष्ट् कसा Represent करवा हा प्रश्न होता. शेवटी प्रतिकूल परिस्थितीत माईक हाती घेतला. मै रितेश भुयार महाराष्ट्र से आया हु. सर आप महाराष्ट्र में रहते है. इस का गर्व है हमें हम सब अपने प्रांत का लिबाज पहन के आए है , हम यहा चाहेंगे की आप हमारे साथ महाराष्ट्र गित गाए, त्यावर शाहरूख उत्तरला. यार मुझे ताे इतनी खास मराठी आती नही. केवल एक Sentence आता है" सावधान पुढे गतिरोधक आहे." फिर भी मै प्रयास करता हू महाराष्ट्र गित गाने का. त्यानेही ही गायल आमच्यासोबत गान. त्यानंतर थेट शाहरूखच्या गोटातच प्रश्न टाकला. ' दिपीका के साथ आप दो बार हिट हूए. काजोल के साथ कटरिना के साथ भी. कई हिरोईन के साथ आपकी अच्छि बनती है , इस के पिछे क्या केमेस्ट्री है.' या प्रश्नाच समर्पक उत्तर दिल शाहरूख ने. कार्यक्रम आटोपला पहाटे 4 वाजता अन आम्ही शाहरूखच्या आझादी एक्सप्रेसचा प्रवास आटोपून घर जवळ केल.
Yes, Nice I was with for this event..!
ReplyDelete