खरे तरे 'आई असते जन्म भराची शिदोरी जी सरतही नाही अन उतरतही नाही' अगदी चपखल वर्णन केलय फमुंनी आपल्या कवीतेत आणि बाप हे कॅरेक्टरही माणसाच्या आयुष्यात तेवढच महत्वाच म्हणूनच तर डॉ. नरेंद्र जाधवांना 'आमचा बाप अन आम्ही' लिहावसं वाटल. आता आई-बापाच महत्व वर्णन करणार्या या दोन प्रातिनिधीक कलाकृतींचा संदर्भ देवून मूळ मुद्याकडे वळतो. माणसाला जन्म देणारे आणि त्याला जीवन मार्गावर चालण्यास सक्षम करणारे आई-बाप हे प्रत्येकच माणसाला कृतज्ञता व्यक्त करणार्या व्यक्ती. खरे तर त्यांच्या पासून लांब राहण्याची मला 20 वर्षांची सवय झाली. पण दूर राहूनही त्यांनी दिलेले संस्कार अण ताठ माणेन जगण्याच बळ शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणूनच त्यांच ऋण जिथे जिथे म्हणून जाहीररित्या व्यक्त करता येईल ते अगदी डोळसपणे केल. मग ते महाविद्यालयीन जीवनात शोध प्रंबंधाच्या अर्पण पत्रिकेतील त्यांचा उल्लेख असो किंवा त्यांच्या नावातील आध्याक्षरांनी तयार होणार्या टोपण नावाने(वनमोती-आईच नाव वनमाला तर वडलांच नाव मोतीरामजी) लिखान करण्याची संधी.
पहिलं लिखान छापून आलयं राजकारण्यांबाबत आणि राजकारण्यांचीच मुलाखत करून ज्या राजकारण्याची बातमी करून मी सर्वात पहिली बायलाईन मीळवली होती ती सुध्दा एकाच दिवशी 11 आवृत्यांमध्ये तीही लीड स्टोरी. असो, हा केवळ योगायोग आहे तुर्तास ती मुलाखत येथे देत आहे. कृपया मुलाखतीच्या तळातील नावावर(पत्रकारितेच्या भाषेत क्रेडीट लाईन) लक्षद्या .

++Ritesh+Bhuyar+One+Page+scan++30.10.2013.jpg)
No comments:
Post a Comment