डोक्यात शिरणार्या नवीन-नवीन कल्पना अन मग त्याचाच पिश्चा पूरवून त्याचा एक प्रयोग घडून प्रत्यक्षात येण, अन समाजाच्या उपयोगी पडनं, अशी मोठी चेन ज्या विषयाला आहे ते म्हणजे विज्ञान. मग याच ध्येयाने प्रेरित होवून कार्य केलेली आईनस्टाईन, गॅलीलीओ ते अगदी एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकरांपर्यंत शास्त्रज्ञांची अशी माेठी फळी सांगता येईल. तसेच, आपणही प्रत्येक जण आपल्या आजुबाजूच्या परिसराच्या सततच्या वावराने काहीना काही शोधत असतो. शालेय जीवनात ही ओढ असण आणि त्यास शालेय विज्ञान प्रदर्शनी सारख व्यासपीठ मिळन त्यातही भारी. अभ्यास सांभाळून अशा प्रदर्शीनींमध्ये सहभाग घेण म्हणजे आपली मांडणी कला आणि वक्तृत्वाची खरी कसोटी असते. अन हे ज्याला जमल तो बाल शास्त्रज्ञ होण्यास वा निदान त्या दृष्टीने त्याचे पाऊल पडण्यास सुरुवात होत असते. मी ही तसा प्रयत्न केला होता 6 वीत असताना. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय विहीगाव या शाळेच प्रतिनिधीत्व अंजनगाव सुर्जी येथे आयोजित तालुक्का स्तरीय स्पर्धेतला तो माझा सहभाग. प्रयोगाच नाव 'मुळासकट रोपट उपटून काढण्याचे यंत्र'. लोखंडी बादलीला समसमान चिरा देवून तयार केलेले हे यंत्र आणि तिथेच माझ्यातील बाल शास्त्रज्ञ शांत झाला. पुढे माझ्या शिकवणीला येणार्या विद्यार्थीनीला 'घरगुती कुकरचे मॉडेल' बनवून देण्यात केलेली मदत येवढाच काय तो शालेय विज्ञान प्रदर्शनीशी आलेला संबंध. आणि आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर थेट राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीचे वार्तांकण करण्यासाठी गेलो असतानाचा हा खास वृतांत.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित तिसर्या राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीत पश्चिम विभागातून महाराष्ट्राच्या क्षितीज महाजनच्या ‘अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठी’ या प्रयोगाने प्रथम तर सुरेश पवार ने तयार केलेली ‘आधुनिक बैलगाडी’ या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली.
येथील
प्रगती मैदानावर 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात
आले. त्यात देशभरातून एकूण 5 विभागातून 935 प्रयोग सादर करण्यात आले होते.
महाराष्ट्रातून एकूण 99 प्रयोग सादर करण्यात आले होते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा,
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांचा मिळून पश्चिम विभाग तयार करण्यात आला. या
विभागातून महाराष्ट्राच्या नागपूर येथील मुंडले इंग्लीश स्कुलचा इयत्ता 9 वीत
शिकणारा विद्यार्थी क्षितीज महाजन ने तयार केलेली ‘अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठी’ या
प्रयोगाने प्रथम क्रमांक पटकवला. क्षितीजने ही काठी बनवण्यासाठी स्वत: नागपुरातील ‘ द ब्लाईंड बॉईज इन्स्टिटयुटमध्ये’ जावून तेथील अंध विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
त्यांना दैनंदिन जीवनात येणार्या अडचणी समजून घेतल्या आणि येथूनच सेन्सर चा उपयोग
करून अंधाना उपयुक्त ठरणार्या काठीच्या प्रयोगाचा जन्म झाला. आपल्या शिक्षकांशी
चर्चा करून, विविध पुस्तक वाचून व इंटरनेटहून माहिती गोळा करून क्षितीजने सेंसरचा
वापर करून ही काठी तयार केली. दिशा दर्शक काठीच्या माध्यमातून अंध व्यक्तिला रस्ता
कळतो त्यासाठी त्या व्यक्तिच्या गळयात सेंसर अडकवण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही
व्यक्तिच्या मदतीशिवायही अंध व्यक्ती घराबाहेर जाऊन आपले काम सुरळीतपणे पार पाडू
शकतात.
कोल्हापूर
जिल्हयातील, करवीर तालुक्यातील, कसबा आराळे येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी
सुरेश पवार याने तयार केलेल्या ‘आधुनिक बैलगाडी’ च्या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली आहे. आजपर्यंत चारचाकी
व दुचाकी गाडयांमध्ये बरेच प्रयोग झालेत. पण, देशातील शेतकर्यांची बैलगाडी मात्र
या प्रयोगांपासून लांबच होती. सुरेश पवार ने आपल्या भागातील शेतकर्यांना होत
असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आधुनिक बैलगाडीचा प्रयोग तयार केला. त्यात
बैलगाडीचा अपघात झाल्यावर बैलगाडीच्या काप्त्या आवळल्याने बैलांचा फासी लागून
होणारा मृत्यू टाळण्यासाठी गाडीवानाच्या हाताशी एक यंत्र बसवले आहे. ज्यामुळे
अपघाताच्यावेळी काप्त्या सुटून बैल सुरक्षीत बाहेर पळू शकतात.या बैलगाडीच्या पुढच्या भागात एक चाक बसवून
बैलांच्या खांद्यांवर येणारा भार कमी करण्यात आला आहे. बैलगाडीच्या चाकाद्वारे
तयार होणार्या गतीज उर्जेचा उपयोग करून बैलगाडीला पुढील बाजुला दिवे बसविण्यात
आले आहे तसेच मागच्या बाजुला इंडिकेटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे रात्री
बैलगाडीवर कोणती गाडी आदळून अपघात होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
बैलगाडीच्या चाकालाच करवत व हत्यारांना धार लावणारे एंब्री यंत्रही बसविण्यात आले
आहे.
याखेरीस
सांगली जिल्हयातील,जत तालुक्यातील, कुंभारी येथील न्यू इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी
स्वप्नील पाटील ने तयार केलेला ‘इलेक्ट्रो सेल्यूलर
एक्स्प्लोजीव रिमोट इन बाय हयूमन इलेक्ट्रिक जनरेटर’, अहमदनगर जिल्हयातील, संगमनेर येथील सर डी.एम.पेटीट विद्यालयाचा विद्यार्थी
विशाल गुर्रप याने तयार केलेला ‘एसएमएस द्वारे मोटार पंप
सुरु करण्याचा प्रयोग’ हे
प्रयोगही या विज्ञान प्रदर्शनीतचे विशेष आकर्षन ठरले.

No comments:
Post a Comment