Friday, July 19, 2019

My Book Review


यशाचा मंत्र
ज्येष्ठ सनदी अधिकारी बुरा व्यंकटेशम लिखीत ‘सेल्फी ऑफ सक्सेस’ ही कलाकृती यशाचा मंत्र देणारी साहित्यिक मेजवानीच म्हणावी लागेल. सकारात्मक विचारांना चालना देवून सदैव उत्तमोत्तम कार्यासाठी प्रेरीत करणारे हे पुस्तक यशाच्यादिशेने मार्गक्रमण करण्यास दिशादर्शक ठरते. वाचकांना सक्सेस मंत्रा सांगणा-या पुस्ताकांच्या पठडीत व्यंकटेशम यांचे हे पुस्तक आपली वेगळी ओळख निर्माण करणारी व उठून दिसणारी उत्कृष्ट कलाकृती असल्याची अनुभूती  देते.  

          ‘सक्सेस बुक्स’ अर्थात यश या विषयावर आतापर्यंत प्रकाशित पुस्तकांमध्ये  आपल्या इच्छित गोष्टी प्राप्त करण्याबाबत आणि  संपत्ती, समृध्दी, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी   प्रंसगी उद्योग साम्राज्य उभारण्यासाठी वा आयुष्यात मोठे स्थान आदी मिळविण्यासाठी करावयाच्या नियोजनाबाबत भारंभार विचार दिसून येतात. तर, काही फरकाने तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टी मिळविण्यासाठी काय करावे व काय नये? कसे वागावे व कसे नको? असे सल्ले वजा मार्गदशन सापडेल. मात्र, या पुस्तकात व्यंकटेशन यांनी ३६० अंशामध्ये यशाचे गमक समजावून सांगितले आहे आणि तेच या पुस्तकाचे बलस्थानही ठरले आहे. यश या संकल्पनेचे वैविद्यपूर्ण पैलू या पुस्तकात वाचकांच्या दृष्टीस पडतात व नक्कीच ते मनाचा ठावही घेतात. आयुष्यात यश मिळविण्याचे ध्येय बाळगणा-या प्रत्येकालाच हे पुस्तक वाचून यातील अकल्पनीय व वैशिष्टयपूर्ण आशय भुरळ घातल्याशिवाय राहत नाही.

          यशाबाबतचे समग्र विचार काव्यात्मक व तत्वज्ञानाच्या पध्दतीने आणि प्रवाही मांडणीद्वारे मांडण्यात आल्याने हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेते.  महत्वाकांक्षी लोकांच्या आयुष्यात घडणारे यशाचे दुष्परीणाम व त्यातून जन्माला आलेले पापाचरण यावरही या पुस्तकात भाष्य करण्यात आल्याने मूळ विषयाचा समतोल साधला गेला आहे. वास्तव  जीवनातील निवडक कथा व उदाहरणांची पेरणी करून यशाचे विविध पैलू या पुस्तकात  उलगडून दाखविले आहेत. एका अर्थाने यश म्हणजे काय? हे समजावून सांगणारा सर्वसामावेशी पैलुंचा गुच्छ असल्याची अनुभूती वाचकाला या पुस्तकातून पदोपदी जाणवते. पुस्तकाच्या पहिल्या पानापासूनच वाचकांच्या यश विषयक संकल्पनेच्या ज्ञानकक्षा रूंदावण्याचे कार्य लेखकाने नेटकेपणे केले आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी त्या क्षेत्राची इतंभूत माहिती करून घेण्याची जिजूविशा असावी लागते. आणि स्वत: भारतीय प्रशासकीय सेवेसारख्या मानाच्या सेवेत कार्यकरताना लेखकाने यशाचा बहुआयामी अभ्यास केल्याने, नव्हे-नव्हे त्यातूनच त्यांचे व्यक्तीमत्व घडत गेल्यानेच , ‘आधी केले मग सांगितले’ या न्यायाप्रमाणे या पुस्तकातील प्रत्येक मुद्याचा आशय वाचकांच्या हृदयाला भिडतो.

          हे पुस्तक विविध बाबींमुळे वैशिष्टयपूर्ण ठरते, त्यातील ठळक बाबी म्हणजे या पुस्तकात देश व जगातील नामांकित व्यक्तींच्या आयुष्यातील किस्से मांडण्यात आले आहेत. पुस्तकात महात्मा गांधी ते एस्कोबर,  जॅक मा ते रामोजीराव, ओप्रा विन्फ्रे ते मायकेल जाक्सन यांच्या कथा अनुषांगिकरित्या व तितक्याच सहजरित्या वाचकांच्या भेटीला येतात.    

            या पुस्तकात आशय मांडणी करताना त्याची उत्तम विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणात ठासून भरलेल्या कौशल्यपूर्ण शैलीतील माहितीमुळे वाचक एकाचवेळी हे पुस्तक वाचू शकतात नाही तर टप्प्या टप्प्याने वाचन करू शकतात. अर्थात, वाचकांची जिज्ञासा व आवड यांस हे पुस्तक पूर्ण न्याय देते. लेखकाने अगदी सहज सोप्या भाषेचा उपयोग करून निर्मिलेली ही कलाकृती सर्वच स्तरातील वाचकांना सहजी आकलन होऊ शकते.

          आकर्षक लेखनशैली ,वैशिष्टयपूर्ण आशय मांडणी आणि सर्वसमावेशीदृष्टीकोणाचे हे पुस्तक वाचकांनी नक्की वाचले पाहिजे.
                                                     ०००००

Monday, May 13, 2019

"पंढरपूर वारी तथा महाराष्ट्र की संत परंपरा" विषय पर मेरा साक्षात्कार (Late Post)


स्नेहपूर्ण नमस्कार !!
"पंढरपूर वारी तथा महाराष्ट्र की संत परंपरा" विषय पर मेरा साक्षात्कार आकाशवाणी के 'रेनबो चैनल' दिल्ली (102.6Mhz), मुंबई (107.1Mhz) सहित देश के सभी राज्यों के रिले स्टेशनों पर रविवार (19 अगस्त 2018) को सुबह 11 से 12 बजे तक प्रसारित होगा।
आपको विदित होगा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक मास के अंतिम रविवार को आकाशवाणी के कार्यक्रम 'मन की बात' के माध्यम से देशवासियों को संबोधित करते हैं। इस कार्यक्रम में प्रधानमंत्री जिन विषयों को उठाते हैं, उन पर अगले तीन रविवार को ‘रेनबो’ चैनल पर विशेष साक्षात्कार प्रसारित होता है।
इस कड़ी में कल रविवार को मुझे 'महाराष्ट्र की पंढरपूर वारी व संत परंपरा' विषय पर विचार रखने का मौका मिला है। आप सभी से विशेष आग्रह है कि कृपया कार्यक्रम को सुनें और अपने सुझाव भी दें। 

















आपल्या मानसाचा सन्मान


     
                      दिल्ली लोकमत चे संपादक श्री विकास झाडे यांचा उमरेड ते दिल्ली असा संपादक पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहकार्यानी ११ मे २०१९ रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात श्री व सौ झाडे यांचा सत्कार आयोजित केला.

       खासदार सर्वश्री डॉ.नरेंद्र जाधव, श्री हुसैन दलवाई, प्रेस क्लब ऑफ इंडीयाचे अध्यक्ष तथा  दैनिक सकाळ दिल्लीचे ब्यूरो चीफ श्री अनंत बागाइतकर, राजकीय विश्लेषक व टीव्ही 9 चे श्री अशोक वानखडे मंचावर उपस्थित होते.
        

                झाडे(श्री व सौ) हे प्रेमळ दांपत्य म्हणजे दिल्लीत पत्रकारिता क्षेत्रात करियर करण्यासाठी आलेल्या माझ्या सारख्या अनेक मुलांची आधारवड. माझ तर सेकंड होम आहे झाडे साहेबांच कुटुंब. लौकिक अर्थाने कुठले आम्ही आणि कोण एका अनोळखी शहरात भेटलो आणि आपले झालो. हेच आपलेस करून घेण्याचा या दाम्पत्याचा स्वभाव त्यांच्या वैचारिक उंचीच प्रतीक आहे.

               उमरेड ते दिल्ली हा पत्रकार ते एका प्रतीतयश वृत्तपत्राचे संपादक या पदापर्यन्तचा झाडे साहेबांचा प्रवास म्हणजे एक संघर्ष व त्यावर यशस्वी मात असाच आहे. १० वर्षा पूर्वी जेंव्हा दिल्लीत आलो तेंव्हा फील्ड वर पत्रकार म्हणून त्यांना बघत होतो महाराष्ट्रातील राजकीय पतिस्थितीची उत्तम जान व त्यानुसार राजकारन्याशी असलेला त्यांचा सम्बध .त्यातून वृत्तपत्रामध्ये त्यांनी राजकारण्याचा घेतलेला समाचार. आमच्या सारख्या तेंव्हा नवख्या पत्रकाराणा खूप शिकवून गेला. त्यांची चार चाकी गाडी म्हणजे फील्डवर मराठी पत्रकारांसाठी जणू हक्काची ने आन व्यवस्था.त्यांनी आपल्या पेपरच्या brand चा कधीच तोरा अन्य पत्रकाराप्रमाने मिरविला नाही. सतत बातमीची भूक असलेला निष्ठावान व कल्पक पत्रकार ही त्यांची ओळख .



         मध्यंतरी या क्षेत्रातुन निवृत्ती घ्यावी असाही त्यांना विचार आला होता , कदाचित ती परिस्थिती असेल तशी.

         दिल्ली लोकमत हे खर brain child आहे झाडे साहेबांच . त्यासाठी आपला वाचक, आशय पुढील वाटचाल अस सर्व नियोजन त्यांच्या डोक्यात सदैव चालत असे. लोकमत दिल्लीची आवृत्ती सुरु करणे हे धाडसी व तितकच कौतुकाच काम साहेबांनी केल. आता हा डोलारा ते लीलया सांभाळत आहेत. आता तर सम्पादक म्हणून त्यांनी या आवृत्तीत प्राण ओतलाय. दिल्लीकर मराठी वाचकांच्या मनामनात हे वृत्तपत्र बसविन्यासाठी त्यांनी उत्तम संकल्पना राबविल्या आहेत. या कामात आता त्यांना अनुभवी व तरुण रक्ताची फळी मिळाली आहे. सामाजिक बांधीलकी जपत सतत नाविन्याचा शोध घेणारे सम्पादक श्री झाडे साहेब आपली छाप दिल्ली व मराठी वृत्तपत्र सृष्टित सोडतील हा मला विश्वास आहे.त्यांना उज्ज्वल कारकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.

                                                                         औचित्य
       ११ में १८८८ रोजी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मुंबईत त्यांच्या सहकार्यानी त्यांचा सत्कार केला होता आज त्याच ११ में रोजी झाडे साहेब यांच्या सहकार्यानी दिल्लीत असा कार्यक्रम आयोजित करून खास औचित्य साधले आहे व हा कार्यक्रम अविस्मरणीय केला आहे.

                                                           कार्यक्रमास खास उपस्थिती
श्री झाडे यांचे नागपूरच्या पत्रकारिता जीवनातील सहकारी यावेळी आवर्जुन उपस्थित होते यात.दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे सहयोगी संपादक श्री सुनील चावके, दैनिक पुढारीचे सहयोगी संपादक श्रीराम जोशी, दैनिक तरुण भारतचे ब्यूरो चीफ श्री श्यामकांत जहागिरदार , दैनिक लोकमत चे वृत्त संपादक श्री सुरेश भुसारी आणि महाराष्ट्र परिचय केंद्र दिल्लीचे उपसंचालक श्री दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

                                सौ भारती झाडे Madam एक प्रेमळ रसायन

    महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागात सर्वोच्चपदी अर्थात संचालक पदी असताना आपल्या पदाचा तिळमात्र बड़ेजाव  न करता सर्वांशी आपलेपणाने व प्रेमळपणाने वागणाऱ्या भारती Madam यांच व्यक्तिमत्वही झाडे साहेबांच्या नावा प्रमाणे त्यांच्या विकासास पुरक ठरल. या दाम्पत्याचे आपापल्या क्षेत्रातील उत्तुंग कामासोबत सामाजिक बांधिलकीतून निर्माण झालेल व्यसनमुक्ती क्षेत्रातील काम म्हणजे या दोघांच्या आयुष्यारूपी वृक्षाला आलेल सुमधुर फळ. संसार ,Job या सर्वातून वेळ काढून व्यसनमुक्ती केंद्राच नागपूर येथे ऊत्तम काम ते करीत आहेत. हे काम बघण्याची संधीही मला मिळाली. आमच्या सारख्या तरुण पीढ़ीसमोर या दांपत्याने मोठा आदर्श निर्माण करून ठेवला आहे.

                                                                    आई बाबांचा वसा
     संस्कृती व निर्मिती झाडे याही आपल्या आई वडिलांच्या शिस्तित व संस्कारात वाढलेल्या मुली . त्यांची सामाजिक जान घरातूनच समृद्ध होत आहे. झाडे साहेब व Madam यांनी आपल्या आई वडिलांच्या कार्याचा वसा ज्याप्रमाणे समर्थपणे पुढे नेला आहे तोच वारसा त्यांच्या नाती ही घेवून जातील हा मला पूर्ण विश्वास आहे.



     ज्या विचाराने आदरणीय झाडे साहेब व झाडे Madam एकत्र आले. व त्यांच्या हातून उत्तमोत्तम व रचनात्मक काम घडले व घडत आहे त्या आदर्श  व्यक्तिमत्वासाठी. श्रद्धयेय बाबा आमटे यांच्या पंक्ति चपखल लागू होतात. संघर्षाला न डगमगता प्रगतीकडे वाटचाल करीत रहा असा संदेश देणारे हे खास गीत सादर. 

          
शृंखला पायी असू दे

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले

भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे

वाडगे घेवून हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करूणा जगाची, लांबोनी चतकोर झाली

माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही


                                                                   000000

रितेश मोतीरामजी भुयार

पुरस्कार



महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याची  दखल घेवून राजधानी दिल्लीत दरवर्षी केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांवर एक दृष्टीक्षेप.         





                       फर्स्ट लेडी’  पुरस्कार 
            केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना वर्ष 2018 मध्ये "फर्स्ट लेडी"  सन्मान देऊन गौरविण्यात आले. देशात प्रथमच केंद्रशासनाच्यावतीने महिलांचा अशा नाविन्यपूर्ण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये  महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश होता. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 20 जानेवारी 2018  रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना "फर्स्ट लेडी"  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी  कर्तृत्ववान महिलांना आणि भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला यांना मरणोत्तर "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(हा पुरस्कार वर्ष 2018 मध्ये फक्त एकच वेळा देण्यात आला आहे.)
                                                                                       




 ‘नारी शक्ती’ पुरस्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या देशातील महिला व संस्थांना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी ‘नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. देशाच्या विकासात महिलांच्या योगदान व उपलब्धींचा सन्मान म्हणून केंद्रशासनाच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो . पुरस्कार प्राप्त महिलांचा आदर्श देशवासीयांनी घ्यावा व रचनात्मक कार्य करावे हा या पुरस्कारा मागील उद्देश आहे. प्रत्येक वर्षी 20 फेब्रुवारी रोजी पुरस्कार विजेत्या महिलांच्या नावांची घोषणा करण्यात येते. दरवर्षी जास्तीत-जास्त 30 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रमाणपत्र आणि 1 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही महिला आवेदन करू शकते तसेच व्यक्ती किंवा संस्था ज्या क्षेत्रात कार्य करित असेल त्या क्षेत्राचा किमान 5 वर्षांचा अनुभव असने आवश्यक आहे.

                                      फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार

12 मे हा  फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्मदिन  आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी देशभरातील परिचारिक, परिचारिका आणि परिचारिका सहायक, महिला आरोग्य अभ्यागत यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येतो.
            फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी जगात आधुनिक नर्सिंग सेवेचा पाया रचला म्हणून12 मे हा त्यांचा जन्मदिन जगभर ‘नर्सिंग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून भारत सरकारच्या कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देशातील नर्सिंग सेवेतील महिलांचा उचित सन्मान करण्याच्या उद्देशाने 1973 
पासून फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. 50 हजार रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार
देशातील उदयोग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणा-या महिलांसाठी निती आयोगाच्यावतीने 2016 पासून वुमेम ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार सुरु करण्यात आला. दर वर्षीच्या पुरस्कारासाठी  संकल्पना निश्चित करण्यात येते व त्यानुसार  निती आयोगाकडे देशभरातून आवेदन प्राप्त होतात. विविध चाचण्यांमधून निवडक महिलांची  पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सलग तीन वर्ष या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.
2016 मध्ये जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर निती आयोग, मायगोव्ह(केंद्र शासनाचे अधिकृत वेबपोर्टल) आणि संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील कार्यालय यांनी संयुक्तपणे वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार सुरु केला. विविध उद्योग क्षेत्रात मोलाचे व अव्याहत योगदान देत भारतदेशाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणा-या महिलांच्या कतृत्वाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला. पुरस्कारासाठी देशभरातून ऑनलाईन आवेदन मागविण्यात येतात. ऑनलाईन सर्वेसह अन्य महत्वाच्या चाचणीअंती या पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड करण्यात येते. वर्ष 2017 मध्ये उस्मानाबाद येथील कमल कुंभार, नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर आणि सातारा जिल्हयातील संगीता कांबळे या महाराष्ट्रातील तीन महिला उदयोजिकांना तर वर्ष 2018 मध्ये मुंबई येथील विशबेरी कंपनीच्या सह संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका अग्रवाल यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.                                                               
                                              अंगणवाडी सेविकांना ‘पोषण माह’ सन्मान 

‘पेाषण माह’ या विशेष कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणा-या अगंगणवाडी सेविकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरात  ‘सप्टेंबर  महिना’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. यात अगदी गाव पातळीपासून गरोदरमाता, स्तनदामाता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता , मुलींचे सुपोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी  विषयांवर  पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रिय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.                                                                                   
सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू पुरस्कार
            केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनानिमित्त दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार ’ वितरीत करण्यात येतात. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुंनाही सन्मानित करण्यात येते. विविध 14 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामधील सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुच्या श्रेणीत दिव्यांग महिला खेळाडुंना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 50 हजार रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी महिला खेळाडुंचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सहभाग व कामगिरी लक्षात घेतली जाते. दरवर्षी 15 जून रोजी मंत्रालयाच्यावतीने जाहीरात देवून पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येतात. विविध चाचण्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यात येते. दरवर्षी 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरीत करण्यात येतात.   
                                                                                                         ०००००
संकलन
रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक.
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.






Friday, February 1, 2019

आयुष्यातील पहिल पत्र लिखान



आयुष्याच्या एका वळणावर काही गोष्टींचे सिंहावलोकन करताना आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा हेवा वाटतो. असाच हा प्रसंग. माझे थोरले बंधू मनिष भुयार यांनी कालच वॉटसअप वर मला माझा लहानपणचा फोटो व माझ्या आयुष्यात लिहीलेल पहिल पत्र मला पाठवल.

            माझ गाव माझ कुटुंब सोडून मी मामाकडे आलो. महात्मा फुले माध्यमिकशाळा विहीगाव येथे सहावीत प्रवेश घेतला. एवढया लहान वयात घरापासून लांब राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग (तेव्हा पासून शिक्षण आणि आता नौकरी निमित्त अजूनही घरा पासून लांबच राहतोय). पहिले वहिले पत्र आणि तेही आईला लिहीलेले. 12 वर्षांचा असेल तेव्हा जेमतेम. आयुष्याचा हा पट एकदम मागे घेऊन जाताना थेट मला सहावीत घेवून जातो.

घरचं मोकळपण सोडून मामांकडे शिस्तीत राहणं माझ्यातील बालसुलभ मनाला थोड अवघडच गेल. आजोडी  मला जरी आजी व मामा- मामींकडून  खूप  प्रेम मिळाल चांगली वागणूक मिळाली तरी त्या वयात आईपासून लांब राहण मला फार अवघड गेल. तोच भाव या पत्रातून प्रखरतेने जाणवतो. ‘आई तुझी खूप आठवण येते. पण काय करू देवाने मला पंख सुध्दा दिले नाही.’ हे वाक्य माझ्या मनातील त्यावेळची स्थिती दर्शविते.  माझे मामा शामसुंदर पोटदुखे यांनी सुंदर अक्षरात या पत्रात माझ्या घरचा पत्ता लिहून दिला. यावयात व पुढेही मामांचं  सतत प्रोत्साहणच माझ्या व्यक्तीमत्वाला आकार देत गेल. आजही हा प्रवास सुरु आहे. आपल्यामुळाकडे वळून पाहताना खूप गहीवरून येत असाच हा अनुभव.

                                                           पत्र क्रमांक- २


       
       

लोकराजयच्या जानेवारी २०१९ च्या अंकातील माझा लेख





महाराष्ट्राला यावर्षी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे याजमानपद मिळाले. याचे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या 
लोकराजयच्या जानेवारी २०१९ च्या अंकातील माझा लेख .