दिल्ली लोकमत चे संपादक श्री विकास झाडे यांचा उमरेड ते दिल्ली असा
संपादक पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहकार्यानी ११
मे २०१९ रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात श्री व सौ झाडे यांचा सत्कार आयोजित केला.
खासदार सर्वश्री डॉ.नरेंद्र जाधव, श्री हुसैन
दलवाई, प्रेस क्लब ऑफ इंडीयाचे अध्यक्ष तथा
दैनिक सकाळ दिल्लीचे ब्यूरो चीफ श्री अनंत बागाइतकर, राजकीय विश्लेषक व टीव्ही
9 चे श्री अशोक वानखडे मंचावर उपस्थित होते.
झाडे(श्री व सौ) हे प्रेमळ
दांपत्य म्हणजे दिल्लीत पत्रकारिता क्षेत्रात करियर करण्यासाठी आलेल्या माझ्या सारख्या
अनेक मुलांची आधारवड. माझ तर सेकंड होम आहे झाडे साहेबांच कुटुंब. लौकिक अर्थाने कुठले
आम्ही आणि कोण एका अनोळखी शहरात भेटलो आणि आपले झालो. हेच आपलेस करून घेण्याचा या दाम्पत्याचा
स्वभाव त्यांच्या वैचारिक उंचीच प्रतीक आहे.
उमरेड ते दिल्ली हा पत्रकार
ते एका प्रतीतयश वृत्तपत्राचे संपादक या पदापर्यन्तचा झाडे साहेबांचा प्रवास म्हणजे
एक संघर्ष व त्यावर यशस्वी मात असाच आहे. १० वर्षा पूर्वी जेंव्हा दिल्लीत आलो तेंव्हा
फील्ड वर पत्रकार म्हणून त्यांना बघत होतो महाराष्ट्रातील राजकीय पतिस्थितीची उत्तम
जान व त्यानुसार राजकारन्याशी असलेला त्यांचा सम्बध .त्यातून वृत्तपत्रामध्ये त्यांनी
राजकारण्याचा घेतलेला समाचार. आमच्या सारख्या तेंव्हा नवख्या पत्रकाराणा खूप शिकवून
गेला. त्यांची चार चाकी गाडी म्हणजे फील्डवर मराठी पत्रकारांसाठी जणू हक्काची ने आन
व्यवस्था.त्यांनी आपल्या पेपरच्या brand चा कधीच तोरा अन्य पत्रकाराप्रमाने मिरविला
नाही. सतत बातमीची भूक असलेला निष्ठावान व कल्पक पत्रकार ही त्यांची ओळख .
मध्यंतरी या क्षेत्रातुन
निवृत्ती घ्यावी असाही त्यांना विचार आला होता , कदाचित ती परिस्थिती असेल तशी.
दिल्ली लोकमत हे खर
brain child आहे झाडे साहेबांच . त्यासाठी आपला वाचक, आशय पुढील वाटचाल अस सर्व नियोजन
त्यांच्या डोक्यात सदैव चालत असे. लोकमत दिल्लीची आवृत्ती सुरु करणे हे धाडसी व तितकच
कौतुकाच काम साहेबांनी केल. आता हा डोलारा ते लीलया सांभाळत आहेत. आता तर सम्पादक म्हणून
त्यांनी या आवृत्तीत प्राण ओतलाय. दिल्लीकर मराठी वाचकांच्या मनामनात हे वृत्तपत्र
बसविन्यासाठी त्यांनी उत्तम संकल्पना राबविल्या आहेत. या कामात आता त्यांना अनुभवी
व तरुण रक्ताची फळी मिळाली आहे. सामाजिक बांधीलकी जपत सतत नाविन्याचा शोध घेणारे सम्पादक
श्री झाडे साहेब आपली छाप दिल्ली व मराठी वृत्तपत्र सृष्टित सोडतील हा मला विश्वास
आहे.त्यांना उज्ज्वल कारकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.
११ में १८८८ रोजी थोर
समाजसुधारक महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मुंबईत त्यांच्या सहकार्यानी
त्यांचा सत्कार केला होता आज त्याच ११ में रोजी झाडे साहेब यांच्या सहकार्यानी दिल्लीत
असा कार्यक्रम आयोजित करून खास औचित्य साधले आहे व हा कार्यक्रम अविस्मरणीय केला आहे.
कार्यक्रमास खास
उपस्थिती
श्री झाडे यांचे नागपूरच्या पत्रकारिता जीवनातील सहकारी यावेळी आवर्जुन
उपस्थित होते यात.दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे सहयोगी संपादक श्री सुनील चावके, दैनिक
पुढारीचे सहयोगी संपादक श्रीराम जोशी, दैनिक तरुण भारतचे ब्यूरो चीफ श्री श्यामकांत
जहागिरदार , दैनिक लोकमत चे वृत्त संपादक श्री सुरेश भुसारी आणि महाराष्ट्र परिचय केंद्र
दिल्लीचे उपसंचालक श्री दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.
सौ भारती झाडे Madam एक प्रेमळ रसायन
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ
विभागात सर्वोच्चपदी अर्थात संचालक पदी असताना आपल्या पदाचा तिळमात्र बड़ेजाव न करता सर्वांशी आपलेपणाने व प्रेमळपणाने वागणाऱ्या
भारती Madam यांच व्यक्तिमत्वही झाडे साहेबांच्या नावा प्रमाणे त्यांच्या विकासास पुरक
ठरल. या दाम्पत्याचे आपापल्या क्षेत्रातील उत्तुंग कामासोबत सामाजिक बांधिलकीतून निर्माण
झालेल व्यसनमुक्ती क्षेत्रातील काम म्हणजे या दोघांच्या आयुष्यारूपी वृक्षाला आलेल
सुमधुर फळ. संसार ,Job या सर्वातून वेळ काढून व्यसनमुक्ती केंद्राच नागपूर येथे ऊत्तम
काम ते करीत आहेत. हे काम बघण्याची संधीही मला मिळाली. आमच्या सारख्या तरुण पीढ़ीसमोर
या दांपत्याने मोठा आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
आई बाबांचा वसा
संस्कृती व निर्मिती झाडे
याही आपल्या आई वडिलांच्या शिस्तित व संस्कारात वाढलेल्या मुली . त्यांची सामाजिक जान
घरातूनच समृद्ध होत आहे. झाडे साहेब व Madam यांनी आपल्या आई वडिलांच्या कार्याचा वसा
ज्याप्रमाणे समर्थपणे पुढे नेला आहे तोच वारसा त्यांच्या नाती ही घेवून जातील हा मला
पूर्ण विश्वास आहे.
शृंखला पायी असू दे
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेवून हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करूणा जगाची, लांबोनी चतकोर झाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ज्या विचाराने आदरणीय झाडे साहेब व झाडे Madam एकत्र आले. व त्यांच्या
हातून उत्तमोत्तम व रचनात्मक काम घडले व घडत आहे त्या आदर्श व्यक्तिमत्वासाठी. श्रद्धयेय बाबा आमटे यांच्या
पंक्ति चपखल लागू होतात. संघर्षाला न डगमगता प्रगतीकडे वाटचाल करीत रहा असा संदेश देणारे
हे खास गीत सादर.
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेवून हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करूणा जगाची, लांबोनी चतकोर झाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
000000
रितेश मोतीरामजी भुयार


No comments:
Post a Comment