Friday, August 19, 2016

‘भारत पर्व’; पुरण पोळी व पुणेरी पगडी आकर्षण


















                                                                                                          शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६
नवी दिल्ली : देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे प्रसिध्द व्यंजन पुरण पोळी आणि मराठीबाणा दर्शविणारी पुणेरी पगडी येथे येणाऱ्यांचे आकर्षण ठरले. राज्याच्या विकासाची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड व लोकराज्यला तरूणांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

भारत देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दालनांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. पहिल्याच दिवशी जवळपास ३ हजार प्रेक्षकांनी या दालनांना भेट दिली. पुरण पोळी, पुणेरी पगडी प्रेक्षकांचे आकर्षण ठरले तर राज्य शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड आणि लोकराज्य ला तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

येथे देशाच्या विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचे दालन उभारण्यात आले असून महाराष्ट्राच्या खाद्य दालनाला भेट देणाऱ्या खवय्यांसाठी पुरण पोळी महत्वादाचे आकर्षण ठरले आहे. या स्टॉलवर पुरण पोळीचा आस्वाद घेणारे, मुळचे उत्तर प्रदेशातील अलाहबादचे आणि दिल्लीत नोकरी करणारे अम्बरीश श्रीवास्तव सांगतात, ‘शिक्षणासाठी पुण्याला असताना मी पुरण पोळीचा आस्वाद घेतला होता. भारत पर्व प्रदर्शात महाराष्ट्राच्या स्टॉलवर दिल्लीत पुरण पोळी खाण्याचा आनंद मनाला सुखावून गेला’. श्रीवास्तव पुढे सांगतात, माझ्यामते पुरण पोळी ही देशातील सर्वोतम ‘स्वीट डीश’ आहे.

महाराष्ट्र राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणाऱ्या डिजिटल दालनाला भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यात शालेय मुलांचे आकर्षण ठरत आहे, एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून परिधान करण्यात येणारी पुणेरी पगडी.

दिल्लीला लागूनच असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील कौशांबी येथील ८ वीत शिकणारा माहित गुप्ता म्हणतो, एलइडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालून मला खूप आंनद झाला. मी, पहिल्यांदाच असा प्रयोग बघितला. मला इतिहासात आवड आहे. लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालत असल्याचे मी अभ्यासले आहे. महाराष्ट्र दालनात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे माहित सांगतो. ब्लु टूथच्या माध्यमातून पुणेरी पगडी परिधान केलेला फोटो माहित ने आपल्या मोबाईलमधे घेतला त्याचाही त्याला खूप आनंद झाला.

महाराष्ट्र शासनाच्या विकास कामांची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र ‘महाराष्ट्र अहेड’ आणि ‘लोकराज्य’ला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुळचा बिहार मधील भागलपूरचा महंमद आफताब आलम, सध्या दिल्लीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत आहे. आफताब सांगतो, ‘महाराष्ट्र अहेड’ मधून महाराष्ट्राची इंतभूत माहिती मिळते आणि राज्याच्या विकास कामांची माहिती मिळते त्यामुळे माझ्या प्रमाणेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्यासांठी हे मासिक खूपच उपयुक्त आहे. दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंत ‘भारत पर्व’ ला भेट देता येणार आहे.

                 महाराष्ट्र अहेड व लोकराज्यला तरूणांचा प्रतिसाद











‘भारत पर्व’ ला सुरुवात; महाराष्ट्राच्या जडणघडणीचे डिजीटल दर्शन








                                                                                              शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६


नवी दिल्ली  : देशाच्या प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्‍या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनास शुक्रवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्राने आपल्या जडण घडणीचे दर्शन या प्रदर्शनात घडविले आहे. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत देशाचा गौरपूर्ण इतिहास दर्शविणाऱ्‍या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. केंद्रीय नगर विकास, माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा, माहिती व प्रसारण मंत्री राज्यमंत्री राजवर्धन सिंह यावेळी उपस्थित होते.

विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची दालने याठिकाणी आहेत. महाराष्ट्राची तीन दालने या ठिकाणी आहेत. राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे डिजीटल दालन लक्ष वेधून घेते. या ठिकाणी ‘मेकइन महाराष्ट्रा’च्या माध्यमातून राज्यात झालेली गुंतवणूक व विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान दर्शविणारे आकर्षक पॅनल येथे आहेत.
डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सफर

दालनात शिरताच मोठी एलइडी दिसते. ‘व्हर्च्युअल टुरीजम’च्या माध्यमातून शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का मखबरा, अंजीठा-वेरूळ लेण्या आणि तारकर्ली समुद्र किनाऱ्‍याची सफर येथे भेट देणाऱ्‍यांना करण्यास मिळते. अन्य एका एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता येतो . विशेष म्हणजे याची छायाचित्रे ब्लूटूथ व वायफायच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या मोबाईलमध्ये घेण्याची सोय करून देण्यात आली आहे. उभी स्क्रीन उभारून चित्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र देण्यात आले आहेत. ‘ऑगमेटीक रियॅलीटी’ या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळतो.

राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले आहे. पैठणी साड्या, वारली पेटींग, लाखाच्या बांगड्या, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे बघायला मिळते. महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणाऱ्‍या प्रेक्षकांना चाखता येतात. त्यासाठी महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचे दालन उभारण्यात आले आहे. पुरण पोळी, साबुदाना खिचडी, साबुदाना वडा, पीठलं भाकरी, भरली वांगी, वडा पाव आदी मराठमोळी व्यंजन येथे उपलब्ध आहेत. दिनांक १८ ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंत ‘भारत पर्व’ला भेट देता येणार आहे.
पर्यटन मंत्री डॉ.महेश शर्मांची महाराष्ट्र दालनास भेट; लोकराज्य अंकाचे कौतुक

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांनी भारत पर्वचे उद्घाटन झाल्यानंतर महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जुन पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. डॉ.शर्मा यांना लोकराज्य व महाराष्ट्र अंक भेट स्वरूपात देण्यात आले. 

Saturday, July 30, 2016

बदल न स्विकारल्याचा फटका ; YAHOO चे दिवाळे ज्वलंत उदाहरण




 
    
       काळानुसार आपण वागलो नाही तर आपणच कालबाहय ठरतो. जो काळाची पाऊले ओळखून स्वत:त बदल करतो तो पुढे जातो आणि जो या बदलाकडे पाठ फिरवतो त्याला काळचं पाठी मागे सारतो, याचं उत्तम उदारण म्हणजे जगप्रसिध्द YAHOO ही मेलींग  कंपनी. याचं जोडीला मोबाईल क्षेत्रात NOKIA तर कॅमेरामध्ये KODAK. एकेकाळी आप-आपल्या क्षेत्रात शिखरावर असणा-या या कंपन्यांचे आज दिवाळे निघाले आहेत. एक नजर बदलांना पाठ दाखवणा-या या मातब्बर कंपन्यांच्या संक्षिप्त स्थितीवर.
            YAHOO मेलींग कंपनीची स्थापना १९९४ ची. तुमच्या माझ्या सारख्यांचा  पहिला मेल  बहुदा Yahoo.in अथवा yahoo.com असाचं असायचा. याहून या कंपनीची लोकप्रियता आपल्या लक्षात येईल. आज मात्र yahoo चा मेल आहे पण, त्याकडे आपण बघत नाही. आणि आपणा बहुतेकांचा मेल हा gmail.com असतो. गम्मत अशी की, ज्या  Google ने आपल्याला विकत घ्यावे अशी विनवनी Yahoo ला केली होती ती गुगल, बदलांचा स्वीकार करून यशो शिखरावर गेली. अन बदलाला पाठ दाखविल्यामुळे आणि योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे Yahoo इतिहास जमा व्हायला निघाली. ज्या Yahoo कडे  Google आणि  Facebook आपणास विकत घ्या अशी विनवनी करायला गेले होती, त्यांची किंमत ५ लाख कोटींच्या घरात गेली. तर Yahoo कंपनीचे दिवाळे निघून ही कंपनी अवघ्या ३५ हजार कोटींमध्ये आपला लिलाव करण्यास निघाली आहे. भरीस भर घातली ती या कंपनीच्या सीईओ मॅरीसा मेयर या बाईने.  २०१२ मधे सीईओ झालेल्या मेयर बाईंनी या कंपनीला बदल स्वीकारणारे अन ग्राहकांच्या मागणीचा विचार करून त्यानुसार आपले धोरण आखणारे नेतृत्वच दिले नाही. त्याचं कारणही तसच आहे. एखादी कंपनी बुडते तेव्हा तिच्या सीईओच्या खिशातून ती रक्कम वळती होते. पण, चतुर मेयर बाईंनी आपल्या खिश्याची केवळ ३ टक्के रक्कमच या  कंपनीशी जोडली त्यामुळे त्यांना ही कंपनी बुडाल्याचा अल्प भुर्दंड पडला.
            मोबाईल क्षेत्रात अशीच एक बाप कंपनी म्हणजे NOKIA.१९९४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीची लोकप्रियता २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात एवढी शिगेला गेली होती की, या कंपनीचा मोबाईल बाळगणे ही अभिमानास्पदबाब वाटत असे. गँरटी का दुसरा नाम म्हणजे नोकिया मोबाईल अशी म्हणही प्रसिध्द झाली होती. मात्र बाजारात आलेल्या अन्य मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना उत्तमोत्तम ऑपरेटींग सिस्टीम उपलब्ध करून दिल्या आणि त्या कंपन्याकडे लोक वळले. नोकीया कंपनीने बदलाचे हे वारे न स्वीकाल्यामुळे ही कंपनी मागे पडली . आणि आज इतर कंपन्यांच्या तुलनेत नोकिया कंपनी फक्त नावाला उरली आहे.
            याच साखळीत आपणास कॅमेरा कंपनीतील एकेकाळी नावाजलेली आणि १९७५ मध्ये प्रथमच जगात डिजीटल कॅमेराचा प्रयोग करणारी कोडॅक कंपनी तिचाही दुर्देवाने विचार करावा लागतो.आजकाल मोबाईल मध्ये कॅमे-याचे फिचर असल्याने आता स्टिल कॅमेरा हा प्रत्येकांच्या हातात आला आहे. असे असले गुणात्मकदृष्टया स्टिल कॅमेराचे महत्व आजही कायम आहे. डिजीटल फोटोग्राफीचा शोध जगाला करून देणा-या कोडॅक कंपनीला अन्य कॅमेरा कंपन्यांनी केव्हांच मागे टाकले आहे. आणि डिजीटल फोटोग्राफीचा पाया घालणारी ही कंपनीचं आज काळानुसार बदल न स्वीकारल्यामुळे बाजारात नामशेस होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे.        
                                                                      ०००००

Friday, July 29, 2016

महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रगत वाटचाल




महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राजधानी दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राने राज्याच्या नावाला साजेशी कामगीरी केली आहे. राज्यशासनाच्या प्रसिध्दी व जनसंपर्काचे काम यशस्वीपणे सांभाळणा-या या कार्यालयाने बदलाची कास धरली. वायफाय सुविधा,अत्याधुनिक साधन सामुग्री आणि कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण निर्मिती यामुळे कार्यालय आएएसओ प्रमाणीत झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कार्यशाळांचे आयोजन करून कार्यालयाने महाराष्ट्राची प्रतिमा राज्याबाहेर निर्माण करण्यात यश मिळवीले असून देशातील विविध राज्यांच्या जनसंपर्क कार्यालयांना जोडण्यात पुढाकार घेतला.
राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे लाईव्ह वेब कास्टकरून कार्यालयाने नवा इतिहास घडवला. पंजाब मधील घुमान येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात पंजाबी भाषेत मेक इन महाराष्ट्र ही पुस्तिका प्रकाशन करून केलेली विशेष प्रसिध्दी म्हणजे कार्यालयाने केलेले सिमोलंघन ठरले.राज्य शासनाची उपलब्धी देश-विदेशातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लावण्यात आलेली प्रदर्शनी विशेष ठरली. सोशल मीडीया आणि एसएमएस सवेचा प्रभावी वापर करून राज्यशासनाच्या कामांची माहिती शेकडो पत्रकारांना देणा-या या कार्यालयाने महाराष्ट्र शासनाचा विश्वसनीय स्त्रोत म्हणून नाव लौकीक मिळवीले आहे. म्हणूनच राज्याचे मंत्री,लोकप्रतिनीधी, साहित्यिक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी,प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या महाविद्यालयांचे विद्यार्थी या कार्यालयाला सतत भेटी देतात.
माहिती व जनसंपर्क विभागाचे महत्वाचे कार्यालय म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राने पुढाकर घेत शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे सलग दोन वर्ष यशस्वी आयोजन केले. जनसंपर्कातील नवे प्रवाह, प्रतिमा निर्मिती, सामाजिक माध्यमांचा वापर, ब्रँडिंग आदी विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्याख्यात्यांनी या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. २०१५ मध्ये आयोजित या कार्यशाळेत आसाम, मणिपूर, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, केरळ, गोवा या राज्यांतील जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांसह महाराष्ट्रातील २० जिल्हा माहिती अधिका-यांनी सहभाग घेतला. २०१६ मध्ये आयोजित कार्यशाळेत माहिती व जनसंपर्क विभागातील १४ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील माहिती व जनसंपर्क विभागाच्या २३ अधिका-यांनी  सहभाग घेतला.         
लाईव्ह वेबकास्टच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे काम कार्यालयाने केले. राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेतील विविध महत्वाचे सत्र महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर वेबकास्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. महासंचालनालयाचे जे अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित राहू शकले नाहीत अशा अधिका-यांनी आप-आपल्या मोबाईलवर आणि कार्यालयांमधे मोठ-मोठया स्क्रिन लाऊन या उपक्रमाचा लाभ घेतला. विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला व उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  पत्रकार परिषदेचे लाईव्ह वेबकास्ट करून कार्यालयाने  महासंचालनालयाच्या कार्यालयांपुढे नवा पायंडा घालून दिला. या प्रक्षेपणाला सर्वचस्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
                 पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातआयोजित करण्यात आले. या संमेलनात कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्राची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्मिती करण्याच्या उद्देशाने मेक इन महाराष्ट्र ही पंजाबी भाषेतील पुस्तिका तयार करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन झाले, त्‍यांनी कार्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. साहित्य संमेलनास भेट देण्यास येणारे साहित्यप्रेमी, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह ही पुस्तिका पंजाबमध्ये लोकप्रिय ठरली. या शिवाय संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शन दालनात महाराष्ट्राची प्रगती दर्शविणारे पंजाबी भाषेतील विविध फलक कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आले होते. महाराष्ट्र आणि दिल्लीबाहेर देशाच्या उत्तरेकडील महत्वाच्या पंजाब राज्यात केलेली महाराष्ट्राची प्रतिमा निर्मिती म्हणजे या कार्यालयाने केलेले सिमोलंघनच ठरले.
             राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात येणारा अंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा म्हणजे देश- विदेशातील ग्राहक व जनता यांचा संगम. पंधरा दिवस चालणा-या या मेळाव्यात सहभागी होणा-या जनतेसमोर महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या उपलब्धींची माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यालयाने प्रदर्शनीचे आयोजन केले. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महाराष्ट्र दालनास भेट देणारे देश -विदेशातील व्यापारी, गुंतवणुकदार, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती प्रभावीपणे पोहचविण्यात आली. दिल्ली हाट येथे राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, हस्तकला व लघु उद्योगाचे दर्शन घडविणा-या महाजत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात कार्यालयाच्यावतीने राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले. जवळपास दोन आठवडे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून महाजत्रेस भेट देणारे देश-विदेशातील पर्यटक, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली.
            राजधानी दिल्लीतील शासकीय व खासगी प्रसार माध्यमांच्या कामाचे स्वरुप तसेच संसदीय कार्यप्रणली आदींची माहिती पत्रकारांना व्हावी, या उद्देशाने या कार्यालयाने महाराष्ट्राच्या विविध विभागांतील पत्रकारांसाठी  दिल्ली पत्रकार दौ-याचे आयोजन केले. या उपक्रमाअंतर्गत कोकण व नाशिक विभाग, अमरावती व नागपूर विभाग, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पत्रकार दौ-यांचे आयोजन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. या कालावधीत ब्युरो ऑफ पार्लामेंटरी स्टडीज एण्ड  ट्रेनिंगच्या सत्रांचे आयोजन , लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, साहित्य अकादमी, राष्ट्रीय माध्यम केंद्र आदी कार्यालयांच्या भेटींचे आयोजन करण्यात आले. तसेच, केंद्रीय मंत्री आणि प्रसार माध्यम, राजकीय,आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांशी या दौ-यात सहभागी पत्रकारांच्या वार्तालापाचे आयोजनही करण्यात आले. याशिवाय दिल्ली स्थित मराठी व गैर मराठी पत्रकारांसाठी कार्यालयाच्यावतीने पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयात घुमान येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनासाठी  पत्रकार दौ-याचे आयोजन करण्यात आले.
कार्यालयाने एसएमएस सेवा सुरू केली. MPCELL आणि MICDEL नावानी ही सेवा प्रसिध्द असून अल्पावधीत ही सेवा लोकप्रिय झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून दिल्लीत झालेल्या महाराष्ट्रासंबंधित महत्वाच्या निर्णयाची माहिती महाराष्ट्रातील ५ हजारांहून अधिक पत्रकारांना, दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांना दिली जाते. तसेच, मंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेच्या आयोजनाबाबतची माहितीही देण्यात येते. महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील मराठी मंडळांच्या सदस्यांनाही या एसएमएस सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अपडेट देण्यात येतात.
बातमी हे या कार्यालयाचे महत्वाचे अंग आहे. दिल्ली  शासकीय भेटीवर असणारे मुख्यमंत्री , इतर मंत्री त्यांच्या बैठकी, महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव, केंद्र शासनाकडून महाराष्ट्रासाठी झालेले महत्वाचे निर्णय आदी महत्वाच्या घटनांचे वार्तांकन करून ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यालयाच्यावतीने अव्याहतपणे सुरु आहे. समाज माध्यमांचा (सोशल मीडिया)वाढता प्रभाव लक्षात घेता कार्यालयाने या नव माध्यमांची कास धरत शासनाच्या प्रसिध्दीकामी या माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयाचे अधिकृत  ट्विटर हँडल, फेसबुक अकांऊट आणि पेजेस, ब्लॉग, गुगल प्लस आणि युटयूब अकाऊंट  असून या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 MAHA INFO CENTRE नावाने कार्यालयाचे ट्विटर हँडल असून आतापर्यंत ७८० ट्वीट करण्यात आले. कार्यालयाच्या ट्वीटरचे एकूण २ हजार ४८२ फॉलोअर्स आहेत. Mic New Delhi नावाचे कार्यालयाचे फेसबुक अकाऊंट आहे याचे एकूण ९५४ फ्रेंडस आहेत. याव्यतिरीक्त Maharashtra Information Centre PR Activity आणि MIC MEDIA GROUP नावाने कार्यालयाचे स्वतंत्र पेजेस आहेत. http://micnewsdelhi.blogspot.in/ नावाने कार्यालयाचा ब्लॉग असून यावर १८७ पोस्ट प्रकाशीत करण्यात आल्या. MIC New Delhi या नावाने कार्यालयाचे Google+ अकाऊंट आहे. MIC New Delhi नावाने कार्यालयाचे युटयुब अकाऊंट असून आतापर्यंत १२ व्हीडीओ अपलोड करण्यात आले असून त्यास ६५० लोंकानी भेट दिली आहे.MIC
            विविध आयोजनातही कार्यालयाचा पुढाकार आहे. दरवर्षी ६ जानेवारी ला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. पत्रकारीतेतील नामवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शन यावेळी आयोजित करण्यात येते. राज्यातील प्रसार माध्यमांसाठी कार्य करणा-या दिल्लीतील प्रतिनिधींसह दिल्लीत कार्यरत गैर मराठी भाषीक पत्रकारही या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित असतात. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जंयती निमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मराठी भाषेसाठी योगदान देणा-या नामवंताचे मार्गदर्शन आणि मराठीसाठी झटणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येतो. ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कालावधित मराठी पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, विविध चर्चासत्रे, व्याख्याने, काव्य रजनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या काळात करण्यात येते. दिवाळी अंक प्रदर्शनाची मोठी परंपरा या कार्यालयाला असून दरवर्षी दिवाळी अंक प्रदर्शनी भरवण्यात येते. या प्रदर्शनीस वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.  
                 राजधानी दिल्लीत राज्याचे पहिले संपर्क कार्यालय म्हणून डौलाने उभे असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे महत्व अबाधित असून या कार्यालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
                                                  00000



कौशल्य विकासात महाराष्ट्राची अग्रेसर वाटचाल



विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक सन्मान खोवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाने राज्य आता देशातील कौशल्य विकास कार्यक्रमातही आघाडीवर आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या या कामगिरीची माहिती दिली. राज्य शासनाच्या या उपलब्धीचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत 60 हजार तरुणांना ॲप्रेंटिसशिप मिळवून देण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. कौशल्य विकासातील हा टक्का अजून वाढण्याकरिता राज्य शिकाऊ (ॲप्रेंटिसशिप) परिषद आणि राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापण्याची परवानगी मिळावी या मागणीसह मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत अनेक महत्वाच्या सूचना केल्या.

यासह सर्वोच्च न्यायालयाने नीट(राष्ट्रीय पात्रता पूर्व परिक्षा) बद्दल दिलेल्या निर्णयावर किमान या वर्षाकरिता सूट मिळावी म्हणून मुख्यमंत्री यांनी स्वत: राज्यातील विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता पंतप्रधानांची भेट घेतली. या मागणीवर केंद्राने अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यावर्षीकरिता स्थिगीती आणली. मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्या मुळे मिळालेले यश अनन्यसाधारण आहे.
   
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली.  या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. राज्यात या कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी त्यांनी स्वत:लक्ष घातले.  केंद्रा प्रमाणे राज्यातही कौशल्य विकासासाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला आणि मुख्यमंत्रीच या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे  आयोजित करण्यात येत आहेत.  जिल्हयाच्या ठिकाणी असे आयोजन होऊन तरूणांना विविध कंपन्यांमधे थेट कामाची संधिच या मेळाव्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.  केंद्राने प्रशिक्षणार्थी (ॲप्रेंटिसशिप) कायद्यात बदल केल्याने महाराष्ट्र राज्याला त्याचा मोठा फायदा झाला. राज्यात यावर्षी जवळपास 60 हजार उमेदवार ॲप्रेंटिसशिप  करू शकले.  जे इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.  
देशभर सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्रीय मंत्री आणि निवडक मुख्यमंत्री व उद्योजकांचे प्रतिनिधी विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश असणा-या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम कार्यकारी परिषदेची निर्मिती करण्यात आली. कौशल्य विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात या परिषदेच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.  यावेळी महाराष्ट्र,जम्मू –काश्मीर आणि अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदेस उपस्थित होते.  दोन तास चाललेल्या या बैठकीत केंद्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीकरिता करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत  राज्यांना स्वतंत्र राज्य शिकाऊ (ॲप्रेंटिसशिप) परिषद तयार करण्याची परवानगी दयावी अशी मागणी केली. केंद्र सरकारने ॲप्रेंटिसशिप कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे राज्यांना चांगलाच फायदा झाला आहे. आता एक पाऊल पुढे जात राज्यांना ॲप्रेंटिसशिप परिषद तयार करू दिल्यास छोटे-छोटे अभ्यासक्रम तयार करून  त्यांना प्रमाणीत करता येईल.
केंद्र सरकार राष्ट्रीय कौशल्य विकास विद्यापीठ उभारण्यासंदर्भात विचार करीत आहे त्यासाठी त्यांनी नियमावली तयार करीत आहे. यात  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे महाविद्यालयांचे प्राचार्य हे पीएचडी धारक असावे हा नियम वगळून कौशल्य विद्यापीठाअंतर्गत चालविण्यात येणा-या महाविद्यालयांमधे व्यापार, उद्योग आणि विपणन आदी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणावे लागतील ही बाब लक्षात घेता राज्यांनाही या केंद्राच्या नियमावली अंतर्गत स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करू दयावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी यास सकारात्मकता दर्शविली. याशिवाय जे उमेदवार आठवी पास झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून प्रशिक्षण घेतात  त्यांना दहावी उत्तीर्णचा दर्जा प्राप्त मिळावा. तसेच जे दहावीनंतर प्रशिक्षण घेतात त्यांना पदवी अभ्यासक्रमाला सरळ प्रवेश मिळावा, जेणे करून  तांत्रिक शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढेल यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.  
            देशात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणाशी समकक्ष असावे, यामुळे देशातील तरुण जगात कुठेही रोजगार मिळविण्यासाठी सक्षम ठरु शकेल, या दृष्टीने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात मानकांच्याबाबतीत ऑस्ट्रेलिया व इंग्लड सर्वोत्तम असून त्यांच्यानुसार मानक तयार करण्यात यावे यावर सर्वांनी सहमती दर्शवीली. कौशल्य विकास प्रक्षिणार्थींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण अभियानाला केंद्र शासनाच्या मुद्रा योजना प्रमाणे इतर योजनांना जोडण्याबाबत चर्चा झाली.  
दुष्काळ निवारणाच्या पुरवणी प्रस्तावाबाबत केंद्र लवकरच निर्णय घेणार
        दुष्काळाची भीषणता त्यासाठी राज्य शासनाला पुरवणी प्रस्ताव सादर करण्याची केंद्राकडून मिळालेली मंजुरी ही राज्यातील जनतेला दिलासा देणारी बाब असून राज्याच्या प्रस्तावावर लवकरात-लवकर कार्यवाही होऊन दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. कृषी मंत्रालयाशी समन्वय करून महाराष्ट्राच्या पुरवणी  मागणीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन श्री सिंह यांनी या बैठकीत दिले. राजनाथ सिंह हे दुष्काळाला सामोरे जाणा-या राज्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत.                
ईएसआयसीतर्फे चालणा-या रूग्णालयासाठी राज्यात महामंडळ उभारणार
         राज्याला महामंडळ उभारण्याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाच्यावतीने निर्देश प्राप्त झालेले आहेत. असे महामंडळ स्थापन केल्यास राज्यात रूग्णालये उभारण्यासाठी केंद्राकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाईल.
         ईएसआयसी योजनेअंतर्गत राज्यात विविध रूगणालयामंध्ये कर्मचा-यांना वैदयकीय सुविधा पुरविण्यात येतात. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कामगार लाभ घेतात.
  वृक्षारोपण ईश्वरीय कार्य, पंढरपूरच्या वारक-यांना एक रोपटे प्रसाद म्हणून भेट द्यावे-                                                                                          
                                                                             पंतप्रधान
वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य आहे, दरवर्षी  होणाऱ्या पंढरपूर वारीत भाविकांना प्रसादाच्या रुपात एक रोपटे भेट देण्यात यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे दि. १ जुलै २०१६ रोजी करण्यात येत असलेल्या २ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली. अर्थनियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दि. १ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
       अर्थ–नियोजन  आणि वने मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा केंद्राकडे पाठपुरावा
 श्री मुनगंटीवार यांनी दिल्ली शासकीय भेटीत केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापयन व नियोजन प्राधिकरण(कॅम्पा) अंतर्गत राज्यातील वनसंरक्षण कामांसाठी 196 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. यासह राज्याने पुढील तीन वर्षाचे नियोजन करावे, असे निर्देश श्री जावडेकर यांनी यावेळी दिले. तसेच चंद्रपूर जिल्हयातील हुमन प्रकल्पाबाबत राज्य वन मंडळाने नव्याने प्रस्ताव सादर करावे, असे  केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर सूचना दिल्या.
            केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर  यांच्या सोबत झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्हयातील विसापूर येथे सैनिक शाळा उभारण्याबाबतचा सामंजस्य करार झाला. याच बैठकीत  मराठवाडयातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी इको बटालीयनमिळावी अशी मागणी श्री मुनगंटीवार यांनी  श्री पर्रीकर यांच्याकडे केली या मागणीवर  सकारात्मक करणार असे आश्वासन श्री पर्रीकर यांनी दिले.
केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व जहाजबांधनी मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या  भेटीत राज्यातील महामार्गावरील मोकळया जागेवर वृक्ष लागवड करण्याबाबत चर्चा झाली, याबाबत केंद्र आणि राज्य सरकारमधे लवकरच एक सामंजस्य करण्याबाबत सहमती झाली .
रेल्वेमंत्रायलयाच्या वरीष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत , रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक लवकरच राज्यातील वन विभागाच्या सचिवांशी रेल्वेच्या जागेवर वृक्षारोपण करण्यासंबधी  सामंजस्य करार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. वृक्षारोपणासाठी रेल्वे विभाग 5 लाख हेक्टर जागा उपलब्ध करून देणार आहे.
केंद्रीय पर्यटन आणि नागरीविमान वाहतूक मंत्री महेंश शर्मा यांच्यासोबत झालेल्या भेटीत नांदेड भाविकांच्या सोयीसाठी विमानसेवा सुरु करणे, जुहू विमानतळाचा विकास कराणे, वर्धा येथील  सेवाग्राम आश्रमाच्या विकास कामांसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशा  मागण्या करण्यात आल्या, या सर्व मागण्याबांबत सकारात्मकपणे पावले उचलण्यात येतील असे आश्वासन श्री शर्मा यांनी दिले.
००००