दिल्लीतील आयटीओ(Income
Tax Offices) भागातील विष्णू दिगंबर मार्ग वर लोकांची वरदळ
सुरु होती. भर उन्हात जिथे जीवाची
काहिली होते तिथे याच रस्त्यावर असलेल्या हिंदी भवनाच्या उंच इमारती पुढील मोकळ्या
जागेत एक स्टोव्ह, २-३ चहाची स्वच्छ भांडी आणि मोडक्या
स्टूल वर चहा विकत बसलेला लेखक अस चित्र . विश्वास बसणार नाही ना तुमच !
पण, हो हे खरय.
हे लेखक आहेत लक्ष्मण शिरभाते. त्यांच मूळ गाव
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तळेगाव. केवळ लेखक
बनण्याच्या दुर्दम्य इच्छे पायी लक्ष्मणराव १९७५ साली दिल्लीत आले . 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मण यांना
हिंदी भाषेतील लेखक व्ह्यायच
होत. त्यांनी ११
वी आणि १२ वी च शिक्षण दूरस्थ शिक्षा
पद्धतीने पूर्ण केल . याचप्रमाणे दिल्ली विद्यापिठातूनही त्यांनी
पदविका शिक्षण पूर्ण केल. दर्यागंज मधील
पुस्तक बाजारात जाऊन हिंदी पुस्तक विकत आणून ती वाचण्याचा
त्यांनी छडा लावला अण त्यातूनच
लक्ष्मणरावतील लेखक फुलत होता घडत होता.
' नई दुनिया कि नई कहाणी ' ही त्यांची हिंदीतील पाहिली कादंबरी अर्थात उपन्यास सन १९७९ साली प्रकाशित
झाला आणि लक्ष्मण रावांनी
पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आल. त्यांच्या या कामगिरीचं कौतुक तमाम जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसार माध्यमांनी केल. त्यांना जवळपास ५० पुरस्कारांनी
गौरविण्यात आलं आणि आतापर्यंत
त्यांनी एकूण २४ पुस्तक लिहिली
असून यातील १० पुस्तक प्रकाशित झाली
आहेत. त्यातील बहुतेक
पुस्तकांच्या २-३ आवृत्या
निघाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे नुकतेच त्याचं सत्य घटनांवर आधारित "
अहंकार "
वैचारिक धाटनांच पुस्तक प्रसिध्द
झाल. आश्चर्य तर हे की जर
तुम्हाला या लेखकांच पुस्तक हव असेल तर विष्णू दिगंबर मार्ग वरील त्यांच ‘चहाच दुकान’ हेच प्रकाशन आणि
पुस्तक विक्रीचही ठिकाण आहे. ते आजपर्यंत आपले पुस्तक प्रकाशित
करून घेण्यासाठी कोण्याप्रकाशकाकडे गेले नाहीत .
वर्षाकाठी १ लाख रुपयांचे पुस्तक ते स्वतः याच चहाच्या दुकानावर विकतात. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच हे चहाच दुकान
थाटात चालतंय मात्र, या चहावाल्याची 'लेखक' म्हणून वेगळी ओळख या
मार्गावर आहे. महाराष्ट्राची
पताका दिल्लीत अभिमानाने उंचावणार्या या लेखकाशी
साधलेला संवाद.
प्र :
दिल्लीत येण्याचा आपला उद्देश काय होता ?
उ : मला
लेखक बनायचं होत आणि हिंदी भाषेतच लेखन करायचं होत. त्यावेळी गावाकडे मी प्रयत्न
केला पण ते शक्य झाल नाही. मग काही मित्र आणि शुभ चिंतकांनी मला हे स्वप्न पूर्ण
करण्यासाठी दिल्लीतच जाव लागेल अस सांगितल. आणि मी ही मनाची पूर्ण तयारी करून
दिल्लीत आलो. दिल्लीत आपल घर उभाराव किंवा
नौकरी करावी हे माझ ध्येयच नव्हतं. मला फक्त लेखक व्हायचं होत आणि त्यासाठी उदर
निर्वाहाच आणि माझ संपर्काच साधन म्हणून विष्णू दिगंबर मार्गवरील ‘चहाची टपरी’ सुरु केली . मला दिल्लीत येवून लेखक बनायचं
होत ते स्वप्न मी पूर्ण केल. पण, मला अजूनही की ही सुरुवात असल्याच वाटते. मला खूप
मोठा पल्ला गाठायचाय आणि आता तो पल्लाही यशस्वी होण्याचा आत्मविश्वास माझ्याकडे आहे.
प्र : लेखक
म्हटला की त्याच प्रचंड वाचन असाव,
तो प्रकांड पंडित असावा असा एक सामान्य समज आहे, तुमच्या
बाबतीत हे कस जुळतं ?
उ : मुळात
लेखक हा सहृदयी असावा. त्याला तो त्या सामाजात राहतो त्याच्या अवती-भवती घडणार्या
घटना टिपता आल्या पाहिजेत आणि त्या लोकांना समजतील अश्या पद्धतीने
मांडता आल्या की तो झाला लेखक. पण, त्यासाठी वाचनही करावं लागतं. मी ही आतापर्यंत
विविध लेखकांची , विविध पद्धतीची हजारो हिंदी
पुस्तक वाचून काढली. त्यातून माझ्या लेखणीला धुमारे फुटले आणि जोडीला माझी कल्पकदृष्टी
असा सुरेख मेळ जुळला. दिल्लीत आलो तेंव्हा माझ शिक्षण केवळ १० वी
पर्यंत झालेल. नंतर याच शहरात मी प्रपंच अण व्यवसाय करीत पदविकेपर्यंत शिक्षण
पूर्ण केल.
प्र : तुमचे
आवडते लेख कोण ?
उ : असा एक
लेखक म्हणून सांगता येन थोड अवघड आहे पण, मला गुलशन नंदांच लिखान खूप आवडत. मी
त्यांचा चाहता आहे आणि मला भविष्यात त्यांच्याच
तोडीच लेखन करायच आहे.
प्र : तुम्ही
लेखकही आहात अण प्रकाशकही ?
उ : क्षमा
करा पण, मला प्रकाशक या जमातीचीच चीड आहे. मी सुरुवातीला बर्याच प्रकाशकाकडे गेलो बरेच
उंबरे घासले पण, सर्वांनी मला पुस्तक छापण्यासाठी आव्वाच्या सव्वा रक्कम मागितली
आणि वर पुस्तकाची रॉयल्टी मिळणार नाही अस सांगितल . तेव्हाच निर्णय केला की
स्वतःची पुस्तक स्वतःच प्रकाशित करायची आणि लेखकासोबतच
मी प्रकाशकही झालो. आजपर्यंत मी लिहिलेल्या एकूण २४ पुस्तकांपैकी १० पुस्तक
प्रकाशित केलीय आणि काही पुस्तकांच्या 2-3 आवृत्याही निघाल्यात.
प्र : दुसरा
व्यवसाय न निवडता तुम्ही ही चहाची टपरी अजूनही चालवत आहात या मागे काय कारण आहे ?
उ : लेखक
बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी दिल्लीत आलो तेंव्हा,
याच जागेहून उदर निर्वाहाचे साधन म्हणून मी चहाची टपरी सुरु केली. या जेगेशी आणि
व्यवसायाशी माझ एक नात जुळलं ते गेल्या ३५ वर्षात माझ्याच्यान तुटल नाही.एव्हढंच नाही
सुरुवातीला या जागेहून मला उचलून लावण्याचे उद्योगही झालेत. पण माणसातील प्रतिभा त्याला
मोठ करते या न्यायाने आता लेखक म्हणून माझी वेगळी ओळख निर्माण झाल्याने मला समाजात
आणि या विष्णू दिगंर मार्गावरही विशेष मान
आहे. आणि आता हेच चहाच दुकान माझ संपर्क
कार्यालय, प्रकाशन कार्यालय आणि पुस्तक प्रकाशन कार्यालय झालय.
त्यामुळेच हा व्यवसाय आणि ही जागा मी अजून तरी सोडलेली नाही .