Monday, July 15, 2013

मन मुके का?

मन मुके का? असा प्रश्न पडला आणि त्याच्या शोधात आता लेखनी चालवायचा हा प्रयत्न.

माणसाच्या वागण्या बोलण्याचा मुख्य संबंध शरीराच्या ज्या भागाशी असतो ते म्हणजे मन. मुळात मन हा बुध्दीच्या कप्यात असणारा एक भाग असं याच लोकेशन(तुर्तास वाद बाजुला ठेवू). मनात काही ही कसेही विचार येऊ शकतात. जसे मनात येतं की आपल्याला पंख असावेत ज्यामुळे आपण आकाशातही मुक्‍त विहार करू शकू. हयाच मनात खरमरीत खावं असा विचार येतो .तसेच एखादी मुलगी समोर आली त्यात ती आवडली तर तिला आपण मिठी मारावी तिच चुंबन घ्यावं(मुलगी असेल तर तीच्याही भावना मुलाबद्दल अशा असू शकतात) असही या मनालाच वाटतं. म्हणूनच या मनाला काबूत ठेवणे वा त्याच्यावर सुसंस्कार करणे वैगेरे गोष्टी पुढे आल्या. या मानवी मनाचा परिचय लोक कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी उत्तम प्रकारे करून दिला. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला-हाकला फेरी येतं पिकावर” रामदासांनी तर या मनाने काय करावे नी काय करू नये याचा उपदेशच 'मनाचे श्लोक' मधे लिहून ठेवलयं.  
           तुर्तास, विषय काय लिहावा हा प्रश्न मिटला. पण मनाला आपण किती जपतो त्याला कशा प्रकारचे वातावरण देतो यावर बरच काही अवलंबून असतं अस मला अनुभवाअंती वाटतं. जर झोपडपट्टीत मूलं लहानाचं मोठ झालं तर त्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर घडतात, डॉ किशोर शांताबाई काळे लिखीत कोल्हाटयाच पोर आणि अक्करमासी या लक्ष्मन माने लिखीत कांदबरीतून हे चित्र उभं राहताना आपल्या लक्षात येतं. तर साने गुरूजी लिखित शामची आई या पुस्तकात मुलावर संस्कार करणारी 'आई' असे चित्र दिसते.
        या उदाहरणानंतर स्वानुभवातून या विषयावर प्रकाश टाकावासा वाटतो. घरात आई कडून, आजोडी आजी आणि मामांकडून मिळालेल्या सुसंस्कारामुळे मला खूप फायदा झाला आणि माझी उत्तम जडणघडण होऊ शकली. घरच्या मंडळींनी आग्रहाने उन्हाळी संस्कार शिबीरात घालून या संस्कारात टाकलेली भरही तेवढीच महत्वाची आणि मोलाची आहे. शिक्षण आणि करीअर हा मोठा पल्ला गाठताना शेकडो चेहरे, शेकडो गाव फिरलो पण अजूनही चहा, सिगरेट, दारू, बाई या गोष्टींपासून कोसो दूर राहू शकलो. हे सर्व श्रेय या संस्कारांच आहे अस मी आत्मविश्वासान सांगू शकतो. तर मेट्रो अर्थात दिल्लीतील मेट्रोत प्रवास करताना 7वी,8वी च्या मुली मुक्तपणे बोलतात यार, आज टल्ली होने का मन कर रहा है, एक बोतल भी पडी है घर में …..’  पुढे न बोललेलच बर. मुलींची ही परिस्थिती तर मुलांच काही विचारूच नका आई वडिलांच्या पैस्यांवर दारू, पाटर्या हे नित्याचेच मग त्यात फॅशनच्या नावावर होणारे नको ते प्रकार असं कितीतरी वर्णन करता येईल. त्याचं वर्णन करण्याकरिता नव्यान लिहावं लागेल. पण, आज एवढचं सागांयचय की जीवन घडवण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मनाला घडवावं लागतं ते ज्याला जमलं तो सुखी नी आनंदीही.
      
                          

No comments:

Post a Comment