ती जिंकली........
" मला माझा जीवनसाथी म्हणून तोच हवा आहे, मला पूर्ण खात्री आहे तो मला आनंदी ठेवू शकतो आणि माझी काळजी ही घेऊ शकतो". मुलीचे हे शब्द मध्यमवर्गीय कुटुंबातील मंडळींना अपचनीयच पण प्रंचड विरोधानंतरही तीच म्हणन कुटुंबियांनी ऐकल आणि त्यामुलानेही त्या मुलीला पूर्ण साथ दिली आणि अखेर 4 वर्षांच्या प्रेमाच्या फळ स्वरूप आता त्या दोघांचा विवाह 28 मे 2013 रोजी संपन्न होत आहे. तीने आपले प्रेम तकलादू नसल्याचे जगाला दाखवून दिले खरच ती जिंकली. . She has won the Sweet Battle of Life.
तीने 12 वीच शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या सल्ला-मसलतीसह ग्रामसेवक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षणासाठी घरापासून दूर राहण्याचा तिचा हा आयुष्यातील पहिलाच अनुभव. याचकाळात तीच या प्रशिक्षण संस्थेतील सिनीअर बॅचच्या मुलावर मन जडल तोच तिच्या जीवनातील प्रेमाचा अंकुर. सजगतेतून फुललेल्या प्रेमाच्या या नाजूक भाव भावनांची गुंफन अधिक घट्ट झाली. प्रशिक्षण कालावधी आटोपून दोघही आपपल्या घरी परतले. दोघांनीही पुढील शिक्षण आणि सोबतच नोकरीसाठी धावपड सुरु केली. मुलगा आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घ्यावा म्हणून गावापासून लांब गेला. आता या दोघांच बोलन नुसत मोबाईलहूनच व्हायला लागल. मध्यंतरी मुलीच्या वडिलांच अकाली निधन झाल आणि प्रेमळ वडिलांचा छत्र हरवल्याने ती पूरती खचून गेली. घरातही तिच्यावर अप्रत्यक्ष जबाबदार्याही आल्याच अशात तिचा प्रियकर तिच्यापाठीशी ठाम होता. बघता बघता काळ लोटला आणि लग्नाचा प्रसंग समोर ठाकला. तिनेही नकार न कांदे पोहयांचे अर्थात मुलगी बघाण्याचे दोन कार्यक्रम सुरळी पार पाडू दिले. पण आता चिंता लागली आपल्या प्रेमाच काय ? लग्नाच्या व्यापारात आपल्या मौल्यवान प्रेमाची कवडी मोल किंमत होण तिच्या मनाला कधीच पटेना . मग तीन मनाचा हिय्या केला आपल्या प्रियकाराला विषय समजून सांगीतला त्याची तिला साथ होतीच अशात या मुलीने धाडस दाखवत आपल्या भावना कुटुंबियांना समजावून सांगितल्या. पण आई, काका , मोठे वडील यांचा तिच्या निर्णयाला आणि भावनांना प्रंचड विरोध झाला तिचे आणि त्याच कशातही मन लागत नव्हत पण तो त्याच्या बाजूने ठाम होता वास्तविक भावंडांमध्ये थोरला असल्याने आणि स्वत:चा नवीन उद्योग थाटल्याने तो किमान 1 वर्षाने लग्न करणार होता. पण त्याने तिच्यासाठी आपला निर्णय बदवला आणि कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्याने मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतला.
आता मुलीची बाजू बळकट झाली प्रथमत: जातीतील मुलगा आहे, नात्यातीलही आहे हे निकष लावून मुलीला सज्जड दम देत सांगण्यात आले ‘निर्णय तुझा आहे त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील’ . मुलीचा स्वत:वर आणि आपल्या प्रेमावर एवढा अतुट विश्वास की तीने परिणामाला सामोरे जाण्याच धाडस दाखवल. आणि तिचा विजय झाला ती जिंकली आठडयापुर्वी तीचा साखर पुढा झाला आणि आता ती लग्न या आयुष्यातील मोठया व प्रेमळ नात्याच्या जबाबदारीला पुढे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हो ती जिंकली तीने प्रेमाची लढाई जिंकली.
No comments:
Post a Comment