नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स परिसरात
डौलान उभी असलेली ही मुख्य टपाल कार्यालयाची अर्थात जीपिओची ऐतिहासिक इमारत.१९२१ मध्ये
बांधून पूर्ण झालेली ही इमारत आज त्याच दिमाखात उभी आहे.वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीमुळ
या इमारतीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
नागपूर शहरातील ४० टपाल कार्यालयांच नियंत्रण
या ठिकाणाहून होतं.
या इमारतीवरील घड्याळ हे इथल वैशिष्ट्य.तुम्हाला
ऐकून आश्चर्य होईल गेल्या १०२ वर्षांपासून
हे घड्याळ सुरूय.दर दोन वर्षातून एकदा घड्याळाला चावी भरली जाते. आणि चावी भरणारा माणूसही
नागपुरात एकमेव.
येथील फीलाटली विभागात विशिष्ट प्रकारचं
कार्य चालत.इथ नियमित आणि कोमोमॉरेटिव्ह अशी दोन टपाल तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
एवढंच काय तर सर्वसामान्य माणसाला आपलं टपाल तिकीट काढण्याची सोयही या विभागान करून
दिलीय.
जुन्याकाळी टपाल सेवा देताना पोस्टमनच्या
संरक्षणासाठी वापरण्यात येणारी शस्त्रही इथ बघायला मिळतात.
टपालसेवे व्यतिरिक्त या कार्यालयात केंद्र
व राज्य शासनाच्या विविध बचत योजनाही चालविल्या जातात. ऑनलाइन बँकिंग तसेच एटीएम ची सुविधाही इथ उपलब्ध
आहे.
सकाळी १० वाजता कामाला सुरूवात होण्याआधी
सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथाही इथल वैशिष्ट्य.
नऊ एकर परिसरात डौलान उभी असलेली ही इमारत
आजही सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहे आणि नागपूरच भूषण वाढवीत आहे .
0000

No comments:
Post a Comment