आज
ऑफिसला येताना तरूणाईचे तीन प्रातिनिधीक उदाहरण बघितले अन इथे खरडायला घेतल.
पहिलं उदाहरण.
आज नेहमी प्रमाणे ऑफिसला लगबगीने निघालो, मेट्रो
स्टेशनवर ओळखीतला मराठी चेहरा दिसनं तस दुर्लभ. मात्र, आज तस घडलं. समोर वल्लभ
पाटील(इंजिनीअरींगच्या तिस-या वर्षाला शिकतोय) दिसला हाय-हॅलो
झाला. चालता चालताच मी त्याला विचारलं, ‘आटोपली का परीक्षा?’ तो उत्तरला, ‘हो जस्ट आटोपली!’
लगेच माझा दुसरा प्रश्न, कुठे निघालास? त्यावर
वल्लभचं उत्तर, ‘कॉलेजला जाऊन येतो जरा!’ काही पुस्तकं परत करायची होती लायब्ररीची अस म्हणून त्याने काढता पाय
घेतला. मला ज्या रूटने जायचे होते त्याचं दिशेनं तो झपा- झपा पाय-या चढत मेट्रो
प्लॅट फॉर्मवर उभ्या असलेल्या मेट्रोत शिरला. मी पाय-यांवरच होतो ते पाहून एव्हाना
मेट्रोच्या दारात उभा राहून वल्लभ मलापण हाताने खुनावत होता ये की मेट्रोत. नेमकी
मेट्रो सुटायची वेळ असताना मेट्रोत शिरण्याचा उपदव्याप मी बहुतेक वेळा टाळतो पण
वल्लभच्या हाकेमुळे मी धाडसाने मेट्रोत प्रवेश केला.
दारात उभा राहिलो वर मेट्रो स्टेशनच्या नावाकडे कटाक्ष
टाकला त्यात एका स्टेशनचं नाव होतं ‘दुर्गाबाई
देशमुख नगर’ कुतुहलाने मी वल्लभला म्हटलं, ‘यार हे तर मराठी नाव वाटत !’. त्याने लगेच सांगितल
हो, त्या बाई मुळच्या आंध्रप्रदेशातील
आहेत मात्र ,मराठी व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला ज्यांच्याशी विवाह झाला ते
होते रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर
सी.डी.देशमुख. या तरुणाकडे असलेली इंस्टंट माहिती पाहून
मी अवाक झालो. मी म्हटल मान्य, त्यांचा विवाह मराठी व्यक्तीशी झाला पण त्यांच योगदान? त्यावर वल्लभ म्हणाला, ‘त्या सामाजिक
कार्यकर्त्या होत्या’. मला आश्चर्य वाटल म्हटल कमाल
आहे तुझी, तू बरे माहिती मिळवली ! वल्लभ
म्हटला दिल्लीतील एका भागास हे मराठी नाव असल्याचे बघून मलाही जिज्ञासा निर्माण
झाली अन म्हणून मी शोधून काढली माहिती बस. आता स्टेशन आलं होतं वल्लभ त्याच्या मार्गाने व मी माझ्या
ऑफीसच्या दिशेने निघालो.
Moral of
the Discussion पहिली बाजु तरूण
जिज्ञासू व अभ्यासू असतात दुसरी बाजू पण असे
जिज्ञासू व त्यात सातत्य राखणारे तरूण किती?
दुसर
उदाहरण
एव्हाना
मेन मेट्रोस्टेशनहून(राजीव चौक) ऑफिसकडे
जाण्यासाठी मला वोव्हर फुट ब्रीज पार करून जाव लागणार होत. त्यात एक मुलगी (जेमतेम २० वर्ष वय अंदाजे) शरीर यष्टी अतीशय जाड अगदी
माझ्या आजुबाजुलाच होती ती ही मला ज्या दिशेने जायचे होते त्याच दिशेने मार्गक्रमन
करीत होती. मेट्रोस्टेशनहून बाहेर पळताना
तीन पर्याय होते १ पाय-या चढून जाणे, २
एस्केलेटर(फिरत्या पाय-या ज्यावर नुसत उभ रहाव लागत) आणि ३ लिफ्ट. त्या मुलीने यातील
पहिला पर्याय निवडावा असे तिच्या पकृतीहून वाटले होते मात्र तिच्या सोबतच्या
मैत्रिणीला ती सांगते, ‘चल ना यार
एस्केलेटर और सिडीयोंसे बेहतर तो लिफ्ट है’.
Moral of
the Discussion – दिसती बाजु : तरूण
आळशी व आरोग्याच्याबाबतीत उदासीन असतात दुसरी बाजू शरीराला झेपत नसेल तिथे त्रास करून घेण्याचा
अट्टाहस तरूण टाळतात it mean they are Smart.
तिसरं उदाहरण
मी एस्कलेटरहून बाहेर पडताना मुद्दाम
शेजारच्या सेंटर पार्ककडे कटाक्ष टाकतो, आजही हा शिरस्ता कायम ठेवला तर समोर दोन
तरुण जोडपे. एक जोडपं पूर्णपणे एकमेकांच्या बाहुपाशात तर दुस-या जोडप्यांची त्या
दिशेने तयारी. महत्वाच म्हणजे सकाळी ११ ची वेळ प्रत्येकाला कामावर ऑफिसला जायची
घाई, त्यात मरणाचं उन्ह आणि त्यात तरूणाईचे प्रयोग. ही मंडळी विसी
-पंचविसीच्या वयाची.
Moral of
the Observation – तरूण म्हटल तर बेफिकीर असतात दुसरी बाजू त्यांनाही भाव-भावना आहेत त्यांना व्यक्त
व्हायच आहे.
******

No comments:
Post a Comment