मोठी
उपलब्धी : माननीय राष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलसाठी मराठी अनुवादाची संधी व तीच सोनं.
दिनांक २०
मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती भवनातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विशेष कार्य
अधिकारी अंकीत जैन यांचा दूरध्वनी आला तो मीच उचलला. त्यांनी विचारले आपले साहेब आहेत
का? मी, लगेच त्यांना आमच्या कार्यालय प्रमुखांना दूरध्वनी जोडून दिला.
थोडयात वेळात कार्यालय प्रमुखांनी मला बोलवून घेतले व सांगितले, राष्ट्रपती
महोदयांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात पद्मपुरस्कार प्रदान करण्यात येत असून
त्यांनी महाराष्ट्रातील महोदयांसंदर्भात इंग्रजी ट्विट तयार केले आहेत. तेव्हा
आपल्या कार्यालयास ते ट्विट मराठी भाषेत अनुवाद करावयास सांगितले आहेत, हे काम तू
व्यवस्थितपणे कर. मग काय मराठी ट्टीट तयार आणि साहेबांच्या OK शे-यानंतर राष्ट्रपती भवनास
पाठविले ट्वीट आणि त्या दिवशी राष्ट्रपती महोदयांच्या ट्विटर हँडलहून ते ट्विट प्रसारीत झाले. दिनांक २ एप्रिल २०१८
रोजीही दुस-या टप्प्यातील पद्मपुरस्कार वितरणाच्यावेळी राष्ट्रपती भवनातून अशाच
सूचना प्राप्त झाल्या व ठरल्या प्रमाणे मला कार्यालय प्रमुखांचा आदेश झाला व मिशन
फत्ते. याठिकाणी राष्ट्रपती भवनातून प्राप्त इंग्रजी ट्विट व त्याचा अनुवाद आणि
प्रत्यक्ष राष्ट्रपती महोदयांच्या ट्विटर
हँडलहून प्रसारीत झालेले ट्विट देत आहे.
20 March 2018
Dear Sir,
As discussed, request you to kindly translate
the tweets below into Marathi. Also check that the translated tweet does not
exceed the 280 character limit.
President Kovind
presents Padma Vibushan to Ustad Ghulam Mustafa Khan in the field of music.
Doyen of the Rampur-Sahaswan Gharana, he is a Hindustani classical singer,
music director, scholar and teacher to a long list of notable singers
संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद
यांनी रामपूर साहसवान घराण्याचे गायक
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना #पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हिंदुस्तानी शास्रीय गायक,संगीत दिग्दर्शक, संगीत तज्ज्ञ व अनेक नामवंत गायकांचे गुरु म्हणून ते
विख्यात आहेत.
#PresidentKovind presents Padma Bhushan to Pandit Arvind Parikh in
the field of Art (Music). A sitarist and cultural ambassador of Hindustani
classical music, Pandit Parikh is former Vice President of UNESCO's
International Music Council
#राष्ट्रपतीकोविंद
यांनी संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंडित अरविंद पारिख यांना #पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
सतारवादक व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे राजदूत अशी ओळख असणारे पंडित
पारिख यांनी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय
संगीत परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
#PresidentKovind presents Padma Shri to Dr Abhay Gang and Dr Rani
Bang in Medicine. The duo transformed healthcare in Gadchiroli, Maharashtra,
over 30 years. Their home-based newborn care model significantly reduced infant
mortality and was adopted for pan-India roll out
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद
यांनी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना #पद्मश्री पुरस्काराने
सन्मानित केले. ३०वर्षांहून अधिक काळ बंग दाम्पत्यांनी #गडचिरोली
जिल्हयात आरोग्यसेवा प्रदान केली. नवजात शिशु संगोपणाचे त्यांचे मॉडेल बालमृत्यू
रोखण्यात प्रभावी ठरले आहे.
2 April 2018
President
Kovind presents Padma Shri to Shri Rameshwarlal Kabra Trade & Industry. An
industrialist known for his work in rural and especially tribal India, he is
part of ‘Friends of Tribal Society’ which has set up 30,000 Ekal Vidyalayas
providing free education to 8 lakh children
व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय
योगदानासाठी श्री रामेश्वरलाल काबरा यांना #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ‘फ्रेंड्स ऑफ
ट्रायबल सोसायटी’ च्या माध्यमातून त्यांनी तीस हजार एकल
विद्यालये स्थापित करून आठ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे.
President Kovind presents Padma Shri to Dr Gangadhar V. Panatawane for Literature & Education. A Marathi writer and pioneer of the Dalit Literary Movement, he is the founder of journal 'Asmitadarsh' among the first literary and cultural platforms of Dalit expression
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण
योगदानासाठी डॉ. गंगाधर पानतावणे (मरणोत्तर) यांना #राष्ट्रपतीकोविंद
यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मराठीतील नामवंत साहित्यिक व दलित साहित्य चळवळीचे ते अग्रणी होते,
त्यांनी अस्मितादर्श नियतकालिक सुरु करून
दलितांचा आवाज बुलंद केला.
President
Kovind presents Padma Shri to Shri Manoj Joshi. A versatile theatre, TV and
film actor in Gujarati, Marathi & Hindi. He is famous for essaying the role
of Chanakya on TV
बहुआयामी कलावंत श्री मनोज जोशी यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय
योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. श्री.जोशी हे गुजराती,मराठी व हिंदी रंगभूमी,टीव्ही व चित्रपट क्षेत्रातील
प्रसिध्द कलावंत असून टिव्ही वरील चाणक्य च्या भूमिकेसाठी ते प्रसिध्द आहेत.
Warm
regards,
Ankit Jain
Ankit Jain
OSD (Communication)
President's
Secretariat
Rashtrapati Bhavan
New Delhi-110004
********










No comments:
Post a Comment