............आणि मला उत्तर सापडल
आज ऑफिसला जायला निघालो आणि बस स्थानकावर बसची वाट बघत होतो, त्यावेळी बघितलेलं दृष्य मन विषन्न करणार होत. एक आंधळा माणूस बसच्या प्रतीक्षेत उभा होता तिथेच जेमतेम ९ व्या वर्गात शिकणारे गोरे गोमटे,बुटके, अंगात थोडा मळकट शालेय पोशाख घातलेले मुल छोट्या प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी काढत होते. बघतो तर ते विडी काढत होते. त्यातील साजेशी विडी काढून त्या दोन मुलांपैकी एकाने ती ओठात धरून बघितली. नंतर ती दोघही मुल रस्त्याच्या थोड कडेला झाले आणि त्यांनी विडी पेटवली. आळी- पाळीने झुरके मारू लागले. बसस्थानकावर याच वेळी माझ्या शेजारी चष्मा लावलेला, नीट- नेटका पोशाख घातलेला लहानगा शालेय विध्यार्थी उभा होता तो पण हे दृष्य बघत होता.
आता दिसत्या
घटनेचे आम्ही दोघही साक्षीदार पण मला या प्रश्नाच उत्तर या लहान मुलांच्या
पिढीतील प्रतिनिधीकडून हव होत म्हणून मी त्या मुलाला विचारलं. " कारे तू कोणत्या वर्गात शिकतो आणि कोणत्या शाळेत ? त्याच उत्तर होत सातवीत शिकतोय, केंद्रीय विद्यालायात. त्या मुलाला मी
विचारलं " ती मुल बघिलीस तू ? काय करताहेत ती ? .
तो क्षणाचाही विलंब न करता उत्तरला, "विडी ओढताहेत ते". मग माझा प्रश्न होता
तुझ्यामते ही मुल अस अयोग्य कृत्य का करीत
असतील ? तर तो म्हटला ," वातावरण, ही मुल ज्या शाळेत
शिकताहेत कदाचित तेथील इतर मुल पण अशीच असतील आणि त्यांचच अनुकरण करत असतील "
हे उत्तर मार्मिक आणि खूप समजूतदार पनाच होत. तो मुलगा म्हणाला "भैया मेरी बस
आयी है , अब मै निकलता हू" .
काही वेळानी ती मुल विडी ओढन झाल्यावर परत
बसस्थानकावर आलीत आणि नंतर रोडच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर जाऊन बसले शेजारीच
असलेल्या फुटक्या मडक्याचे तुकडे ते रस्त्यावर फेकत होते आणि त्या तुक्ड्याहून
रस्त्याने जात असलेल्या एखाद्या दुचाकी व चारचाकी गाडीचे चक गेले कि आनंदी होत
होते. थोड्या वेळाने बस स्थानकावर एक गाडी आली त्या मुलांनी तिथेच उभ्या असलेल्या
आंधड्या व्यक्तीचा हक मारत सांगितल " अंकल आप कि बस आगायी है" आणि
त्याचा
हात धरून त्याला बस मध्ये बसवून त्याच बस मध्ये
ती मुल निघून गेली.
आता मात्र माझ्या
डोक्यात वेगाने विचार चक्र सुरु झाल. राजधानी दिल्लीतील एका सरकारी शाळेतील
विध्यार्थी व्यसनाच्या आहारी गेलेत तर देशातील दुर्गम भागात अजूनही जिथ शाळेत शिकायला जायला कोसो दूर पायी चालत
जाव लागत तेथील मुलांची काय अवस्था असेल. संस्कारच मंदिर म्हणवणाऱ्या
शाळातील मुल जर व्यसनाधीन होवू लागले असतील तर दोष कुणाचा ? शिक्षकांचा, आई- वडिलांचा की
स्वतः मुलांचा ? शालेय जीवनात ही कोवळी मुल जर व्यसनाधीन होत
असतील तर पुढ भविष्यात ते समाजाचा घटक म्हणून कसे वागत असतील असे एकानेक प्रश्न
माझ्या टाळक्यात रुंजी घालत होते.
यातच मला ते दिवस आठवले जेंव्हा माझी आई आम्हा
दोघही भावांना शाळेत जाण्याआधी घराशेजारील
मंदिरात पाया पडून आल्याशिवाय घरात दुधाच्या पेल्यास हात लावू देत नव्हती, दुपारी कुशीशी
घेवून धार्मिक व महापुरुषांच्या गोष्टी सांगायची , आठवीत असतापासून आई नेच मला बळजबरीने १ महिन्याच्या उन्हाळी सर्वांगीण विकास शिभिरात पाठवल होत. "माझ्या आईच शिक्षण ८ वा वर्ग पास पण प्रचंड ती व्हिजनरी आहे"
. नंतर मी स्वताहून सलग ७ वर्ष या शिबिरात गेलो. पुढे स्वतःहूनच चंद्रपूर
जिल्ह्यातील, मुल तालुक्यात सोमनाथ या ठिकाणी थोर समाज
सेवक
बाबा आमटे नी सुरु केलेल्या संस्कार शिबिरात
२००२ साली गेलो होतो. शिबिरात स्वावलंबन, मेहनत, सामाजिकता, सुसंवाद, नेतृत्वगुण आदि गोष्टी शिकायला मिळाल्या.
या शिबिरामधून शेकडो मुलांशी संपर्क
यायचा पण त्यातील मोजकीच संस्कारित मुल माझे मित्र झाले. मी मित्र निवडण्याच्या
बाबतीत चुजी झालो. आणि आता मला बस स्थानकावरील भेटलेल्या त्या मुलाचे शब्द
आठवले " वातावरण, ही मुल ज्या शाळेत शिकताहेत कदाचित तेथील इतर
मुल पण अशीच असतील आणि त्यांचच अनुकरण ही विडी ओढणारी मुल करत असतील ". मला
माझ्या प्रश्नच उत्तर मिळाल होत.
·
ही पोस्ट वाचणारयास माझी नम्र विनंती राहील की १५ ते २२ मे
दरम्यान सोमनाथ येथे संस्कार शिबीराच आयोजन केल जात आयुष्यात एकदा तरी हे
शिबीर अटेंड कराव मी खात्री देतो की इथे गेल्यावर तुम्हास एक विजन मिळेल.
विध्यार्थी दशेत जर हे शिबीर अटेंड केल तर मी तर म्हणेल ते सर्वोत्तम होईल. हे
फक्त अनुभावाचेह बोल आहेत. इत्तपर "मर्जी आपकी"
No comments:
Post a Comment