Friday, April 13, 2012

केली पण प्रिती. . . .. .. . . .

केली पण प्रिती. . . .. .. . . .
एक मुलगा जो आपला जीवन साथी निवडावा म्हणून एका मुलीच्या समजून उमजून आणि डोळसपणे प्रेमात पडतो. एकमेकास समजण्याची प्रक्रिया सुरु होते फोन क्वाल, मेसेज आणि काही मोजक्या भेटीही होतात, दोघही एकमेकात गुंततात. लग्नाच्या आणाभाका होतात कस जगायचं? काय करायचं? याबाबतही चर्चा होतात या सर्व घटनाचक्रात एक वर्षाचा कालावधी मागे पडतो . यातच लग्नाचा प्रसंग उभा ठाकतो. ती नेहमी त्याला या विषयांच गांभीर्य समजावून सांगते वेळोवेळी त्याला सांगते की," स्वतःच्या आणि माझ्याही आई- वडिलांजवळ लग्नाचा विचार काढ" . पण, तो या विषयाबाबत प्रचंड गाफील राहतो आणि परिणामस्वरूप तो आणि ती मोठ्या संकटात सापडतात. "तीच लग्न ठरण्याचा दिवस उजाळतो" आज तो तिला आर्जव करतो " एकदा चूक झाली ती मोठ्या मानाने माफ कर पण, आताही वेळ आहे हा कार्यक्रम पार पडण्याआधी आपण सर्वांना समजाऊन सांगू आणि पुन्हा एकत्र येऊ , पण ती त्याला नकार देते " आज मी माझ्या आई वडिलांचा विचार आधी करेल आणि तू आता स्थिती पृर्ववत होण्याची अपेक्षा सोड " सांगते आणि तो पुरता खचून जातो. त्याने तिच्यावर जीवापाड प्रेम केल असत तिच्या शिवाय दुसऱ्या मुलीचा जीवनसाथी म्हणून तो विचारही करुशकत नाही. त्यामुळे तो प्रचंड खचून जातो तीच आता त्याला साथ देण्यास नकार देत असल्याने तो रीतसरपणे या प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय घेतो.
पण इथून कहाणीला नव वळण येत. ज्या मुलासोबत तीच लग्न जुळल तो तिच्या समोर लग्नापूर्वीच काही अटी ठेवतो की, ज्या ती स्वीकारू शकत नाही. ती स्वतःस असुरक्षित समजते आणि परत ती त्या मुलाजवळ जाते.तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळी त्याच्या आणि तिच्याही मनात पुन्हा एकत्र येण्याची आशा निर्माण होते. पण तेही दिवा स्वप्नच ठरते." संबंधित दिवशी तू माझ्यासोबत साखरपुडा करण्यासाठी तयार रहा असा म्हणणारी ती , थोड्या वेळ्याने त्याला मेसेज करून कळवते माझी आई आपल्या लग्नाला नाही म्हणते आणि तो मुलगाही ( ज्याच्याशी लग्न जुळलंय तो ) आता आपल्या अटी माघे घेण्यास तयार आहे आणि हा प्रकार तू प्लीज कुणाला सांगू नको"
परत कहाणीला नव वळण येत. मुलगी "साखरपुड्यासाठी तयार रहा" सांगते म्हटल्यावर नव्या उमेदीने तयारीला लागलेला तो मात्र त्या मेसेजमुळे पुरता खचून जातो आणि आता पुन्हा या प्रकरणात न गुंतण्याचा कठोर निर्णय घेतो तसेच यानंतर जीवनात कुण्या मुलीवर प्रेम नाकारण्याच ठरवतो. तो या विचाराप्रत पोहचतो की," त्या मुलीच आपल्यावर खर प्रेमच नव्हत, केवळ जीवनातील सुरक्षितता म्हणून ती मुलगी आपल्या भावनांशी खेळत होती " जर अस नसत तर कुटुंब, समाज याचा विरोध पत्करून त्याला साथ देण्यासाठी ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असती.पण ती हा तर विचार करत नसेल की," ज्यावेळी मी त्याला माझ्या बाजूने आई वडिलांपुढे उभा रहा अशी विनवणी केली तेंव्हा तो उभा राहिला नाही मग मी का त्याग करावा ? " कदाचित तो तिचा विचार योग्य असेल. पण प्रेमात ध्येय गाठण्यासाठी चुका विसरून दोघांनीही पुढे जायचं असत हेही नाकारता येत नाही. तो आणि ती या प्रकरणातून कसे सावरले ? ती आणि तो सध्या कुठे आणि कसे आहेत ? या सर्व प्रश्नाची उत्तरे पुढील वर्षी याच दिवशी लिहिण्याचा संकल्प घेवून पूर्णविराम देतो.
त्या मुलाच्या भावना व्यक्त करणाऱ्या ओळी इथे नमूद कराव्याश्या वाटतात " अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी , लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती"
---------------------------------------------------------------------------------------------------------------
 आज दिनांक 18 एप्रिल 2013 रोजी म्हणजे तब्बल 1 वर्षाने मी केलेल्या संकल्पानुसार  केली पण्‍ा प्रिती या पोस्टमध्ये उल्लेखित मुला मुलीच्या आयुष्यात काय झाल आणि सध्याची त्यांची स्थिती विषद करणार आहे. 

मुलीचा साखरपुडा पार पडला आणि त्याच दिवशी या मुलाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. नेहमी प्रमाणे त्याला कौतुकाची थाप फारशी कुणी मनातून दिली नाही. पण, एकला चलो रे चं ब्रीद उराशी बाळगून जीवन प्रवास करणार्‍या त्या मुलाची अवस्था 'एका डोळयात आसू तर दुसर्‍या डोळयात हसू' अशी झाली होती.  तो मुलगा पुन्हा आपल्या कामात लागला पण्‍ा त्याच मन कामात लागत नसे त्याच मन त्याला  सारख खात असे अशातही त्या बहाद्दराची भाबडी आशा होती की, तिच्या लग्नाच्या शेवटच्या फेर्‍या पर्यंत आपण आशा सोडायची नाही पण तो पुन्हा अपयशी ठरला त्याची आशा हवेत विरली मुलीचा विवाह संपन्न झाला. तरिही विवाहाच्या दिवशी त्या मुलाने मनाचा हिय्या करुन मुलीला शुभेच्छा दयायला फोन केला आणि तीनेही एवढया घाईत व टेन्शनमध्ये त्याचा फोन घेत शुभेच्छा   स्वीकारल्या. मुलीच लग्न होऊन ती सासरी गेली पण या मुलाच मन स्वत:ला खात होत. त्या मुलीच आपल्यावर खर प्रेम नव्हत तीने नुसता स्वॉफ्ट टार्गेट  म्हणून आपला वापर केला असा त्याचा ग्रह झाला होता जो होने साहाजीकही होते. त्याने ही आता ठरवल होत असेही आता आपण त्या मुलीपासून दूर झालोच आहोत तर एकदा आपल्या मनातील शंका तिला विचारून मोकळ व्हाव पण्‍ा तिच तर लग्न झाल मग कस विचाराव ? हा प्रश्नही होताच पण तरी त्याने पुन्हा एकदा मनाचा हिय्या करून तिला फोन केला आणि तिला विचारलं "तू माझ्यावर खरच प्रेम केल होत का? , तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय स्वत:च्या आई -वडिलांना समजावून सांगण्या इतपत भेकाड होतीस का? आणि का ?" यावर तीच उत्तर होत हो मी तुझ्यावर खर प्रेम केल आणि मी भेकाड होती मात्र का ? याच उत्तर माझ्याकडे नाही.  त्याचवेळी मुलाने म्हटल या प्रश्नांचे खरे नी स्पष्ट उत्तर ऐकूण तुझ्या आयुष्यातून बाहेर पडण्याचा माझा खंबीर निर्णय होता तो कायम आहे पण तू माझ्या प्रश्नांच समर्पक उत्तर  दिल नाही थोड धाडस केल असत तर आपल प्रेम लग्नात परावर्तीत झाल असत आणि आजही तू स्पस्ट बोलायच धाडस करत नाहिएस. तेव्हा आज पासून हे चाप्टर क्लोज आणि आपले फोन वरुन संवादही बंद. पण त्याला रहावे ना लग्नानंतरही तो त्या मुलीची आठवण झाल्यावर तिला फोन करीत असे आणि ती सुध्दा फोन उचलत असे. ते दोघ एकमेंकांचे जोडीदार होऊ शकले नाहीत पण त्यांनी आपल्या निखळ मैत्रीच नात जपलयं. पुढे त्या मुलाने कष्ट उपसून सरकारी नोकरी मिळवली व स्वत:ला सिध्द करुन दाखवल. तेव्हाही त्या मुलाने घरी फोन करुन झाल्यानंतर पहिला फोन तिलाच करुन ही गोड बातमी ऐकवली. हो एक चांगली गोष्ट म्हणजे लग्नानंतरही तीने आपले पदव्युत्तर शिक्षणाचे पेपर दिलेय. आता तिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे तीला तिच्या नवर्‍याने आणि कुटुंबाने घालून दिलेल्या चाकोरित पण चेहर्‍यावर स्मीत करत आणि  तिच्याच शब्दात सांगायचे तर  "आनंदी जीवन जगतेय" वास्तव सांगयचे तर तिच्या सो कॉल्ड उद्योगपती नवर्‍याला तीला हनीमूनला घेऊन जाण्यासाठी अजून पर्यंत सवड मिळालेली नाही तिचा ऑलवेज ड्रिम असलेला आग्रयाचा ताजमहाल बघण्याची इच्छाहीही लग्नानंतर अपूर्णच आहे.
                           तो मुलगा तर लग्न करून 'आयुष्याची वाट पुढे रेटेल' ती सुध्दा 'त्याग बीग' करुन संसाराचा गाडा पुढे रेटेल. पण प्रश्न अनुत्तरीतच आहे ' त्या मुलाच्या भावनाही त्याच आहेत' 
" अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी , लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती"           

No comments:

Post a Comment