Saturday, September 17, 2016

पंतप्रधान मोदी वक्ता सहस्त्रेषु आणि अजूनही : त्यांच्या ६७व्या वाढदिवसा निमीत्त



         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७ वा वाढदिवस. या देशाचा सामान्य नागरीक म्हणून माझ्या नजरेतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडायचा मोह आवरला नाही म्हणून हा लेख प्रपंच. मी, व्यक्तीपूजक नाही आणि कोणत्या राजकीय पक्षाचा फॉलोअरही नाही हे मी आधिच स्पष्ट करतो.
         मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचा मला भावलेला पैलू म्हणजे त्यांचे अमोघ वक्तृत्च. बहुतेक नेते मंडळी ही त्यांच्या वक्तृत्चामुळे ओळखले जातात. मोदी ही त्याला अपवाद नाहीत उलट ते एक सरस वक्ते आहेत असच म्हणाव लागेल. पंतप्रधान होण्या आधी मी त्यांचे एकही भाषण ऐकले नाही ही विशेषत्वाने नमूद करतो. मात्र, विविध कार्यक्रमांमध्ये(ज्यातील काही कार्यक्रमांचे मी स्वत: कव्हरेज केले.), परदेश दौ-यांमधे आणि मन की बात या रेडीओ कार्यक्रमातील त्यांच्या भाषण शैलीचा मी बारकाईने अभ्यास केला. मनाला भिडणारे शब्द, शब्द फेक, उच्चारणातील चढ-उतार आणि उत्तम हाव भाव हे त्यांच्या वक्तृत्वातील ठळक वैशिष्टे.  प्रत्येक भाषणात नावीन्यपूर्ण संकल्पना असतात त्यांच्या. २०१४ च्या निवडणूक प्रचारातील भाषणांमध्ये दिवसाला ४ प्रचार सभा असतील तर तेथील त्यांचा पेहराव आणि भाषणातील मुद्दे एकदम वेगळे मात्र स्थानिक प्रश्नांची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक प्रश्नांना साद घालणारे वक्तव्य ते आपल्या शैलीने लिलया पेरतात हा माझा अनुभव. सरकारी कार्यक्रम वा योजनांच्या उदघाटन प्रसंगीचं भाषण त्याहून वेगळ त्यात आव्हान करणारे वक्तव्य मनाला भीडतात. सामन्य जनतेला संबोधून करण्यात येणार  लाल किल्ल्यावरील स्वातंत्र दिनाचं भाषण हे राजकीय सामाजिक आणि आर्थिक अशा विविध छटा असणारं. आता हे भाषण मोदी साहेब स्वत: तर तयार करीत नसतील अर्थात त्यांच्याकडे वेळ नसतो.मात्र, भाषणाचे मुद्दे मिळाल्या नंतर ते फुलवण्याच त्यांच कौशल्य भारी आहे.
           संसद भवनातील ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार वितरण कार्यक्रमातील भाषण, १५ ऑगस्ट २०१५ रोजीचे लाल किल्यावरील भाषण, सेतू भारतम या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या योजनेच्या शुभारंभातील भाषण,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील त्यांचे भाषण आणि २८ जानेवारी २०१६ रोजी एनसीसी कॅडेट्सला पंतप्रधान बॅनर वितरण कार्यक्रमातील भाषणाचे वार्तांकण करण्याची मला संधी मिळाली हे इथे आवर्जून नमूद करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पंतप्रधानांना काही अंतराहून बघण्याची संधी मिळाली. यात बहूतेक वेळा माझी पत्नीही सोबत होती त्यामुळे तिलाही मोंदीच दर्शन घडल.
         पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या वहील्या गणतंत्र दिनी २६ जानेवारी २०१५ रोजी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे असताना मोदींना सर्व नियम व सुरक्षा बाजुला ठेवून वर हात करून उपस्थितांना केलेले अभिवादन म्हणजे आम्ही दोघांनी त्यांना १० ते १५ फुट अंतराहून बघण्याचा सुखद प्रसंग. त्यानंतर ऑफीसचा कॅमेरामन नसल्यानं स्वत: कॅमेरा चालवत महाराष्ट्र सदनात आयोजित मुख्यमंत्री परिषदेच्या समारोपाचे वक्ते म्हणून संबोधीत करण्याकरीता आलेले मोदी हे मला पुन्हा एकदा १० ते १५ फुटांहून पाहण्याची मिळालेली संधी.            
        आता थोड कामाबद्दल . पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशात स्वच्छतेला प्राधान्य देत सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान’, पायाभूत सुविधांनी सज्ज अशा शहरांची संकल्पना असलेले स्मार्ट सिटी’  प्रकल्प, आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत सुरु झालेली पंतप्रधान जनधन योजना’, मुलींचा  घटत जाणारा जन्मदर रोखण्यासाठी सुरु झालेली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान,  बेरोजगरांना काम आणि उद्योगांना कुशल कामगार देणारी स्कील इंडिया ही योजना,  कृषी क्षेत्रात मोलाची ठरणारी पंतप्रधान पिक विमा योजनाअशा महत्वाच्या योजना वैशिष्ट पूर्ण म्हणता येईल त्याच्या प्रत्यक्ष व चोख अंमलबजावणीमुळे मोठा देशात मोठा व सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होईल हे निश्चित.
           काही दुर्देवी घटनाही घडल्या. मुस्लीम व दलीत बांधवांवर झालेले अत्याचार, महिलांवर झालेले अत्याचारही आपल्याला दृष्टी आड करून चालत नाहीत. जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादयांच्या कारावयांमुळे गालबोट लागले.उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्र सरकारकडून झालेला प्रयत्न आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र  सरकारला लगावलेली चपराक सुध्दा चर्चेचा विषय झाला.
     याच काळात शिक्षक दिनी पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत स्वत: उपस्थित राहून संशोधकांना दिलेले प्रोत्साहन, रीओ ऑल्म्पिक मधे भाग घेण्यासाठी जाणा-या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छा आदी बाबी उल्लेखनीय वाटल्या.                                       
         योजना आयोगाचे नाव बदलून निती आयोग करणे, कृषी मंत्रालयाला जोडून शेतकरी कल्याण नामकरण करणे या बाबींचा विचारही महत्वाचा ठरतो. मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला थेट जनतेशी संवाद करण्याची त्यांची शैलीही उत्तम ठरते. विविध राज्यांतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून त्या-त्या राज्यांच्या मुख्य सचिवांशी दर महिन्याला  घेत असलेली बैठक याचाही उल्लेख महत्वाचा ठरेल.
        विदेश नितीचा विचार करता सकारात्मक बाबी दिसून येतात. ज्या अमेरीकेने मोदींना व्हिजा नाकारला होता त्याच अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांशी त्यांचे जुडलेले टयुनींग संपूर्ण जगाने पाहीले त्यामुळे आशिया खंडात भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. अमेरीकेने भारताला संयुक्त राष्ट्र संघात स्थायी सदस्यत्वासाठी जाहीर केलेला पाठींबा आणि अमेरीकी संसदे संबोधित करण्यासाठी मोदींना देण्यात आलेले निमंत्रण हे जागतिक राजकारणात महत्वाचे ठरते. जपान, चिन, अमेरिका, इंग्लड सासख्या बलाढय देशांसह आखाती देशांसोबतची मैत्री  जागतिक राजकारणात महत्वाची ठरते. परदेश दौ-यात भारतीयांना संबोधन म्हणजे कुटनितीक दृष्टया महत्वाचे ठरले. प्रत्येक देशांशी भारताचे व्यापारीक व नैसर्गीक संबंध सुधारण्याच्या दिशेने ते महत्वाचे पाऊले ठरतात. पंतप्रधानपदाची शपथ घेतानाच सार्क देशाच्या प्रमुखांना मोदींनी निमंत्रित करून नवा पायंडा पाडला हे ही इथे उल्लेखनीय.
      दर वाढदिवासाला आपल्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी जाणारे मोदी  आणि पक्ष व देशा प्रती  त्यांची असलेली श्रध्दा एका सच्या मानसाची ओळख करून देते.
    

Wednesday, August 31, 2016

कल्पक व भावनाशिल चित्रकार श्री. चक्रधर हिवसे




              श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्तवेधक चित्रांनी उभी केली पंढरीची वारी
आलीया संसारा उठा वेग करा ! शरण जा उदारा पांडुरंगाया संतोक्तीनुसार सर्वांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा निर्देश केलेला आपणास जाणवतो. देश व राज्याच्या कानाकोप-यातून पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात भक्त सध्या मोठया प्रमाणात उपस्थित आहेत. आषाढीवारी निमित्त महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसूसले आहेत. हाच धागा धरुन मानवी मनाचा भाव आपल्या चित्रांमधून नेमकेपणाने मांडणारे प्रसिध्द चित्रकार चक्रधर हिवसे यांनी पांडुरंगाचे व त्याच्या लाडक्या भक्तांचे भाव आपल्या चित्रांतून नेमकेपणाने मांडले आहेत.
वारक-यांचा शूभ्र वेष परिधान केलेला, भाळी चंदनाचा टिळा, गळयात तूळशीची माळ आणि हाती चिपळया- विणा असणारा चित्रातील वारकरी आणि त्याच्या मागोमाग पताका, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जात नामजप करणा-या महिला वारक-यांचा जथ्था यासर्वांच्या मनोभावे भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना प्रेरणा देणारा चित्रातील पांडुरंग. अशी अप्रतिम कलाकृती श्री. हिवसे यांच्या चित्रातून कला रसीकांना भेटते.  
            श्री. हिवसे यांनी या चित्रांमधे केलेला रेषा, प्रकाश आणि रंगसंगतीचा अचूक व नेमका वापर यामुळे पंढरपूरच्या वारीचे चित्र ठळकपणे आपल्या डोळयांसमोर उभे राहते. एका चित्रात त्यांनी पांडुरंगाची भलीमोठी प्रतिमा उभारली असून त्यात पांडुरंगाच्या भावमुद्रेला नेमकेपणाने टिपताना मस्तकावरील मळवट, कानातील मत्स्य कुंडले, शिरावरील मुकुट बघून कस्तूरी मळवट श्रीमुख शोभले सूखाचे ओतले सकळहीअसे संतानी पांडुरंगाच्या रूपाचे केलेले वर्णन आपणास अनुभवास येते. 
पंढरिच्यावारीचा अनुभव करून देणारे  प्रसिध्द चित्रकार व 
माझे गुरु श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्रांना मानाचा मुजरा.


Tuesday, August 30, 2016

माणसान ‘चांगलं दिसाव की चांगल असावं’

 या ग्रुपमध्ये मध्यभागी चसमा परिधान केलेली मुलगी प्रतिभा सेठ

तब्बल १७ वर्ष जुनी आठवण. उन्हाळयात शाळेला सुटी लागल्यानंतर मे महिन्यात मी, संर्वांगीन विकास शिबीरात जायचो. तिथे मला शिकविणा-या शिक्षकांनी, प्रश्न विचारला होता. रितेश मला सांग, माणसाने चांगलं दिसावं की चांगलं असावं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी १ महिन्याचा कालावधी घेतला होता. दरम्यान, माझ्या निरीक्षणाच्या आधारावर मी या प्रश्नाच उत्तर दिल होत माणसाने चांगलं असावं’. या गोष्टीला तब्बल दीड तप(पंधरा वर्षांहून अधिक काळ) लोटून गेल आहे आणि आज परत त्या प्रश्नाचं ठोस उत्तर माझ्या जवळ आहे जे मी अनुभवातून सांगू शकतो की, माणासाने चांगलं असणंच श्रेष्ठ आहे.
मेट्रो रेल्वे स्थानकावर उभी असलेली सुंदर निटनेटकी मुलगी ही मांजाने कबुत्तराचा जीव जाणार हे पाहून विव्हळते व त्याला वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न करते. मराठीतील एफआयआर हिंदीत अनुवादीत करण्यासाठी आलेल्या गरीब इसमाचे काम विनामुल्य करून दिल्याबद्दल त्याने गहीवरून जाऊन उपकारादाखल माझे धरलेले पाय आणि काल चक्क आपल्या मित्र मैत्रिनींसमोर मला हस्तांदोलन करत एका सुंदर तरूणीने म्हटलेलं वाक्य, ‘आप बडे अच्छे हो. मला तब्बल दीड तपाने त्या प्रश्नाच उत्तर देऊन गेलं.
            १५ ऑगस्टचा दिवस. दिल्लीत या दिवशी पंतग उडवून आनंद व्यक्त करण्याची पध्दत आहे. मात्र, आता याला विभस्त रूप आलं आहे. घराच्या छतावर कर्णकर्षक आवाजात डिजे लाऊन बीअरच्या बाटल्या रिचवत पतंगबाजी करण्याचा नवीन ट्रेंड येथील तरूणाईत बघायला मिळतो. याच्या अगदी विपरीत चित्रही आहे , भाऊक आणि भूतदया माणणारी पिढीही इथे बघायला मिळते. एकमेकांच्या पतंगा कापन्यासाठी त-हे- त-हेचे मांजे वापरले जातात आणि यामुळे आकाशात उडणारे पक्षी मांजाने चखमी होतात कधी-कधी तर त्यांचा नाहक बळी जातो. आता अनुभव सांगतो. १५ ऑगस्ट रोजी माझी डयुटी असल्याने मी लगभगीत मेट्रोने जायला निघालो. मेट्रो स्टेशनवर एक सुंदर मुलगी माझ्या शेजारी उभी होती. आम्ही मेट्रोची वाट बघत होतो. एकदमच ही मुलगी मागे वळली आणि पाय-या उतरत असल्याचे बघून मी अवाक झालो नेमक काय झाल म्हणून मी कुतुहलाने बघायला गेलो तर, मांजात वाईट पध्दतीने टिनाच्या शेडला अडकलेल्या कबुत्तराला सोडविण्याचा प्रयत्न ती मुलगी करीत होती. मी तिथे गेलो आणि तिला म्हटल, मांजा ओढून कबुत्तराला सोडविण्यात त्याला इजा होईल तर मी मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला बोलवितो आणि त्याच्या मदतीने आपण कबुत्तराला वाचवू. तेवढयात तिथे आलेल्या ३५ शीतल्या तरूणाने आपला जीव धोक्यात घालवून त्या कबुत्तराला वाचविण्याचा प्रयत्न केला. बघता –बघता तिथून जाणा-या मेट्रो प्रवाशांची गर्दी जमली. कबुत्तराचा प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. मी तिथून निसटलो आणि मेट्रो कंट्रोल रूममधे जाऊन सुरक्षा रक्षकाला घेऊन आलो. तर काय कबुत्तराची सुटका झाली होती आणि गर्दी पांगली होती. हा अनुभव म्हणजे त्या मुलीचं चांगल असण अधोरेखित करून गेला. ती दिसायला सुंदर होतीच पण मनान आणखीही सुंदर होती  म्हणूनच मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी तीने पुढाकार घेतला आणि बघता बघता तिच्या कार्याला जनतेचाही पाठींबा मिळाला.
            अनुभव क्र. २. कामात असताना माझ्या कॅबीन मध्ये एक गृहस्थ अगदी साध्या वेशात पण चिंताग्रस्त चेहरा अशा अवस्थेत शिरले. आणि त्यांनी मला काही एफआयआरची कागद दाखवत विचारणा केली ,साहब इसका हिंदी में ट्रान्सलेशन करना है कितना खर्चा आएगा और क्या आप कर सकतो हो?. मी उत्तरलो हिंदी में काम है तो एक पेज का १५० रूपये(त्यांनी ६ पेज आणले होते). मग ते म्हणाले कुछ कम करों न साहब पैसे. मी म्हटल ८ साल से एकही रेट ले रहा हॅुं मै काम का. और मराठी से हिंदी , अंग्रेजी में ट्रान्सलेशन करके जरूरत मंदो को मदद करना ही हेतु है मेरा. यदी आपको कही और से कराना है तो मै आपको उनके भी मोबाईल नंबर देता हुं. हे ऐकूण त्यांनी निरागसपणे सांगित आपही करदो साहब मै किसे किसे और कहा कहा ढुंडता फिरू. आणि ते गृहस्थ निघून गेले. त्यांचा अगदी साधा मोबाईल ते माझ्या कॅबीन मधे विसरून गेले. मी तो मोबाईल सांभाळून ठेवला थोडया वेळाने ते मोबाईलच्या शोधात आले  सापडलेला मोबाई मी  त्यांना परत केला. दुस-या दिवशी ते ट्रांन्सलेशनच काम घ्यायला आले. पण मी बातमी कव्हरेज करण्यासाठी बाहेर गेलो होतो( राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान). त्यामुळे त्या गृहस्थांना २ तास ताटकळत बसाव लागल पण त्यांना त्याचा काहीही त्रागा झाला नाही नइफॅक्ट त्यांनी तो बोलवून दाखवलाही नाही. मग मी त्यांना हिंदी अनुवादीत पान प्रींट काढून दिली. त्यांनी ती बघीतली आणि खिशातील प्लॅस्टीकच्या पिशवीतून पिशवी करत एक एक शंभरची नोट ते काढत मोजून त्यांनी माझ्या हातात ९०० रूपये टेकवले. मी त्यांच्या निरागस व चिंताग्रस्त चेह-याकडे पाहत म्हटल, रहने दो अंकल मुझे पैसे नही चाहीए. इन पैसो को आप किसी अच्छे चिज के लिए इस्तेमाल करना. अस म्हणताच त्यांनी पैसे खिशात ठेवले आणि माझे पाय पकडले. मी  म्हटल ये क्या कर रहे हो आप. त्यावर ते म्हटले साहब बडी मेहरबानी हुई आपकी.  मुळात मी जेव्हा एफआयआर ट्रान्सलेशन करायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आल. की या गृहस्थाचे दोन मुल मुंबईत कामासाठी गेले. तिथे ट्रकवर क्लिनर म्हणून काम करून उत्तर प्रदेशातील आपल्या घरी ती दोघे पैसे पाठवत असत त्यावरच त्यांच घर चालत असे. या दोघा मुलांपैकी मोठया मुलाचा मध्यरात्री ट्रकच्या गॅलरीहून उतरताना पाय घरून पडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्या गृहस्थाला पुढील कारवाईसाठी विमा कंपनीत हा एफआयआर जमा करण्यासाठी हिंदीत अनुवादीत करून हवा होता. ही परिस्थिती एफआयआर करताना कळताच मला गहीवरून आल मग माणूसकीच्या नात जपतच मी त्या अनुवादाचे पैसे घेतले नाहीत. या अनुभवातून मलाच माझा अभिमान वाटला आण माझ्यातील चांगूल पण जिवंत ठेवण्याची उर्जा मिळाली.
            अनुभव क्र.३. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंडिया गेट समोरील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट २०१६ दरम्यान भारत पर्व नावाने महा प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारत देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि महान इतिहास दर्शविण्याचा तसेच विविध राज्यातील हस्तकला, खाद्य पदार्थ आणि त्या त्या राज्यांची उपलब्धीही दर्शविण्यात आली होती. महाराष्ट्राच्यावतीने या प्रदर्शनात ३ दालने उभारण्यात आली होती. आणि कार्यालयाने या कामाच्या प्रसिध्दीची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. दिनांक १६ ऑगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे महाराष्ट्र दालना गेलो तिथे भेट देणा-या लोकांना आपल्या दालना विषयी माहिती देत असतानाच मला दोन विदेशी मुल दिसले. अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स मी त्यांना या दालना विषयी आणि महाराष्ट्रा विषयी माहिती दिली त्यांची इन कॅमेरा मुलाखातही घेतली. यानंतर लगेचच आमच्या दालनात मुला मुलींचा घोळका शिरला. ही सर्व मुल मुली दिल्ली विद्यापीठाच्या  राज्यशास्त्र विभागात पदव्युत्तर  शिक्षण घेत असल्याचे कळले. मी त्या सर्वांना आमच्या डिजीटल दालनाची सैर घडवली त्यांना महाराष्ट्रा विषयी दालनात मांडण्यात आलेली माहिती दिली. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली ती त्यांना फारच आवडली. याचा कळस म्हणजे दिसायला सुरेख आणि हुशार असणारी,राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली प्रतिभा सेठ नावाची मुलगी या सर्व मुला मुलींच्या घोळक्यातून माझ्या समोर आली. आणि तीने चक्क सर्वांसमोर मला हस्तांदोलन केल आणि म्हणाली,‘सर आप बडे अच्छे हो. हे ऐकूण माझ्यासह माझ्या कार्यालयाचे आणि दालनात उपस्थित कर्मचारी यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, मला माझ्या कामाची पावती मिळाली. आपण चांगल आणि मनापासून काम केल की त्याची पावती आपल्याला नक्की मिळते. मग मला आठवल की याच खर गुपीत दडलय ते माणूस चांगला दिसण्या पेक्षा चांगला असण्यात दडलयं.
                              ००००००००००   

महाराष्ट्राच्या देशभक्तीपर कार्यक्रमाने “भारत पर्व” चा समारोप ; 40 हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांची महाराष्ट्र दालनास भेट





नवी दिल्ली, 18 : महाराष्ट्राच्या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने भारत पर्वप्रदर्शनाचा आज समारोप झाला. प्रदर्शन काळात महाराष्ट्र दालनास जवळपास 4० हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांनी भेट दिली.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने 70 व्या स्वतंत्र दिनानिमित्त राजपथ लॉनवर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधित भारत पर्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज सुभाष नकाशे यांच्या दिग्दर्शनाखालील राज्यातील 300 कलाकारांचा सहभाग असणा-या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी  केंद्रीय नगर विकास, माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, पर्यटन सांस्कृतिक मंत्री  डॉ. महेश शर्मा, माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
            विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची तीन दालने या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनाला उदंड प्रतिसाद मिळाला . या ठिकाणी  ‘मेकइन महाराष्ट्राच्या माध्यमातून  राज्यात झालेली गुंतवणूक  विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात ले.  महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवी दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान  हे आकर्षक पॅनलच्या माध्यमांतून येथे भेट देणा-यांपर्यंत पोहचविण्या आले. ‘व्हर्च्यअल टुरीजमच्या माध्यमातून  शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर घडविण्यात आली. अन्य एका एलइडीवर फेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद येथे येणा-या प्रेक्षकांनी घेतला. या दालनास भेट देणा-या शाळकरी , महाविद्यालयीन मुलांनी पझल गेमच्या माध्यमातून लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र जोडून या महापुरुषांविषयी जाणून घेतले. ‘ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळाला.
                 राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले. यात राज्यातील ७ लघु उद्योजकांनी  सहभाग घेतला. पैठणी साडया, वारली पेटींग, लाखाच्या बांगडया, कोल्हापूरी चपला, हुपरी ज्वेलरी, आयुर्वेदिक साबण , पॅच वर्क, सतार आदी वस्तुंचे स्टॉल येथे लावण्यात आले. प्रदर्शनासोबतच या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या, मोठया प्रमाणा वस्तूंची विक्री झाल्याले लघु उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. 
खाद्य दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणा-या प्रेक्षकांना चाखता आली. पुरण पोळी, साबुदाना खिचडी, साबुदाना वडा, पीठल भाकरी, भरली वांगी, वडा पाव, मिसळ पाव आदी मराठमोडया व्यंजनांचा खवय्ये ग्राहकांनी मनमुराद आनंद घेतला.  
                     महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला उदंड प्रतिसाद
डिजीटल दालनात महाराष्ट्र अहेड व लोकराज्य या महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्राचा स्टॉल लावण्यात आला. केंद्रीय पर्यटन   सांस्कृतिक मंत्री  डॉ. महेश शर्मा आणि संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे  यांनी  या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला. प्रदर्शन काळात विविध क्षेत्रात कार्यरत अधिकारी, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या तरूणांचा या स्टॉल ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्टॉल वर भेट देणा-यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला.
००००००००००

भारत पर्व : देश-विदेशातील तरुणांना ‘व्हिजीट महाराष्ट्र’ चे आकर्षण




नवी दिल्ली, 17:  महाराष्ट्र दालनास भेट  दिल्यावर देश-विदेशातील तरुणांनी राज्यातील पर्यटन स्थळांना  भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या निमित्ताने राज्य शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र-2017 ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.   
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पारशी नववर्ष दिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनात बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा पाचवा दिवस असून इथे भेट देणा-या देश–विदेशातील तरुणांनी  महाराष्ट्र दालनात एकच गर्दी केली. इथे डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबाबत, पर्यटन स्थळांबाबत आणि राज्यातील महापुरुषांचे  स्वातंत्र्य चळवळ व देश विकासातील योगदानाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे. आणि हे दालन तंत्रज्ञान युगात वावरणा-या  देश विदेशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरत आहे.
अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स सध्या भारत भेटीवर असून आज त्यांनी भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास भेट दिली. दालनाबद्दल सांगताना सॅम सांगतो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचा प्रयोग करुन दर्शविण्यात आलेला महाराष्ट्र मला खूप आवडला. एलइडी वॉल वर दिसणारा ताडोबा जंगलातील वाघ आणि त्याच्या सोबत सेल्फी घेण्याचा अनुभव फारच छान  होता.  तर ॲलेक्स सांगतो, इथे ठेवण्यात आलेला पझल गेम मी खेळलो आणि लोकमान्य टिळक या महापुरुषाचे चित्र यशस्वीरित्या तयार केले. पुणेरी पगडी आणि फेटा परिधान केला. येथील विविध स्क्रीनवर दर्शविण्यात आलेली महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयची माहिती अप्रतिम आहे. ॲलेक्स आणि सॅम यांनी या दालनात महाराष्ट्रा विषयी उत्तम माहिती मिळाल्याचे सांगून आम्ही लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे सांगितले. या दोघांना महाराष्ट्रातील प्रसिध्द लोणावळा चिक्की आणि व्हिजीट महाराष्ट्र ची कॅप भेट स्वरुपात देण्यात आली.  
दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चमुने महाराष्ट्र दालनास भेट दिली. त्यांना हे दालन फार आवडले. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला निरज कुमार भारत सांगतो, व्हर्च्यअल टुरीच्या माध्यमातून  शिर्डी  येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर ा दालनात करायला मिळाली. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या सामाजिक सुधारणेतील योगदान तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदानबद्दल उपयुक्त माहिती मिळाल्याचे तो सांगतो. याआधी आपण वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला भेट दिली असून महाराष्ट्र दालनातील प्रदर्शनामुळे मी प्रभावित झालो आहे व लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली  प्रतिभा सेठ सांगते, एलइडीवरफेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता आला. विशेष म्हणजे, याची छायाचित्रे ब्लूटूथ वायफायच्या माध्यमातून मला व माझ्या मैत्रिणींना मोबाईलमध्ये घेण्याची  इथे सोय करून देण्यात आली त्यामुळे आंनदात आणखी भर पडली. ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभवही मजेशीर होता असे तीने सांगितले.आम्हा सर्व मैत्रिणींना महाराष्ट्र दालनातील प्रदर्शन खूप आवडले असून आम्ही सर्व महाराष्ट्राला लवकरच भेट देणार असल्याचे तीने सांगितले. 

यावर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाजत्रा प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीट महाराष्ट्र-2017 ची घोषणा केली. आणि राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी महाराष्ट्रास भेट द्या अशा शब्दात दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना  खुले निमंत्रण दिले होते. त्यास भारत पर्व मधे  देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.