Tuesday, November 15, 2022

यंत्र आणि वेळेची ऐसीतैसी

मानवी प्रगतीच्या अनेक मानदंडापैकी एक म्हणजे यंत्र. या साधनाने मानवाच्या प्रगतीत जेवढी मोलाची भूमिका वठवली तेवढेच मानवाचे नुकसानही झाले आहे, याचा प्रत्ययच आज एस.टी. बसमध्ये आला. परतवाड्याहून अकोल्यासाठी निघालेली ही बस आपल्या नियत प्रवसादरम्यान अचानक थांबली. कुणाला ऑफिसला पोचायचय, कुणाला कोर्टाची तारीख ,लग्न अटेंड करायची लगबग तर विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज व क्लासेस अटेंड करण्याची घाई असल्याने या बसच्या अकोल्यात पोचण्याच्या बेताने आखलेले सर्व नियोजन खटक्यात कोलमडले. गाडीचे वाहक आपल्याजवळ असलेल्या तिकीट यंत्रात काही तरी सारखे उघड झाप करतायेत हे पाहून एव्हाना शांत झालेल्या सर्व प्रवाशांना कळून चुकले होते की ‘तिकीट मशीन’मुळे बस प्रवासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. ‘तिकीट मशीन’ने वाहकाला फोडला घाम तापमानातील घटीमुळे वातावरणात गारवा वाढूलागल्याचा परिणाम गाडीतील प्रवाशांच्या अंगातील गरम कपड्यांनी अधोरेखित होत असताना बसच्या वाहकाला दरदरून फुटलेला घाम काही आता प्रवाश्यांच्या नजरेतून लपून राहिला नव्हता. तिकीट मशीनने मध्येच पुकारलेला संप मात्र, या वाहक महोदयांच्या यांत्रिक कौशल्याची परीक्षा ठरत होता. त्यांच्या अवाक्या बाहेर गेलेला विषय आता एसटीच्या तांत्रिक सहायकाकडे गेला अर्थात वाहकांनी तंत्रसहायकाला फोन केला. आता मात्र, सर्वांना प्रतिक्षा लागून राहिली ती तंत्रसहायकाची . साहेब कधी येणार तुमचा तंत्रसहायक अशा बसमध्ये बसलेल्या प्रवशांच्या प्रश्नाला वाहकाच उत्तर येणार हो ५ -१० मिनिटांत. तेवढयात वाहकसाहेंबांचे तिकीट मशीन उगडझाप करण्याचेच प्रयत्न फळाला आलेत आणि अशी तशी रुसलेली मशीन काम करती झाली. तीन चार तिकट देवून झाल्यानंतर आता बराच काळ थांबलेली एसटीबस मार्गस्थ होईल अशी आशा प्रवाशांना लागलीतीच आशा केविलवाणी ठरावी अशी घटना घडली. म्हणजे, अचानक तंत्र सहायकाची एंट्री झाली. सायासाने कार्यरत झालेल्या तिकीट मशीनवर आता तंत्र सहायकाने सोपस्कारम्हणून प्रयोग सुरु केले.अशात प्रवशांमधून पुन्हा एक आरोळी आली , ‘साहेब सुरळीत सुरु झालेल्या तिकीट मशीनला आता काय नवीन ट्रिटमेंट देताय?’ त्यावर वाहक महोदयांचे उत्तर , अहो ही तात्पुरती सुरु झाली होती मशीन आता इथून पुढे अकोल्या पर्यंतच्या प्रवासात ही तिकीट मशीन बंद पडू नये म्हणून तंत्रसहायक नीट तपासून कार्यवाही करीत आहेत, पाहतो तर काय या मशीनने आता तंत्रसहायकालाही पुरता घाम फोडला होता, त्यांनीही एसटीबसप्रवास विलंबात हातभार लावून सोपस्कार आटोपलेत. आणि जवळपास २५ मिनिटांच्या खंडानंतर या सर्व कार्यकलापाची बाजुला राहून नुसती गंमत बघणारे एसटीबसच्या चालकांनी भिष्मप्रतिज्ञा घेत गाडी सुरु केली. एव्हाना तुम्हालाही कल्पना आलीच असेल की, प्रवासास विलंबानंतर चालकांनी कोणती भिष्म प्रतिज्ञा केली असेल तर . अगदी बरोबर ते म्हणाले, ‘जरी तिकीट मशीनच्या बिघाडामुळे बस प्रवासास २५ मिनिटांचा खोडा असला तरी आपल्या मौल्यवान वेळेची भरपाई करून देत मी आपणा सर्वांना अकोला बसस्थानकात नियत वेळेनुसार म्हणजेच सकाळी ११.०० पोहचवेन. ’ आता दर्यापूर ते अकोला हा म्हैसांग मार्गे बसगाडीचा प्रवास मात्र सुसाट वेगाने झाला आणि बसचालकाने दिलेला शब्द पाळला गेला. बस प्रवाशांना झालेला मनस्ताप व एसटीच्यासेवे बद्दल निर्माण झालेली नकारात्मक प्रतिक्रिया क्षणात बदलली व सर्व प्रवशांना नियत वेळेनुसार व नियोजनानुसार आप-आपले काम पारपाडण्याचा मार्गही प्रशस्थ झाला. या प्रवशांमध्ये असलेला मी सुध्दा सर्व निरीक्षण टिपून शब्दब्ध करून आपल्यापुढे मांडले. सद्या अकोला येथे नोकरी निमित्त ये-जा करण्यासाठी विविध संपर्क माध्यमांचा उपयोग करणारा मी पहिल्यांदा या प्रवासावर लिहिता झालो, त्यासाठी सर्वांचे आभारही तर मानलेच पाहिजे. मंडळी आभार. ०००००

No comments:

Post a Comment