Monday, August 24, 2020

‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2020’


 

स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये महाराष्ट्राची मोहोर

 महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

              

नवी दिल्ली दि. 20 : स्वच्छ सर्वेक्षण-2020’ मध्ये महाराष्ट्राने बेस्ट परफॉर्मिंग स्टेट चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठया शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिस-या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तिनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने एकूण 17 पुरस्कार मिळविले आहेत.

 

            केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री  हरदीपसिंग पुरी  यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पध्दतीने आज स्वच्छ सर्व्हेक्षण-2020’ चे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी विविध श्रेणींमध्ये एकूण 129  पुरस्कार व्हर्च्युअल पध्दतीने प्रदान करण्यात आले महाराष्ट्राला यात एकूण 17 पुरस्कार मिळाले. केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा आणि महाराष्ट्राच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, नगर विकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

                           महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा दुस-या क्रमांकाचा मान 

100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने 2895.29 गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला . एकूण 11 राज्य या श्रेणीत निवडण्यात आली. मागील वर्षी या श्रेणीत महाराष्ट्र तिस-या स्थानावर होता.                                                             

              1 लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील 4 शहर

          1 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील  टॉप 25 स्वच्छ शहर निवडण्यात आली असून राज्यातील 4 शहरांचा यात समावेश आहे. या श्रेणीमधील पहिल्या तीन शहारांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत चंद्रपूर (9),  धुळे (18)       आणि नाशिक (25) या शहारांचा समावेश आहे.

            

   1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये पहिले तीन पुरस्कार महाराष्ट्राला

                पहिल्या 25 शहरांमध्ये राज्यातील 20 शहरं

          राज्याने 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील एकूण रँकींगमध्ये बाजी मारली असून या श्रेणीत देशात पहिले तिनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहेत. यामध्ये कराड शहराने  पहिला, सासवड शहराने दुसरा तर लोणावळा शहराने  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.

 

        या तीन शहरांसह या श्रेणीत देशातील पहिल्या टॉप 25 शहरांमध्ये राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.          यात पन्हाळा(5), जेजुरी(6), शिर्डी(7),मौदा(8),कागल(9),रत्नागिरी(10), ब्रह्मपुरी(11), वडगाव (12), गडहिंगलज(13), इंदापूर(14), देवळाली प्रवरा(15), राजापूर (16) ,वीटा (17),मुरगुड(18), नरखेड(23), माथेरान(24) आणि मलकापूर (25) या शहारांचा समावेश आहे.   

 

                                   देहूरोड कँटॉनमेंट ठरले सर्वोत्तम

       देशातील एकूण 8 स्वच्‍छ कँटॉनमेंट बोर्डना आज पुरस्कार देण्यात आला यात महाराष्ट्रातून देहूरोड कँटॉनमेंटने पहिला क्रमांक पटकाविला आहे. 6 कँटॉनमेंट बोर्डना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. देशातील एकूण 62 कँटाँनमेंट बोर्डना स्वच्छता रँकींग देण्यात आली असून महाराष्ट्रातील 6 कँटॉनमेंट बोर्डचा यात समावेश  आहे. यात देहूरोड  कँट(8), अहमदनगर (12), खडकी (15), पुणे(25), औरंगाबाद(29) आणि देवळाली (52) असा क्रम आहे.

                                                              

                    पश्चिम विभागात राज्यातील 11 शहारांनी मारली बाजी

         देशातील पश्चिम विभागातील राज्यांमधील लोकसंख्या निहाय तीन श्रेणींमध्ये 15 शहारांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील सर्वाधिक 11 शहरांचा समावेश आहे.

          पश्चिम विभागातील राज्यांमधील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात हिंगोली , बल्लारपूर, रत्नागिरी आणि शेगाव नगर परिषदांचा समावेश आहे.

           याच विभागातील राज्यांमधील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांना वेगवेगळया श्रेणीत प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यात वीटा , इंदापूर, शिर्डी आणि वरोरा नगर परिषदांचा समावेश आहे.

      पश्चिम विभागातील राज्यांमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 3 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात अकोले , जेजुरी आणि पन्हाळा नगर परिषदांचा समावेश आहे.

                                               

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 

रितेश भुयार  /वृत विशेष क्र.79 / दि.20.06.2020

 

 

कामाचं समाधान



देशाच्या राष्ट्रपतीचा शुभेच्छा संदेश करून दिला मराठीत भाषांतरीत .आणि त्यांनी तो आपल्या अधिकृत सोशल मीडियाहुन प्रसूत केला.

Thursday, July 23, 2020

माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची मुलाखत



(माजी लोकसभा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चाकुरकर यांची माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त लोकराज्य विशेषांकासाठी  मुलाखत घेण्याचा व ती शब्दबध करण्याचा योग आला. लोकराज्य अंक जुलै २०२०)  





जुलै महिन्याचा लोकराज्य विशेषांक प्रकाशित
'जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेषांक' वाचण्यासाठी क्लिक करा:
https://mahasamvad.in/?p=17886



घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल




(स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरांचा समावेश असल्याचा एक निकाल आला आहे काल कृपया याबाबत सविस्तर लेख दयावा असा आमचे सहकारी व लोकराज्य मासिकाचे उपसंपादक राजाराम देवकर यांचा एक संदेश मिळाला मग काय याविषयाचा माग घेतला आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या काही ट्विट वरून चक्क बातमी तयार झाली व तो लेखही लोकराज्यच्या जून २०२० अंकामध्ये प्रकाशित झाला )



वृत्त विशेष 63                                                                                 दिनांक 20 मे 2020 




          घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
                   राज्यातील ७६ शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील १४१ शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकटया महाराष्ट्रातील ७६ शहरांचा यात समावेश आहेनवी मुंबई महानगरपालिकेला पंचारांकित तर ३४ शहरांना तीन आणि ४१ शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मुलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो केंद्रीय नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष २०१९-२० साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहारांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील ४ हजार ३७२ शहरांपैकी १४३५ शहरांनी आवेदन पाठविली होती यापैकी डिजीटल एमआयएस चाचणीत ६९८ शहर बाद ठरलीउर्वरीत ७३७ शहरांमध्ये नागरीकांचे मत व मंत्रालयाच्या अधिका-यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण २० मानकांआधारे चाचणी करून अंतिम १४१ शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७६ शहरांनी बाजी मारली आहेदेशातील ६ शहरांना पंचारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील ६५ शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ३४ शहरांचा यात समावेश आहेदेशभरातील ७० शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील  ४१ शहरांचा यात समावेश आहे.
स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील  महानगरपालिका ,नगर पालिका खालील प्रमाणे.
पंचारांकित मानांकन
   नवी मुंबई महानगर पालिका
तीन तारांकित मानांकन
अंबरनाथ,भिवंडी निजामपूरब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलजइंदापूर,जळगावजालनाजेजुरीजुन्नरकागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि  विटा
एक तारांकित मानांकन
अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई,  जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूरकुरुंदवड, महाड,  मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे,  उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.
    राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले  वर्चस्व निर्माण केले आहे.   
स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणा-या एकूण गुणांपैकी २५ टक्के म्हणजे ६००० पैकी १५०० गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्व असून यात महाराष्ट्राची सरसी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.63 /दि.20.05.2020