Thursday, October 3, 2013

अनोखा सफर 'शाहरूखच्या आझादी एक्सप्रेसचा'



शाहरूख खान माझा आवडता नट. त्याच्या नैसर्गीक अभिनयाचा मी खूप चाहता आहे. त्याच्याशी अशी वादळी भेट होईल अस काही अपेक्षीत नव्हत. पण, ती भेट झाली. भेटीच वैशिष्टय अस की आमची ही भेट व वार्तालाप तमाम प्रेक्षकांनी बघीतला. आता तुमची फारशी उत्सूकता न तानता सांगतो, 14 ऑगस्ट2013 रोजी इंडिया टीव्हीच्या स्टुडिओमध्ये(या वृत्त वाहिनीचा आपकी अदालत हा प्रसिध्द कार्यक्रमही याच स्टुडिओत चित्रीत होतो) रात्री 3 ते 4 वाजे दरम्यान चित्रीत झालेला कार्यक्रम 'शाहरुख की आजादी एक्सप्रेस' आणि त्यात विविध राज्यांच्या चमुनी शाहरुखशी संवाद साधावयाचा होता. आणि महाराष्ट्राच्या 15 सदस्यीय चमुच नेतृत्व होत माझ्याकडे.  
स्टुडिओत रात्री 9 वाजताच मराठमोळया वेशात  दाखल झालेलो आम्ही आणि आमच्या सारखेच पंजाब, तामीळनाडू, केरळ आदी राज्यांच्या चमूचे सदस्य खूप वैतागलो होतो शाहरूखची वाट बघून. घडयाळीचे काटे फिरत होते 10 , 11, 12 तस-तसे सर्वांना पेंगायला येत होत. पण शाहरूखच्या दर्शणाची ओढ सर्वांनाच होती. आम्हाला 1 वाजता मुख्य स्टुडिओत सोडण्यात आल. तिथेही शाहरूखची वाट बघण्यात दीड तास गेला आण्‍िा रात्री 2.30 वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपर स्टार बादशा शाहरूख एकदाचा अवतरला. त्यात कार्यक्रम सुरु झाला आणि ज्या- त्या मुली शाहरुखला विनवनी करू लागल्या. शाहरूख I am your fan & I want to hug you, want to dance with you, कोणीतर शाहरूखला लूंगी परिधान केली तर कोणी डान्स शिकवला. आधीच वेळ एवढा झालेला. त्यात लोक असले प्रकार करताताहेत त्यामुळे आता इथे महाराष्ट् कसा Represent करवा हा प्रश्न होता. शेवटी प्रतिकूल परिस्थितीत माईक हाती घेतला. मै रितेश भुयार महाराष्ट्र से आया हु. सर आप महाराष्ट्र में रहते है. इस का गर्व है हमें हम सब अपने प्रांत का लिबाज पहन के आए है , हम यहा चाहेंगे की आप हमारे साथ महाराष्ट्र गित गाए, त्यावर शाहरूख उत्तरला. यार मुझे ताे इतनी खास मराठी आती नही. केवल एक Sentence आता है" सावधान पुढे गतिरोधक आहे." फिर भी मै प्रयास करता हू महाराष्ट्र गित गाने का. त्यानेही ही गायल आमच्यासोबत गान. त्यानंतर  थेट शाहरूखच्या गोटातच प्रश्न टाकला. ' दिपीका के साथ आप दो बार हिट हूए. काजोल के साथ कटरिना के साथ भी. कई हिरोईन के साथ आपकी अच्छि बनती है , इस के पिछे क्या केमेस्ट्री है.' या प्रश्नाच समर्पक उत्तर दिल शाहरूख ने. कार्यक्रम आटोपला पहाटे 4 वाजता अन आम्ही शाहरूखच्या आझादी एक्सप्रेसचा प्रवास आटोपून घर जवळ केल.                                                                          
 




                           

Monday, September 30, 2013

माझ्या गावाची असली तर्‍हा 'माझ जन्म गाव अचलपूर'


 
                                                                                               (विविध संदर्भ वापरून हा लेख प्रंपच आहे)
           माणसाचा जन्म झाल्यावर त्याला पहिला शब्द शिकवणारी त्याची आई. आणि तिची भाषा ते तान्ह बाळ आत्मसात करतो म्हणून ती ठरते 'मातृभाषा'. जस भाषेचं तसच ते जन्मभूमीचंही . आपण ज्या गावात जन्माला येतो ते आपल गावं आणि त्या गावाचं आपल्या जडण-घडणीतील महत्वही अनन्य साधारण असतं. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हयील अचलपूर हे तालुक्याच ठिकाण माझ गाव. दुर्देवाने मला 4 थी पर्यंतच सलग राहण्याची संधी मिळाली. पुढे 5 वी पासून गावाबाहेर पडलो ते आतापर्यंत.  गावाच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे म्हणजे गावाच वैभव. माझ्या गावाला कापड ,लाकूड आणि रेशीम उद्योगाची असलेली गौरवशाली पंरपंरा जवळून पाहता आली अनुभवता आली. माझ्या गावचे दसर्‍याच्या दिवशी होणारी रामलीला आणि रावण दहन जेवढ, नागपंचमीची यात्रा, अष्टमहासिध्दी या तिर्थ क्षेत्रावरील यात्रा आणि तेवढयाच उत्साहाने साजरा होणारा मोहरम व उरुस हा मुस्लीम बांधवांचा सण म्हणजे माझ्या गावाच्या असहीष्णूपणाची ओळख. कालौघात हे वातावरण दुषीत झाल्याची खंत आहे. पण माझ गाव मल खूपच प्यारं आहे त्यावर हा दृष्टीक्षेप     
       'अचलपूरचा इतिहास म्हणजेच वर्‍हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) शहर. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील 'इल' नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणार्‍या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुर्‍यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वर्‍हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वर्‍हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.
बहामनी सत्ताकाळात १३९९ मध्ये आठवा सुल्तान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुल्तानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, यावरून त्या काळातील एलिचपूरचे महत्त्व लक्षात येते. १४२५ पर्यंत अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर इमादशाहीत म्हणजे १४९० ते १५७४ पर्यंत वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला. बरीच वर्षे अचलपूरचा ‘वास्तू इतिहास’ कोराच राहिला. तरीही अचलपूरचे महत्त्व कमी झालेले नव्हते. १५७४ ला वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे आला. निजामशाहीतही हे शहर महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले. सुमारे २६ वष्रे निजामशाहीत राहिलेला वऱ्हाड प्रांत १५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. अबूलफजल हा वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगलांची सत्ता संपूर्ण शतकभर होती. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर व संबंधित किल्ल्यांचे उल्लेख सापडतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रात अजून एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. त्यात मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मोगल काळातच मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या.
१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.
मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.
शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे पण, या जागेचा वापर या ठिकाणी मिळणारा एकांत पाहून नको त्या कामांसाठी केला जात असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात.

     

अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात. या गतवैभवावर चर्चा करणेच आता अचलपूरकरांच्या नशिबी आले आहे. दोन्ही शहराची तहान पूर्णपणे भागवू शकेल, अशी पाणीपुरवठा योजना अजूनही अस्तित्वात आलेली नाही.

Saturday, September 28, 2013

शेफाली वर्मांच्या नजरेतून फॅशन विषय



अंतरीया, उतरीया आणि कायाबंद  हे मूळ भारतीयपोषाख आहेत आणि भारतीय संस्कृतीच प्रतिक म्हणवणारी साडी मात्र पारसी संस्कृतीकडून आपण स्वीकारलेली पोषाख पद्धती आहे. भारतात अगदी २० व्याशतकाच्या  ७ व्या  शकात आलेला डोक्यावरील केस साम्भारातील  हिप्पी कट, पुरुष पोषाकातील बेलबाटम ची लोकप्रियता , रेडीमेडपोषाख  परिधान करण्याची तऱ्हा त्याची सुरुवात . . कदाचित ही माहिती नवीनच असेल ना तुम्हाला !
             दिल्ली शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात व्याख्याता असणाऱ्या शेफाली वर्मा. राजस्थान विध्यापिठातून कला शाखेत  पदविका शिक्षण पूर्ण करून त्यांनी जयपूर येथील महारानीज कॉलेजमधून फेशन डिजायनिंग  विषयात डिप्लोमा(३ वर्ष)  चे यशस्वी शिक्षण  पूर्ण केले. आता मात्र त्यांनी फेशन हेच आपल प्याषण बनवल . नंतर त्यांनी   जम्मू -काश्मीर मध्ये म्ब्रोयडरी डिजाईनमध्ये स्वताःची कल्पकता  वापरून स्वतःचा उद्योग सुरु केला. याचवेळी त्या याच विषयाच्या व्याख्याता म्हणून श्रीनगर मधील शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात काम पाहू लागल्या. त्यानंतर त्यांनी वस्त्र शास्त्र विषयही शिकवला. पण हा विषय शिकवण्यासाठी त्यांनी सायासाने स्वतः विवर सर्विस सेंटर मधून वस्त्र शास्त्र विषयाचा शोर्ट टर्म कोर्स केला. त्याचवेळी श्रीनगर मधील   डब्ल्यूएलसी फेशन डिजाईन  कॉलेज मध्ये त्यानी व्याख्याता म्हणून कार्य केले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी फेशन दिजायनिंगशी संबंधित विविध कोर्सही आत्मसात केले आणि व्याख्याता म्हणून कार्य ही केले . सध्या श्रीमती शेफाली र्मा ह्या दिल्ली शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात गारमेंट कंट्रक्शन , हिस्ट्री ऑफ फेशन आणि फेशन फोरकास्टिंग हे विषय शिकवत आहेत . त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्र : भारतात फॅशनचा प्रभाव नेमका  कधी   दिसून येतो
उ : पूर्वी भारतात राजे राजवाडे असायचे तेंव्हा राजे , राण्या आणि दरबारी यांचा पोषक बनवण्यासाठी असणारे खास कारागीर आणि त्यांनी या क्षेत्रात केलीली फेशन ची बांधणी हा भारतीय फेशनचा मानबिंदू ठरलाय. पण जवळपास १८ व्या शतकात युरोपियन देशांमध्ये आधुनिक युगाच्या वाटचालीत सुरु झालेली फेशन भारतात रुजायला बराच काळ जावा लागला कदाचित ब्रिटीशांच्या जोखळात असल्याने हा उशीर झाला असावा. भारतात १९७० मध्ये फेशन ला पोषक अस वातावरण तयार झाल . चित्रपटात नट आणि नाती जे पोषाक आभूषण परिधान करत असत तेच मग लोक दैनंदिन जीवनात परिधान करू लागले केस साम्भारातील  हिप्पी कट, पुरुष पोषाकातील बेलबाटम ची लोकप्रियता , रेडीमेड पोषक  परिधान करण्याची वेगवेगळी तऱ्हा बघायला मिळाली . आता तर जागतिक स्तरावर होत असलेले  फेशन क्षेत्रातील बदल लगेचच भारतीय बाजार पेठेतही दिसून येतात.
प्र : भारतातील फॅशन उद्योगाची स्थिती काय आहे ?
उ :  भारतात रिलायन्स , बिर्ला, टाटा ईत्यादी उद्योग समूहांचा विशेष दबदबा आहे आणि जागतिक स्तरावरही या उद्योगांनी भारतच नाव झळकवलय. या व्यतिरिक्त परदेसी कंपनी पण इथे मोठ्या प्रमाणात आल्या आहेत . त्यांना भारतातून निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत होते किंबहुना  या बाबतीत ते भारतावर अवलंबून आहेत अस म्हटल्यास वावग होणार नाही. या क्षेत्रात भारतीय लघु कला उद्योगात काम करणाऱ्या कारागिराना रोजगार उपलब्द झाला आहे तसेच आज काल फेशन  डीजायनिंग चा कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यानाही या उद्योगात महत्वाच्या हुद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

   

Tuesday, September 17, 2013

लेखक नावाचं गारुड ‘लक्ष्मण राव’









 

     
दिल्लीतील आयटीओ(Income Tax Offices) भागातील विष्णू दिगंबर  मार्ग वर लोकांची वरदळ सुरु होती.  भर उन्हात जिथे जीवाची काहिली होते तिथे याच रस्त्यावर असलेल्या हिंदी भवनाच्या उंच इमारती पुढील मोकळ्या जागेत एक स्टोव्ह,-३ चहाची स्वच्छ  भांडी आणि मोडक्या स्टूल वर चहा विकत बसलेला लेखक अस चित्र .  विश्वास बसणार नाही ना तुमच ! पण, हो  हे  खरय.
       हे लेखक आहेत लक्ष्मण शिरभाते. त्यांच मूळ गाव महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तळेगाव. केवळ लेखक बनण्याच्या दुर्दम्य इच्छे पायी  लक्ष्मणराव १९७५ साली दिल्लीत आले .  10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मण यांना हिंदी भाषेतील लेखक व्ह्यायच होत.  त्यांनी ११ वी आणि १२ च शिक्षण  दूरस्थ शिक्षा पद्धतीने पूर्ण केल . याचप्रमाणे  दिल्ली  विद्यापिठातूनही त्यांनी  पदविका शिक्षण  पूर्ण केल.  दर्यागंज मधील पुस्तक बाजारात जाऊन हिंदी पुस्तक  विकत आणून ती वाचण्याचा त्यांनी छडा लावला अण त्यातूनच लक्ष्मणरावतील लेखक  फुलत होता घडत होता.  ' नई दुनिया कि नई कहाणी ' ही त्यांची हिंदीतील पाहिल कादंबरी अर्थात उपन्यास  सन १९७९ साली प्रकाशित झाल आणि लक्ष्‍मण रावांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आल.  त्यांच्या या कामगिरीच कौतुक तमाम जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक  प्रसार माध्यमांनी केल. त्यांना जवळपास ५० पुरस्कारांनी गौरविण्यात आल आणि आतापर्यंत त्यांनी एकूण २४ पुस्तक लिहिली असून यातील १० पुस्तक प्रकाशित झाली आहेत. त्यातील बहुतेक पुस्तकांच्या २-३ आवृत्या निघाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे नुकतेच त्याचं सत्य घटनांवर आधारित  " अहंकार " वैचारिक धाटनांच पुस्तक प्रसिध्द झाल.  श्चर्य तर हे की जर तुम्हाला या लेखकांच पुस्तक हव असेल तर विष्णू दिगंबर मार्ग वरील त्यांच चहाच दुकान हेच प्रकाशन आणि पुस्तक विक्रीचही ठिका आहे.  ते आजपर्यंत आपल पुस्तक प्रकाशित करून घेण्यासाठी कोण्याप्रकाशकाकडे गेले नाहीत . वर्षाकाठी लाख रुपयांचे पुस्तक ते स्वतः याच चहाच्या दुकानावर विकतात. गेल्या ३५ वर्षांपासून त्याच हे चहाच दुकान थाटात चालतंय मात्र, या चहवाल्याची 'लेखक' म्हणून  वेगळी ओळख या मार्गावर आहे.  महाराष्ट्राची पताका दिल्लीत अभिमानाने उंचावणार्‍या  या लेखकाशी साधलेला संवाद.              
प्र : दिल्लीत येण्याचा आपला उद्देश काय होता ?
उ : मला लेखक बनायचं होत आणि हिंदी भाषेतच लेखन करायचं होत. त्यावेळी गावाकडे मी प्रयत्न केला पण ते शक्य झाल नाही. मग काही मित्र आणि शुभ चिंतकांनी मला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीतच जाव लागेल अस सांगितल. आणि मी ही मनाची पूर्ण तयारी करून दिल्लीत आलो. दिल्लीत आपल घर उभाराव  किंवा नौकरी करावी हे माझ ध्येयच नव्हतं. मला फक्त लेखक व्हायचं होत आणि त्यासाठी उदर निर्वाहाच आणि माझ संपर्काच साधन म्हणून विष्णू दिगंबर मार्गवरील चहाची टपरी सुरु केली . मला दिल्लीत येवून  लेखक बनायचं होत ते स्वप्न मी पूर्ण केल. पण, मला अजूनही की ही सुरुवात असल्याच वाटते. मला खूप मोठा पल्ला गाठायचाय आणि आता तो पल्लाही यशस्वी होण्याचा आत्मविश्वास माझ्याकडे आहे.
प्र : लेखक म्हटला की त्याच प्रचंड  वाचन असाव, तो प्रकांड पंडित असावा असा एक सामान्य समज आहे,  तुमच्या बाबतीत हे कस जुळतं ?
उ : मुळात लेखक हा सहृदयी असावा. त्याला तो त्या सामाजात राहतो त्याच्या अवती-भवती घडणार्‍या घटना टिपता आल्या पाहिजेत आणि त्या  लोकांना समजतील अश्या पद्धतीने मांडता आल्या की तो झाला लेखक. पण, त्यासाठी वाचनही करावं लागतं. मी ही आतापर्यंत विविध लेखकांची , विविध पद्धतीची  हजारो हिंदी पुस्तक वाचून काढली. त्यातून माझ्या लेखणीला धुमारे फुटले आणि जोडीला माझी कल्पकदृष्टी असा सुरेख  मेळ जुळला. दिल्लीत आलो तेंव्हा माझ शिक्षण  केवळ १० वी पर्यंत झालेल. नंतर याच शहरात मी प्रपंच अण व्यवसाय करीत पदविकेपर्यंत शिक्षण पूर्ण केल.
प्र : तुमचे आवडते लेख कोण ?
उ : असा एक लेखक म्हणून सांगता येन थोड अवघड आहे पण, मला गुलशन नंदांच लिखान खूप आवडत. मी त्यांचा चाहता आहे आणि मला  भविष्यात त्यांच्याच  तोडीच लेखन करायच आहे.
प्र : तुम्ही लेखकही आहात अण प्रकाशकही ?
उ : क्षमा करा पण, मला प्रकाशक या जमातीचीच चीड आहे. मी सुरुवातीला बर्‍याच प्रकाशकाकडे गेलो बरेच उंबरे घासले पण, सर्वांनी मला पुस्तक छापण्यासाठी आव्वाच्या सव्वा रक्कम मागितली आणि वर पुस्तकाची रॉयल्टी मिळणार नाही अस सांगितल . तेव्हाच निर्णय केला की स्वतःची पुस्तक  स्वतःच प्रकाशित करायची आणि लेखकासोबतच मी प्रकाशकही झालो. आजपर्यंत मी लिहिलेल्या एकूण २४ पुस्तकांपैकी १० पुस्तक प्रकाशित केलीय आणि काही पुस्तकांच्या 2-3  आवृत्याही निघाल्यात. 
प्र : दुसरा व्यवसाय न निवडता तुम्ही ही चहाची टपरी अजूनही चालवत आहात या मागे काय कारण आहे ?
उ : लेखक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी  दिल्लीत  आलो तेंव्हा, याच जागेहून उदर निर्वाहाचे साधन म्हणून मी चहाची टपरी सुरु केली. या जेगेशी आणि व्यवसायाशी  माझ एक नात जुळलं ते गेल्या ३५ वर्षात माझ्याच्यान तुटल नाही.एव्हढंच नाही सुरुवातीला या जागेहून मला उचलून लावण्याचे उद्योगही झालेत. पण माणसातील प्रतिभा त्याला मोठ करते या न्यायाने आता लेखक म्हणून माझी वेगळी ओळख निर्माण झाल्याने मला समाजात आणि या विष्णू दिगंर मार्गावरही विशेष  मान आहे.  आणि आता हेच चहाच दुकान  माझ संपर्क कार्यालय, प्रकाशन कार्यालय आणि पुस्तक प्रकाशन कार्यालय  झालय. त्यामुळेच हा व्यवसाय आणि ही जागा मी अजून तरी सोडलेली नाही .