अंतरीया, उतरीया आणि कायाबंद हे मूळ भारतीयपोषाख आहेत आणि भारतीय संस्कृतीच प्रतिक म्हणवणारी साडी मात्र
पारसी संस्कृतीकडून आपण स्वीकारलेली पोषाख पद्धती आहे. भारतात अगदी २० व्याशतकाच्या ७ व्या द शकात आलेला डोक्यावरील केस साम्भारातील हिप्पी कट, पुरुष पोषाकातील बेलबाटम ची लोकप्रियता , रेडीमेडपोषाख परिधान करण्याची तऱ्हा त्याची सुरुवात . . कदाचित ही माहिती
नवीनच असेल ना तुम्हाला !
दिल्ली शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात
व्याख्याता असणाऱ्या शेफाली वर्मा. राजस्थान विध्यापिठातून कला शाखेत पदविका शिक्षण पूर्ण करून त्यांनी जयपूर येथील महारानीज कॉलेजमधून फेशन डिजायनिंग
विषयात डिप्लोमा(३ वर्ष) चे यशस्वी शिक्षण पूर्ण केले. आता मात्र
त्यांनी फेशन हेच आपल प्याषण बनवल . नंतर त्यांनी जम्मू -काश्मीर मध्ये एम्ब्रोयडरी डिजाईनमध्ये स्वताःची कल्पकता वापरून स्वतःचा उद्योग सुरु केला. याचवेळी त्या याच विषयाच्या
व्याख्याता म्हणून श्रीनगर मधील शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात काम पाहू लागल्या. त्यानंतर
त्यांनी वस्त्र शास्त्र विषयही शिकवला. पण हा विषय शिकवण्यासाठी त्यांनी सायासाने स्वतः
विवर सर्विस सेंटर मधून वस्त्र शास्त्र विषयाचा शोर्ट टर्म कोर्स केला. त्याचवेळी
श्रीनगर मधील डब्ल्यूएलसी फेशन डिजाईन कॉलेज मध्ये त्यानी
व्याख्याता म्हणून कार्य केले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी फेशन दिजायनिंगशी संबंधित
विविध कोर्सही आत्मसात केले आणि व्याख्याता म्हणून कार्य ही केले . सध्या श्रीमती
शेफाली वर्मा ह्या दिल्ली शासकीय पोलीटेक्निक महाविद्यालयात गारमेंट कंट्रक्शन , हिस्ट्री ऑफ फेशन आणि
फेशन फोरकास्टिंग हे विषय शिकवत आहेत . त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्र : भारतात फॅशनचा
प्रभाव नेमका कधी दिसून येतो ?
उ : पूर्वी भारतात राजे राजवाडे
असायचे तेंव्हा राजे , राण्या आणि दरबारी यांचा
पोषक बनवण्यासाठी असणारे खास कारागीर आणि त्यांनी या क्षेत्रात केलीली फेशन ची बांधणी
हा भारतीय फेशनचा मानबिंदू ठरलाय. पण जवळपास १८ व्या शतकात युरोपियन देशांमध्ये आधुनिक
युगाच्या वाटचालीत सुरु झालेली फेशन भारतात रुजायला बराच काळ जावा लागला कदाचित ब्रिटीशांच्या
जोखळात असल्याने हा उशीर झाला असावा. भारतात १९७० मध्ये फेशन ला पोषक अस वातावरण तयार
झाल . चित्रपटात नट आणि नाती जे पोषाक आभूषण परिधान करत असत तेच मग लोक दैनंदिन जीवनात
परिधान करू लागले केस साम्भारातील हिप्पी कट, पुरुष पोषाकातील बेलबाटम ची लोकप्रियता , रेडीमेड पोषक परिधान करण्याची वेगवेगळी तऱ्हा बघायला मिळाली . आता तर जागतिक स्तरावर होत असलेले फेशन क्षेत्रातील बदल लगेचच भारतीय बाजार पेठेतही दिसून येतात.
प्र : भारतातील फॅशन
उद्योगाची स्थिती काय आहे ?
उ : भारतात रिलायन्स , बिर्ला, टाटा ईत्यादी उद्योग समूहांचा विशेष दबदबा आहे आणि जागतिक
स्तरावरही या उद्योगांनी भारतच नाव झळकवलय. या व्यतिरिक्त परदेसी कंपनी पण इथे मोठ्या
प्रमाणात आल्या आहेत . त्यांना भारतातून निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत होते
किंबहुना या बाबतीत ते भारतावर अवलंबून आहेत अस म्हटल्यास वावग होणार नाही. या क्षेत्रात
भारतीय लघु कला उद्योगात काम करणाऱ्या कारागिराना रोजगार उपलब्द झाला आहे तसेच आज काल
फेशन डीजायनिंग चा कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यानाही या उद्योगात महत्वाच्या हुद्यावर
काम करण्याची संधी मिळाली आहे.
No comments:
Post a Comment