विमान प्रवास,
पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास, राष्ट्रपती भवन आणि भारत मंडपम या गौरवशाली वास्तुंमधील वावर, राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणांची सहेर. यावर कळस ठरलेला प्रसंग अर्थात,
लेकीच्या धाडसी कामगिरीमुळे बालकांसाठीचा देशातील सर्वोच्च सन्मान
साक्षात राष्ट्रपतींकडून मिळण्याचा व पंतप्रधानांसोबत लेकीच्या संभाषणाचे चित्र
प्रत्यक्षात डोळ्यात साठवून आयुष्याची कृतकृत्यता झाल्याच्या भावनाच माझ्या मनात
आहेत.
पुरस्कार स्विकारण्यासाठी
लेकीसोबत दिल्लीत जायचं ठरलं आणि मनावर दडपणही आलं. मुलीचा राष्ट्रीय गौरव बघायला
मिळणार म्हणून मी हरखून गेले. आयुष्यात असा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार
याचा विचार करत करत दिल्लीच्या तयारीसाठी बॅग भरतांना मजेशीर किस्से घडले. आम्ही
माय लेकिंनी त्याततही भारी एन्जॉय केला. विमानात खिडकीची सिट घेवून टेक ऑफ व
लँडींगच्यावेळी मस्त फोटो व्हिडीयो घेण्याचे प्लॅनिंगही झाले. राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे शद्ब केवळ कधी मधी वाचून किंवा ऐकूण असणाऱ्या आम्ही
माय-लेकी त्यांना प्रत्यक्ष जवळून बघणार होतो याचाही वेगळाच आनंद होता. पण,
यासर्वात पाय जमीनीवरच होते.
पाचविला पुजलेली गरीबी. त्यामुळ हात मजुरीवर
चालणार आमच्या संसाराच गुऱ्हाड. घरापासून कोसो दूर पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाच
बिऱ्हाड पाठीशी घेऊन कधी हा प्रदेश तर कधी तो प्रदेश आम्ही चाललो. आमच्या या
बिऱ्हाळात दोन लेकी. त्यांच्या संगोपनासोबत सुरक्षेचीही मोठी जबाबदारी आलीच. पण, आयुष्याच्या या धबडग्यात लेकीचा राष्ट्रीय सन्मान होण्याची घटना माझ्या
आयुष्याची फलश्रुती ठरावी अशी आहे.
लोकांच्या घरची धुनी,भांडी,केर काढण्यात चाललेलं आयुष्य असच अडगळीत पडून
होत. मात्र, लेक करीना (१७ वर्ष) हिने आम्ही मजुरी करीत असू
त्या जय अंबा अपार्टमेंटला आगीच्या विळख्यातून वाचवल अर्थात जीव धोक्यात घालून.
क्षणभर डोळ्यासमोर तो प्रसंग आणला तर आग लागलेल्या फ्लॅटमधून सिलेंडर बाहेर
काढताना अपघात घडला असता व आपली मुलगी...
नको!,असले भलते विचार नकोत. मुळात प्राणांची आहुती देवून
आपल्या मायभूचे इथल्या नागरिकांचे रक्षण करण्याची आमची महान परंपरा राहिली आहे
म्हणूनच तर माझ्या लेकीने ही परंपरा कायम ठेवली आहे.
लेकीच्या धाडसाची वार्ता हा हा करता
पंचक्रोशित पसरेल व तिच्या सोबत आम्हाला ठिक-ठिकाणी सन्मानित करण्यात येईल,अस स्वप्नवत वाटणार सर्व आमच्या आयुष्यात घडू लागल. १५ में २०२४ च्या
सायंकाळी अमरावतीतील कठोरा परिसरातील आम्ही मोलमजुरी करीत असू त्या जय अंबा
अपार्टमेंटला अचानक आग लागली. समयसूचकता व धाडस दाखवत जीवाची बाजी लावून माझ्या लेकीने आमच्या पोशिंद्या अपार्टमेंट
मधील ७० सदनिका धारकांच्या कुटुंबांचे रक्षण केले.
या प्रसंगानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल
घेऊन आवश्यक ते सोपसकार पार पाडले. इकडे अधून-मधून आम्हाला निमंत्रण येऊ लागलं
.सत्कार होत राहिले. मात्र, पती अशोक थापा यांचे
अपार्टमेंटचे केअर टेकर म्हणून सुरू असलेले काम आणि मी व माझ्या दोन्ही लेकींचे याच
अपार्टमेंटमध्ये धुनी, भांडीचे काम अव्याहत सुरूच होते.
अशात वार्ता धडकली लेक करिनाला केंद्रीय
महिला व बाल विकास मंत्रालयाचा "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य
पुरस्कार" जाहीर झाल्याची.
राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याच कळल. ज्ञान, अधिकार, शासन -प्रशासन याचा दुरान्वयाने संबंध नसलेल्या आमच्या
आयुष्यात असे सोनेरी प्रसंग येतील याची तसुभरही कल्पना नव्हती.
लेकीच्या कर्तुत्वामूळ हे सर्व घडून
आलं. समाजामध्ये जिथ मुलगा हाच वंशाचा
दिवा समजला जातो तिथं आमच्या मुलींन थेट एवढा मोठा सन्मान मिळवून देत मुलीचं
योगदान अधोरेखित केलं.
या पुरस्काराने आमच्या जीवनात फार फरक
पडणार नाही. आम्ही याचा काही अहंम बाळगणार नाही. पण, आमच्या
एका कामाची एवढी मोठी दखल शासन दरबारी घेतली जावू शकते याची जाणीव झाली. आणि आपल
कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडायचं बळ मिळालं. लेक करीनाला शिक्षणात व तिच्या
आवडीच्या बॉक्सिंग खेळात पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही उभयता होईल ते सर्व प्रयत्न
करू. या पुरस्काराने करीनाला मोठा मंच मिळाला आहे. शासन व समाजाकडून तिला सहकार्य
मिळतेय त्याचा सार्थ आदर व जाणीव आम्हाला कायम आहे.
करीनाच्या राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतच्या
या सर्व प्रवासात आम्हा कुटुंबियां एवढाच जय अंबा परिवारातील प्रत्येकाचा मोलाचा
वाटा आहे. त्यासाठी आम्ही कायम कृतज्ञच राहू. सर्वांचे मनापासून आभार!
आपली
निशा अशोक थापा



No comments:
Post a Comment