Thursday, January 27, 2022
वर्ष २०२२ च्या सुरुवातीला कामाची शाबासी
प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे पथसंचलन व त्याबाबात बातमी आणि ट्विटरच्या माध्यमातून राबविलेल्या प्रसिध्दी मोहिमेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक डॉ.बिभीषण चवरे यांनी कामाची शाबासी दिली. तर दुसरा प्रसंग म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कार्यालयाच्या ट्विटर हँडलहून मराठी भाषेचे वैशिष्टय विषद करणा-या मोहिमेचे कौतुक राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाचे सदस्य तथा भारतीय परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी, पासपोर्टमॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिल्लीतील मराठी अधिका-यांच्या वॉटसॲप ग्रुपवर केलेले कौतुक व याग्रुपवर वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कौतुकाची थाप.तिसरा प्रसंग म्हणजे कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनासाठी केंद्र व राज्य शासनात दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी व पत्रकार यांच्याकडून वि.वा.शिरवाडकर यांच्या साहित्याचे वाचन करून घेणे व त्यास कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांहून प्रसारित करणे. व या संदर्भात मी पसृत केलेल्या बातमीवर आमच्या विभागाचे सचिव तथा महासंचालक यांची ‘Excellent Initiative’ अशी शाबासी.
या तिन्हीबाबी वर्षारंभी घडताहेत त्यामुळे एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे व यापुढेही उत्तमोत्तम कार्य करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment