प्रसंग ऑफीसला जाण्याचा.
घाईतच रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनवर आलो. सेक्युरीटी चेकसाठी मशीन मध्ये ऑफीसबॅग
ठेवताच मागून आवाज आला “ अरे कैसे
हो भाई , कहा ऑफीस निकले हो शायद, ‘यार तुम्हारे हात
की वह कटहल(फणस)की सब्जी आज भी याद
आती है’”. हा एकेरी संवाद ऐकुण मी कुतुहलाने मागे पाहतो तोच ४ वर्षा पूर्वी
एका ऑफीसमध्ये माझ्या सोबत काम करणारा माझा मित्र ‘राम’ दिसला. अगदी ५ मिनटांच्या चालत्या -फिरत्या भेटीत आम्ही एक-मेकांची हाली खुशाली जाणून
घेतली. मी ऑफीससाठी मेट्रो घेतली तर राम
त्याच्या आई आणि बहीणीला घेऊन मोतीनगरला गेला. आता मात्र ऑफीसला पोहचेपर्यंत मी ‘फ्लॅश बॅक’ मध्ये गेलो. माझ्या ‘शेफगिरीच्या’ मजेशीर गोष्टी आठवून मलाच माझ
हसू आवरेणा आणि माझा स्वाहभिमानही आपसूक
दुनावला.
घरापासून लांब असल्याने स्वयंपाक करण्याचे प्रसंग अनुभवने
क्रमप्राप्त होते. अमरावतीला पत्रकारितेच शिक्षण घेण्यासाठी आलो तोच माझ्यातील
शेफगिरीची परिक्षा सुरु झाली. रूम वर भांडयांची चण चण आणि त्यात पुरण पोळी
करण्याची मला आलेली खुमखुमी हा प्रसंग मजेशीरचं. कुकर मध्ये हरब-याची डाळ शिजवली.
पण, मिक्सर नसल्याने आता पुरण वाटावे(बारीक करणे) कसे ?
हा प्रश्न पडला. मग काय पातेल्यात शिजलेली हरब-याची डाळ घेतली आणि रवी
घेऊन बारीक करण्याचा प्रयत्न केला.मात्र, अपयश आले काही केल्या डाळ बारिक होईना
परिणामी पुरणाची पोळीच तयार होऊ शकली नाही. हे अपयश कमी होते तर काय नवीन प्रयोग
म्हणून मित्रांना रोडगे(राज्याच्या काही भागात याला पानगे म्हणतात.) खाऊ
घालण्याचा घाट रचला. रोडगे तयार करण्यासाठी जाडसर पिठाची आवश्यकता असते ते ही दळून
आणले. आता गोव-या आणाव्या लागत होत्या , त्या पण आणून झाल्या. मात्र हे रोडगे
शिजवताना जमीनीवर शिजवण्यासाठी आमच्या रूमच्या व्हरांडयात नुसती मातीदार जमीन
नसल्याने (सर्वत्र फरसी पसरलेली) हा प्रयोगही अपयशी ठरला. पुढे रोडग्यांना पर्याय म्हणून मी बिटटया हा प्रकार
लिलया करायला लागलो आणि मित्रांना करून खाऊ घालू लागलो, आपसूकच त्यांच्याकडून
शाबासकी मिळू लागली. पुढे पनीर नावाच्या प्रकारान माझ्या मनात गारुड घातल. मग काय
प्रयोग सुरु. पालक पनीर करायला घेतले. पहीलाच प्रयोग अपयशी ठरला पण प्रयोगातून
शिकलो आणि मी ‘पालक पनीर’ –‘काजु करी’ या भाज्या बनवण्याच ब्रँड मिळवल. जवळच्या लोकांकडे
गेलेा म्हणजे या भाज्या बनवण्याची फरमाईस मला यायला लागली. ‘शिक्षण,
स्ट्रगल आणि आवड’ जपण्याचा प्रांजळ प्रयत्न असा उत्तम ट्रँगल जुळून आला अमरावतीच्या वास्तव्यात.
पुढे शिक्षणासाठी
पुण्याला गेलो, इथे मात्र मेसचं जेवण
असल्यानं माझ्यातील शेफ पूर्णपणे शांत आणि निवांत होता. तेथून पुढे करीअरसाठी
दिल्लीत आलो. इथे मेस प्रकार नव्हता आणि दाल
मखनी, दाल फ्राय, मटर पनीर, कढाई पनीर अशा भाज्या त्यात पडणारं बटर आणि भरीस भर
म्हणून तंदूर रोटी (जी पचायला अवघड)
त्यावर बटर यामुळे माझ्या जेवणाच
तंत्रच बिघडून गेल होत. मग रूम शोधली आणि चांगल -चुंगल जेवण करण्यासाठी किचन
सजवलं. पुन्हा माझ्यातील शेफगिरीला सुरुवात झाली. आता इथे टोमॅटोची चटणी,काजू करी,
बैंगन भरता, सरसों का साग, अरबी आणि कटहल अशा भाज्या बनवण्यात मी मास्टरी मिळवली. ज्याला
ज्याला जी भाजी आवडायची तो माझ्या भाज्यांचा फॅन होऊ लागला. लाडक्या वहीनीबाईंना
करून खाऊ घातलेली ‘सरसों का साग आणि मके की रोटी’ हा हिवाळयातील
पंजाबींचा खास व्यंजन प्रकारही शाबाशी मिळवून गेला. ज्या ऑफीस मध्ये माझा मित्र
राम होता तिथेच मुलींना मात्र माझ्या हातची टोमॅटोची चटणी आवडायची. त्या मुलींनी
तर माझ्याकडून रेसिपी सुध्दा समजून घेतली होती. असा हा माझ्या शेफगिरीचा प्रवास
लग्ना नंतर जवळपास थांबलाच. आता मी फार क्वचीत किचन मध्ये जातो , इनफॅक्ट माझी
अर्धांगिनीच मला किचनमध्ये काही बनवण्याची परवानगी देत नाही. पण, तरीही तिला बर
नसल किंवा मलाच काही बनवण्याच मुड झाल तर मी बनवतो काहीही आणि आता माझी
अर्धांगिनीही मला शाबासकी देते. अशा रितीने माझ्या शेफगिरीच्या प्रवासात मी घडत
गेलो आणि मला शाबसकी देणारे अस्सल खवय्ये व शेफची पारख असणारे बदलत गेले. But frankly speaking I still love preparing
food for a change. आणि तुम्ही मनापासून जेवनं
बनवलं तर ते उत्तमच बनते हा माझा अनुभव इथे नमूद करून थांबतो.
******

No comments:
Post a Comment