Tuesday, September 29, 2020

महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर https://mahasamvad.in/?p=23073

Tuesday, September 15, 2020

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

 

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

https://mahasamvad.in/?p=21646

Friends Corner गप्पा With सारिका

 

https://youtu.be/FYK9tt890yg


सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार,                                                       

     ‘वाळवंटातील फुलं’ या आपल्या  वाट्सअप समुहाच्या Friends Corner या  उपक्रमाची दुसरी SpecialGuest  सारिका मोहोड-काळबांडे ला काल 13  सप्टेंबर 2020 ला आपण भेटलो. 

 

. सारिका, बॉर्न अँड बॉटअप नागपूर सारख्या मोठया शहारात झाली. त्यामुळे विहिगावला आल्यावर तिचं वागणं-बोलणं व सर्वांमध्ये मिसळनं इथल्या मुला-मुलींना एकदम इम्प्रेस करायचं. बोल्ड वागणारी सारिका जेवढी फटकळ तेवढीच ती मनाने मृदू व सालस. बारावी नंतर इतर मुलींप्रमाणे तिलाही खूप शिकायचं होतं पण, तिच्या वाटयाला अल्प कॉलेजजीवन आलं. परिस्थितीने तिला स्वप्नांच्या दुनियेत रमन्याआधीच प्रपंचाकडे वळवलं . मुलीने सुखाने संसार थाटावा व त्यात रमावं ही आई-वडिलांची इच्छा असते त्याला सारिकाचे आई वडीलही अपवाद नव्हते.सर्वांनी सारिकासाठी वर निवडला सर्वांना आवडलेही यजमान. मात्र, हिला काहीकेल्या आपल्या जीवनपटाचा हिरो आवडेना. आता, ती दोन गुणी लेकारांची आई आहे. साहिल  नुकताच कॉलेजला गेला तर मुलगी भूमी ही 10वी कडे वाटचाल करित आहे, आता तिला जीवनपटाचा हिरोचं बॉलीवडुच्या शहंशाहप्रमाणे वाटू लागला आहे.

       आपल्या  उपक्रमाच्या पहिल्या सेगमेंटमध्ये यजमानांशी अरेंजमॅरेजपध्दतीने जुळलेल्या रेमीगाठीबाबत मजेशीर किस्से सांगतांनाच संसारपटाच्या सुरुवातीच्या काळात घरातील ज्येष्ठ सदस्याच्या अंगावर चुकून पडलेली भाजी व त्यातून उडालेली धांदल हा किस्सा ऐकून हशा पिकला. आवडी- निवडी जाणून घेताना रिताने आम्हाला सांगितलेली तुझी झोपेची आवड आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या आवडीपायी तू या चित्रपटाचे केलेले  100 वेळा पारायण आमच्या भूवया उंचावून गेले. फोटोसोबत संवाद साधतांना तुझा हिरोईन स्वरूपातील फोटो आविष्कार व त्याची जन्म कहाणी ऐकून मजा आली. तुला पंख दिले तर सर्व मित्रांना भेटून येण्याची व त्यातही  स्वित्झर्लंडमध्ये पहिली भेट अमोल ठाकरेची घेण्याची तुझी कल्पकताही आम्हाला भावली.

 

  झटपट संवादात तुझे विहीगाव वरील प्रेम, बोरकर सरांचे लेक्चर बोअर होत असल्याने त्यांच्या चेह-यावर घडयाळीच्या काचेचे तिरीप चमकवण्याचा म.ज्यो.फुले शाळेतील अविस्मरणीय प्रसंग.आयुष्यात उच्च शिक्षण घेण्याचं व काही करून दाखवण्याचं स्वप्न अपूर्ण आहे मात्र, भविष्यात स्वत:ची ओळख निर्माण करणारा एखादा उद्योग थाटण्याचा तुझा मानस स्तुत्य आहे. बाकी आपल्या वाळवंटातील फुल सतत टवटवीत रहावीत ही तुझी आपल्या मैत्रिची प्रबळ भावनाही भावली.   

  प्रिय सारिका, काका (तुझे वडील) अत्यवस्थ असल्याने त्यांच्या तब्येतीची ममताकडून जातीने झालेली विचारपूस मैत्रिचा अर्थ अधोरेखित करून गेली. आज तुझ्याकडे आयत्यावेळी पाहुने आले त्यात तू ठरल्या नियोजनात व्यत्यय नको म्हणून मैत्रिसाठी वेळ काढलास आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यासाठी आमच्या सर्वांकडून तुझे आभार,अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.

                                                                     (रितेश मोतीरामजी भुयार)

                                              ***


                                                                                         







 

Thursday, September 3, 2020

Performing KIRTAN after 10 Years -Part 1

मजेशीर  किस्सा

👆या किर्तनातील टाळकरी हे पहिल्यांदा कीर्तनात टाळकरी म्हणून उभे झाले.
(आपली काम आटोपून पंचपती भजनात जाणारी मंडळी आहे ही,   मी त्यांच्यावर विश्वास टाकला व हे तुम्ही करू शकता अस म्हटलं तर ते तयार झाले)

◆संवादिनीवरील आजोबांकडे सायं काळी 6 वाजता भेटायला गेलो(आमच्या मोहल्यात राहतात, खूप तयार आहेत) ते म्हटले तब्येत बरी नाही. पण, विनंती केली त्यांना मग त्यांना कीर्तनाची रुपरेषा थोडक्यात समजावून सांगितली.ते ही आयत्यावेळी तयार झाले.

◆तबलावादक घरा शेजारीच असतो तो भजनाला निघाला होता कीर्तनाच्या  5 मिनिटांआधी त्याला विनंती केली. (किर्तनासाठी मृदंन आयत्यावेळी आणला होता तो स्वरात लावणे आदी वेळ जाईल म्हणून त्याने स्वतः जवळचा तबलाच घेतला) 

◆यातील गायकाच्या मात्र मी संपर्कात होतो (ते घराशेजारील काका आहेत, परतवाडा डेपोत एक हॉटेल आहे तिथे आचारी आहेत) त्यांना मी कीर्तनाचा अभंग सांगितला तो पाठ करून घेतला किर्तनातील प्रमाण (प्रसंगानुरूप गावयाचे विविध अभंन समजावून संगीलते नव्हे नव्हे त्यांच्या समोर कीर्तनाची तालीमही केली दोन तीन वेळा).

◆कीर्तनाला लागणारा वीणा, टाळ आणि मृदुंग (मारोती महाराज संप्रदायाची मंडळी) आणायला सुद्धा मला जावं लागलं होतं.

◆फेटाही स्वतःचं बांधला तब्बल १० वर्षांनंतर 


 कीर्तनाच्या दिवशी दुपारी ३ वाजता दिल्लीहून पोचलो होतो, घरी पोहचल्या नंतर निवांत तालीम, थोडा सराव हे करण्या ऐवजी उपरोक्त सर्व सर्कस करावी लागली होती. त्यात या कीर्तनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग  करायचेही ठरवले होते तेही नियोजन आणि याच किर्तनाचे Facebook live ही केले त्यासाठी मित्रांना व्यवस्थित सूचना आदी किरकोळ बाबीकडे लक्ष.

हे कीर्तन म्हणजे १० वर्षां नंतर मला स्वतःला या मंचावर सिद्ध करायचं होतं हे मी स्वतःला दिलेलं चॅलेंज होतं.


ही सर्व पार्श्वभूमी आहे या कीर्तनाला


आयोजकांनी फक्त प्रेमाने मंच उपलब्ध करून दिला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर

महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान

 ➡️  राजधानीतून...

महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान; राज्याला एकूण १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार



https://mahasamvad.in/?p=21224