(काही वेळेस आपली चूक आपल्या लक्षात येण आणि जवळच्यांनीही आपल्याला त्याची जाणीव करून देण फार गरजेचे असते)
आयुष्याच्या
टप्प्यावर आपण वेग-वेगळया जबाबदा-यांचे वहन करीत असतो. त्यात, पती व बापाची भूमिका
बजावताना आपण जीवावर उदार होऊ शकतो हा अनुभव आज आयुष्यात पहिल्यांदा घेतला. बायको-मुलासाठी
थेट धावत्या रेल्वे गाडीतून उडी मारण्याचा हा अनुभव होता जो, आत्म परिक्षणाची निकड
निर्माण करून गेला आणि आपण जबाबदार आहोत की बेजबाबदार हा प्रश्न उपस्थित करून गेला.
मुळ प्रसंग
:-
आज
बुधवार, दिनांक ४ जुलै २०१८ ला पत्नी सोनाली,
मुलगा स्वरित आणि आकडसासूबाई अनुराधाताई हे पातालकोट एक्सप्रेस ने दिल्लीत येणार होते. तब्बल २ महिन्या नंतर पत्नी
व मुलाला भेटत असल्याचा प्रंचड आनंद होता तेवढी काळजी ही. सकाळी लवकर उठून या मंडळींना घ्यायला दिल्लीतील सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशनवर जायचे नियोजन
आदल्या दिवशी ठरले होते, त्यानुसार रात्री झोपी गेलो मात्र काळजी पायी साडेतीन वाजताच
जाग आली मग काही झोप येईना. तेवढयात मध्यरात्री सोनालीचा फोन आला, ‘आम्ही बल्लभगडला
पोचलो. कदाचित ट्रेन लवकर आहे तर तसे नियोजन कराल !’ त्यानुसार मी सर्व नव्याने नियोजन
करायला घेतल. एवढयातच नवीन रूम शिप्ट केली असल्याने सराय रोहिल्ला स्टेशला कस जायच
किंवा त्या अगोदर कुठलं स्टेशन लागते ते इंटरनेटवर सर्च केल मग पटेल नगर रेल्वे स्टेशन
राहत्या टागौर गार्डन परिसरातून जवळ पडेल तेव्हा तिथेच या मंडळीला उतरावयास सांगावे
हे नवे माझेच नियोजन तयार झाले होते. मात्र याला थोडी अडचण अशी होती की पटेलनगरला या
रेल्वेचा थांबा नाही मात्र ती अगदी अल्पवेळ थांबते. सोनाली सोबत याविषयी चर्चा झाली
व पटेल नगरलाच उतरायचे निश्चीत झाले. ट्रेन रेल्वे स्थानकावर आली. इथे मात्र थोडी चुकामुक
झाली. ही मंडळी प्लॅट फॉर्मच्या एका बाजुस उतरले व मी दुस-या बाजुला
त्यांना शोधत होतो रेल्वे आता रेल्वे स्थानकाहून
निघायला लागली ही मंडळी ट्रेन मध्येच तर नाही ना राहीले असावेत असा विचार करून मी ट्रेन
मध्ये चढलो. आता एका एका डब्यात यांना शोधत होतो तेवढयात बायकोचा फोन आला आम्ही तर
ट्रेन मधून उतरलो आहोत ! तूम्ही कुठे आहात? अजून इथे दिसत नाहीत. तेव्हां मी ट्रेन
मध्ये होतो बायकोला सांगितले तर ती म्हटली पुढील स्टेशनवर ट्रेन थांबल्या नंतर सावकाश
उतरा व परत या. मात्र, पटेल नगर स्टेशन चा
परिसर बघता या मंडळीस रेल्वे स्टेशनवर एकटे सोडणे मला खूप असुरक्षीत वाटले . पण आता
ट्रेन रूळाहून धावत होती अशात ट्रेनचा वेग कमी होण्याची वाट मी पाहत होतो व ट्रेन मधून
उडी मारता येईल का हा विचार करीत होतो. मात्र, मला हिम्मत होत नव्हती . शेवटी खाली
छोटे छोटे दगड, छोटीसी वस्ती असे पाहून मी धाडसाने ट्रेनमधून उडी मारली. आता, मात्र
मला काहीच कळायला मार्ग नव्हता उडी घेतल्यावर एकाएकी माझ अंग बधीर झाल, पायातील चप्पल
बाजुला पडली, आणि रूळाहून रेल्वे पुढे जात होती तेव्हढयात लांबूनच लोक म्हणू लागले,
‘लगा तो नही भैय्या’ आणि मी ही निरागस पणे
त्यांना सांगत होतो अभी कुछ समझ नही आ रहा . मी उठलो मात्र मला चालता येईना पूर्ण अंग
अंग दुखू लागल होत आणि माझ्या डाव्या हाताच्या तळव्याला ब-यापैकी खरचटल होतेा व त्यातून
रक्त वाहू लागल होत. अशात बायकोला फोन केला तिला सांगीतल तुम्ही तिथेच थांबा मी पोहचतो
आहे. आणि अशातही मी रूळाहून धावत होतो व शेवटी
मी माझ्या बायको मुलांजवळ पोहचलो त्यांना घेऊन घरी सुखरूप पोहोचलो.
बेजबाबदारपणा : ज्यांना आधिच नवीन रूम किंवा या नव्या रेल्वे स्टेशन बद्दल माहित नाही अशा घरच्या
मंडळींना पुरेशी कल्पना न देता वेळीच नियोजनात केलेला बदल पूर्णपणे चुकीचा. त्यात चालत्या
रेल्वे गाडीतून उडी मारण्याचा प्रकार पूर्णपणे निंदणीय व बेजबाबदार कारण, जर का वाईट
घडले असते तर? हा पूर्णपणे आपल्या वर निर्भर तसेच स्वकीयांपुढे चिंता निर्माण करण्याचा आत्मघातकी निर्णय
वाटतो.
खुडी जबाबदारी : बायका पोरांसाठी एवढी टोकाची भूमिका घेतली हे थोडया
वेळासाठी पटण्यासारख मात्र पूर्णपणे बेजबाबदार वर्तन.
गेल्या काही वर्षांपासून
आमच्या नात्यांमध्ये कर्ते पुरुष जाण्याच्या घटना घडतआहेत. आकडसासुचे पती, ४ वर्षात
दोन काकांचा अकाली मृत्यू आणि काल परवा काकुच्या बहीणीच्या पती निधन. या सर्व घटणांमुळे
घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबाची किती वाताहत होते आणि नभरून निघणारे नुकसान
होते याचा अनुभव ताजा असताना माझ्या बेजबाबदार कृत्याचा पश्चाताप होतो हे मात्र, खरे.
या प्रसंगातून खूप मोठा धडा शिकलो व एक जबाबदार मुलगा,पती,बाप,भाऊ म्हणून मी असा प्रकार
कधीच करणार नाही हे मनोमन ठरविले आहे.
******






























